अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात २४ तासात ३६० नव्या रुग्णांची भर

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- जिल्ह्यात काल (गुरुवारी ) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६० ने वाढ झाली. यामध्ये जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५६, अँटीजेन चाचणीत १४३ आणि खाजगी प्रयोगशाळेत बाधीत आढळून आलेल्या १६१ रुग्णांचा समावेश आहे.  यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५४५ इतकी झाली आहे. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध करण्यात आला आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये  कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य करण्‍यास या आदेशान्‍वये दिनांक एक ऑगस्ट ते दि.31 ऑगस्ट … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवलं ‘असे’ आहेत नियम !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :-राज्यभरात १ ऑगस्टपासून मिशन बिगिन अगेनच्या पुढच्या टप्प्यात अनेक निर्बंध शिथिल करण्याचा सरकारनं निर्णय घेतला असून अहमदनगर मध्येही काय सुरु रहाणार आणि बंद याबाबत माहिती आपण या  बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.  अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीमध्ये कोणत्याही रस्त्यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्त्यावर, गल्लोगल्ली याठिकाणी संचार, वाहतूक, फिरणे, उभे राहणे, थांबून … Read more

आमदार रोहित पवार म्हणाले नेत्यांना चांगले वाटावे म्हणून सुजय विखे…..

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- आज अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात रोहित पवार यांनी भेट देत कोरोनाच्या अनुषंगाने आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी विविध विषयांवर वक्तव्य केले. यावेळी त्यांनी खा.सुजय विखे यांच्यावर निशाणा साधला. खा. सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी राम मंदिर भूमिपूजनवरून भाजपवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला होता. ते म्हणाले होते ‘अहमदनगर जिल्ह्यात कर्जत-जामखेडचे आमदार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीवर नजर ठेवल्याच्या कारणातून झाला ‘त्याचा’ खून !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात राधू सहादू कोकरे ४५ (रा. ढवळपूरी ता. पारनेर) या भटकंती करून उपजिविका करणा-या मेंढपाळाचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणाने हत्याराने डोक्यात मारून खून करण्यात आला होता. ओळख पटू नये म्हणून आरोपीने खडकवाडी शिवारात आडरानात प्रेत नेउन ठेवले होते,या खुनाचा उलगडा झाला आहे, अवघ्या चोवीस तासांत पोलिसांनी या खुनातील … Read more

पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- पारनेर तालुक्यात आज ७ कोरोना बाधीत रुग्ण आढळले आहेत. पारनेर २, तिखोल २, सुपे व पाडळी दर्या येथील प्रत्येकी १ रुग्ण बाधीत पारनेरच्या दोन पैकी एक रुग्ण केडगाव येथे वास्तव्यास, तर दुसरा म्हसोबा झाप येथील आरोग्य यंत्रणेचा खुलासा. २३ संशयितांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह. राधे ११, टाकळी ढोकेश्वर ३,पारनेर, कान्हूरपठार … Read more

मतदारसंघातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आ.रोहित पवार सरसावले

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- सध्या महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. अहमदनगरमध्येही कोरोनाने उग्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे. परंतु या प्रसंगात कोरोनाला घाबरून घरात न बसता जनसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आ. रोहित पवार हे मतदार संघात फिरत आहेत. थेट जनसामान्यांच्या प्रश्नांना भिडत आहेत. मतदारसंघातील कुकडी व सीना धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या अडचणी जाणुन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज पुन्हा वाढले 40 रुग्ण

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४० ने वाढ झाली  दरम्यान,  आज जिल्ह्यातील ४११ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३३६० इतकी झाली आहे. रूग्ण बरे होण्याची टक्केवारी ही ७२.२१ इतकी झाली आहे. बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये पारनेर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तब्बल 411 रुग्णांना मिळाला आज डिस्चार्ज.

