त्या अधिकाऱ्याचा शाहिस्तेखान करून टाका ! त्याशिवाय धर्म टिकणार नाही – आमदार संग्राम जगताप

महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे अन् त्यांच्याच राज्यात त्यांच्याच पुतळ्यासाठी शिवप्रेमींना झटावे लागते, यासारखे दुर्दैव नाही. आज अर्धाकृती पुतळा बसला, लवकरच या ठिकाणी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्यासाठी सर्वांनी एकजूट झाले पाहिजे. अतृप्त राजकारण्यांच्या विरोधापुढे झुकून एखादा अधिकारी जनरल डायर बनून पुतळा हटवण्यास आलाच, तर सर्वांनी छत्रपती होऊन त्याचा शाहिस्तेखान करून टाका. त्याशिवाय धर्म टिकणार … Read more

अहिल्यानगरमध्ये हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ! पोलिसांनी पकडला परप्रांतीय आरोपी

नगर-सोलापूर महामार्गावरील वाकोडी फाटा येथे एका परप्रांतीय व्यक्तीने हॉटेलच्या आड वेश्याव्यवसाय चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भिंगार कॅम्प पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकत आरोपीला अटक केली असून, दोन महिला आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. शहानवाज वाहाब आलम हुसेन (मूळ राहणार बिहार, सध्या सावेडी, तपोवन रोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव … Read more

जिल्ह्यातील तीन युवकांनी मोटारसायकलवर केली प्रयागराजची यात्रा

Ahilyanagar News : म्हणतात ना इच्छा तिथे मार्ग असाच अनुभव अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील तरुण घेत आहेत. येथील तीन तरुण मोटारसायकलवर थेट प्रयागराज यात्रा करून आले आहेत. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा सुरू आहे. या कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी देश विदेशातून मोठ्या संख्येने साधू संत तसेच सर्वसामान्य भाविक दाखल झाले आहेत. शेवगाव तालुक्यातील … Read more

सीएनजी गॅसचा स्फोट ! जामखेडमध्ये इर्टीगा कारमध्ये होरपळून पोलीस आणि व्यावसायिकाचा मृत्यू

जामखेड शहरातील बीड रोडवर, नवले पेट्रोल पंपाच्या जवळ, इर्टीगा कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि नंतर कारने पेट घेतला. सीएनजी गॅसच्या स्फोटामुळे वाहनाने आगीच्या ज्वाळा पकडल्या. या दुर्घटनेत कारमधील दोन जण होरपळून मृत्यूमुखी पडले. ही दुर्दैवी घटना २४ फेब्रुवारी रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक महेश पाटील आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. … Read more

मतदारांनी खासदारकीच्या माध्यमातून लागलेली कीड नष्ट केली; आमदार दाते यांची टीका

Ahilyanagar News : खासदारकीच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्हयात दहशतीची कीड पसरली होती;परंतू पारनेर, नगर मतदारसंघातील सूज्ञ मतदारांनी ही कीड नष्ट करण्याचे काम केल्याने जिल्हा शांत झाल्याचे सांगत आ. काशीनाथ दाते यांनी खा. नीलेश लंके यांचे नाव न घेता टीकास्त्र सोडले. देवीभोयरे ग्रामस्थांच्या वतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळाल्याबद्दल आ. दाते यांचा नागरी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर … Read more

आता पोलीस दादांना देखील मिळणार नवीन घरे : नवीन वसाहतीसाठी ११५ कोटी मंजूर

अहिल्यानगर : नगर शहरात लालटाकी रोडवरील पोलीस मुख्यालयाच्या जागेत असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या शासकीय वसाहतीची दुरावस्था झाली होती. त्यामुळे याठिकाणी नवीन इमारत व पोलीस निवासस्थानाच्या नव्या बांधकामासाठी मंजुरी मिळावी यासाठी आ.संग्राम जगताप यांनी २०२३ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याकडे केला होता. तसेच विधानभवनात तारांकित प्रश्नही उपस्थित करत राज्य … Read more

