आ.बाळासाहेब मुरकुटेंची बदनामी करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा.

नेवासे :- तालुक्यातील मुरकुटे व गडाख गटातील कार्यकर्ते एकमेकांच्या नेत्यांची व पक्षाची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर मागील काही दिवसांपासून करत आहेत. त्याची परिणीती रविवारी गुन्हा नोंदवण्यात झाली. आमदार बाळासाहेब मुरकुटे राष्ट्रवादीच्या वाटेवर, माजी आमदार चंद्रशेखर घुले, अजित पवार आणि आमदार मुरकुटे यांची पुण्यात गुप्त बैठक अशी बातमी व घुले हे आमदार मुरकुटे यांचा पुष्पगुच्छ … Read more

कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी.

नेवासा :- 2014 साली शेतामधून जाण्यासाठी रस्ता द्यावा म्हणून सांगीतल्याचा राग आल्याने एकास कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी ए. एल. टिकले यांनी विलास श्यामराव कर्डिले (रा. जेऊर हैबती ता. नेवासे) याला दोषी धरून तीन वर्षे सक्तमजुरी व ७५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.  फिर्यादी कर्डिले यांना शेतात जाण्यासाठी … Read more

राष्ट्रवादीच्या नगरसेवकावर गुन्हा दाखल.

श्रीरामपूर :- नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत नगरसेवक पदासाठी भरण्यात आलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या शपथपत्रात खोटी माहिती व वार्षिक उत्पन्नाचा तपशिल निरंक दाखवून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची दिशाभूल केली. या कारणावरून राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र जगन्नाथ पवार यांच्याविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नगरसेवक राजेंद्र पवार यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे काँग्रेसचे पराभूत उमेदवार संजय जगन्नाथ छल्लारे … Read more

संगमनेरात बंदुकीचा धाक दाखवून ३६ लाखांची जबरी चोरी.

संगमनेर :- बँकेच्या एटीएममध्ये भरणा करण्यासाठी जाणार्‍या एका खाजगी कंपनीच्या दोघाना वडगाव लांडगा शिवारात चार अज्ञात दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत त्यांच्या जवळील 36 लाख रुपयांची रक्कम लुटून पोबारा केल्याची घटना काल 10 जानेवारी रोजी दुपारी घडली. संगमनेरच्या कॉर्पोरेशन बँकेतून 26 लाख आणि बँक ऑफ बडोदातून 10 लाख अशी एकूण 36 लाख रुपयांची रोख रक्कम काढून … Read more

धनादेश देणे पडले महागात,कंत्राटदाराला तीन महिने कैद.

कोपरगाव :- अमृत संजीवनी शुगर ट्रान्स्पोर्ट कंपनीसोबत काम करणाऱ्या धुळे जिल्ह्यातील विंचूर येथील ऊसतोडणी वाहतूकदार प्रकाश गंगाराम देसलेला धनादेश देणे महागात पडले आहे. ४ लाख ८० हजार रुपये नुकसान भरपाईचे आदेश. देसले याने कंपनीकडून घेतलेली उचल रकमेची परतफेड केली नाही व त्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याने कोपरगाव येथील न्यायदंडाधिकारी पी. एन. देशपांडे यांनी आरोपीस तीन … Read more