अहमदनगर ब्रेकिंग :’त्या’ महिलेला कोरोनाची लागण, कोरोना बाधितांचा आकडा झाला 54 !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर शहरातील एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा ५४ झाला आहे. या महिलेला सारी सदृश लक्षणे आढळल्याने तिला दोन दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तसेच तिच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. आज सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही महिला कोरोना … Read more

अहमदनगर जिल्हा लवकरच ग्रीन झोनमध्ये !

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली आहे.रुग्णाच्या संपर्कात असलेल्यांची तातडीने तपासणी, रुग्ण आढळलेला परिसर तातडीने सील करणे, तसेच बाधित व्यक्तीचा इतरांशी संपर्क तोडणे या जिल्हा प्रशासनाने केलेल्या त्रिसूत्री उपाययोजनांमुळे जिल्हा ग्रीनझोनकडे वाटचाल करत आहे. या तीन प्रमुख उपाययोजनांमुळे जिल्ह्यात रुग्ण आढळण्याचे प्रमाण काहीसे कमी झाले. राज्यात … Read more

महत्वाची बातमी : ‘त्यांना’ आता अहमदनगर मध्ये ‘नो एण्ट्री’ !

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- लाॅकडाऊन शिथिल झाल्याने अनेक मजूर, नातेवाईक नगरमध्ये वास्तव्याला येत आहेत. परवानगी असेल, तरच त्यांना प्रवेश दिला जाईल. परवानगी असेल त्यांची आरोग्य तपासणी करून होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जातील. अंमलबजावणी करण्यासाठी मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी शहरात १७ प्रभाग सुरक्षा समित्यांची स्थापना केली आहे. या समित्यांमध्ये आरोग्य विभागाच्या यंत्रणेसह नगरसेवकांचाही … Read more

अहमदनगरकरानों काळजी घ्या ! जिल्ह्यामध्ये वादळी पावसाचा इशारा, वाचा महत्त्वाची बातमी

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :-  कोरोना व्हायरस तसेच लॉकडाऊन चे संकट सुरु असतानाच आता अवकाळी पाऊसही बळीराजाची चिंता वाढविणार असल्याची चिन्हे आहेत. हवामान विभागाने राज्यभरात पावसाचे संकेत दिले आहेत.रविवारी (ता.१०) अहमदनगर जिल्ह्यातील काही भागांत वादळी पावसाने हजेरी लावली होती. दरम्यान आजही पुढील तीन ते चार तासात वादळी वार्‍यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 4 रुग्ण झाले कोरोनामुक्त; आज डिस्चार्ज,आतापर्यंत ४० जण झाले कोरोनामुक्त !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि आरोग्य यंत्रणा करत असलेल्या प्रयत्नांना यश आल्याचे चित्र दिसत आहे. आज जामखेड येथील ०४ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.आज या रुग्णांना बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ४० झाली … Read more

सुपा एमआयडीसीतील कामगाराची आत्महत्या

अहमदनगर Live24 ,11 मे 2020 :- पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगीक वसाहतीमधील परप्रांतिय कामगाराने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विनायक कन्हार (रा. ओडिसा) असे कामगाराचे नाव आहे. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील सुपा येथील औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठ्या कंपन्या आहेत. त्यातील सूरज बिल्डकॉन या कंपनीतील विनायक कन्हार रा.ओडीसा हा काम करत होता. याने वाघुंडे गावात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगराध्यक्षांची नागरिकांवर दहशत करून हुकूमशाही !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-  देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात लॉकडाऊनच्या नावाखाली नगराध्यक्ष सत्यजित कदम शासकीय कामात हस्तक्षेप करत नागरिकांवर दहशत निर्माण करून हुकूमशाही गाजवित आहेत. याची चौकशी करून संबंधित नगराध्यक्ष व त्यांच्या हस्तकांवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सदस्य अजित कदम यांनी केली आहे. राहुरी फॅक्टरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. … Read more

संगमनेर तालुक्यात वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ झाली आहे. अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्यात वाढणारी करोना रुग्णांची संख्या चिंताजनक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा पुन्हा हादरला,अंगावर ट्रॅक्टर घालून एकाचा खून !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा खुनाच्या घटनेने हादरला आहे,पाथर्डी तालुक्यातील अकोला गावात येथे किरकोळ वादातून पुतण्याने सख्या चुलत्याच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जागीच ठार केले आहे. ही घटना आज दुपारी घडली आहे. वादाचे कारण अद्याप समजले नसून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे,घटनेतील मयत बाबासाहेब व संशयीत आरोपी तुळशीराम हे एकमेकांचे साडू आहेत. … Read more

