अहमदनगर ब्रेकिंग : मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने घेतला बळी !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :   नगर शहरातील एमजीरोड येथील एका मोठ्या कापड दुकानाच्या मालकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे कापड बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये एकच घबराट पसरली आहे. अहमदनगर शहरातील एका मोठ्या दुकानाच्या मालकाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे.  या प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा दोन दिवसांपूर्वी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मृत व्यक्ती ही व्यावसायिक असून त्यांचा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पाथर्डी तालुक्यात गोळीबार ! पंचायत समितीच्या माजी सभापती…….

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  पाथर्डी तालुक्यातील शिराळ (चिचोंडी ) येथे रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास शेतीच्या वादातून दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका गटाकडून थेट गोळीबार करण्यात आल्याने एका तरुणाच्या पायाला गोळी लागली. तसेच या हाणामारीत  एकमेकांवर तुफान दगडफेकही करण्यात आल्याने सुमारे 15 ते 20 जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी २८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

माजी मंत्री राम शिंदे यांचे वडील अनंतात विलीन

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांचे वडील शंकरराव बापू शिंदे यांचे काल (शनिवार) निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज (रविवार) अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीस खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार रोहित पवार, माजी आमदार भीमराव धोंडे, कैलास वाघचौरे, अरुण मुंडे, भानुदास बेरड, अजय … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दिवसभरात आढळले ‘इतके’ रुग्ण ! वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज रात्री आणखी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये संगमनेर तालुक्यातील कुरण येथील २२ जण बाधित आढळून आले आहेत. याशिवाय श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील ०५ जण बाधित आढळून आले आहेत. निंबे नांदूर (ता. शेवगाव) येथील एक रुग्ण कोरोना बाधित आढळला आहे. अहमदनगर Live24 वर तुमच्या … Read more

आ. रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे कांदा चाळीचे अनुदान जमा

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : मागील दीड वर्षांपासून रखडलेल्या कांदाचाळींचे अनुदान कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. राज्य शासनाच्या ‘राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत’ कर्जत व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदाचाळीची उभारणी केली होती. मात्र, दीड वर्षांपापासून कांदा चाळींच्या अनुदानाचे भिजत घोंगडे तसेच पडले होते. अनुदान मिळण्यास विलंब झाल्याने … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यात आज आणखी १२ रुग्ण वाढले आहेत. नगर तालुक्यात नवनागापूर येथे ०३, नगर शहरात पदमानगर ०२, नाईकवाडपुरा (संगमनेर) ०१, श्रीरामपूर ०१, गवळी वाडा (भिंगार ) ०२, खेरडा (पाथर्डी) ०२, राहाता ०१  या रुग्णांचा समावेश आहे. आज ६० व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.आता जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आमदारांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  अहमदनगर जिल्ह्यातील एका आमदारांना कोरोनाची लागण झाली होती त्यांच्या पत्नीचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर शहरातील सावेडी भागातील ६१ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]Read more

नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : आमदार नीलेश लंके यांनी सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू मानून विकासात्मक व आरोग्याच्या दृष्टिकोनाने कामे चालू आहेत. कोरोनाला न घाबरता त्याचे संक्रमण रोखण्यासाठी उपाययोजना करून व नियमांचे पालन करून ही महामारी हद्दपार करावी, असे आवाहन आदर्शगाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत … Read more

‘युरिया खत ८ दिवसांत न मिळाल्यास आंदोलन’

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत्या ८ दिवसांत मिळाले नाही, तर कृषी विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा जनशक्तीचे अध्यक्ष शिवाजी काकडे यांनी दिला. तहसीलदार अर्चना भाकड व तालुका कृषी अधिकारी मरकड यांना युरिया खत त्वरित उपलब्ध करून द्यावेत म्हणून लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे, वसंत गव्हाणे, संदीप … Read more

पांडुरंग कृपेने कोरोना महामारी लवकरच संपेल

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 :  सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र बंद आहे. शासनातर्फे विविध स्तरांवर उपाययोजना सुरू करून जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे काम सुरू आहे. त्यात सर्वांचा सहभाग व संघटित प्रयत्न आवश्यक आहे. आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी पंढरपूरला वारीने न जाता घरातच विठ्ठल-रुख्मिणीची पूजा करून कोरोना संकट दूर करण्याचे साकडे घातले आहे. पांडुरंग हा सर्वांच्या भक्तीला … Read more

… त्यामुळे मी सांगेल तेच होणार आहे – आमदार निलेश लंके

अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख उमा बोरुडे यांच्यासह पारनेर नगरपंचायतीच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी शनिवारी बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आमदार नीलेश लंके यांच्या या खेळीमुळे विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लागला. विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेचे अनेक नगरसेवक आमदार नीलेश लंके यांच्या संपर्कात होते. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : 4 जुलै 2020

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : अहमदनगर जिल्ह्यात आज दिवसभरात ३३ रुग्णांचा कोरोनाचा चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.आज १६ व्यक्ती कोरोनातुन बरे होऊन घरी परतले. आज दिवसभरात ८७ व्यक्तींचा कोरोना चाचणी अहवाल निगेटीव्ह आला आहे.आज दुपारी २६ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. आज सायंकाळी ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. पारनेर तालुक्यातील ६ जणांना … Read more

पारनेर तालुक्यातील या गावात आढळले 5 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :  आज दिवसभरात जिह्यात तब्बल 33 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात 5 रुग्ण हे पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील आहेत. तर याच तालुक्यातील कुंभारवाडी येथील एकाचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सकाळी 26 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते.यात संगमनेर तालुक्यातील13 तर नगर शहरातील … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आज सायंकाळी जिल्ह्यात वाढले आणखी ०७ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज सायंकाळी आणखी ०७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये पारनेर तालुक्यातील पिंपळगाव रोठा या गावातील ०५ जण, कुंभारवाडी (ता. पारनेर) गावातील एक जण आणि अशोकनगर,श्रीरामपूर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान आज दुपारी २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले होते.  अहमदनगर Live24 वर … Read more

माजीमंत्री राम शिंदे यांना पितृशोक

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :   महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांचे वडील स्व.शंकर बाप्पू शिंदे यांचे दुःखद निधन झाले आहे. नगर येथे साई दीप हॉस्पिटल मध्ये आज संध्याकाळी ५ च्या दरम्यान त्यांनी अंतिम श्वास घेतला आहे. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, चार मुली, एक मुलगा असा परिवार आहे.  त्यांच्यावर हृदयविकार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : 26 रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 : आज अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे २६ रुग्ण वाढले आहेत, शहरातील ८ जणांसह जिल्ह्यात २६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १३, नगर शहर ०८, कोपरगाव तालुका ०२,अकोले ०२ आणि बीड जिल्ह्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. … Read more

आ. विजयराव औटी यांच्या पारनेरमधील गडाला हादरा !

अहमदनगर Live24 टीम ,4 जुलै 2020 :पारनेरचे आ. निलेश लंके यांनी माजी आ. विजयराव औटी यांच्या पारनेरमधील गडाला हादरा दिल्याने एकाच वेळी अनेक बुरुंज ढासळले आहेत. पारनेरच्या शिवसेनेतील पाच नगरसेवकांनी आज दुपारी बारामतीला जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पारनेर तालुक्यातील शिवसेनेचे पाच नगरसेवक राष्ट्रवादीच्या गोटात सामील झाले आहेत. त्यामुळे पारनेर … Read more