अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी सुजय विखेंकडून सर्वात मोठे गिफ्ट ! दीड कोटी खर्च करून करणार…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या देशभरात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये मुळे व वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत. जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परीवार सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा खा.डॉ सुजय विखे … Read more

खून केला फरार ही झाला पण गर्लफ्रेंड मुळे अडकला ! वाचा जिल्ह्यातील बहुचर्चित हत्याकांडातील आरोपीची एक चूक…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राहुरी येथील पत्रकार रोहिदास दातीर यांची हत्या झाल्यानंतर त्यातील एक आरोपी फरार झाला आणि थेट उत्तरप्रदेशमध्ये दाखल झाला. तेथे वेषांतर करून शेतमजूर म्हणून काम करू लागला. पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याचा ठावठिकाणा शोधला. मात्र तोंडाला मास्क आणि वेषांतरमुळे एकवेळ पोलिसांनाही तो ओळखू येईना. त्याच्या उजव्या हातावर मात्र ‘सायली’ हे नाव … Read more

‘जिल्ह्यासाठी रेमेडिसिवीर इंजेक्शनचा साठा वाढवून द्या’

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, तर मृत्यूचेही प्रमाण वाढले आहे. जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे नेते संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. कदम यांनी म्हटले आहे की, नगर जिल्ह्यात ऑक्सिजन पुरवठा देखील अल्प आहे. नगरच्या प्रशासनाने इंजेक्शनचा पुरवठा … Read more

आनंदाची बातमी अहमदनगरमध्ये हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांपेक्षा डिस्चार्ज घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त.

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज २७२५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ४० हजार ४११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २६५५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

जिल्हा दौऱ्यात महसूलमंत्र्यांना आढळून आला समस्यांचा भंडार ; मुख्यमंत्र्यांना धाडले पत्र

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-करोना उपायोजनेत स्थानिक पातळीवर अडचणी असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महसूलमंत्र्यांनी जिल्हा दौरा केला, व तालुकानिहाय पातळीवर करोना संदर्भात त्रुटी आढळून आल्या. त्यावर उपाययोजना केल्यास करोनावर मात करणे अधिक सोपे होईल, असे म्हणत महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. तसेच याप्रकरणी महसूलमंत्री थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव … Read more

खा. डॉ. सुजय विखे म्हणतात, कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला घाबरत नाही

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-आम्ही काही चुकीचे केले नाही. त्या इंजेक्शनची खरेदी आणि वाटपाची सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत. आणलेला साठा संपल्याचे आपण त्या व्हिडिओमध्येच जाहीर केले आहे. त्यामुळे आता कारवाई काय करणार आणि जप्त काय करणार? इंजेक्शनचे रिकामे बॉक्स आता शिल्लक आहेत. त्यामुळे कोणत्याही कारवाईला आणि राजकारणाला आम्ही घाबरत नाही, असे भाजपाचे खासदार … Read more

ऑक्सिजन अभावी रुग्णालयांचा श्वास कोंडला; रुग्णांमध्ये धाकधूक

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरविण्यात प्रशासन हतबल होत आहे, यातच बेड पाठोपाठ जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक रुग्णांचे जीव टांगणीला लागले आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडीन अनेक तालुक्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा काही तास पुरेल इतकाच शिल्लक असल्याने आरोग्य विभाग देखील चिंताग्रस्त … Read more

गव्हाच्या जागी नागरिकांना मिळतोय निकृष्ठ मका; प्रशासनाचा कानाडोळा

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-एकीकडे नागरिक कोरोना सारख्या भयाण विषाणूशी लढत जगण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल असे कृत्य केले जात असल्याचे उघड झाले आहे. स्वस्त धान्य दुकानात मागील महिन्यापासून लाभार्थीना गहू देण्याऐवजी प्रति लाभार्थी दोन किलो मका दिली जात असून दिलेली मका ही खराब आणि किडकी … Read more

