राहुरी तालुक्यात दरोडेखोरांचा धुमाकूळ; घरात घुसून मारहाण करत दागिने लुटले

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :- अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकून घरातील रोख रक्कम सुमारे २० हजार व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबाडून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी- चेडगाव रस्त्यावरील तरवडे वस्तीवर मध्यरात्री घडली आहे. दरोडेखोरांच्या हल्ल्यात रावसाहेब बापू तरवडे हे जखमी झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रात्री एक-दीडच्या सुमारास रावसाहेब बापू तरवडे … Read more

परदेशातून राहुरी तालुक्यात आलेले तिघे ! टेस्ट केल्यानंतर असे आलेत रिपोर्ट्स…

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2021 :-  देशभरासह राज्यात सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन या व्हायरसचा बोलबाला झाला असून काही ठिकाणी त्याचे संशयित रुग्ण आढळून आले. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यात तीन नागरिक परदेशातून आले आणि प्रशासनाची धांदल उडाली. मात्र, तिघेही निगेटिव्ह असल्याचे समजताच संबंधित यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. ब्रिटनमधून एक दांपत्य आणि जर्मनीहून एक युवक राहुरी तालुक्यात … Read more

मध्यरात्री दरोडा टाकून रोख रक्कम व दागिने लांबविले

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी, चेडगाव रस्त्यावरील तरवडे यांच्या वस्तीवर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघा चोरट्यांनी दरोडा टाकला. यावेळी घरातील सुमारे २० हजार रूपये रोख रक्कम व महिलेच्या गळ्यातील दागिने ओरबडून नेले. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्री एक ते दीडच्या सुमारास रावसाहेब बापू … Read more

ट्रॅक्टरचे टायर बदलत असताना घडले असे काही की दोघे थेट रुग्णालयात पोहचले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :-दोन ऊस तोडणी कामगार उस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर बदली करत असतांना अचानक फुटून जबर जखमी झाले असल्याची घटना आरडगांव येथे घडली आहे. या दोघा कामगारांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोघे प्रसाद शुगर कारखान्याचे कामगार आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील आरडगांव येथे … Read more

१९ गावांतील शेतकऱ्यांचे उपोषण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  सुरत, नाशिक, अहमदनगर ग्रीनफिल्ड राष्ट्रीय महामार्गात राहुरी तालुक्यातील १९ गावांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. या बाबत कुठल्याही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता या जमिनी संपादित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने  घेतला आहे. या शेतकरी विरोधी धोरणा विरोधात राहुरी तालुक्यातील १९ गावातील शेतकऱ्यांनी आज दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राहुरी तहसील … Read more

लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून तरुणास दगडाने मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  लाईट मिटर काढण्याच्या कारणावरून संदिप चव्हाण या तरूणाला लाथा बूक्क्यांनी व दगडाने मारहाण करून, मोटारसायकलची तोडफोड करण्यात आली. ही घटना राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील हॉटेल मानसी येथे घडली असून याबाबत 30 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप रायभान चव्हाण( वय २८ वर्षे ,राहणार देवळाली प्रवरा … Read more

बदलत्या हवामानामुळे शेती उत्पादनात वाढ करण्याचे मोठे आव्हान

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :-  बदलत्या हवामानात नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन शेतीच्या उत्पादनात वाढ करणे हे सर्वात मोठे आव्हान आज शेतकऱ्यांसमोर आहे. अशा आव्हानाचा सामना करण्यासाठी शाश्वत तंत्रज्ञान हा एक उपाय ठरू शकतो. त्यासाठी शाश्वत तंत्रज्ञानाचा प्रचार आणि प्रसार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते यांनी केले. राहुरी … Read more

Ahmednagar Corona Update Today : 30-11-2021जाणून घ्या जिल्ह्यातील आजचे सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ६४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

लखपती बनला बेघर, उपासमारीची आली वेळ

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- एकेकाळी लखपती असलेल्या वृद्ध व्यक्तीवर आज मुलांच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर राहून उपासमारीची वेळ आली आहे. माणूसकीला काळीमा फासणारी ही घटना अतिशय निंदनीय असून संबंधित वयोवृद्ध इसमाला न्याय मिळावा. अशी मागणी काही लोकांनी केली आहे. सलिम शहाबुद्दिन इनामदार वय ६६ वर्षे हे राहुरी शहरातील स्टेशन रोड परिसरात रहावयास होते. त्यांची … Read more

