बिग ब्रेकिंग : अहमदनगरमध्ये टळली पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पालघर मध्ये साधूंचे हत्याकांड गैरसमजुतीतून झाले होते, पालघर हत्याकांडाची पुनरावृत्ती अहमदनगर पोलिसांच्या सतर्कतेमुळे टळली  आहे. नगर तालुक्यातील विळद येथेही गुरुवारी रात्री असाच प्रसंग तिघा मजुरांवर ओढवला. नरबळीच्या संशयातून संतप्त झालेल्या जमावाने महिलेसह इतर दोघांना घेराव घालून त्यांच्यावर हल्ला चढविला.  दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते. त्यावेळी विजेचा … Read more

पुण्याहून दहा कोरोना रूग्ण आणून संपूर्ण गावात थैमान घालेन…

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- काष्टी येथून दररोज पुण्याला जा-ये करणाऱ्या मुन्ना बागवान याला कोरोना ग्रामसुरक्षा समितीच्या सदस्यांनी घरातच थांबण्यास सांगितले असता मी पुण्यातून कोरोना संक्रमित दहा जणांना गावात सोडून विषाणूचा प्रादुर्भाव वाढवेन. माझे कोणी काय करु शकत नाही, अशी धमकी त्याने दिली. त्याच्या विरोधात गुरुवारी ग्रामसुरक्षा समितीने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. बागवान … Read more

अफवांवर विश्वास ठेवू नका : महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :-  कोरोना तिसऱ्या टप्प्यावर येऊ पहात असल्याने सर्वांनी सतर्कता बाळगणे गरजेचे आहे. संगमनेर शहर व तालुक्यात विविध ठिकाणी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच अफवांवर विश्वास न ठेवता घरीच सुरक्षित थांबावे, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. थोरात म्हणाले, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सोशल डिस्टन्स, मास्क … Read more

अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये पावसामुळे धावपळ

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. सध्या लॉकडाऊन सुरू असल्यामुळे रस्त्यावर वर्दळ कमी आहे. मात्र, किराणा, औषधे, भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडलेले नागरिक, अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणार्‍या नागरिकांची अचानक सुरू झालेल्या पावसामुळे धावपळ उडाली. रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजीपाला विक्रेत्यांचे हाल झाले. जवळपास दीड तास … Read more

अवकाळी पावसाने घरांचे पत्रे उडाले, विजेचे खांब पडले, कांदेही भिजले

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- वादळ आणि अवकाळी पावसाने अस्तगाव भागातील अनेक घरांचे पत्रे उडाली, शेतात साठविलेला कांदा भिजला. काही ठिकाणी झाडांच्या फाद्या पडल्या, विजेचे खांबही पडले, यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले.या वादळी पावसामुळे वीज परिवठा खंडित झाला होता. काल दुपारी 4 नंतर पावसाळी वातावरण दिसून आले त्यानंतर पावणेसहाच्या दरम्यान वादळी वार्‍यांसह पावसाचे जोरदार … Read more

माजीमंत्री राम शिंदेनी सांगितले उमेदवारी न मिळाल्याचे कारण !

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- पक्षांतर्गत कोणत्याच वादावर कधीही जाहीर भूमिका न घेणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी देखील या विषयावर सोशल मिडीयातून आपली नाराजी व्यक्त केल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत वेळी पक्षाने एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, प्रा. राम शिंदे आदी नेत्यांना उमेदवारी डावलण्यात आली होती तेव्हापासून पक्षांमध्ये अंतर्गत वाद … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण आढळला

अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- घाटकोपर येथे राहत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पूण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेले सात व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ०६ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले असून ही ३० वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. सदर महिला आणि तिचा पती … Read more

भाजपाच्या ‘या’ आमदारांच्या खासगी कारखान्यातून दारूसाठी स्पिरीटची

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- ‘पार्टी विथ डिफरन्स’ पाठ थोपटून घेणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील आमदार बबनराव पाचपुते यांच्या साईकृपा फेज – 2 या कारखान्यातून धुळे येथे हातभट्टी दारुसाठी स्पिरिटची विक्री केली जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या तपासातून उघड झाले आहे. याप्रकरणी कारखान्यातील दोन कर्मचाऱ्यांनाही अटक करण्यात आली आहे. पाचपुते यांच्या साईकृपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- अवघ्या एक महिन्याच्या बाळाची दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. पारनेर तालुक्यातील वाघुंडे शिवारातील उज्ज्वला चव्हाण हिच्या घरी बुधवारी रात्री ही घटना घडली. मागील भांडणातून आरोपींनी उज्ज्वला हिच्या एक महिन्याच्या अर्णवच्या डोक्‍यात दगड घालून त्यास ठार केले. अर्णव अभिषेक चव्हाण (वय 1 महिना) असे मृत बाळाचे नाव … Read more

