श्रीगोंद्याच्या तहसीलदार आणि नायब तहसीलदारांना केले निलंबित! नेमके संपूर्ण प्रकरण काय आहे? वाचा सविस्तर!

श्रीगोंदा – तालुक्यात एक मोठं प्रकरण समोर आलं आहे, जिथे द कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ ख्राइस्ट वेस्टर्न इंडिया या संस्थेची जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकली गेली. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली असून, यात थेट तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली आहे. ही जमीन विक्री सहज व्हावी म्हणून तहसीलदारांकडून मालकी हक्क बदलण्याची परवानगी घेण्यात … Read more

श्रीगोंद्यात गुंडांची दहशत ! आमदार विक्रम पाचपुते आक्रमक

श्रीगोंदे तालुक्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुंडांचा बंदोबस्त करण्याची मागणी आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी अधिवेशनात केली. चोरी, दरोडे, रस्तालुट, खून, टोळीयुद्ध आणि गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, गुंडगिरीद्वारे दहशत निर्माण केली जात असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दाणेवाडी येथे माऊली सतीश गव्हाणे (वय १९) या युवकाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या घटनेच्या तातडीने … Read more

श्रीगोंद्याच्या यात्रेत दुर्दैवी घटना! खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय मुलीचा मृत्यू

श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज यात्रेत फुले, तोरण आणि खेळणी विकणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. खुशी अनिल भोसले असे या मुलीचे नाव असून, ती मूर्तिजापूर तालुक्यातील सिलगुंडी गावची रहिवासी होती. यात्रेच्या शेवटच्या दिवशी उन्हाच्या तीव्रतेमुळे अचानक चक्कर येऊन पडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. खुशीच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे … Read more

Mauli Gavane Murder Case : माऊलीच्या खुनाच खरं कारण आलं समोर ! समलैंगिक संबंध …

Mauli Gavane Murder Case : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे १२ मार्च रोजी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. विठ्ठल मांडगे यांच्या शेतातील विहिरीत पोत्यात भरलेला मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता त्याचे मुंडके, दोन्ही हात आणि उजवा पाय धडापासून वेगळे करण्यात आल्याचे समोर आले. ही हत्या अत्यंत निर्दयपणे करण्यात आल्याने … Read more

श्रीगोंद्यात शिर नसलेल्या मृतदेहाने खळबळ ! पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर

श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे आढळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या मृतदेहाला शीर, हात आणि एक पाय नसल्याने ओळख पटवणे कठीण बनले आहे. मात्र, काही प्राथमिक सुत्रांच्या आधारे हा मृतदेह दाणेवाडी येथील बेपत्ता असलेल्या माउली सतीश गव्हाणे (वय १९) याचा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी यासंदर्भात माउलीच्या वडिलांची डीएनए चाचणी घेतली असून … Read more

Ahilyanagar Breaking : गोरक्षकांना धमक्या; ठाकरे गटाचे साजन पाचपुते यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदे तालुक्यातील कोकणगाव येथे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीने १४ गोवंश जनावरांची सुटका केली. या जनावरांना कत्तलीसाठी डांबून ठेवण्यात आले होते. मात्र, गोरक्षकांनी पोलिसांना माहिती देताच स्थानिक नागरिकांनी गोंधळ घातला आणि जनावरे सोडण्यास विरोध केला. इतकेच नव्हे, तर गोरक्षकांना धमक्या देत त्यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्यासह सात जणांवर गुन्हा … Read more

पोलिस कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात

१ मार्च २०२५ अहिल्यानगर : जमिनीच्या वादातून दाखल झालेल्या राईटच्या गुन्ह्यात कारवाई न करण्यासाठी सात हजार रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी श्रीगोंदे पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्याला लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडल्याची घटना घडली गुरुवारी संध्याकाळी घडली.पोलिस कर्मचारी संतोष फलके याच्या विरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये दिनांक २७ … Read more

आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही ! शेतकऱ्यांचे प्रश्न माझे प्रश्न म्हणून सोडवणार : प्रा.राम शिंदे

१४ फेब्रुवारी २०२५ श्रीगोंदा : विधान परिषद सभापतिपदी शिंदे यांची निवड झाल्याबद्दल चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शेतकरी व महिला बचतगट मेळावा झाला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना शिंदे बोलत होते.ते म्हणाले, की वेळ बदलत असते.पूर्वी आपण आणि श्रीगोंदेकरांनी संघर्ष केला. आता पाटपाण्याचे प्रश्न सोडवू, शासकीय नोकरी मिळाली की नोकरवर्ग … Read more

जिहादी मनासिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही : ना. राणे

श्रीगोंदा हे सरकार हिंदुत्ववादी विचारांचे सरकार असून, हे सरकार हिंदूंच्या ताकदीमुळे स्थापन झालेले आहे. या सरकारच्या काळात हिंदूंवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही. सरकारचा मंत्री व प्रतिनिधी म्हणून मी येथे आलो असून, येथील जिहादी मानसिकतेच्या लोकांची मस्ती सहन करणार नाही, असा इशारा राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला येथील ससाणेनगरमध्ये झालेल्या … Read more

