राहुरी कारखाना खाजगीकरणाच्या मुद्द्यावरून खासदार विखे संतापले

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- ‘महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत २५ साखर कारखाने बंद पाडून खासगीकरण करून ताब्यात घेण्यात आल्याचे प्रकार घडले आहेत. मात्र, जोर्पंत मी जिवंत आहे, तोपर्यंत राहुरी कारखान्याच्या बाबतीत असे होऊ देणार नाही.’असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले आहे. डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या अधिमंडळाची 65 वी … Read more

मढी येथील होळीने पोलीस बंदोबस्तात घेतला पेट

अहमदनगर Live24 टीम, 29 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी रविवारी ५ वाजता पोलीस बंदोबस्तात पेटली. दत्त मंदिराजवळील होळी पेटविण्याची मूळ जागा बदलून गोपाळ समाजाच्या पारावर होळी घ्यावी, अशा काहींच्या अट्टाहासामुळे किरकोळ तणाव झाला होता. मात्र कान्होबा देवस्थान समिती, पोलीस, महसूल प्रशासन अशा तिहेरी समन्वयाने होळीने अखेर पेट घेतला … Read more

कुटुंबाला मारहाण करणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-राहूरी तालुक्यातील चिंचविहिरे शिवारात सचिन दत्तू शिंदे या तरुणास लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन दत्तू शिंदे या तरुणाने राहूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शिंदे याने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले की, दि २७ मार्च रोजी माझा चुलत भाऊ … Read more

मंगलकार्यालय चालक आर्थिक संकटात; जिल्हाधिकाऱ्यांकडे केली ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- शहरातील मंगल कार्यालय, हॉल, लॉन्स गेल्या वर्षभरापासून कोरोना प्रादुर्भावामुळे व्यावसाय बंद असल्याने आर्थिकदृष्ट्या होरपळून निघाले आहेत. २०२०-२१ या आर्थिक वर्षात शासनाचे टॅक्स, हॉलचा असणारा अवाढव्य खर्च, बँकांची कर्जामुळे मंगल कार्यालय मालक हे आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. कोविडचे संकट दूर होत असताना पुन्हा पेशंट वाढल्याने पुन्हा मंगल कार्यालय, हॉल चालक … Read more

दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- भरधाव वेगातील मोटरसायकल स्वराचे दुचाकीवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला जाऊन रस्त्यानी जाणार्‍या अशोक सिताराम मांडगे ( वय 47 रा. माळकुप तालुका पारनेर ) यांना धडक दिली. दरम्यान या अपघातात एकजण जखमी झाला आहे. ही घटना बस स्टँडवर ओवर ब्रिजमध्ये देहरे येथे घडली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, … Read more

मढीत मानापानाच्या ‘तणावात’ होळी पेटली!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- पाथर्डी तालुक्यातील मढी येथील गोपाळ समाजाची मानाची होळी मानपानाच्या किरकोळ कारणावरून ताणतणावातच पोलिस बंदोबस्तत पेटली. कोरोच्या पार्श्वभूमीवर शासनाने मढी यात्रेला बंदी घातल्याने फक्त गोपाळ सामाजाच्या मानकऱ्यांना होळीच्या ठिकाणी प्रवेश देण्यात आला होता. रविवारी सायंकाळी पाच वाजता गोपाळ बांधव कडेकोट पोलिस बंदोबस्तात मानाच्या गोवऱ्या घेण्यासाठी कानिफनाथ गडावर आले. यावेळी देवस्थान … Read more

जिल्ह्यात रात्री नऊ ते सकाळी सहा संचारबंदी ! जिल्हाधिकारी भोसले यांचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढीची शक्यता लक्षात घेत शासन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी खबदारीचे आणखी एक पाऊल उचलले आहे. येत्या दि. १५ एप्रिलच्या कालावधीत जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी जारी करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेत सार्वजनीक ठिकाणी फिरण्यास मनाई केली आहे. … Read more

दुकानदार, फळे व भाजी विक्रेते या सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिकांची बेफिकीरी काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. यामुळे कोरोनाचे संक्रमण आणि वाढती आकडेवारी यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार प्रशासन सतर्क झाले आहे. तालुका पातळीवर तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन!

