नगर – कल्याण रोडवर अपघातात एक ठार !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-नगर-कल्याण रोडने भरधाव वेगाज जाणार्‍या कारने पायी चालणार्‍या 55 पादचार्‍यास धडक दिली. या धडकेत पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर – कल्याण रोडवरील धोत्रे शिवरामध्ये शुक्रवार दि.26 रोजी सकाळी 9.45 च्या दरम्यान घडली. माहिती अशी की, नगर कल्याण रोडवर धोत्रे गावच्या शिवारात सोन्याबाप्पू राहिंज (वय 55 वर्ष) रा. धोत्रे … Read more

३१ मार्चपर्यंत कर्ज भरा, पुन्हा कर्ज देऊ …

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-श्रीगोंदे तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ बेलवंडी सहकारी सेवा संस्थेला नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे आणि जिल्हा बँकचे नूतन संचालक माजी आमदार राहुल जगताप यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेने स्वभांडवलातून सुमारे दीड कोटी रुपये खर्चून उभारलेल्या संस्थेच्या कार्यालय इमारतीचे पाहणी केली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे तसेच जिल्हा … Read more

आज ६४३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ८२९ बाधितांची रुग्ण संख्येत भर !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८२ हजार ७३९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ८२९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४९८५ इतकी … Read more

मंत्री तनपुरे यांच्या प्रयत्नांनी ‘त्या’ देवस्थानला निधी मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-पाथर्डी तालुक्यातील सातवड येथील श्रीक्षेत्र ढोलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता त्यापैकी शासनाकडून काही निधी प्रलंबित राहिल्यामुळे येथील विविध विकास कामे रखडली होती. परंतु येथील ग्रामस्थांनी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे रखडलेला निधी पुन्हा एकदा संबंधित विभागाकडे वर्ग झाला आहे. लवकरच उर्वरित कामे देखील … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-लग्नाचे नाटक करून लुबाडणारी टोळी कर्जत पोलिसांकडून जेरबंद करण्यात आली. कर्जत तालुक्यातील एका मोठ्या गावातील एका युवकाला या टोळीने सावज केले. ही परभणी येथील टोळी तेथे लग्न जमवण्यासाठी गेली आणि लग्न जमवले. या लग्नासाठी या टोळीने नवऱ्या मुलांकडून दोन लाख दहा हजार रुपये घेतले. लग्न उरकण्यात आले. काही दिवसात नवरी … Read more

लग्न समारंभासाठी आता पूर्वपरवानगी आवश्यक… नाहीतर होणार असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून लग्न समारंभ आणि साखरपुडा यासारख्या धार्मिक समारंभाचे आयोजनास संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकार्‍यांची पूर्वपरवानगी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आहेत. गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात अशा प्रकारच्या कार्यक्रम, समारंभानंतर कोरोना रुग्ण संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले होते. याशिवाय, जिल्ह्यातील … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरीकांसाठी सर्वात महत्वाची बातमी : आजपासून ‘हे’ असेल बंद !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी आहे, जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारांना बंदी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी दि. 26 मार्च रोजी हा आदेश काढला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर गर्दी टाळणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 29 मार्चपासून 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स एकाच क्लिकवर…

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही तासांमध्ये 829 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 239 जणांना काेराेना संसर्ग झाला आहे. शहरात काेराेना संसर्गाची रुग्णसंख्या वाढतीच आहे.  मागील चोवीस तासात 829 नवीन बाधिताची रूग्णसंख्येत भर पडली आहे. 48 तासात दोन हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. नगर शहरातही रूग्णवाढीचा आलेख … Read more

सशस्त्र टोळीचा कलाकेंद्रावर राडा !

