‘कुकडी’च्या पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक!

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- कुकडीपाणी प्रश्नासाठी श्रीगोंदा शहरातील पेडगाव रस्त्यावरील कुकडी कार्यालयासमोर माजी जिल्हा परिषद सदस्य दिकर पंधरकर , प्रमोद जगताप , सुरेश भापकर, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी धरणे आंदोलन सुरू केले होते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी , संचारबंदीचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी या चौघांना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केले असून, आंदोलन … Read more

जयंती कार्यक्रमातून युवकांचा नियमांचे पालन करुन कोरोनाशी लढण्याचा निर्धार

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने युवकांनी वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली. कोरोनाचे संक्रमण वाढत असताना फाऊंडेशनच्या कार्यालयात वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या जयंती कार्यक्रमात युवकांनी नियमांचे पालन करुन कोरोनाशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. फाऊंडेशनचे अध्यक्ष … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात सर्वात मोठा रेकॉर्ड ! एकाच दिवसांत 3 हजार…..

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. जिल्ह्यात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचा रेकोर्ड ब्रेक असा आकडा वाढला आहे, चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 3097 रुग्ण वाढले आहेत. गेल्या … Read more

चार बिबट्यांचा धुमाकुळ , नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-श्रीगोंदातालुक्यातील काष्टी (गवतेमळा) येथे गेल्या आठ दिवसांपासून चार बिबट्यांनी तीन शेळ्या व तीन कुत्रे फस्त करीत धुमाकुळ घातला आहे. बिबट्याच्या दहशतीने नागरिक हैराण झाले आहेत. या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. यावर वन खात्याकडून चार दिवसांपूर्वीच पिंजरा लावण्यात आला असला तरीसुद्धा बिबट्या पकडण्यात यश आलेले नाही. काष्टी अजनुज … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आणि त्यांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आज ११२० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६ हजार २२१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २४०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता … Read more

मंत्री तनपुरेंच्या मतदारसंघातील हे संपूर्ण गावाच ‘व्हेंटिलेटर’वर !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  मंत्री तनपुरेंच्या मतदारसंघातील राहुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे समुदाय अधिकारी, आरोग्य सेवक नसल्याने आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर गेलेली आहे. वर्षभरापासून ग्रामपंचायतीवर असलेल्या प्रशासकाचा कारभारदेखील कुचकामी ठरत असल्याने ग्रामस्थांची मोठी हेळसांड होत आहे. तांदुळवाडी गाव रेल्वेलाईनच्या दोन बाजूला विभागलेले आहे. तांदुळवाडी गाव … Read more

सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकजण निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- कामात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस नाईक शिवनाथ बडे यांचे निलंबन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या या कारवाईचे नागरिकांमधून स्वागत केले जात आहे. पाथर्डी तालुक्यातील … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा महाविस्फोट ! चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती अत्यंत भयंकर बनत चालली असून कोरोना रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.  गेल्या चोवीस तासांत नगर जिल्ह्यात तब्बल 2405 रुग्ण वाढले आहेत, कालही तब्बल 2,654 रुग्ण वाढले होते.  आजही अडीच हाजाराजवळ काेराेना संसर्गाचे रुग्ण आढळले आहेत.जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 2 हजार 405 … Read more

ऊस तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, हनुमान टाकळी, चितळी, ढवळेवाडी परीसरात ऊस तोड मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. तेरा, चौदा महीने होवूनही अजुनही ऊस शेतातच उभा असून लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. ऊस हे महाराष्ट्राची ओळख असलेले नगदी पीक आहे. या एका पिकाने अनेक शेतक ऱ्यांची घरे उभी … Read more

पारनेर तालुक्यात १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-  पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे १ हजार बेडचे कोव्हिड सेंटर उभारण्यात आले असून, या महाजंगी कोव्हिड सेंटरचे १४ एप्रिल रोजी उद्घाटन होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार निलेश लंके यांच्या विशेष पुढाकारातून या महाकोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी हे कोव्हिड सेंटर नागरिकांच्या सेवेत रुजू होणार … Read more

श्रीगोंदयातील धूळ खात पडलेले व्हेंटिलेटर चालू करण्यासाठी प्रशासन अजून किती रुग्णांच्या मृत्यूची वाट पाहणार:अक्षय अनभुले

