कारागृहातील १७५ कैद्यांची महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी

अहिल्यानगर – अहिल्यानगर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत १०० दिवसीय प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानात अहिल्यानगर जिल्हा कारागृहातील १७५ कैद्यांची आरोग्य तपासणी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली. मंगळवारी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. क्षय रोगमुक्त अहिल्यानगर करण्यासाठी शासनाच्या अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. मंगळवारी सकाळी शहरातील सबजेल कारागृह … Read more

आढळा कालवे दुरुस्ती कामात भ्रष्टाचाराचा आरोप ; भाजपचे वाकचौरे यांचा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार अर्ज

२२ जानेवारी २०२५ अकोले : तालुक्यातील अकोले, संगमनेर आणि सिन्नर तालुक्यांतील १५ गावांना सिंचन उपलब्ध करणाऱ्या आढळा धरणावरील कालव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे प्रदेश सदस्य आणि माजी गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी केला आहे.त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज सादर केला आहे. आढळा धरणातून उजव्या आणि … Read more

‘मुळा-प्रवरा’ ची तातडीने निवडणूक घ्या ; भोसले यांची मागणी !

२२ जानेवारी २०२५ श्रीरामपूर : येथील मुळा प्रवरा वीज संस्थेने निवडणूक घेण्यासाठी लागणारा खर्च देण्यास टाळाटाळ केल्यामुळे संस्थेच्या निवडणूकीचे सध्या तळ्यात मळ्यात सुरू आहे.दरम्यान,मुळा प्रवरा सहकारी संस्थेची निवडणूक शासनाने तातडीने घ्यावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन २०१५-१६ ते सन २०२०-२१ पर्यंत … Read more

संगमनेरात चक्क पाळीव कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल

२२ जानेवारी २०२५ संगमनेर : कुत्रा अंगावर आल्याने झालेल्या अपघातामध्ये महिला जखमी झाल्याने या महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी चक्क शहरातील एका डॉक्टरांच्या पाळीव कुत्र्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, संगमनेर शहरालगत असणाऱ्या घुलेवाडी गावाच्या शिवारातील नवशीचा मळा येथे ही जखमी महिला राहते. या महिलेच्या घराजवळच डॉ. पानसरे हे राहावयास … Read more

डंपरची दुचाकीला धडक ; सेवानिवृत्त जवान ठार

२१ जानेवारी २०२५ राहुरी खुर्द / आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हे दि. २० जानेवारी २०२५ रोजी सकाळी त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात असताना राहुरी खुर्द येथे एका डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.त्याचवेळी दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून गोकुळदास दातीर हे जागीच ठार झाले. याबाबत सूत्रांकडून समजलेली … Read more

Shirdi News : शिर्डीत आणणार मदर डेअरी चा मोठा प्रकल्प !

२१ जानेवारी २०२५ कोपरगाव : “केवळ नफा मिळविणे हे सहकाराचे ध्येय नसून समाजाचा आणि सभासदांचा उत्कर्ष सहकाराचा खरा उद्देश आहे.दूध उत्पादक व सभासद हे खरे दूध संघाचे मालक आहेत.दूध संघात उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ बसला पाहिजे.उत्पन्नापेक्षा खर्च कमी पाहिजे, तरच सहकारी संस्था नफ्यात राहतील,” असे असे प्रतिपादन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. कोपरगाव … Read more

सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये घडेल – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर: आपल्या मंदिरांसमोर थडगे उभारायचे आणि हळूहळू पाय पसरायचे आणि नंतर वक्फ बोर्ड हक्क सांगणार. सिद्धटेक नंतर बालिकाश्रम रस्त्यावरील थडगे काढण्यासाठी महापालिकेकडे पत्र व्यवहार केला आहे. ३१ तारखेच्या आत काढले नाही तर सिद्धटेकला जे घडले ते अहिल्यानगरमध्ये देखील घडेल. आपल्या धर्माचा योग्य विचार व प्रचार समाजामध्ये घेऊन जाण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे. धर्माच्या माध्यमातून … Read more

Ajit Pawar घेणार मोठा निर्णय ! राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय काय बदलणार ?

शिर्डी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून शिर्डी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पक्षामध्ये मोठ्या संघटनात्मक बदलांची तयारी सुरू आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत फेरबदल करणे, स्थानिक तसेच राष्ट्रीय पातळीवर नवीन नेतृत्व निर्माण करणे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे या उद्दिष्टांवर अधिवेशन केंद्रित आहे. अजित पवार गटाची संघटनात्मक रणनीती शिर्डीच्या अधिवेशनस्थळी पोहोचण्याआधी अजित … Read more

Shrirampur Breaking : हवेत गोळीबार आणि चाकूचे वार; श्रीरामपूर शहरात भीतीचे वातावरण ! नागरिक घाबरले

श्रीरामपूर: शहरातील वॉर्ड नं. २ मधील घासगल्ली भागात काल (शुक्रवारी) सायंकाळी दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात वाद उफाळून तुफान हाणामारी झाली. या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांवर जोरदार हल्ला करत चाकूने वार केले, ज्यामुळे तिघेजण गंभीर जखमी झाले. याशिवाय, एका व्यक्तीने हवेत गोळीबार केल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. वादाचं कारण काय ? घटनेची सुरुवात राहाता तालुक्यातील एका … Read more