अल्पवयीन मुलीला पळवून नेले,तालुक्यातील तिसरी घटना ! परिसरात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2021 :- १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तिसरी घटना घडल्याने राहुरी तालुक्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध राहुरी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. रात्रीच्या वेळी नेहमीप्रमाणे मुलगी आपल्या कुटुंबांसमवेत घरात झोपलेली होती. पहाटेच्या वेळात मुलगी घरातून गायब असल्याचे दिसून आल्याने नातेवाईकांनी शोध … Read more

आज ११२ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ७० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ११२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ४९ हजार ४८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

वीज पुरवठा खंडित…संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडले

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- बंद केलेले रोहित्र सुरु करण्यासाठी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात शेतकऱ्यांसोबत आंदोलन करण्यात आले होते. यावेळी महावितरणने बंद असलेले रोहीत्र त्वरीत सुरु करण्यात येतील. मात्र, शेतकऱ्यांनी सात दिवसांत शेतीबिलाची चालू थकबाकी भरावी, असे आश्वासन मिळाल्यानंतरच ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. महावितरणने परिसरातील रोहित्र कुठलीही पूर्वसूचना न देता बंद … Read more

घराच्या पार्कींगमधून बुलेट चोरली मात्र पोलिसांनी बुलेटसह…!

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- घराच्या पार्कींगमध्ये लावलेलली बुलेट मोटारसायकल चोरणाऱ्या एका भामट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद कले आहे. महेश भाऊसाहेब मंचरे (वय २५, रा. गोटुंबे आखाडा, ता.राहुरी, जि.अहमदनगर) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. तर त्याने कोपरगाव परिसरातून बुलेट चोरली होती. याबाबत अधिक माहिती अशी की, दि.१३ नोव्हेंबर २०२१ रोजी राहत्या घराच्या … Read more

घरात झोपलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता, अपहरणाचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालूक्यातील दोन अल्पवयीन मुलींचे अपहरण झाले. त्यांना अद्याप तपास लागला नाही. तर आता अपहरणची तिसरी घटना समोर आली. दरडगाव थडी येथील अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर मुलीच्या वडिलांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे कि, दिनांक २५ नोव्हेंबर रोजी रात्री सदर … Read more

खड्ड्यात रिक्षा पलटी होऊन पाच गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील आंबी-देवळाली प्रवरा रस्त्यावरील सरई परिसरात खड्यात रिक्षा पलटी होऊन पाच जण जखमी झाल्याची झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात रिक्षाचालक प्रशांत किसन भिंगारदिवे, ताराबाई फकिरा पवार, मच्छिंद्र दादा मगर व इतर दोन असे पाच जण गंभीर जखमी होऊन खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. हे सर्व प्रवासी … Read more

राहुरी तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी गाव तेथे शाखा उभारणार

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2021 :-  राहुरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची चाहुल लागली आहे. यामुळे तालुक्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले असल्याने इच्छुकांसह कार्यकर्ते कामाला लागले आहे. यातच ना. शंकरराव गडाख व उत्तर नगर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे तरूण नेतृत्वही सक्रिय सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख खेवरे यांचे सुपुत्र … Read more

विज रोहिञ बंद केल्याने शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कामगारांना कार्यालयात डांबून ठेवले

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथिल महावितणाच्या उप कार्यकारी अभियंता कार्यालयाने शेतीचा विज पुरवठा विज रोहिञ बंद करुन खंडीत केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी देवळाली प्रवरा नगर पालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन छेडले. संतप्त शेतकऱ्यांनी दोन तासा नंतरही संबधित अधिकारी विज रोहिञ चालू करीत नसल्याने महावितरणाच्या … Read more

प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या हक्कासाठी तहसीलसमोर बेमुदत उपोषण सुरू करणार

अहमदनगर Live24 टीम, 26 नोव्हेंबर 2021 :-  जमिनीचे स्थानिक बाजारमूल्य विचारात घेऊन प्रथम मोबदला जाहीर करावा, त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.अन्यथा राहुरी तालुक्यातील शेतकरी मंगळवार दि. 30 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांच्यावतीने महसूल प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदनात म्हटले, सुरत एक्सप्रेस ग्रीनफील्ड अहमदनगर, नाशिक या नवीन राष्ट्रीय महामार्गासाठी शेतकर्‍यांच्या बागायती व फळझाडे … Read more