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-जिल्ह्यातील राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने कोरोना रूग्ण वाढत आहेत. यात राहाता शहर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असल्याने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने राहाता नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी अजित निकत यांनी ३० मार्च ते ५ एप्रिलपर्यंत शहरात सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व आस्थापना सात दिवस बंद राहणार … Read more

लक्ष द्या… आजपासून आठच्या आत घरात ; नाहीतर चोप मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- राज्यात मोठ्या प्रमाणात कोविड बाधित समोर येवू लागल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कठोर निर्णय घेत आजपासून राज्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी निर्बंध घातले आहेत. हा आदेश पुढील 15 एप्रिलपर्यंत संपूर्ण राज्यात लागू राहणार आहे. या नियमांमुळे आजपासून प्रत्येकाला आठच्या आत घरात यावे लागणार आहे. कोरोनाच्या … Read more

घाटात ट्रक उलटला; तिघे बालबाल बचावले

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटातील अवघड वळणावर लोखंडी प्लेटाचे रोल घेऊन जाणारा ट्रक उलटला. वळणाला मोठा कठडा असल्याने त्यात ट्रक अडकल्याने तिघे बचावले. याबाबत अधिक माहिती अशी कि, कल्याण-निर्मळ महामार्गावरील करंजी घाटात लोखंडी प्लेटाचे रोल पुण्याहून परभणीला घेऊन जाणारा ट्रक अवघड वळणाचा चालकास अंदाज न आल्याने उलटला. या ट्रकमध्ये चालक, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ८५७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८४ हजार ३६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९२.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १२२८ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ५२४२ … Read more

मंत्री थोरातांनी घेतला कोरोना उपाययोजनांचा आढावा

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे प्रशासनाला अधिक सतर्क करण्यासाठी शुक्रवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अमृतवाहिनी कॉलेज येथे आढावा बैठक घेऊन प्रादुर्भाव, लसीकरण व उपाय योजनांचा आढावा घेतला. या बैठकीतून कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.लग्न समारंभ पोलिसांच्या परवानगी शिवाय होणार नाहीत. शहरात २६ ठिकाणी खासगी कोरोना … Read more

अहमदनगरकरांना ज्याची भीती होती तेच झाल ! जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी …

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  सध्या देशभरात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये वाढ होत चालली आहे. तर राज्यातही मुंबई आणि पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्णवाढ कायम असून कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.  गेल्या चार दिवसात जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ कायम असून आजही तब्बल 1228 रुग्ण वाढले आहेत. तालुकानिहाय … Read more

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, सात जणांवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-फळे पिकवण्यासाठी लागणारा एसी आणण्यासाठी व घर बांधण्यासाठी माहेरून दहा लाख रुपये घेऊन ये, या मागणीसाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरकडील पती व सासु – सासऱ्यासह एकुण सात जणांवर विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर असे की, जामखेड माहेर असलेली फिर्यादी विवाहित महिला नाजमीन … Read more

‘सर्वसामान्यांना त्रास झालेला मी सहन करणार नाही’: ना.तनपुरे

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:- रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई केल्याने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधीचे दप्तर तपासून महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची चांगलीच कान उघाडणी केली. राहुरी तहसील कार्यालयात रेशनकार्डच्या कामांत दिरंगाई होत असल्याच्या तक्रारी मंत्री तनपुरे यांच्याकडे केल्या होत्या. त्यामुळे ना.तनपुरे यांनी थेट तहसील कार्यालयात जाऊन रेशनकार्ड संबंधित दप्तर तपासणी … Read more

‘त्या’ शेतकऱ्यांना दिलासा! अतिवृष्टीने नुकसानग्रस्त ‘या’ तालुक्यातील १४ गावांना आले ३४ लाख

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  मागील वर्षाच्या रब्बी हंगामातील गहु, हरबऱ्याचे अतीवृष्टीने नुकसान झाल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकरी हतबल झाला होता. यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आधार देत सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील त्या १४ नुकसानग्रस्त गावाना ३४ लाखांचे अनुदान प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात बळीराजाने मोठ्या कष्टाने … Read more

त्या एका कारणामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये संताप

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यात शिधापत्रिका शोध मोहीमे अंतर्गत बोगस शिधापत्रिका धारक उजेडात यावेत म्हणून मागील पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार मार्फत प्रत्येक शिधापत्रिका धारकाचा स्थानिक रहिवासी असल्याचा पुरावा पासपोर्ट फोटोसह आधारकार्ड वीजबिलाची झेरॉक्ससह अनेक कागदपत्रे जोडून तो फार्म शिधापत्रिका धारकांनी स्वस्त धान्य दुकानदारकडे जमा केले. हे अर्ज भरून देताना सर्वसामान्यांसह … Read more