अहमदनगर जिल्हातील दुकाने आणि आठवडे बाजाराबाबत नवा आदेश

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिकाहदीतीन एकल (stand alone), वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापि याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी ०१ जण कोरोनामुक्त, वाचा आजचे कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- जिल्ह्यातील नेवासा येथील ०१ कोरोनामुक्त होऊन आज घरी परतला. आज या रुग्णाला बूथ हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६ झाली आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तींची संख्या ५३ असून त्यापैकी आता १४ जणांवर उपचार सुरू असून ०३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, अशी … Read more

धक्कादायक : कुट्टी मशिनमध्ये अडकून महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राहरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील तरुणी अलका शिवाजी मंडलिक , वय ३१ हिचा कुट्टी मशिनमध्ये पदर अडकून जखमी झाल्याने नगरच्या नोबेल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना अलका या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी डॉक्टरांच्या खबरीवरुन राहरी पोलिसात अमृनं . ४७ दाखल करण्यात आला असून पोना कारेगावकर … Read more

पुण्याहून विनापरवानगी आल्याने चौघांवर गुन्हा

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :-सध्या कोरोना विषाणूचा प्रार्दभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन चाल असताना कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो हे माहीत असतानाही पुणे ते राहरी असा कोणतीही अधिकृत परवानगी न घेता विनापरवाना प्रवास केला म्हणून चौघांविरुद्ध राहरी पोलिसात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचा भंग केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. चौघाही आरोपींना गाडगे महाराज आश्रम राहरी येथे क्वॉरंटाईन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून चिरडण्याचा प्रयत्न !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- राज्यात अनेक भागात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ल्याच्या घटना घडत असतानाच श्रीगोंदा तालुक्यातील निमगावखलू चेकनाक्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. या कर्मच्याऱ्याने प्रसंगावधान दाखवल्याने त्याचा जीव वाचला.या घटनेबाबत पो.ना मुकेशकुमार बडे यांच्या फिर्यादीवरून ट्रक क्र.सी.जी ०८ ए एम ७६६१वरील अज्ञात चालकाविरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा … Read more

अहमदनगर जिल्ह्यात वादळी वा-यासह जोरदार गारांचा पाऊस,वीज पडून एक जखमी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- रविवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जामखेडमध्ये वादळी वा-यासह विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला. नाहुली येथे वादळी पावसात वीज पडून शेतकरी राजेंद जाधव (वय ६४) हे जखमी झाल्याची दुर्घटना घडली. यात ते जखमी झाले आहेत. त्यांना जामखेड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तालुक्यातील शिऊर, सावरगाव, कुसडगाव, … Read more

भाजप निष्ठावंत माजी मंत्र्यांची श्रेष्ठींवर नाराजी !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील अनेकांनी विधानपरिषदेबाबत माझ्या नावाची शिफारस केली होती. 81 शिफारशी झाल्या होत्या. त्यामुळे श्रेष्ठींनी निर्णय घ्यायला हवा होता. आजी-माजी आमदारांनीही शिफारशी केल्या होत्या. तरीही श्रेष्ठींना विचार केला नाही, अशा शब्दांत भाजपचे निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी श्रेष्ठींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे जाणाऱ्या शिंदे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरला भरस्त्यात कमरेच्या बेल्टने मारहाण !

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- कारला दुचाकीची धडक देऊन धक्का लागल्याच्या कारणातून डॉक्टरला शिवीगाळ करून भररस्त्यात कमरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. नगर-मनमाड रस्त्यावरील लोकमत भवनशेजारी ही घटना घडली. साईदीप हॉस्पिटल येथील डॉक्टर मिलिंद कांबळे हे त्यांच्या स्विफ्ट कारमधून घराकडे चालले होते. त्यावेळी त्यांच्या कारला एका दुचाकीने पाठीमागून धडक दिली. गाडीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वाराने डॉक्टरसोबत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : आणखी एक व्यक्ती कोरोना बाधित, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता ५३

अहमदनगर Live24 ,10 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील मृत्यु पावलेल्या वृध्द व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही ३६ वर्षीय व्यक्ती धांदरफळ येथीलच आहे. या व्यक्तीचा अहवाल आज प्राप्त झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ५३ झाली आहे. तर, धांदरफळ येथील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ०८ … Read more