विनाकारण बाहेर जाण्यापूर्वी ही बातमी एकदा वाचा!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने लॉकडाऊन घोषीत केला आहे. मात्र तरीदेखील अनेकजण विनाकारण रस्त्यावरू येजा करत असतात. त्यांना याबाबत अनेकवेळा आवाहन करून देखील फरसा फरक नव्हता त्यामुळे मंगळवारी पाथर्डी तालुक्यात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी केली गेली. यात दोघेजण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यामुळे … Read more

गुप्तधनासाठी तीनशे वर्ष जुन्या वाड्यात खोदकाम; या ठिकाणचा धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जुन्या काळी लोक आपल्याजवळील धन हे जमिनीत गाडून ठेवत अशा अनेक गोष्टी आपण ऐकल्या असतील. व आजच्या त्या काळात त्या धनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केल्याचाही अनेक प्रकरणे तुम्ही पहिली असतील. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा मध्ये घडला आहे. श्रीगोंदा शहरातील मध्यवस्तीत असणाऱ्या एक तीनशे वर्ष जुन्या वाड्यात अज्ञान व्यक्तींनी गुप्तधनासाठी … Read more

टायर चोरी करणारी टोळी पोलिसांनी केली गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कर्जत तालुक्यातील राशीन रोडवर असलेलं बहार नावाचे टायर पंचर दुकान अज्ञात चोरट्याने लुटल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज व इतर गोपनीय … Read more

काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले… अजित पवारांचा खासदार विखेंना टोला

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यात लसीकरणाच्या मुद्द्यावर उद्या बैठकीत निर्णय घेतला जाईल अशी माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकतेच दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी खासदार सुजय विखे यांच्या व्हायरल फोटोवरून चांगलाच टोला लागवला आहे. यावेळी बोलताना पवार म्हणाले कि, काही लोकांचे विमानात बसलेले फोटो पाहिले. त्यांच्यासोबत बॉक्सही पाहिले. असा अतिरेक होऊ नये. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी कोरोना रुग्णसंख्या झालीय कमी !आढळलेत फक्त इतके रुग्ण…

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या कमी होण्यास सुरवात झाली आहे.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात 2655 रुग्ण आढळले आहेत, कालही नगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले होते आज ते आणखी कमी झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सातत्याने साडे तीन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळत होते, कडक निर्बंध, व … Read more

नगर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : मुलगा आणि पत्नीच्या मृत्यूची माहिती समजताच पित्याने सोडले प्राण!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोरोनाची बाधा झाल्याने रूग्णालयात उपचारादरम्यान पत्नी व मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच पित्याचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील करंजी या गावात घडली. याबाबत सविस्तर असे की, पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील एका सुशिक्षित कुटुंबातील आई वडील व मुलगा हे तीन व्यक्ती अहमदनगर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोनावर उपचार घेत होते. … Read more

नागरिकांनी न घाबरता कोविड सेंटरमध्ये दाखल व्हावे

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-दुसऱ्या लाटेमध्ये कोविडचा प्रसार खेड्या पर्यंत पोहोचला आहे. कोविडच्या अनाठाई भीतीपोटी अनेक जण घरीच उपचार घेत आहेत किंवा कोविडची चाचणी करून घेण्याचे टाळत आहेत. वास्तविक ताप, खोकला, अंग दुखणे, सर्दी, थकवा अशी लक्षणे दिसतात तेव्हा कोविडची चाचणी करून घेणे व चाचणी पॉझिटिव्ह आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक असताना … Read more

टाळेबंदीतही पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोमात

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- टाळेबंदीत देखील पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून, वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक आर्थिक हितसंबंध असल्याने जाणीवपुर्वक कारवाई करीत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तर या प्रकरणी उपलब्ध असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करुन … Read more

जिल्ह्यातील ११ बाजार समितीच्या निवडणुका ६ महिने लांबणीवर

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळ निवडणुका पुढील सहा महिन्यांसाठी (२३ ऑक्टोबर) पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ३०६ पैकी २७७ तर, अहमदनगर जिल्ह्यातील १४ पैकी ‘त्या’ ११ बाजार समित्यांवर विद्यमान संचालक मंडळ कारभार पाहणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील संचालक मंडळाच्या … Read more

त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन …

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप केल्याबद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. … Read more