नगर कल्याण मार्गावर दोन कार व दुचाकीचा अपघात ! गर्भवतीच्या पोटावरून चाक गेले, पळून जाताना कारचालकाचाही धडकून मृत्यू..

accident

Ahmednagar News : नगर कल्याण रोडवर दोन कार व एका दुचाकीचा अपघात झाला. कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील महिला उडून रस्त्यावर पडल्या. त्या गरोदर होत्या. या धडकेत महिलेच्या पोटातील सात महिन्यांच्या बाळाचा (गर्भ) मृत्यू झाला. अपघातानंतर तो कारचालक कारसह पळून जाताना दुसऱ्या एका हॉटेलसमोर दुसऱ्या कारला धडकला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेत … Read more

‘बाप कितीही मोठा असुद्या, पण वारसदार…’ आ. बाळासाहेब थोरातांचा निशाणा नेमका कुणाकडे, चर्चांना उधाण

thorat

Ahmednagar Politics : सध्या महाराष्ट्रासह जिल्ह्यात आता फक्त विधानसभेचा फिव्हर दिसून येतोय. दररोज विविध घडामोडी घडताना दिसतायेत. राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचे गेल्या आठवड्यात सूप वाजल्यानंतर सर्वच पक्षांनी विधानसभा निवडणु‌कीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वत्र आढावा बैठका, सभा, विशेष मोहिमा घेणे सुरू आहे. त्यासाठी काँग्रेस, भाजप आणि समाजवादी पक्षासह अनेक प्रमुख पक्षांचे … Read more

शिर्डीत दहशतवादी..? ते दोघे आले अन गेलेही..? पोलिसांकडून कसून शोध सुरु

shirdi news

Ahmednagar News : शिर्डी शहरात बुधवारी एका नामांकित हॉटेलमध्ये दोन युवक आले होते. त्यांच्याकडे काही संशयित बॅगा होत्या. हॉटेलचालकांनी त्यांच्या आधार कार्डची मागणी करून पडताळणी केली असता त्यात तफावत आढळली. त्यामुळे संबंधित तरुणांना रूम रिकामी करण्यास सांगितले. ते दोघे त्यांच्या आलिशान गाडीमध्ये बसून निघून गेले. विशेष म्हणजे ते खोली खाली करताना उर्वरित पैसे न घेताच … Read more

फुटलेली काच अन् आत फुटलेल्या बांगड्या..! नगर झेडपीच्या पार्कीगमध्ये महिनाभरापासून उभी कार, एकच खळबळ

zp

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी आली आहे. अहमदनगर झेडपीच्या आवारात जवळपास महिनाभरापासून उभ्या असणाऱ्या कारने एकच खळबळ उडवून दिली आहे. धक्कादायक म्हणजे या कारची समोरील फुटलेली काच आणि बाहेरून गाडीत लाकडी दांडा आणि बांगड्यांच्या फुटलेल्या काचासदृश दिसणाऱ्या वस्तू अशा अवस्थेत ही कार आढळली आहे. आणि ही कार जवळपास महिनाभरापासून उभी असल्याचे समजते. … Read more

झगडे फाटा येथे अशोक लेलॅन्ड कंपनीच्या मालट्रकमधून ४०० लिटर डिझेलची चोरी !

crime

पोहेगाव झगडे फाटा येथे उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकच्या चालकाला बंदूकीचा धाक दाखवत डिझेल टाकीतून नुकतेच ४०० लिटर डिझेल चोरी केले गेले. काल गुरूवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास झालेल्या डिझेल चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अशोक लेलॅन्ड कंपनीचा (आरजे ११ जीसी ४५०५) क्रमांकाचा मालवाहू ट्रक यूपीकडून झगडे फाटा मार्गे इंदापूर … Read more

सावकाराच्या भावाने कर्जदारावर केले धारदार चाकूने सपासप वार, अहमदनगरमधील प्रकार

chakuhalla

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यामधील अवैध सावकारी हा अनेकदा चर्चेचा विषय झालेला आहे. यातून घडणाऱ्या अनेक घटनाही जिल्ह्यासाठी धक्कादायक असतात. आता सावकाराच्या चुलतभावाने कर्जदारावर वाहनाच्या चावीतील की-चैनमधील धारदार चाकूचे सपासप वार करत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार गमनेर तालुक्यात साकूरजवळ बिरेवाडी घडला आहे. कर्जदाराने सहायक निबंधकांकडे तक्रार दाखल केल्याच्या रागातून गुरुवारी … Read more

मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मारहाण, सोनाईत तीघांवर गुन्हा दाखल !

badanami

मुलीचे फोटो व्हायरल करून बदनामी करून जीवे मारण्याची धमकी देणे व दीड तोळा सोन्याची चैन बळजबरीने काढून घेऊन मारहाण केल्याप्रकरणी रुपेवाडी (ता. पाथर्डी) येथील तिघांवर सोनई पोलीस ठाण्यात नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३८ वर्षीय इसमाने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, आदिनाथ संजय मिठे याने आमच्या मुलीबरोबर … Read more

कांदा चाळींचे वैयक्तिक अनुदान बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी, विधानसभा निवडणूक सुद्धा ‘कांदा’ च गाजवणार !

kanda

दर वाढले की कांदा सर्वसामान्यांना रडवतो आणि कमी झाले की, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत आसवे आणतो. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मात्र कांद्याने मातब्बर नेत्यांच्या डोळ्यांतून पाणी काढत महायुतीच्या ११ खेळाडूंची विकेट काढली ! आता सरकारने कांदा चाळींना वैयक्तिक स्वरूपात दिले जाणारे अनुदान बंद केल्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता … Read more

नगर तालुक्यातील स्टोन क्रशरवर वाहनाखाली चिरडून कामगाराचा मृत्यू !

aaaccident

दगड व खडी वाहतूक करणाऱ्या टाटा कंपनीच्या हायवा या अवजड वाहनाखाली सापडून स्टोन क्रशरवरील परप्रांतीय कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील खंडाळा गावच्या शिवारात असलेल्या एस. आर. स्टोन क्रशरच्या आवारात बुधवारी (दि.१७) सायंकाळी ४.३० च्या सुमारास घडली. मनोज प्रकाश कुमार (मूळ रा. बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश, हल्ली रा. खंडाळा, ता. नगर) असे मयत कामगाराचे नाव आहे. … Read more

राहुरीत दरोड्याच्या तयारीतील पाच जण अटकेत, दोन आरोपी पसार, राहुरी पोलिसांची कारवाई !

police caught thief

राहुरी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या सात सशस्त्र आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या पैकी पाच आरोपींना वाहन व हत्यारांसह अटक केल्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले. राहुरी पोलीस स्टेशनच्या गस्त करणाऱ्या पथकास माहिती मिळाली की, गुहा परिसरामध्ये काही संशयीत लोक टाटा कंपनीची पांढऱ्या रंगाची मालवाहतूक गाडी व मोटरसायकलने येऊन दरोड्याच्या तयारीने टेहळणी करत आहे. … Read more

भंडारदरा धरण ४३% भरले, भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पावसाचे पुनरागमन !

bhandardarra

अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात पुन्हा एकदा पाऊस परतला असून पावसाच्या आगमनाने रखडलेल्या भात लागवडींना आता वेग आला आहे. तर भंडारदरा धरण ४३% भरले असून पावसाचे पुनरागमन झाल्याने भंडारदरा धरणाच्या पाण्याच्या पातळीत संथगतीने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटात चार ते पाच दिवसापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात … Read more

नगरकरांनो सावधान: संगमनेरमध्ये आढळले ‘या’ विषाणुजन्य आजाराचे तीन रुग्ण; आरोग्य विभागाने केल्या ‘या’ सूचना

Ahmednagar News : सदयस्थितीत झिका विषाणुजन्य आजाराचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण राज्यातील काही भागामध्ये वाढलेले आहे. डासांमार्फत पसरणाऱ्या झिका या विषाणुजन्य आजाराची सध्या सर्वसामान्यांमध्ये भीती आहे. सध्या या आजाराचे आतपर्यंत पुणे, नाशिक, कोलाहपूर,सांगली आदी ठिकणी रुग्ण आढळून आले आहेत. ही रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य विभागामध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान आता अहमदनगर जिल्हयातील संगमनेर शहरामध्ये आतापर्यंत … Read more

खा. लंके यांचे स्थानिक गुन्हे शाखेविरोधात सोमवारपासून उपोषण; शाखेतील हप्तेखोरीची तक्रार करूनही दखल नाही 

