शेवगाव तालुक्यातील बसस्थानकामध्ये बसच्या चाकाखाली चिरडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

शेवगाव- छत्रपती संभाजीनगरला नातवासोबत जाणाऱ्या एका महिलेचा राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागच्या चाकाखाली सापडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी बसस्थानकाच्या आवारात घडली. या प्रकरणी शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यू झालेल्या महिलेचं नाव मथुराबाई मधुकर पटारे असं आहे. त्या पाथर्डी तालुक्यातल्या निंबेनांदूर गावच्या रहिवासी होत्या. त्या आपल्या नातवाला घेऊन छत्रपती संभाजीनगरला … Read more

राहुरी : १० नंतर डीजे वाजवला तर थेट ५ लाखांचा दंड आणि ६ महिने जेल

राहुरी : राज्य शासनाच्या १०० दिवस कृती कार्यक्रमांतर्गत प्रशासनाने ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यासंदर्भात नुकतीच एक बैठक घेण्यात आली, ज्यात मंगल कार्यालय आणि लॉन्स मालक, डीजे व साऊंड सिस्टीम व्यावसायिक, उपविभागीय अधिकारी बसवराज शिवपुंजे, पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलिसांनी स्पष्ट केले की, रात्री १० नंतर … Read more

कर्जत-जामखेडमध्ये कुस्तीचा ‘महाकुंभ’; महाराष्ट्र केसरीसाठी स्टेडियम सज्ज!

कर्जत-जामखेड मतदारसंघात प्रथमच होणाऱ्या ६६ व्या ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेची जोरदार तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने आयोजित ही स्पर्धा २६ ते ३० मार्च २०२५ दरम्यान कर्जत येथे रंगणार असून, आमदार रोहित पवार मित्र परिवार आणि अहिल्यानगर जिल्हा तालीम संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कुस्ती महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. राज्यभरातील … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव लाखोंची वाहने मिळणार कमी किमतीत

शेवगाव तालुक्यात गौण खनिजांचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या वाहनांवर तहसील कार्यालयाने कठोर कारवाई केली आहे. या कारवाईत पकडण्यात आलेली काही वाहने तहसील कार्यालयात आणली गेली होती. मात्र, या वाहनांच्या मालकांनी दंड भरून वाहने नेण्यास टाळाटाळ केल्याने, आता ही पाच वाहने जाहीर लिलावाद्वारे विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा लिलाव बुधवार, २६ मार्च २०२५ रोजी … Read more

माव्यानंतर आता नशिली पानं अहिल्यानगर जिल्ह्यातील ह्या तरुणाईला लागलं नवं व्यसन!

अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या पान टपऱ्यांभोवती तरुणांची गर्दी वाढताना दिसत आहे. गुटखा बंदीनंतर माव्याकडे वळलेली तरुणाई आता पानाच्या नशेकडे आकर्षित झाली आहे. ठराविक वेळेला या टपऱ्यांवर तरुणांचा गराडा पडतो, जे विशिष्ट प्रकारच्या पानांसाठी येतात.या पानांमध्ये नशायुक्त घटकांचा समावेश असल्याने त्याची सवय जडत असल्याचे दिसून येते. ही बाब समाजासाठी आणि तरुणांच्या … Read more

पारनेरसाठी आमदारांचा मास्टर प्लॅन! टाकळी ढोकेश्वरला मिळणार का एमआयडीसी ?

पारनेर तालुक्यातील स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आमदार काशिनाथ दाते यांनी राज्य सरकारकडे भाळवणी आणि टाकळी ढोकेश्वर परिसरात विस्तारित एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) उभारण्याची मागणी केली आहे. विधानसभेत अर्थसंकल्पीय मागण्यांवरील चर्चेदरम्यान त्यांनी ही मागणी मांडली. पारनेर हा दुष्काळी मतदारसंघ असून, येथील आर्थिक विकास आणि रोजगार निर्मितीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांचे मत … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावात गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या !

