‘या’ आमदाराने दिला कोविड सेंटरला ‘प्राणवायू’

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :-कोरोनाबाधित रुग्णांना चांगले उपचार मिळून तो लवकरात लवकर बरा व्हावा, हाच अट्टहास कायम राहिलेला आहे. याच दृष्टीकोनातून केवळ सामाजिक बांधिलकीतून आमदार रोहित पवार यांनी जामखेड येथील आरोळे कोविड सेंटरला बारामती अॅग्रोच्या माध्यमातून ५० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर मशीन भेट दिल्या. आ. पवार हे नाविन्यपूर्ण व प्रभावी उपाययोजनांद्वारे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात … Read more

जिल्ह्यातील ह्या ठिकाणी जबरी चोरी ! सोने-चांदी दागिन्यासह..

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- पारनेर तालुक्यातील राळेगणथेरपाळ येथील अशोक सीताराम सालके या शेतकऱ्याच्या घराचा आतील दरवाज्याचा कोंडा कटावणीने तोडून घरात घुसलेल्या चोरट्यांनी सहा तोळे सोन्याचे दागीने लंपास केले. शुक्रवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अशोक सालके, त्यांची पत्नी, मुलगा तसेच सून हे रात्री बारा वाजण्याच्या सुमारास … Read more

जे व्हायला नको होत तेच झाले… अखेर अहमदनगर मध्ये कडक लॉकडाऊन !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नगर शहरामध्ये कोरोना चा प्रादुर्भाव विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे कोरोना चा संसर्ग तोडण्यासाठी अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने सात दिवसाचा कडक लॉक डाऊन जाहीर केला आहे. उद्या रात्री बारा वाजल्यापासून ते 10 मे पर्यंत … Read more

गुरे चारण्यासाठी गेलेल्या आजी – नाती परतल्याच नाही…

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-आजी नातीचा बंधाऱ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील येथे चिंचोली गुरव येथे घडली आहे. शुक्रवारी दिनांक ३० एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत भक्ती एकनाथ आभाळे (वय ७) व प्रमिला श्रीराम आभाळे (वय ४५) असे मृत्यू झालेली आजी नातीचे नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी … Read more

संगमनेर कारखान्याने तैवान येथून केली ऑक्सिजन प्लॅन्ट खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-राज्यातील जनसामान्यांचे नेते व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ५०० बेडचे अद्यावत कोवीड केअर सेंटर सुरू केले असून या कोविड सेंटर करिता व इतर रुग्णालयांत करिता लागणा-या ऑक्सिजनसाठी कारखान्याच्या वतीने तातडीने तैवान येथून स्कीड माऊंटेड ऑक्सिजन प्लांटची खरेदी करण्यात आली … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या मृतदेहाचे गूढ उकलले

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-पारनेर तालुक्यातील मनकर्णिका नदीपात्रात २३ एप्रिलला आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले आहे. तरसासारख्या जंगली प्राण्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन वरखेडमळा परिसरात राहणाऱ्या उत्तम अर्जुन औटी (वय ५९) यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. मानेवर, डोक्याला, तसेच चेहऱ्यावर जखमा असल्याने मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाले होते. मृतदेह ग्रामीण रुग्णालयात नेण्यात … Read more

आज ३७५३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४२१९ बाधितांची रुग्ण संख्येत भर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६६ टक्के

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३७५३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५३ हजार ५५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४२१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

कोविड सेंटरमध्ये रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही सुद्धा सेवा

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कोविड संकटामुळेच सर्वांना माणुसकी कळाली, पैसा आणि संपत्तीपेक्षाही माणसाला देव महत्त्वाचा वाटू लागला. आरोग्याची काळजी घेतानाच भीती आणि मनाच्या दुबळेपणाला दूर करावे लागणार आहे. कोविड सेंटरमधून माणुसकीची सेवा करणारे कार्य घडू लागले. कोविड सेंटरमधून रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे ही सुद्धा एक माणुसकीची सेवा ठरेल, असा विश्वास समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज … Read more

जंगली प्राण्याच्या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-गेली अनेक महिने जिल्ह्यात बिबट्याने धुमाकूळ घातला होता. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. यातच एका जंगली प्राण्याच्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पारनेर तालुक्यात व परिसरात बिबट्याच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक विशेषतः शेतकरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीचा खून करून पतीने स्वतःलाही संपविले