‘त्या’ परिसरात अजूनही चार बिबटे ! वनविभागाने लावले पुन्हा दोन पिंजरे

अहिल्यानगर : नगर तालुक्यातील भोरवाडी गावच्या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून वावर असलेल्या पाच बिबट्‌यांच्या पैकी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी (१५ जानेवारी) रात्री जेरबंद झाला आहे. जेरबंद झालेला हा बिबट्‌याचा अंदाजे दीड वर्षाचा बछडा असून अजूनही या परिसरात नर, मादी बिबट्यासह दोन बछड्यांचा वावर असल्याचे वनविभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात दिसून आले आहे. त्यामुळे … Read more

साईच्या नगरीत आजपासून राष्ट्रवादीचे मंथन शिबीर ! अजित पवार यांच्यासह मंत्री, खासदार, आमदार व पदाधिकारी यांची उपस्थिती

दिशा विकासाची.. पुरोगामी विचाराची हे ब्रीदवाक्य व नवसंकल्प घेऊन २०२५ या वर्षभरात सामाजिक समता, विकासाच्या वेगवेगळ्या दिशा, पक्ष संघटन मजबूत करणे यासह इतर विषयांवर मंथन करण्याकरिता साईबाबांची पुण्यभूमी शिर्डी नगरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय पदाधिकारी शिबिर आजपासून सुरू होत आहे. या शिबिरास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासह पक्षाचे मंत्री, खासदार, आमदार … Read more

‘एमआयडीसी’मध्ये उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार – आमदार हेमंत ओगले

श्रीरामपूर : एमआयडीसी मधील प्रश्नाबाबत आपण गंभीर असून मोठे उद्योग श्रीरामपूरात कसे येतील, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी केले. येथील एमआयडीसीतील कार्यालयात अधिकाऱ्यांसमवेत नुकतेच उद्योजकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते आमदार ओगले म्हणाले की, २२० केव्हीचे उच्च दाब वीज स्टेशनचे काम लवकरच चालू होणार असून यासाठी आपण महापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव … Read more

Shirdi Breaking : शरद पवार गटाला मोठा धक्का ! शिर्डीत होणार ‘त्या’ आमदारांचा पक्षप्रवेश

शरद पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण पुन्हा अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे, कारण याआधीच विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांनी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केला होता. आता मात्र ते पुन्हा अजित … Read more

संगमनेरातील सलूनच्या दरात वाढ ! नाभिक समाजाच्या बैठकीत निर्णय

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर शहर व तालुक्यातील सलूनच्या दरामध्ये (दि. १) जानेवारी पासून वाढ करण्यात आली आहे.तालुक्यातील नाभिक समाज बांधवांच्या बैठकीत दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती तालुकाध्यक्ष बाबा जाधव व शहराध्यक्ष रमेश सस्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सलूनसाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांच्या किंमतीत मोठ्या प्रमाणवर वाढ … Read more

मांजाचा फास लागल्याने तरूण जखमी ! आश्वी खुर्द येथील घटना, विक्री बंद करण्याची मागणी

१४ जानेवारी २०२५ आश्वी : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील संजय बबन कहार हे काल सकाळी गावातून घरी जात असताना चायना मांजाचा गळ्याला फास लागल्यामुळे ते जखमी झाले.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संजय बबन कहार (वय ३५, रा. आश्वी खुर्द, बाजारतळ रस्ता) हे नित्याचे काम उरकुन घरी जात असताना येथील आश्वी दाढ-आश्वी खुर्द रस्त्यावर काही मुले पतंग … Read more

जलजीवन योजना जनतेसाठी की अधिकारी, ठेकेदारांसाठी ? खा. लंकेंचा कारवाईचा इशारा

१४ जानेवारी २०२५ राहुरी शहर : जलजीवन योजना ही जनतेच्या सेवेसाठी आहे की अधिकारी ठेकेदारासाठी आहे, हेच समजत नाही. त्यासाठी या प्रश्नावर संसदेच्या येत्या २९ जानेवारी रोजी होणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून जलजीवन योजनेची चुकीची बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी खासदार निलेश लंके यांनी दिला. राहुरी तालुक्यात घेतलेल्या आढावा बैठकीत … Read more

शिर्डीत अज्ञात इसमाची गळफास घेऊन आत्महत्या

१४ जानेवारी २०२५ शिर्डी : शहरातील नगर-मनमाड रस्त्याजवळ असलेल्या फुल मार्केट जवळील एका शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन एका अज्ञात इसमाने आत्महत्या केल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी उघडकीस आली.याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी,की मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० ते ५५ असून त्याने पांढरा हाफ शर्ट आणि पॅन्ट परिधान केली होती. त्याच्या हातावर ‘सुवर्णा’ असे … Read more

संगमनेरच्या विकासात निधी कमी पडणार नाही : उपमुख्यमंत्री शिंदे

१४ जानेवारी २०२५ संगमनेर : संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या प्रलंबित विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.त्यावर संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. खताळ यांना दिला. संगमनेर विधानसभा मतदारसंघात गेली ४० वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्यासाठी आ. खताळ … Read more