अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडातील फरार आरोपीस उत्तर प्रदेशमधून अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील पसार चौथा आरोपी अक्षय कुलथे याच्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या. येथील पत्रकार दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले … Read more

कोव्हिड काळात हलगर्जीपणा भोवला! ‘त्या’ चार डॉक्टरांवर कारवाई 

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-कोविड सेंटरला भेट देऊन तेथील रुग्णांची तपासणी करण्याच्या आदेशाचे उल्लंघन केल्या मुळे पारनेर तालुक्यातील चार डॉक्टरांवर कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर असे की, राष्ट्रीय ग्रामिण आरोग्य योजनेअंतर्गत काम करणाऱ्या डॉ. सचिन सोनवणे, डॉ. पुजा म्हस्के, डॉ. तेजश्री ढवळे, डॉ. आडसूळ यांनी तहसिलदार ज्योती देवरे यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी … Read more

ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णालयांनी पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकिडल भागामध्ये याचा कहर जरा जास्तच आढळून येत आहे. कोरोनाची मोठी वाढ सध्याच्या स्थितीला राहता तालुक्यात आढळून येत आहे. यातच राहता तालुक्यावर मोठे संकट ओढवले आहे. राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच … Read more

अरे बापरे! चक्क कारागृहातील  गुन्हेगारांकडे मोबाईल! ‘या’ पोलिस स्टेशनमधील प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कारागृहात गंभीर गुन्ह्यांत अटक असलेल्या दोन कैद्यांच्या अंगझडतीत दोन मोबाईल आढळून आले आहेत. हा प्रकार पारनेर पोलिस ठाण्यात घडला असून, याप्रकरणी आरोपींना जेवण/भत्ता देणारा मोबाईल पुरवणारा सुभाष लोंढे, प्रविण देशमुख (रा.सुपा) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे मोबाईल आढळून आले … Read more

कर्जत शहरात घरफोडी करणारे चोरटे जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जत परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, आरोपींची कसून चौकशी सुरू असून आणखी काही गुन्ह्यांची उकल होणार आहे. कर्जत येथील विशाल नारायण दळवी यांनी फिर्याद दिली की, राहत्या घरात कुणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करून 10,000 किमतीचा एम आय कंपनीचा मोबाईल … Read more

टाळेबंदीतही पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक जोमात

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-टाळेबंदीत देखील पारनेर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असून, वाळू वाहतूक करणार्‍या विना क्रमांकाच्या वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षक आर्थिक हितसंबंध असल्याने जाणीवपुर्वक कारवाई करीत नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. तर या प्रकरणी उपलब्ध असलेल्या सीसीटिव्ही फुटेजची पहाणी करुन संबंधीत … Read more

राहूरीतील ‘या’ गावात होतेय कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या महामारीत दिवसाला अनेक जणांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्याच्या ठिकाणी अंत्यविधीसाठी नंबर लागत असल्याने जिल्हाधिकारी यांनी देवळाली नगर पालिका हद्दीत व जवळ पासच्या 32 गावातील कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्याचे आदेश काढले त्यानुसार देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या वैकुंठभुमित 9 दिवसात 9 अंत्यविधी करण्यात आले आहे. त्यामध्ये राहुरी तालुक्यातील … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात आता गाव तेथे क्वारनटाईन सेंटर

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत आहे.बहुतेक ठिकाणी रूग्णालयात देखील उपचारासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बहुतेक रूग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचे समोर येत आहे.त्यामुळे तहसीलदार फसियोद्दीन शेख यांनी गाव तेथे क्वारटाईन सेंटर उभारण्यासाठी पुढाकार घेतला असुन त्यादृष्टीने संबधितांना सुचना देखील केल्या आहे. रविवार सायंकाळी झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग … Read more

कोरोनाची लक्षणे दिसल्यास तातडीने विलगीकरण करा

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये. गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या आहेत. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगमनेर तालुक्यातील … Read more