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जगात पती – पत्नीचे नाते हे सर्वात सुंदर नाते म्हणून ओळखले जाते. आयुष्यभराची साथ देण्याची वचणे देऊन एकेमकांशी लग्नाची लग्नगाठ बांधतात. मात्र व्यसनाच्या आहारी गेलेला पती हे नाते विसरला व दारूच्या नशेत त्याने स्वतःसह आपल्या पत्नीला ठार मारले. दरम्यान हा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे घडला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले ! तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  जिल्ह्यातील कोरोना संकट वाढले आहे कारण प्रथमच तब्बल चार हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.  अहमदनगर जिल्ह्यात 4219 रुग्ण आढळले आहेत,नगर शहरात सर्वाधिक रुग्णवाढ कायम आहे. गेल्या चोवीस तासांत पुढीलप्रमाणे रुग्ण शहर व तालुकानिहाय आढळले आहेत –  अहमदनगर : 817, राहाता : 355, संगमनेर : 377, श्रीरामपूर : 252, नेवासे … Read more

लोक घरात तडफडून मरताहेत !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- नेवासे तालुक्यामध्ये तपासणी किट नसल्याने व ऑक्सिजनसह आरोग्य सुविधाची कमतरता असल्याने लोक तडफडून घरी मरत आहेत, अशा शब्दात माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या, तर खासदार सदाशिव लोखंडे यांनी आम्ही घेतलेल्या बैठकांमधील कोणतेही गोष्टीची पूर्तता झालेली नसल्याने बैठकीला काहीच अर्थ राहिलेला नाही, … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना नगर जिल्ह्यात येऊ देणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. त्यात प्रशासन कुठलीही उपाययोजना करतांना दिसत नाही फक्त पालकमंत्री हसन मुश्रीफ आल्यानंतर कडक लॉक डाऊन करा जनता कर्फ्यु पाळा असे आदेश प्रशासनाला देतात. अणि निघून जातात लॉकडाऊन या शब्दाची सर्वत्र मजाक होताना दिसत आहे. ईतर देशांमध्ये ज्यावेळेस कोरोनाच्या दुसऱ्या तिसऱ्या लाटा येत … Read more

अहमदनगर करांसाठी अत्यंत महत्वाची बातमी दुचाकी वरून प्रवास करण्याआधी हे वाचाच !

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढतच असून राज्यात व जिल्ह्या कडक निर्बंध असूनही रुग्ण संख्या कमी होत नाहीय ह्या पार्श्वभूमीवर आज एक नवा आदेश काढण्यात आला आहे.  जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांकामी अत्यावश्यक सेवा व आदेशात नमुद इतर बाबी वगळता निर्बंध … Read more

चार वाजल्यापासून रांगेत तरीही लस मिळाली नाही …

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे चार वाजल्यापासूनच रांगेत उभे राहून देखील लस न मिळाल्याने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी दवाखान्यातील काचेच्या खिडक्यांवर हात डोके आपटून काचा फोडण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्याकडून समजली. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसगावसह परिसरातील जवळपास पंचवीस-तीस … Read more

पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून दीड लाखांची दारू केली जप्त

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-कर्जत पोलीस पथकाने अवैध दारू विक्री करणाऱ्या तालुक्यातील वेगवेगळ्या ११ ठिकाणी छापे टाकून १ लाख ५५ हजार ८७० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी तालुक्यामधील केलेल्या कारवाईचा आढावा पुढीलप्रमाणे आहे. जाफर बंडूभाई शेख (रा. बेलवंडी), महादेव लक्ष्मण नवले (रा. चांदा), … Read more

शासकीय कोविड सेंटरमध्ये शिरले पावसाचे पाणी, रुग्णांची हाल

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शासकीय कोविड सेंटरमध्ये आज शुक्रवार दि ३० एप्रिल रोजी सायंकाळी 6;30 दरम्यान पावसाचे पाणी घुसल्याने रुग्णांची धावपळ उडाली. विलगीलरण कक्षातील रुग्णांना बेड सोडून अन्य ठिकाणी सहारा घ्यावा लागला. या ठिकाणी संबधित अधिकारी फिरकले नाहीत. सहारा लाँन्स मधील कोविड सेंटर रुग्णांचा सहारा हिरावला गेला. देवळाली … Read more

लसीकरणाच्या मागणीसाठी गुरुजी सरसावले; तहसीलदारांना दिले निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. यातच जिल्ह्यात दरदिवशी भयावह आकडेवारी समोर येत आहे. यामुळे जिल्ह्यात लसीकरण मोहीम हि युद्धपातळीवर सुरु करण्यात आली आहे. यातच आता फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांनी लसीकरणाची मागणी केली आहे. कोरोना संकटकाळात तालुक्यातील प्राथमिक शिक्षक गेल्या वर्षभरापासून फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम करीत … Read more