अहिल्यानगरमधून एक दोन गटात तुंबळ मारहाणीची बातमी समोर आली आहे. राहुरीमध्ये ही भांडणे झाले असून गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या दोन गटात झाल्या आहेत. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून या घटनेत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गौरव राजेंद्र रणसिंग (वय २२, रा. आझाद चौक, राहुरी) याने राहुरी … Read more

कर्जतमध्ये पाणीटंचाईचा धोका ! ‘अवैध पाणी उपसा’ केल्यास थेट गुन्हा

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक ठिकाणी जलस्रोतांची पातळी खालावली असून, ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलावांचे पाणी जून २०२५ पर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तलावांमधून अवैध आणि अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, यासाठी … Read more

जिवंत सातबारा मोहीम आणि अहिल्यानगरच कनेक्शन ! शेवगावचा सुपुत्र, राज्यात हिरो

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष काकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम आता राज्यभर राबवली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाला यासंबंधी शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांना होणारी ससेहोलपट संपुष्टात येण्यास मदत होणार असून, राज्यातील … Read more

जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ! ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता गती घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुधारणा व विकासकामांना गती मिळेल. शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच भूमिगत गटार व पाणीपुरवठा पाइपलाइन यांसाठी … Read more

यांत्रिक युगात गाढवांचीही वाढली किंमत : मढीच्या बाजारात गाढवांना मिळाली इतकी मोठी किंमत

अहिल्यानगर : मढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी आली होती. यावर्षी गाढवांच्या खरेदी विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे बोलले जात होते. श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात मोठा चर्चेचा विषय मानला जातो. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मधून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी येतात आणि या खरेदी … Read more

अतिक्रमण, खंडणी, मारहाण… पाथर्डीत कायदा सुव्यवस्था आहे का ?

पाथर्डी तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून, याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मौन बाळगल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे सरचिटणीस प्रताप ढाकणे यांनी केला आहे. तालुक्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारी वाढत असून, खंडणी मागणारे, अतिक्रमण करणारे आणि मारहाण करणाऱ्या गुंडांची दहशत वाढली आहे. शेवगाव रोडवरील काही लोकांनी सार्वजनिक व खासगी जागांवर बेकायदेशीर अतिक्रमण केले असून, मूळ मालकांना … Read more

श्रीगोंद्यात गुंडांची दहशत ! आमदार विक्रम पाचपुते आक्रमक

श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने … Read more

नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर मढी यात्रेबाबात पोलीस प्रशासन सतर्क; घेतला मोठा निर्णय: पोलीस बंदोबस्त देखील केले बदल

अहिल्यानगर : सध्या राज्यातील प्रसिध्द अशी मढीची यात्रा सुरू आहे .मात्र त्यात नागपूरमध्ये झालेली दंगल व स्थानिक वादाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र मढी येथे यावर्षी प्रचंड बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे तीन लाख भाविकांची मंगळवारी सायंकाळपर्यंत मढी येथे गर्दी झाली होती. रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस आहे. त्यानंतर बहुसंख्य यात्रेकरू नाथषष्ठीसाठी पैठण येथे जातील. … Read more

मढी-मायंबा यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सोयीसाठी मोहटा देवस्थानने घेतला मोठा निर्णय

अहिल्यानगर : पाथर्डी तालुक्यातील मढी येथील यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना मोहटा देवस्थान समितीतर्फे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने यावर्षीसुद्धा घेतला आहे. येत्या गुरुवारपर्यंत भाविकांच्या सोयीसाठी अहोरात्र मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मढी ,मायंबा व वृद्धेश्वर येथे रंगपंचमीच्या दिवशी येतात. भाविकांच्या गर्दीपुढे मंदिरांची दर्शनाची वेळ कमी … Read more

पारनेर तालुक्यात गुरू शिष्याच्या नात्याला फासला काळीमा ; शिक्षकानेच केला विद्यार्थिनीचा विनयभंग

अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील पठार भागावरील एका गावात शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग करण्याची घटना घडली. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गावात कडकडीत बंद पाळत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. दरम्यान, याप्रकरणी साहेबराव जऱ्हाड या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला असून, त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. दरम्यान ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या … Read more

श्रीगोंद्याच्या यात्रेत दुर्दैवी घटना! खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यात्रेत फुले, तोरण आणि खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुशी अनिल भोसले असे या मुलीचे नाव असून, ती मूर्तिजापूर तालुक्यातील सिलगुंडी गावची रहिवासी होती. यात्रेच्या शेवटच्या दिवशी उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खुशीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे … Read more

पारनेरचा अश्लील बोलणारा आणि छळ करणारा शिक्षक अखेर अडकलाच !

पारनेर तालुक्यात एका प्रतिष्ठित शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या ५८ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन केल्याची घटना उघडकीस आली आहे. साहेबराव जऱ्हाड असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून, पारनेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, साहेबराव जऱ्हाड यांनी मागील … Read more