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:- नगर तालुक्यातील नांदगाव येथील ओम भगवती कलाकेंद्राच्या बाहेर सहा जणांच्या टोळीने धुमाकूळ घालत वाहनांचे नुकसान केले. एकास तलवारीचा धाक दाखवून १२ हजार २५० रूपये लुटले. बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी सतीष महेश काळे (वय २८ रा. वाळवणे ता. पारनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात सहा … Read more

नियमांचा भंग करणाऱ्यांवर कारवाई ; सात दुकाने केली सील

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. दरदिवशी कोरोनाबाधितांची भयानक आकडेवारी समोर येत आहे. कोरोनाला अटकाव करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. मात्र अनेकजण कोरोनाच्या नियमनाचे उल्लंघन करताना दिसून येत आहे. पाषाणावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत आहे. नुकतेच जामखेड तालुक्यातील खर्डा येथे प्रांताधिकाऱ्यांच्या पथकाने कोरोना नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली. यावेळी साडेपाच हजाराचा दंड … Read more

श्रीगोंद्यात साडेसहा हजार नागरिकांनी घेतली कोरोनाची लस

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणाचाही वेग वाढविण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत युद्धपातळीवर सुरु आहे. यातच जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात आतापर्यंत ६ हजार ७१६ जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असून ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना १ एप्रिलपासून लसीकरणाची सुरुवात होणार आहे. ७ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३३ … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यातील गावे होऊ लागली हळूहळू बंद

अहमदनगर Live24 टीम, 26 मार्च 2021:-जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. अकोळनेर (ता. नगर) येथील ग्रामस्थांची बैठक झाली. कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येथे आजपर्यंत १४० नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील आठ लोकांना जीव गमवावा लागला. सध्या बारा … Read more

होळी, धूलीवंदन आणि रंगपंचमी साधेपणाने साजरे करा ! जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन होळी, धूलीवंदन आणि रंगमंचमी सण कोणत्याही प्रकारे गर्दी न करता साधेपणाने साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. जिल्हावासियांनी या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन जिल्हाघिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. त्याचबरोबर, जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक … Read more

महिला विनयभंग प्रकरणी आरोपी बोठे कोतवाली पोलिसांचा ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे यास एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात वर्ग करण्यासाठी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठेच्या पोलिस कोठडीची मुदत आज संपल्यामुळे दुपारच्या सत्रात पारनेर न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. रेखा जरे यांच्या हत्येनंतर बाळ बोठे फरार असताना त्याच्याविरोधात … Read more

पाच दिवसांत जिल्ह्यात आढळले चार हजार कोरोनाबाधित

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात पुन्हा एकदा करोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यामुळे मोठी चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची धक्कादायक आकडेवारी पाहता नागरिकांमध्ये धाकधूक वाढली आहे. जिल्ह्यात पाच दिवसांत तब्बल चार हजारावर नव्या बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यातील 4 हजार 251 तर नगर शहरातील 1 हजार 404 जणांना या दरम्यान कोरोनाची बाधा झाली … Read more

होळीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या महत्वपूर्ण सूचना

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- जिल्ह्यात करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून गर्दी टाळण्यासाठी एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी, हॉटेल्स, रिसोर्ट, सार्वजनिक सभागृहे, सार्वजनिक व खासगी मोकळ्या जागा, सर्व गृहनिर्माण संस्थांमधील मोकळ्या जागा येथे दिनांक २८ मार्च ते २ एप्रिल, २०२१ या कालावधीत कोणत्याही सार्वजनिक स्वरुपाचे धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनास प्रतिबंध करण्यात आला असल्याचे … Read more

प्रशासनाचा दणका : ‘ह्या’ तालुक्यातील १४ दुकाने केली सील !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले ॲक्शन मोडवर आले असून, जे व्यावसाईक कोरोनाचे नियम पाळणार नाहीत. आपल्या दुकानातील गर्दीवर नियंत्रण ठेवणार नाहीत, अशा दुकानांवर कारवाई करण्यात येणार असून, ती दुकाने सात दिवस पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याचा यापूर्वीच इशारा दिला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करत हे … Read more

अत्यंत धक्कादायक बातमी : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक, वर्षातील सर्वाधिक कोरोना रुग्णांची वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:-  महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम … Read more