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल ४०८ कोरोना रुग्णांना आज डिस्चार्ज मिळाला आहे.यामुळे कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३३५७ झाली आहे. मनपा २२३ संगमनेर ५३ राहाता १८ पाथर्डी २ नगर ग्रा.२५ श्रीरामपूर २३ कॅन्टोन्मेंट १ नेवासा १० पारनेर ७ राहुरी १० शेवगाव १ कोपरगाव ३ श्रीगोंदा १५ कर्जत १४ अकोले ५ जामखेड१ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग: ‘ह्या’ तालुक्यात ढगफुटी; पाण्याचे थैमान, शेत, रस्ते गेले वाहून

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली आहे. शुक्रवारी पहाटे पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरात शुक्रवारी पहाटे ढगफुटी सदृश पाऊस झाला. या जोरदार पावसामुळे अमरापूर कर्जत रोड वरील रस्ते, पूल वाहून गेले असून बरीचशी शेतीही पाण्याखाली गेली आहे. या कोसळलेल्या अस्मानी संकटाने बळीराजा हवालदिल झाला आहे. अमरापूर कर्जत महामार्गावरील रस्त्याचे व … Read more

कर्जत तालुक्यात गुरुवारी 24 कोरोना बाधित

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कर्जत तालुकाही याला अपवाद नाही.लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाचा फैलाव कर्जत तालुक्यात जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. कर्जत तालुक्यामध्ये गुरुवारी दिवसभरामध्ये 24 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. आता तालुक्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 87 वर गेली आहे. तसेच गुरुवारी शहरातील 71 … Read more

जामखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील सहा जण बाधित

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. जामखेडमध्ये काही दिवसांपूर्वी कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळाले होते. परंतु लॉक डाऊन उठल्यानंतर पुन्हा जामखेडमध्ये कोरोना रुग्ण वाढले जात आहेत. काल तालुक्यात नव्याने 19 जण पॉझिटिव्ह निघाले. यामध्ये एकाच … Read more

शेवगाव शहरात सात जण कोरोना बाधित तर 53 जणांची मात

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. परंतु रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याने दिलासा मिळत आहे. शेवगावमध्येही कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. काल (गुरुवार) शेवगावमध्ये नव्याने ७ कोरोना रुग्ण आढळून आले. एकूण 67 नागरिकांची रॅपिड टेस्ट करण्यात … Read more

पारनेर तालुक्यात गुरुवारी आठ कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. पारनेर तालुक्यातही कोरोना रुग्ण वाढताना दिसत आहेत. गुरुवारी दिवसभरात आठ जणांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. या आठ जणांमध्ये कान्हूरपठार गावचे तीन, पाडळी दर्या दोन, सुपा एक, ढवळपुरी एक व टाकळी … Read more

धक्कादायक : बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक झाली असून पोलीस दल, जिल्हापरिषद , मनपा, येथे कोरोनाचा शिरकाव झाला असतानाच राहुरीत एका बँकेत तब्बल चार रुग्ण आढळले आहेत.  राहुरी शहरातील बसस्थानकासमोरच्या एका बँकेतील चार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे गुरूवारी तपासणीदरम्यान उघड झाले. चारपैकी दोन जण राहुरी शहरातील रहिवासी आहेत. या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डाॅक्टरचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,31 जुलै 2020 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील पशुवैद्यकीय डाॅक्टरचा (वय ४०) कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुले आहेत. राहुरी तालुक्यातील कोरोनाचा हा पहिला बळी ठरला. बुधवारी मध्यरात्री नगर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना डाॅक्टरांची प्राणज्योत मालवली. कामानिमित्त मुंबईत गेले असताना त्यांना बाधा झाली. खासगी रुग्णालयात बेड उपलब्ध … Read more

कोरोनाचा कहर, एकाच दिवशी तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- जामखेड येथील ४ कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील ७३ जणांच्या केलेल्या तपासणीत ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले.यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा समावेश आहे. शहरात काल दिवसभरात ए काच दिवशी तब्बल १२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सध्या तालुक्यातील एकुण संख्या ही १९ झाली आहे. गेल्या तीन महीन्यांच्या विश्रांती … Read more

तहसीलदारांनी केली नुकसानग्रस्त भागाची बैलगाडीतून पाहणी

अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- ढोरजळगाव परीसरातील पावसामुळे पाणी साचून नुकसान झालेल्या पिकांची पाहणी व शेतशिवारातील वहिवाट रस्त्याच्या पाहणीसाठी शेवगावच्या तहसिलदार अर्चना भाकड यांनी थेट बैलगाडीने शेतक-यांचा बांध गाठला. गरडवस्ती – गरवाडी ते ढोरजळगाव ने या शेती जमिनीतील वहिवाट रस्त्यासाठी शेतकऱ्यांनी तहसिलदार यांच्याकडे दाद मागितली होती. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व शेतात पिके असल्याने … Read more