खोदा पहाड और निकला चुहा; टीप मिळाली गावठी कट्याची अन मिळाली ‘ही’ वस्तू

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : स्थानिक गुन्हे शाखा त्याचबरोबर राहुरी पोलिस स्टेशन आणि आता अहिल्यानगर शहरातील महत्वाचे समजले जाणारे कोतवाली पोलिस ठाणेही ॲक्शन मोडवर आहे. कोतवाली पोलिसांच्या अवैध व्यावसायिकांविरुद्ध जोरदार कारवाया सुरु आहेत.अशाच एका कारवाईसाठी कोतवाली पोलिस स्टेशनचे पथक रवाना झाले होते. ते पकडायला गेले होते दोन गावठी कट्टेवाला मात्र हाती सापडले त्यांना गॅस लाईटर. … Read more

दहावीच्या पहिल्याच पेपरला ‘इतक्या’ विद्यार्थ्यांची दांडी

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : शुक्रवार पासून दहावीची परीक्षा सुरू झाली असून, पहील्याच पेपरला जिल्ह्यातील ८५७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे. जिल्ह्यात १८४ परीक्षा केंद्र आहेत. त्या केंद्रांपैकी ३० केंद्रांना संवेदनशील परीक्षा केंद्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी ड्रोन कॅमेरे, व्हिडिओ शुटिंग करण्यात आले तसेच पोलीस गस्ती पथक व बैठे पथकही तैनात … Read more

उन्हाचा चटका वाढताच भाजीपाल्याचा बसला झटका; बाजारात पालेभाज्यांचा तुटवडा

२२ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : नगरच्या बाजारात भाजीपाला महागला आहे.पालेभाज्या तर महागल्या आहेतच परंतु, फळभाज्याही मोठ्या प्रमाणावर महागल्या आहेत. ग्रामीण भागात पाण्याची पातळी कमी झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पालेभाज्या पिकविणे कमी केलेले आहे. त्यामुळे बाजारात आपोआप पालेभाज्यांचे प्रमाण कमी झालेले आहे. याचे पर्यवसन पालेभाज्यांच्या भाव वाढीत झालेले आहे. पालेभाज्यांचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना चढ्या भावाने … Read more

जिलेटिनच्या स्फोटात दोघांचा मृत्यू ,एक गंभीर जखमी

२२ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : विहिरीत काम करीत असताना मजूर बाहेर येण्यापूर्वीच स्फोटकांचा ब्लास्ट झाल्याने दोन जण ठार तर एक गंभीर जखमी असल्याची माहिती कर्जत पोलिसांनी दिली.या प्रकाराबाबत कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवार, दि. १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी कर्जत शहरालगत मेहेत्रे … Read more

Ahilyanagar Leopard : बिबट्याची दहशत ! शेतकरी धास्तावले, वन विभाग हतबल

राहुरी तालुक्यातील मानोरी परिसरात बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चार दिवसांपूर्वी शेतकरी विठ्ठल हापसे (वय ५७) यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर वन विभागाने बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू केले असले तरी तो अद्याप मोकाट फिरत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी अनेकदा शेतात बिबट्याला पळताना पाहिले आहे. त्यामुळे हा एकच बिबट्या आहे की परिसरात … Read more

अहिल्यानगर शहरात गुरुवारीही महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम

अहिल्यानगर – महानगरपालिकेने मंगळवारी बाजारपेठेत अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. बुधवारी सुटी असल्याने गुरुवारी पुन्हा मोहीम सुरू करण्यात आली. माणिक चौक परिसरात रस्त्यावर व्यवसाय थाटणाऱ्या अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करून त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंड आकारण्यात आला. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले. बाजारपेठेसह संपूर्ण शहरात महानगरपालिकेने अतिक्रमणांवर कारवाईचे … Read more

व्यापाऱ्यांनो सावधान! कॅरीबॅग आणि कागदी ग्लासचा साठा असेल तर होऊ शकते मोठी कारवाई!

