हिवरे बाजारच्या नावलौकिकास बाधा !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोना विषाणूने थैमान घातल्याने लॉकडाऊनचा गैरफायदा घेत काही अवैध व्यावसायिक हिवरे बाजार व परिसरात अवैध जड वाहतूक केली जात आहे. यापूर्वी अशी वाहतूक कधीही होत नव्हती. येथील रस्त्यांचे नुकसान होत आहे, तसेच वाहनाचा वेग जास्त असल्याने रात्री अपरात्री शेती अथवा इतर काही कामानिमित्त बाहेर पडलेल्या लोकांच्या जीवितास देखील धोका … Read more

महत्वाची बातमी : राज्यातील लॉकडाऊन ‘या’तारखेपर्यंत वाढवला !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  कोरोना व्हायरसनं देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आज संपतोय. दरम्यान केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतानुसार १८ मेपासून ‘लॉकडाऊन ४’ ची सुरुवात होणार असून हा लॉकडाऊन ३१ मे पर्यंत चालणार आहे.  महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महाराष्ट्र सरकारनं 31 मे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मजुरांना घेऊन जाणारी खाजगी बस उलटली

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- पुणे येथून इलाहाबादकडे मजुरांना घेऊन जाणारी खासगी बस उलटून चार मजूर किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा फाटा येथे आज पहाटेच्या सुमारास नगर-औरंगाबाद महामार्गावर घडली. रविवारी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पिंपरी चिंचवड येथून ही बस उत्तरप्रदेश राज्यातील इलाहाबादकडे २६ मजुरांना घेऊन निघाली होती. सदर खासगी बस ( क्र … Read more

‘या’ निर्णयामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून कांदा हटवल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल, असा विश्वास शेतकरी नेते अनिल देठे यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारच्या निर्णयाचे त्यांनी स्वागत केले. अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार कांद्याचे भाव वाढल्यामुळे कोसळले होते. त्यानंतर कांद्याचा जीवनावश्यक वस्तूूंमध्ये समावेश करण्यात आला. कांद्याचे बाजारभाव नियंत्रित ठेवण्यात केंद्र सरकारला यश … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग, पालिकेच्या दोन कामगारांना अटक

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- नाकाबंदीच्या ठिकाणावरील झोपडपट्टीत राहणार्‍या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नगरपालिकेच्या दोन कामगारांविरूद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही कामगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पालिका कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेने विविध ठिकाणी नाकाबंदी केली आहे.लाख रस्ता या ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. नाकाबंदी ठिकाणी झोपडपट्टी आहे. येथील एक महिला … Read more

पत्ते खेळताना आयुष्याचाच पत्ता झाला कट !

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  पाइपलाइन रस्त्यावरील तागडवस्ती येथे एकाचा खून झाला. पत्ते खेळताना पैशांच्या वादातून हा प्रकार घडला. नंदकिशोर गणपत मंचरे (५२, तागडवस्ती) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तागडवस्ती भागात काहीजण शनिवारी जुगार खेळत होते. पैशांच्या वादातून त्यांच्यात भांडणे झाली. त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. मंचरे याला पत्ते खेळणाऱ्या जोडीदाराने दगडाने मारले. त्यात … Read more

‘त्या’ तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नगरमध्येच अंत्यसंस्कार

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मृत्यूपश्चात स्त्रावाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निघोजमधील संबंधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या सर्व दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे निघोज, पिंप्री जलसेन, पठारवाडी, तसेच चिंचोली येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मृताच्या १२ वर्षांच्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तोही शनिवारी सायंकाळी निगेटिव्ह आला. दरम्यान, निघोज परिसरात मुंबईतील रेड झोनमधून दाखल झालेल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ कोरोना बाधित रुग्णाला डिस्चार्ज,कोरोनामुक्त व्यक्तींची संख्या आता 41 !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविलेले १४ अहवाल निगेटीव आले आहेत. तर पाथर्डी येथील कोरोना बाधित व्यक्तीला काल डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या आता ४१ झाली आहे. आज सायंकाळी हे प्रलंबित १४ व्यक्तींच्या स्त्राव नमुन्यांचा अहवाल … Read more

ब्रेकिंग : अहमदनगर शहरातील ‘या’ ठिकाणी खून

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- पत्ते खेळताना झालेल्या वादातून एकाचा खून करण्यात आला. आज सायंकाळी शहरातील तागडवस्ती परिसरात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. नंदकिशोर मंचरे हे मयताचे नाव आहे. काही जण तागडवस्तीवर पत्ते खेळत होते. त्यावेळी पैशाच्या वादात झाला. त्यात एकास आपटून गंभीर दुखापत केली. उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यापूर्वीच मृत्यू … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हजारो शेतकरी कर्जास अपात्र, ‘हे’ आहे कारण