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- श्रीगोंदा(प्रतिनिधी): श्रीगोंदा तालुक्यात कोरोना आजारासाठी आवश्यक असणारे उपकरणे उपलब्ध नसल्याने रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.गेल्या दोन दिवसांत व्हेंटिलेटर सुविधा अभावी दोन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. श्रीगोंदयात दोन व्हेंटिलेटर असून ते किती तरी महिने झाले धूळ खात पडून असून प्रशासन याबाबतीत अजूनही उदासीनच दिसत आहे. जर धूळ … Read more

पोलीस अधीक्षक कार्यालयातील तो पोलीस कर्मचारी हप्ते घेण्यासाठी दिवसाआड पारनेरला

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू तस्करांकडून हप्ते गोळा करणार्‍या त्या पोलीसांची चौकशी करुन त्यांचे निलंबन करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पारनेर तालुक्यातील अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्यावतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही हा … Read more

गिरमकर कुटुंबाला साजन पाचपुते यांचा मदतीचा हात

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील भीमानदी काठी असलेल्या अजनुज येथील रहिवासी अमोल उर्फ विजय नामदेव गिरमकर (वय ३३) यांच्या निधनामुळे त्याच्या कुटुंबाला साजन शुगरचे अध्यक्ष साजन पाचपुते यांच्याकडून १ लाख रुपयांची मदत देण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंधरा दिवसापूर्वी सकाळी घरासमोर पाण्याच्या हौदात विजेचा प्रवाह उतरल्याने तेजल संदीप गिरमकर यांना पाणी … Read more

‘या’ नाथांना चंदनाचा लेप लावला : मात्र गाव बंदच!

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पहाटे चंदनाचा लेप लावुन महाआरती करुन गुढीपाडव्याची महापुजा केली. कोरोनाशी युद्ध जिंकण्याची शक्ती नाथभक्तांना मिळावी अशी प्रार्थना कानिफनाथ चरणी करण्यात आली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे विधीवत पुजा करुन मंदिर बंद करण्यात आले. गुढी पाडव्याला कानिफनाथांच्या यात्रेची सांगता होत असते. मंदिर बंद असल्याने मढीत शुकशुकाट … Read more

राज्यातील सर्वात मोठी बातमी : पुढचे पंधरा दिवस राज्यात १४४ कलम लागू ! वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे LIVE !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला आहे. व राज्यात पुढील १५  दिवसांसाठी कडक निर्बंध आणण्यात आले आहेत.  राज्यात कोरोनाचा कहर वाढल्याने उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. उद्यापासून रात्री 8 वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. 15 दिवस ही संचारबंदी … Read more

‘त्या’ खून प्रकरणी हलगर्जीपणा भोवला! पोलिस निरीक्षकाची बदली तर सहाय्यक पोलिस निरीक्षकासह एकजण निलंबित

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील फुंदेटाकळी फाट्यावरील माजी सैनिक विश्वनाथ फुंदे यांच्या खून प्रकरणी फिर्याद घेण्यास हलगर्जीपणा केल्या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांची जिल्हा मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व पोलीस नाईक शिवनाथ बडे यांचे निलंबन केले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील … Read more

यंदा पाऊसपाणी चांगले मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर? कर्जतमध्ये वर्तवले भाकीत

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-यावर्षी सर्वत्र मुबलक पाऊस पडणार असून पिके देखील चांगली येणार आहे. मात्र यावर्षी देखील आरोग्याचा प्रश्न जनतेला भेडसावणार आहे. आखाती देशांमध्ये युद्ध होऊन नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये येणार, याचा जगभरातील जनतेला व राजाला त्रास होणार आहे, असे भाकीत कर्जत येथील संत गोदड महाराज यांच्या संवत्सरी मध्ये व्यक्त करण्यात आले आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड मिळेना !

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :- अहमदनगर  जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असून हास्पीटलमध्ये बेड न मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव परिसरातील 30 वर्षीय तरूणाचा नगरमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. व्हिडीओ क्लीप व्हायरल :- उपचार सुरू असताना ऑक्सीजनचा पुरवठा खंडित झाल्याने अन्य दोन करोना रूग्णांना जीव गमवावा लागल्याची खळबळजनक घटना घडली. याबाबत व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर … Read more