शहरातील प्लास्टिकचा वाढता वापर आणि कचऱ्यामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन पालिकेच्या पथकाने व्यापारी व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकदा सूचना देऊनही कॅरीबॅग आणि चहाचे कागदी ग्लास सर्रास वापरण्यात येत असल्याने पालिका आरोग्य विभागाने गुरुवारी (२० फेब्रुवारी) बाजारपेठेत पाहणी करत मोठी कारवाई मोहीम राबवली. मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्या आदेशानुसार, आरोग्य निरीक्षक दत्तात्रय ढवळे … Read more

एसटी बस प्रवासादरम्यान महिलेचे १२ तोळ्यांचे दागिने केले लंपास ; अहिल्यानगर जिल्ह्यातील घटना

१९ फेब्रुवारी २०२५ Ahilyanagar News : सरकारने महिलांना एसटीचा प्रवास करताना सवलत दिलेली आहे.त्यामुळे आजमितीला जिल्ह्यात नव्हे तर राज्यातील अनेक भागात महिला मोठ्या प्रमाणावर एसटीने प्रवास करताना दिसतात.मात्र यामुळे आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे.अनेकदा महिलांना एकट्याने प्रवास करावा लागतो. नेमका याच संधीचा काही भामटे फायदा घेऊन प्रवासात महिलांचे दागिने लंपास करतात. नुकतीच एसटी बसने … Read more

जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या ‘या’ धरणातून आवर्तन सुटले; तब्बल २७ दिवस राहणार पाणी

Ahilyanagar News: कर्जत तालुक्यातील कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातुन आवर्तन सोडण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भाग तसा दुष्काळीच मात्र त्यात काही भागात उत्तरेच्या धरणाच्या पाण्यामुळे त्या भागात शेती समृद्ध झाली. मात्र इतर भाग अद्याप कोरडा आहे. कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सिना धरणातून रब्बी हंगामाकरिता मंगळवारी दि.१८ … Read more

या ठिकाणावरून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

१८ फेब्रुवारी २०२५ अहिल्यानगर : खेळण्यासाठी घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलाचे (वय १४) अपहरण केल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी बोल्हेगाव परिसरातील प्रेम भारतीनगर येथे घडली.या प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी या भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतात.त्यांचा मुलगा बोल्हेगावातील हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. १५ फेब्रुवारी रोजी … Read more

आता अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची खैर नाही: आरोग्य उपसंचालकांची जिल्हा रुग्णाालयास दिली अचानक भेट दिल्या ‘या’ सूचना

Ahilyanagar News: जिल्ह्यातील मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तरातील दरी कमी होण्यासाठी जिल्ह्यात पीसीपीएनडीटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करा. त्याचसोबत अवैध वैद्यकीय व्यावसायिकांची शोध मोहिम प्रभावीपणे राबवत त्यांच्यावर कारवाई करा असे निर्देश आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले. आरोग्य उपसंचालक रेखा गायकवाड यांनी जिल्हा रुग्णालयास अचानक भेट देत विविध वॉर्डना भेटी देऊन पाहणी केली. त्यांनी … Read more

‘त्या’ नागरिकांची वणवण थांबणार: जल जीवन मिशन अंतर्गत अवघे ‘इतकी’ गावे झाली टँकरमुक्त…!

Ahilyanagar News : जिल्हयात मागील वर्षी एकूण ३४३ गावांना टंचाई कालावधीत टँकरने पिण्याचे पाणी पुरवठा सुरु होता. जिल्हा परिषद अंतर्गत जल जीवन मिशन योजनेच्या आराखड्यात १०८ गावे व २३५ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडील गावांना टॅंकरने पाणी पुरवठा सुरु होता. सदर १०८ गावांपैकी आजमीतीस सुमारे ५९ गावांना टँकरमुक्त करण्यात जिल्हा परिषदेला यश आले आहे. तसेच मार्च अखेर … Read more