Ahmednagar  News : पोलीस दलातील स्थानिक गुन्हे शाखेतील भ्रष्टाचाराविरोधात दि. ११ जुलै रोजी मुख्यमंत्रयांसह इतरांकडे तक्रार करूनही त्याची दखल न घेतली गेल्याने खा. नीलेश लंके हे त्यांच्या सहका-यांसह सोमवार दि.२२ जुलै पासून पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.     खा. लंके यांनी यासंदर्भात गुरूवारी पोलीस अधिक्षकांना पत्र पाठविले आहे. या उपोषणासाठी लाउड स्पिकर तसेच … Read more

महामार्गाच्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकासह त्याच्या मित्रासोबत भरदिवसा घडले असे काही ; शिरूर नंतर नगर तालुका व शेवटी बीड (अंभोरा ) पोलिसांकडे जावे लागले

Ahmednagar News : नगर – सोलापूर महामार्गालगत असलेल्या वाटेफळ (ता. नगर) शिवारात रस्त्याच्याकडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या व्यावसायिकाला व त्याच्या मित्राला ९ दरोडेखोरांच्या टोळीने मारहाण करत त्यांच्या जवळील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा २ लाख ३१ हजारांचा ऐवज तसेच परवाना असलेला पिस्तुल पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १६) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान याबाबत … Read more

शनिवारी नगर तालुक्यातील ‘या’ गावात उडणार ‘धुरळा’..! होणार लाखोंची उलाढाल?

Ahmednagar News : मागे काही वर्षांपूर्वी न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी घातली होती त्यामुळे अनेकांचा हिरमुड झाला होता. काहीनी खास बैलगाडा शर्यतीसाठी जातिवंत बैल मोठी किंमत देऊन खरेदी केले होते, मात्र न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवर बंदी घातल्याने आता या बैलाचे काय करायचे असा प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला होता. दरम्यान याबाबत अनेकांनी न्यायालयात याचिका दाखल केलेल्या होत्या. … Read more

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यतामध्ये खा. लंके पुन्हा अव्वल ! ; दोन वर्षात १ कोटी ५३ लाखांची मदत : राज्यात सर्वाधिक मदत मिळवून देणारे लोकप्रतिनिधी

Ahmednagar  News :    मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत मतदारसंघासह राज्यातील गरजू रूग्णांना मदत मिळवून देण्यात राज्यातील लोकप्रतिनिधींमध्ये खासदार नीलेश लंके हे यंदाही अव्वल ठरले आहेत.         १ जुलै २०२२ ते १ जुलै २०२४ या कालावधीमध्ये खा. नीलेश लंके यांनी विविध आजारांनी त्रस्त असलेल्या १४९ रूग्णांना १ कोटी १५ लाख ७२ हजार रूपयांची … Read more

मोहरम मिरवणुकीत आ. संग्राम जगताप यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी केली ‘ती’ घोषणाबाजी ; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

Ahmednagar News : नगरमध्ये मोहरम निमित्त कत्तलची रात्र मिरवणुकीच्या वेळी बारा इमाम कोठला परिसरात गेलेल्या आ. संग्राम जगताप यांच्यासमोरच अनेक कार्यकर्त्यांनी खा. निलेश लंके यांच्या नावाच्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा व्हिडीओ शहरात व्हायरल झाला आहे. नगरमध्ये मोहरमनिमित्त कत्तलची रात्र मिरवणूक मंगळवारी (दि.१६) रात्री काढण्यात आली होती. ही मिरवणूक सुरु होण्याअगोदर सवाऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी मंगलगेट हवेली, … Read more

नगर जिल्ह्यातील श्रीगोंद्यानंतर ‘या’ गावात परत ड्रोनच्या घिरट्या ..! मात्र आता शूट आऊट…?

Ahmednagar News : एक महिन्यापासून जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अज्ञात ड्रोन घिरट्या घालत आहेत. ड्रोनच्या भीतीने गावागावात रात्रीच्या वेळी तरुण जागे राहून गस्त घालत आहेत. याबाबत शासनाची कोणतीच यंत्रणा अधिकृत खुलासा करत नाही. त्यामुळे रात्रीच्या वेळी आकाशात असे ड्रोनच्या घिरट्या घालत आहेत. याबाबत नागरिकांना प्रश्न पडला आहे याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेच उत्तर मिळाले नाही. … Read more