शॉर्ट सर्किटमुळे एक एकर ऊस जळाला !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राहुरी तालुक्यातील दवणगाव येथील शेतकरी पोपट लक्ष्मण खपके यांचा अंमळनेर शिवारातील गट नंबर ९६/१/२ मधील एक एकर ऊस जळून खाक झाला. खपके यांच्या उसाच्या शेतावरून गेलेल्या महावितरणच्या विजेच्या तारांचे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ऊस जळाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भर दुपारी धुराचे प्रचंड लोट दिसू लागल्याने परीसरातील लोकांनी जळणाऱ्या उसाकडे धाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक एकाच दिवसात तब्बल 1800 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदारांच्या कामाची पद्धत चुकीची , शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले – घनश्याम शेलार

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- श्रीगोंद्याचे तहसीलदार बेजबाबदारपणे वागत आहेत. सामान्यांची कामे करण्यात त्यांना रस नाही. तहसीलदारांच्या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे श्रीगोंदे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आलेले २ कोटी १८ लाख ८१हजार रुपयांचे अनुदान परत गेले.त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. तहसीलदारांच्या या हलगर्जीपणा व बेजबाबदारपणामुळे त्यांच्यावर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले तब्बल इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आजही विस्फोट झाला असून एकूण 18०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. 24 तासांमध्ये 1 हजार 800 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 456 रुग्ण … Read more

राहूरी तालुक्यातील ‘हे’ गाव लॉकडाउन , गावानेच घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ खुर्द गावाने स्वयंस्फूर्तीने गाव लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विणकारन घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच मच्छिद्र आढाव यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यामधे कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत. त्यामुळे आता प्रशासनाने देखील कडक … Read more

बनावट रेशन कार्डचा अहवाल दिल्याने महिला तलाठ्यास मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- रेशनकार्डाचा अहवाल तहसील कार्यालयास दिल्याच्या कारणामुळे महिला तलाठ्यास तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करुन विटाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी शेवगाव येथे तहसील कार्यालयासमोर घडली. याप्रकरणी आंतरवाली खुर्दच्या तलाठी शुभांगी प्रल्हाद ससाणे (३७) यांच्या फिर्यादीवरुन छाया अविनाश सपकाळ, सोमनाथ अविनाश सपकाळ व सोन्याबापू सुभाष कासुळे (सर्व रा.आंतरवाली खुर्द ता. शेवगाव) … Read more

मजुरास मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- पाच ते सहा महिन्यांपासून थकलेला पगार मागीतला म्हणून राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील तिघां जणांनी महादेव वगारहंडे या मजूरास लोखंडी राॅड व लाथा बूक्क्यांनी जबरदस्त मारहाण केल्याची घटना घडली असून याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. महादेव विठ्ठल वगारहांडे वय २७ वर्षे राहणार बोर्डाता, … Read more

स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे म्हणाले माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरण बहुचर्चित झाले आहे. स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी आता पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्याकडे दिले आहे. स्वत:ला दिलेले पोलिस संरक्षण वाढवून मिळावे, तसेच आणखी एक पोलिस कुटूंबियांकरिता नियुक्त करावा, असे त्यांनी नमूद केले … Read more

अंगावर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-वाळू माफिया विरोधात केलेल्या तक्रारीवरुन अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे अध्यक्ष अरुण रोडे यांच्या चारचाकी गाडीला नगर-कल्याण महामार्गावर ढवळपुरी फाटा येथे विना क्रमांकाच्या डंपरने उडविण्याचा प्रयत्न केला. या अपघातात जीवे मारण्याचा प्रयत्न झाला असल्याने निशुल्क पोलीस संरक्षण देण्याच्या मागणीचे निवेदन रोडे यांनी पोलीस अधिक्षकांना दिले. अन्याय निवारण निर्मूलन सेवा … Read more

कुकडीच्या आवर्तनासाठी 9 एप्रिल ला पुण्यात बैठक.