दुष्काळात तेरावा ; डाळिंबाची बाग जळून झाली खाक

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जामखेड तालुक्यातील खर्डा येथील शेतकऱ्याचे अडीच एकर डाळिंबाच्या बागेला आग लागून बागेचे नुकसान झाले असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील खर्डा भूम रस्त्यावरील शौकत शब्बीर शेख यांच्या डाळिंबाच्या बागेला अचानक आग लागून डाळिंब पिकाचे मोठे नुकसान झाले. तसेच पिकासाठी केलेल्या ठिबक सिंचनचे पाईप जळून … Read more

कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये आता ‘होम आयसोलेशन’ बंद !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोना लाट मोठी असल्याने कोणीही निष्काळजीपणा करू नये. ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करत घरोघर जाऊन तपासणी करा. लक्षणे आढळल्यास सक्तीचे संस्थात्मक विलगीकरण करा, होम आयसोलेशन बंद करा, अशा सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झालेल्या आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते. … Read more

सकारात्मक बातमी : नगर जिल्ह्यात 1 लाख 37 हजार जणांनी कोरोनाला केले पराभूत.

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदार डॉ सुजय विखे अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-खा. डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या … Read more

पाथर्डी तालुक्यातील ‘ह्या’ गावात कोरोनाच हाहाकार ! एका महिन्यात ७ मृत्यू…

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथे एका महिन्यात (एप्रिल) सात व्यक्तीचा मृत्यू, कोरोनाची रूग्णसंख्या वाढत आहे. रूग्ण संख्या किती आहे कळत नाही कारण ग्रामस्थ तपासणीच करत नाहीत. गावात दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत मोफत कोरोना तपासणी कॅम्प लावला, खरवंडी गावची लोकसंख्या पाच हजारांच्या आसपास फक्त ६२ ग्रामस्थांनी तपासणी केली. मात्र … Read more

मयत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची पैशांसाठी हेळसांड

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मयत कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांची ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांकडून पैशासाठी अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला असून सकाळी ८.४५ वाजता मृत घोषित केलेल्या रुग्णाला संध्याकाळी ७ वाजेपर्यंत वेठीस धरण्यात आल्याचे उघड झाले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब (तांबेवाडी) येथील एका व्यक्तीच्या कुटुंबात मुलगी सोडून कोणी … Read more

जिल्ह्यात दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता भेटतात फक्त बाराशे !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात सध्या दररोज ६ हजार रेमडेसिवीर इंजेकशनची आवश्यकता असून केवळ हजारे ते बाराशेपर्यत इंजेक्शनची उपलब्धता होत आहे. तेव्हा तातडीने जिल्ह्याला आवश्यक असलेली इंजेक्शनचा साठा पुरविण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि.१३ एप्रिल रोजीच्या … Read more

आमदार फंडातून कर्जतसाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका रुग्णसेवेसाठी दाखल

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कर्जतची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम व्हावी, तालुक्यातील रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत,कोणत्याही रुग्णास उपचाराअभावी त्रास सहन करावा लागू नये म्हणून आ. रोहित पवारांनी कर्जतच्या रुग्णसेवेत पुन्हा एक अद्ययावत रुग्णवाहिका दाखल केली आहे. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२०-२१ अंतर्गत आ.रोहित पवार यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यासाठी ही रुग्णवाहिका रुग्णांसाठी उपलब्ध असणार … Read more

लॉकडाऊनमध्ये दारूविक्री जोमात

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यात लॉकडाऊन सुरू असल्याने व वाईन्स शॉप बंद असल्याने तळीरामांना इंग्लिश दारू मिळणे आता मुश्किल झाल्याने राहुरी तालुक्यात देशी दारूची विक्री जोरात सुरू आहे. तसेच पाण्याच्या बाटलीत भरून गावोगावी बनावट गावठी दारू (सरमाडी) विक्रीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. विशेष म्हणजे समाजात वावरणारे पांढरपेशी बगळेदेखील यात शिकार होत … Read more