मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत …पिके झाली भुईसपाट !

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-विजांच्या कडकडाटासह रविवारी रात्री झालेल्या पावसाने राहुरी तालुक्याला अक्षरश झोडपून काढले. उभी पिके भुईसपाट झाली. अनेक झाडे उन्मळून पडली. रविवारी दिवसभर पावसाळी वातावरण होते. मध्यरात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. मानोरी, वळण, मांजरी या भागात पावसाबरोबर गाराही पडल्या. पावसामुळे काही भागातील उभी पिके भुईसपाट झाली. झाडे उन्मळून पडली. सडे-वांबोरी … Read more

आमदार रोहित पवार यांच्याकडून जनतेची दिशाभूल

अहमदनगर Live24 ,2 जून 2020 :-  कुकडी आवर्तन पाणी वाटप नियोजनात असमन्वय आणि आभाव असल्याचे परिणाम तालुक्यातील शेतकरी भोगत असून उन्हाळी आवर्तन हे पावसाळ्यात सोडत आहेत. पाणी सोडण्याबाबत लोकप्रतिनिधी ६ तारीख सांगत आहे आणि अधिकारी १० तारीख सांगून जनतेची दिशाभूल करीत आहे, असे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी सांगितले. कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी … Read more

जलसंपदा विभागाच्या गलथान कारभारामुळे शेतकर्‍यांचे 10 कोटीचे नुकसान

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- घोडेगाव तलावावरून उचल पाण्याच्या परवानग्या जलसंपदा खात्याने दिलेल्या आहेत. या तलावाखाली शेतकर्‍यांनी 700 एकर ऊस केलेला आहे. मात्र मार्च- एप्रिल 2020 मध्ये झालेल्या आवर्तनाच्या वेळी शेतकरी पाणी पट्टी भरण्यास तयार असताना घोडेगाव तलावात पाणी सोडले नाही. त्यामुळे सातशे एकर ऊस अडचणीत आला असून, या ऊसाचे सुमारे दहा कोटी रुपयांचे … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे दीडशतक !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून आजही पाच नव्या रुग्णांची भर पडली आहे, यामुळे अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येने दीडशतक पूर्ण झाले असून जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या १५२  झाली आहे. आज जिल्ह्यात आणखी ०५ नवीन रुग्ण. अहमदनगर शहरातील भवानीनगर मार्केट यार्ड येथील 29 वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाली … Read more

आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदेबाबत आमदार रोहित पवार म्हणाले….

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचा पाणी प्रश्न सध्या जिल्ह्यात चांगलाच गाजत आहे, श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते आणि माजीमंत्री राम शिंदे आज याच प्रश्नावर उपोषणास बसले होते. याबाबत आमदार पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. यावेळी पवार म्हणाले, हा त्यांचा प्रश्न आहे. कुकडीचे आवर्तन यापूर्वी उन्हाळ्यात कधीच दोनदा सुटले नव्हते. परंतु मतदार संघातील फळबागा, … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे खुले करा

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  लॉकडाऊन मुळे सध्या बंद असलेली  नगर शहरासह जिह्यातील मठ – मंदिर उघडण्यास परवानगी द्यावी. प्रशासनाने कडक नियमांची अंमलबजावणीची ही संबंधित विश्वस्त – पुजारी यांच्याकडून घेऊन मंदिरे खुली करावीत असे आवाहन विश्‍व हिंदू परिषदेने केले आहे. जिह्यात अनेक पुरातन, स्वयंभू व ऐतिहासिक वारसा लाभलेली देवस्थान आहेत.नगर जिल्हा विश्‍व हिंदु परिषदेच्या … Read more

त्या निर्णयाविरोधात नाभिक समाज संघर्षाच्या तयारीत

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  31 मे रोजी शासनाने महाराष्ट्रातील सलून व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले, त्या पार्श्‍वभुमीवर महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या सलून व्यवसाय सुरु ठेवण्याची विनंती केली आहे. जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लॉकडाऊनचया कालावधीमध्ये शासनाचया सर्व नियम अटींचे पालन करत असतांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या सलून … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : जिल्ह्यातील आणखी ०३ रूग्ण आज कोरोना मुक्त होऊन घरी परतले. या ०३ रुग्णांना आज बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता झाली ७३ झाली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील ३२ वर्षीय रुग्ण, राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील २४ वर्षीय युवक आणि अकोले … Read more

माजी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांचे उपोषण अल्पावधीतच स्थगित;’हे’आहे कारण

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 : कुकडी कालव्यातून उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे सोमवारी सकाळी ११ वाजता कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. काही वेळातच तहसीलदार नानासाहेब आगळे, कुकडीचे कार्यकारी अभियंता रामदास जगताप आदींनी येवून त्यांच्याशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर प्रा.शिंदे यांनी आंदोलन स्थगित केले. प्रा. राम शिंदे यावेळी म्हणाले, … Read more