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- कुकडीचे आवर्तन सोडण्याकरिता नऊ एप्रिल रोजी पुण्यात बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली. श्री.पाचपुते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” कुकडीचे आवर्तन सोडण्यासाठी त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे. त्यात चालढकल खपवून घेणार नाही.पाण्याची गरज व मागणी लक्षात घेऊन पुढील आवर्तनाचा निर्णय … Read more

टँकरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- एका टँकरचा व दुचाकींचा अपघात झाला असून यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात घडली असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या अपघातात राहूरी फॅक्टरी येथील बापू आसाराम साळुंके यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राहुरी फॅक्टरी येथील डाँ. तनपुरे सहकारी … Read more

निगेटिव्ह रिपोर्ट ठरणार व्यावसायिकांच्या व्यवसायाची चावी

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने फैलावत आहे. यामुळे नागरिकांसह प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. यातच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भिंगार कॅन्टोमेंट बोर्डाने एक अजबच फतवा काढला आहे. यामध्ये दुकानदार, भाजीपाला, फळ विक्रेत्यांना कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट सक्तीचा केला आहे. हा रिपोर्ट नसल्यास दुकाने सील करण्यासोबतच पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याचा कठोर निर्णय … Read more

शरद पवार व अमित शहा यांच्या भेटीवर आमदार रोहित पवारांचे मोठे विधान

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपूर्वी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार व देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीच्या चर्चा रंगल्या होत्या. यामुळे राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले होते. या भेटीवर अनेक राजकीय नेत्यांनी विधाने देखील केली होती. आता याच भेटीच्या मुद्द्यावरून कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मोठे विधान केले आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बहुचर्चित खून प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- शेवगाव मधील बहुचर्चित हत्याकांडातील दोघा आरोपींना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान अनैतिक संबधातून बाबपुसाहेब घनवट याची हत्या करण्यात आली होती.याप्रकरणी आरोपी पुनमसिंग भोंड (मयत), कृष्णा पुनमसिंग भोंड व लक्ष्मण किसन कांबळे (तिघेही रा.रामनगर, शेवगाव) यांना जन्मठेप व प्रत्येकी 11 हजार रूपये दंड व दंड न भरल्यास 7 … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८२९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८७ हजार ८१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.२५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १३१९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ७२०० … Read more

थोरात म्हणतात, घोडचुका कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?”

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- गेल्या सात वर्षापासून देश चुकीच्या लोकांच्या हातात असल्याने सरकार चालवण्याऐवजी फक्त चुकाच केल्या जात आहेत. नोटाबंदी, टाळेबंदी, चुकीच्या पद्धतीने केलेली GST ची अंमलबजावणी, इंधन दरवाढ या तर उघड्या डोळ्यांनी केलेल्या घोडचुका आहेत त्या कधी सुधारणार? की देशाची वाट लावतच राहणार?” असं ट्विट महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केंद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दुचाकी व टॅंकरचा अपघात, एक जण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- राहुरी कारखाना येथील डाँ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर इंधन खाली करण्यासाठी आलेल्या टँकरने पेट्रोल भरुन घरी चालेल्या दुचाकी चालकास समोरुन जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाला. हा अपघात दुपारी 1 वाजता डाँ.तनपुरे कारखाना पेट्रोल पंपाच्या आवारात घडला.याबाबत माहिती अशी की, राहुरी कारखाना … Read more

उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केल्याप्रकरणी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपिठाने जमीन हस्तांतरणाला स्थगिती दिली असताना सुध्दा श्रीगोंदा तहसिलदाराने जमीन इतर व्यक्तींच्या नावावर करुन उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली असल्याचा आरोप तक्रारदार जिजाबा रखमाजी वागस्कर यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी तहसिलदारांच्या विरोधात श्रीगोंदा प्रांतापुढे अपील दाखल केली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. … Read more