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- नवीन पीक कर्जासाठी पहिले कर्ज भरलेले असणे गरजेचे असते. राज्य शासनाने कर्जमाफी केली आणि पहिल्या दोन टप्प्यात अनेक शेतकरी कर्जमुक्त झाले. परंतु लॉकडाऊनमुळे आधार प्रमाणिकरण बंद असल्याने तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी अडचणी आल्या असून या शेतकऱ्यांचे कर्ज जैसे थे असल्याने सुमारे २८ हजार शेतकरी खरीप कर्जास अपात्र ठरले आहेत. … Read more

ठेकेदाराने खासदार ‘दादांना’ही दिली नाही ‘दाद’ !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- बहुचर्चित न्यू आटर्स ते निलक्रांती चौक रस्त्याच्या कामाबद्दल अनेकांनी डोके लावूनही फत्ते झालेले नाही. परंतु येथील गटारीचे काम तरी लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा घेऊन नागरिकांनी खा.डॉ.विखे यांना गार्हाणे मांडले. परंतु खासदारांच्या समोर फक्त हो म्हणून ठेकेदाराने हे काम ‘जैसे थे’च ठेवले. त्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावरील पाणी दुकानात शिरले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : युनियन बँक फोडण्याचा प्रयत्न करणारे दोघे ताब्यात !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- अहमदनगर शहरातील नगर-पुणे रोड वरील युनियन बँक आॅफ इंडियाच्या शाखेत धाडसी चोरी करण्याचा प्रयत्न करणात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. या आधीही शहरात दुसऱ्या एका बँकेत असा चोरीचा प्रयत्न झाला होता. पोलिसांनी उसवाल इंपिरियल चव्हाण व सेंथॉल अस्तनदूर काळे (रा.दोघे कुरणवस्ती, वाळूंज, ता. नगर) या … Read more

अहमदनगर शहरातील ‘हा’ भाग सील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- शहरातील सुभेदार गल्ली व सारसनगर भागात सात रुग्ण सापडताच नगर शहरातील माळीवाड्यासह मोठा भाग बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरात नागरिकांना फिरण्यास, तसेच दुकाने व आस्थापना सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने शहरातील खाद्यपदार्थांची, तसेच अन्य एकल दुकाने उघडण्याची मुभा दिली होती. त्यानंतर … Read more

स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांनी दिलेला लढा कोरोनाच्या संकटकाळात प्रेरणा देणारा -रेखा जरे पाटील

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर चालू असलेल्या लॉकडाऊनमुळे शहरात घराघरात स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे पाटील यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत गायकवाड, निरंजन जाधव, गणेश गायकवाड, रोहिणी पवार, संतोष पागिरे, कुणाल साळूंके, अमोल … Read more

रोहित पवारांच्या मतदारसंघातील नागरिकांना पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भूतवडा तलावात अत्यल्प पाणीसाठा असल्याने 15 दिवसातून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे जामखेडकरांवर अक्षरश: पिण्याचे पाणी विकत घेण्याची नामुष्की ओढावली आहे. यंदा मात्र मे महिना अर्धा संपत आला तरी जामखेड शहरासाठी टॅंकर सुरु झाले नाहीत. पहिल्यांदाच मे महिना टॅंकरविना ही परिस्थिती पहायला मिळत आहे. … Read more

मनसेच्या माजी जिल्हाध्यक्षासह पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा पाथर्डी पंचायत समितीचे माजी सदस्य देविदास खेडकर यांच्यासह त्यांच्या पत्नीवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. १२ लाख ५ हजार ४४५ रुपयांची बेहिशोबी मालमत्ता खेडकर यांच्याकडे आढळली आहे. याप्रकरणी देविदास खेडकर यांना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ताब्यात घेतले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष … Read more

‘त्या’ महिलेचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह !

अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :-कोरोनामुळे निघोज येथील ३९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर पारनेर तालुका हादरला होता. तथापि, मृताच्या पत्नीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. इतर नऊ जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले असून एकाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. प्रशासनाने पिंपरी, निघोज, चिंचोली, पठारवाडी हे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. नागरिकांच्या आरोग्याची चौकशी सुरू आहे. गुरुवारी … Read more

मोठी बातमी : अहमदनगर शहरातील दोघांना कोरोनाची लागण, बाधित रुग्णांची संख्या आता 62 !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- अहमदनगर शहरातील शांतीनगर येथे दोन दिवसापूर्वी कोरोना बाधित आढळून आलेल्या ड्रायव्हरची २२ वर्षीय मुलगी आणि सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या संपर्कातील २० वर्षीय युवकाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. आज हे दोघे बाधित आढळून आल्याने जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या आता ६२ झाली आहे. आज सायंकाळी पुण्याच्या लष्करी … Read more