श्रीगोंद्यात बनावट वधूचा पर्दाफाश ! सत्यनारायण पूजेत धक्का…वधूने ऐकले आणि धूम ठोकली

Ahilyanagar News : श्रीगोंदा तालुक्यातील एका सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमात घडलेल्या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण गावात खळबळ उडवली आहे. नवविवाहित वधू आणि तिच्या मध्यस्थीने लग्नानंतर सत्यनारायण पूजेच्या कार्यक्रमातच बनावट ओळख उघड झाल्यानंतर धूम ठोकली. या घटनेने वराकडील मंडळींची केवळ फसवणूकच नाही, तर मोठ आर्थिक नुकसानही झाल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे प्रकरण? तालुक्यातील एका युवकाचे लग्न … Read more

बंद पडलेल्या बसला दुचाकीची धडक ; एक ठार ! मदत करणाऱ्याऐवजी बघ्यांची गर्दी ; स्थानिक नागरिकांचा संताप

२५ जानेवारी २०२५ : श्रीगोंदा : तालुक्यातून गेलेल्या जामखेड ते न्हावरा या राष्ट्रीय महामार्गावरील श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यादरम्यान अपघातांची मालिका सुरूच असून हा रस्ता मृत्यूचा सापळाच बनला आहे.लिंपणगाव शिवारात श्रीगोंदा ते काष्टी रस्त्यावर बंद पडलेल्या श्रीगोंदा आगाराच्या बसला पाठीमागून दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. या अपघातात दुचाकीस्वार डॉ. नवनाथ अशोक साबळे (वय- … Read more

तलाठ्याला हाताशी धरून बनावट व्यक्ती उभी करून जमीन खरेदी

२३ जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील चिखली येथील सुमारे २ हेक्टर ४९ आर शेतजमीनीची तत्कालीन तलाठ्याला हाताशी धरून बनावट व्यक्ती उभे करत संगनमताने परस्पर विक्री केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोपट सोनावणे रा.निर्वी ता. शिरूर यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास श्रीगोंदा पोलीस करत आहेत. शिवाजी सुखदेव लंके, अरुण सुखदेव लंके, … Read more

अहील्यानागर हादरले !अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची हत्या ! पोलिसात हजर होऊन खुनाची…

श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे तरुणाने अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीची लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली तर मारहाण करताना मधे पडलेल्या आईला देखील बेदम मारहाण केल्याची घटना शनिवार दि. १८ रोजी रात्री उशिरा घडली. प्रियंका करण दिवटे (वय २२) असे मारहाणीत मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर आशा नवनाथ दिवटे (वय ४५) ही महिला जखमी झाली. … Read more

Big Breaking ! श्रीगोंद्यात शासकीय यंत्रणेच्या सहाय्याने जमीन विक्री; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmadnagar breaking

श्रीगोंदा शहरातील घोडेगाव रस्त्यावर स्थित दि कॉन्फरन्स ऑफ चर्चेस ऑफ क्राईस्ट इन वेस्टर्न इंडिया या संस्थेची १० हेक्टर ९२ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या मदतीने बेकायदेशीररित्या विक्री करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, शासकीय यंत्रणेतल्या दोषींवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बनावट दस्तावेज आणि संगनमताने … Read more

२ हजार ९०० चा पहिला हप्ता वर्ग ओंकार कारखान्यातर्फे प्रतिटन ३ हजार १० रुपयांचा बाजारभाव

श्रीगोंदा : ओंकार ग्रुपच्या हिरडगाव व देवदैठण येथील दोन्ही कारखान्यांकडे गाळपास आलेल्या उसाला प्रतिटन ३ हजार १० रुपये अंतिम बाजारभाव देणार असल्याचे ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे यांनी जाहीर करत ऊस बिलापोटी प्रतिटन २ हजार ९०० रुपयांचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर वर्ग केला असल्याची माहिती दिली. याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात बोत्रे यांनी चालू … Read more

पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ! पतीसह सासू, सासरा आणि दिर या चौघांविरोधात गुन्हा दाखल…

श्रीगोंदा : विवाहित महिलेला सासरच्या लोकांनी उपाशी ठेवत बेदम मारहाण, शिवीगाळ करत जिवंत ठार मारण्याची धमकी देत पिडीत महिलेला सासरा आणि दिर यांनी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच पिडीत महिलेच्या पतीने पत्नीच्या इच्छेविरुद्ध अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवल्या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा आणि दिर या चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल … Read more

शिक्षण आणि वाचनाने माणूस प्रगल्भ होतो ‘टग्या-टिगीच्या करामती’ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याध्यापक मांगडे यांचे मत

अहिल्यानगर : शिक्षण आणि पुस्तकांचे वाचन यातूनच माणूस खऱ्या अर्थाने प्रगल्भ होतो. त्यासाठी प्रत्येक शाळेत आणि घरोघरी लहान मुलांना सहजपणे वाचता येतील अशा पद्धतीने पुस्तकांची उपलब्धता असावी असे मत सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाब मांगडे यांनी व्यक्त केले. लेखक ‘टग्या-टिगीच्या करामती’ या बालकथा संग्रहाचे प्रकाशन केल्यानंतर ते बोलत होते. रुईखेल (ता. श्रीगोंदा) येथील शेळके वस्ती येथे आयोजित … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more