कोविड हॉस्पिटलला खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली भेट

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर येथील कोविड हॉस्पिटलमध्ये रूपांतरित करण्यात आलेल्या सिव्हिल हॉस्पिटलला अहमदनगर दक्षिण चे खासदार डॉ, सुजय विखे पाटील यांनी भेट दिली. कोरोनच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी याठिकाणी करण्यात आलेल्या वैद्यकीय उपाययोजनांची तसेच इतर सर्व बाबींची पाहणी केली व आढावा घेतला. अहमदनगर मधील नागरिकांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापन सुसज्ज … Read more

कोठडीतून पळून गेला,आणि मंदिरात जावून लपला.. अखेर पोलिसांनी अटक केलीच !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यातील पोलीस कोठडीतील पळून गेलेला आरोपी प्रविण पोपट गायकवाड यास गुरूवारी पहाटे पाच च्या दरम्यान महादेवाच्या मंदीरातून झोपलेला अवस्थेतच अचानक छापा टाकून ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पारनेर ग्रामीण रूग्णालयातुन पोलिसांच्या हाताला झटका देवुन पळालेला आरोपी प्रविण उर्फ मिठु पोपट गायकवाड याला वडनेर हवेलीच्या डोंगरावरील महादेव मंदिरातुन गुरूवारी … Read more

अहमदनगर कोरोना न्यूज अपडेट्स14 मे 2020, वाचा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची स्थिती !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महविद्यालयाकडे पाठविण्यात आलेल्या ०७ व्यक्तीच्या अहवालांची प्रतीक्षा असून आज रात्री पुन्हा १९ व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ६० व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या असून त्यापैकी ४० व्यक्ती बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. सध्या १६ रुग्णांवर उपचार सुरू … Read more

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे – जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध पातळ्यांवर प्रयत्न करीत असतानाच मान्सूनपूर्व पावसामुळे होणारे नुकसान तसेच पावसाळ्यात येणार्‍या नैसर्गिक आपत्ती, पूर आदींचा सामना करण्यासाठी आता प्रशासन सज्ज झाले आहे. यासंदर्भात, सर्व यंत्रणांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी तसेच पूर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी त्यांना सोपविण्यात आलेली जबाबदारी  व्यवस्थित पार पाडण्यासाठी त्यासाठीचे नियोजन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ पंचायत समिती सदस्यावर गुन्हा

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  पाथर्डी पंचायत समिती सदस्यासह त्यांच्या पत्नीवर बेकायदा मालमत्तेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये देविदास लिंबाजी खेडकर (वय 42, पंचायत समिती सदस्य, पाथर्डी, रा:- पाथर्डी , ता: पाथर्डी, जि:- अहमदनगर), सविता देविदास खेडकर (वयः- 37, गृहिणी, रा:- पाथर्डी ता:- पाथर्डी … Read more

कोरड्या विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-कान्हूरपठार शिवारात भक्ष्याचा पाठलाग करताना कोरड्या विहीरीत पडलेल्या बिबट्यास पारनेर वनविभाग, नगरच्या वाईल्ड लाईफ रेस्क्यु टिम व ग्रामस्थांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले आहे. बुधवारी (दि.१३) दुपारी दोन वा. कान्हूरपठार ते गारगुंडी रस्त्यावरील हनुमंत लोंढे यांच्या कोरड्या पडलेल्या सुमारे चाळीस ते पन्नास फुट खोल विहीरीत बिबट्या असल्याचे शेतकरी रामदास लोंढे … Read more

विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला अटक !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :-  विद्यार्थिनीवर पाथर्डी तालुक्यातील केळवंडी परिसरात तसेच शेतात १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थिनीला तिची आई कामानिमित्त पुण्याला गेली असताना मी तुला सांभाळणार आहे . आपण लग्न करू , असे म्हणत तिचे इच्छेविरुद्ध वेळोवेळी बलात्कार केला. त्यातून विद्यार्थिनीचे पोट दुखू लागल्याने मळमळ होऊ लागल्याने तिला गोळ्या देवून गर्भपात केला. सप्टेंबर २०१९ ते … Read more

तरुणीची पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या !

अहमदनगर Live24 ,14 मे 2020 :- राहाता परिसरातील बोठेवस्ती भागात राहणारी तरुणी प्रिती रघुनाथ बोठे , हिने रहात्या घरात भिंतीला असलेल्या पडद्याच्या दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रिती बोठे या तरुणीचे चुलत भाऊ अरुण भगवान बोठे ( कृषी सेवा केंद्र ) बोठे वस्ती राहाता यांनी राहाता पोलिसात खबर दिल्यावरून पोलिसांनी अमन , २५ नोंदविला … Read more