कुकडीच्या पाण्यासाठी प्रा. राम शिंदे बसले उपोषणाला !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- कुकडीचे उन्हाळी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी माजी मंत्री प्रा. राम शिंदे हे कर्जतच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्तेही सोशल डिस्टन्स ठेवून उपोषणाला बसले आहेत. आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी तीन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते. जून महिना आला तरी कुकडीतून पाणी सोडण्यासाठी नियोजन झाले नसल्याने प्रा.राम … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सलूनची दुकाने पुन्हा बंद !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- अहमदनगरचे जिल्हाधीकारी राहुल द्विेदी यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊनची नवी नियमावली रविवारी रात्री घोषित केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील दुकानांची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच अशीराहणार आहे. तसेच पूर्वीपेक्षा फिरण्यासाठी चार तास वाढवून देण्यात आले आहेत. त्यामुळे आता सायंकाळी सातऐवजी रात्री नऊपर्यंत आता फिरायला मोकळीक राहणार आहे. २२ मे पासून सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘क्वारंटाईन‘ च्या वादावरुन खुनाचा प्रयत्न

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- क्वारंटाईन करण्यासाठी नावे देत असल्याच्या संशयावरुन सात जणांच्या टोळक्याने तिघांवर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात डोक्यात तलवारीने वार करुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे मंगळवारी (दि.26) रोजी ही घटना घडली. यामध्ये तीघे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी शनिवार (दि.29) रोजी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा … Read more

दोन दिवसांत नैराश्यातून दोघांच्या आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  शनिवार सायंकाळपाठोपाठ रविवारी दुपारी राहुरी तालुक्यात आत्महत्येची घटना घडली. या दोन्ही आत्महत्या नैराश्यातून झाल्याचे सांगितले जाते. रविवारी दुपारी तालुक्यातील वरशिंदे येथील गौतम भाऊसाहेब विधाते (वय ३५) यांनी राहत्या घरात गळ्याला दोर अडकवून गळफास घेतला. नातेवाईकांनी गौतमला राहुरी ग्रामीण रूग्णालयात नेले, मात्र उपचारांपूर्वीच तो मृत झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. सायंकाळी राहुरी … Read more

पती पत्नीला कुर्‍हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :- जामखेड तालुक्यातील डोळेवाडी येथे घराची भिंत माझ्या हद्दीत आली असून संध्याकाळपर्यंत ती काढून न घेतल्याने 13 जणांनी रामदास खाडे व त्यांची पत्नीला तलवार, लोखंडी पाईप, गज, दगड व कुर्‍हाडीने जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पती-पत्नी यांनी घाबरून घरात जाऊन दरवाजा लावला व पोलिसांना संपर्क केला योगायोगाने पोलीस उपअधीक्षक संजय सातव जामखेड … Read more

माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाला धक्का

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  पिंपळगाव पिसाच्या सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे दिनकर पंदरकर यांच्या पॅनेलच्या सुलक्षणा लक्ष्मण पाडळे यांची शनिवारी बिनविरोध निवड झाली. माजी आमदार राहुल जगताप यांच्या पॅनेलच्या अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव जागेवर असलेल्या सुमन मोरे यांनी पदाचा गैरवापर करत अतिक्रमण केल्याने अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे पद रद्द केले. त्यामुळे जगताप गटाला मोठा धक्का … Read more

पारनेर तालुक्यात पुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने खळबळ

अहमदनगर Live24 ,1 जून 2020 :-  ठाण्याहून टाकळी ढोकेश्वर येथे आलेल्या ३६ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी दिली. तालुक्यातील करोनाबाधितांची संख्या आता पाच झाली आहे. सर्व पाच रुग्ण मुंबई, ठाण्याहून आलेले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून टाकळी ढोकेश्वर येथील बाजारपेठ तातडीने बंद करण्यात आली. हिवरे कोरडा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आणखी ६ नवीन रुग्ण वाढले !

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- जिल्ह्यात आणखी ०६ नवीन रुग्ण तर ५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह मुंबईहून अकोले तालुक्यातील वाघापुर येथे आलेली ६२ वर्षे वयाची महिला बाधित. घाटकोपर होऊन अकोले तालुक्यातील जांभळे येथे आलेला ५३ वर्षीय व्यक्ती बाधित मुंबईहून निमोन(संगमनेर) येथे आलेले 40 वर्षीय व्यक्ती आणि आठ वर्षीय मुलगा बाधित मुंबईहून शेवगाव तालुक्यातील दहीगाव ने येथे … Read more

महत्वाची बातमी : उद्यापासून अहमदनगर जिल्ह्यात काय सुरु आणि काय बंद ? वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :-  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्‍यासाठी प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचे एक भाग म्‍हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्‍यास प्रतिबंध व्‍हावा म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 नुसार अहमदनगर जिल्‍हा महसूल स्‍थळ सीमेच्‍या हद्दीमध्‍ये कोणत्‍याही रस्‍त्‍यावर, सार्वजनिक वाहतुकीचे रस्‍त्‍यावर, गल्‍लोगल्‍ली याठिकाणी संचार, वाहतुक, फिरणे, उभे राहणे, थांबुन राहणे, रेंगाळणे असे कृत्‍य … Read more