वारकऱ्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी अहमदनगर मधील वाहतुकीत केले ‘असे’ बदल

Ahmednagar News : आषाढी वारी व आषाढी एकादशी नंतर वारकरी भाविकांच्या दिंडया या परतीचा प्रवास अहमदनगर जिल्ह्यातून करणार असल्याकारणाने दि.२१/०७/२०२७ रोजीचे २४/०० वा. पावेतो कायम ठेवण्यात येत आहेत, तसेच इतर जिल्हयातुन मोठ्या प्रमाणात वारकरी भाविकांच्या दिंडया अहमदनगर शहरातुन जाणार आहेत. सदर दिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वारकरी सहभागी होणार आहेत. सध्या अहमदनगर – मनमाड या महामार्गावरील पत्रकार … Read more

शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याच्या आमिषाने तिघांना पावणे चार कोटींचा गंडा ; नगर जिल्ह्यातील घटना

Ahmednagar News : शेअर मार्केटमध्ये १० टक्के परताव्याच्या आमिषाने कमी काळात अधिक पैसा कमविण्याच्या नादात नगर जिल्ह्यातील अनेकजण कामाला लागले आहेत. त्यात अनेक डॉक्टर, वकील, शिक्षक आणि आमदार खासदारांसह अनेक प्रतिष्ठीत व्यक्ती आहेत. मात्र बदनामीच्या भीतीपोटी कोणी काहीच बोलत नाहीत. त्यामुळे, अनेकांचे पैसे गुंतून देखील गप्प बसण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. जिल्ह्यातील शेवगाव येथील अनेकांचे … Read more

पवार की डांगे ? नगर मनपाचे आयुक्त २४ तासात बदलले, बदली आदेशानंतर वेगळ्याच हालचाली, राजकारण की आणखी काही? पहा..

dange

Ahmednagar News : पंकज जावळे यांच्यावर झालेल्या लाच मागणीच्या आरोपानंतर महापालिका आयुक्तपदी कोण येणार याकडे लक्ष असतानाच देविदास पवार यांची नियुक्ती झाल्याचे आदेश शासनाने जारी झाले. परंतु अवघ्या २४ तासात याच्यात ट्विस्ट आला पवार यांची ऑर्डर रद्द करून यशवंत डांगे यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्याच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या. या हालचालींमुळे पवार आज नगरला रुजू होऊ … Read more

I AM CHAPRI : इन्स्टाग्रामवर अहमदनगरमधील महिलेसोबत केले ‘असे’ काही

Ahmednagar News : इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या वापराने केवळ भारतातच नव्हे तर जगभरात क्रांती घडवून आणली आहे. इंटरनेटचा वापर जसजसा वैविध्यपूर्ण झाला आहे, तसतसे अनेक लोक संवादाचे, एकमेकांशी संवाद साधण्याचे साधन म्हणून इंटरनेटचा वापर करू लागले आहेत. राजकारणी, अभिनेते आणि इतर नामांकित व्यक्ती देखील त्यांच्या प्रचार कार्याचा प्रचार करण्यासाठी आणि इंटरनेटवर अधिकाधिक प्रसिद्धी मिळवण्यासाठी इन्स्टाग्राम, … Read more

विठूरायाची ओढ ! अहमदनगरमधील चौघे अवघ्या चारच दिवसांत २१० किमी अंतर पार करत पंढरपुरात

pandharpur

Ahmednagar News :  आषाढी वारी म्हणजे वारकऱ्यांचा विठुरायाच्या भेटीचा सोहळा. तब्बल ८०० वर्षांहून अधिक जुनी परंपरा आषाढी वारीला आहे. लाखो वारकरी २५० किलोमीटर अंतर ठराविक दिवसात पार केले जाते. या वारीमुळे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जीवन समृद्ध झालेले आहे. मात्र, पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी येथील चौघांनी वारीचे २१० किमीचे अंतर अवघ्या चार दिवसांत पूर्ण केले आहे. … Read more

दशक्रियेला बोलवा कावळ्या आधी मी येईन, विकासकामांपेक्षा जनसंपर्क ठेवीन, सुजय विखे पाटील स्पष्टच बोलले…

sujay vikhe

Ahmednagar Politics : लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचा खा. निलेश लंके यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर सुजय विखे पाटील यांच्या जनसंपर्कवरून बरीच चर्चा झाली. त्यांचा जनसंपर्क कमी असतो, ते लोकांच्या कार्यक्रमाला येत नाहीत आदी अनेक टीकास्त्र त्यांच्यावर त्यावेळी सोडण्यात आले. आता याच मुद्द्याला धरून त्यांनी मार्मिक भाषण केले आहे. निमित्त होते एका … Read more

दृष्टीदोष दाखवून पूजा खेडकर आयएएस, वडिलांकडे 40 कोटींची संपत्ती, नगरमधून लढवली लोकसभेची निवडणूक

पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात  बदली झाली आहे. खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारण्याचा तथाकथित आरोप त्यांच्यावर होता. आता त्यांचा आणखी एक कारनामा समोर आलाय. खेडकर या यूपीएससीची परीक्षा अपंगत्वाचे प्रमाणपत्र दाखवून उत्तीर्ण झाल्या आहेत असा दावा आता केला जात आहे. दृष्टीदोष असल्याचे … Read more

नगरला येण्यापूर्वीच पवार यांची बदली ; ‘हे’ असतील नगर मनपाचे नवीन आयुक्त

mnp

Ahmednagar News : नगर महानगरपालिकेच्या रिक्त झालेल्या आयुक्तपदी दोन दिवसांपूर्वी देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र पवार यांनी नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच त्यांची बदली करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे आता नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी पिंपरी चिंचवडचे उपायुक्त यशवंत डांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परिणामी आता पवार यांची नगर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी … Read more

आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे मराठा समाजाने ओळखावे, मंत्री विखे पाटलांचा खा. शरद पवारांवर निशाणा

radhakrushn vikhe

मराठा आरक्षणाचे खरे शत्रू कोण हे आता मराठा समाजाने ओळखावे. चार वेळा मुख्यमंत्री राहून सुद्धा एकदाही मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली नाही. केवळ मताचे राजकारण करत समाजात दुही माजवयाची आणि आपली राजकीय समीकरणे मांडायची अशी बोचरी टीका राज्याचे महसूल तथा दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेत केली. … Read more

बंदुकीच्या धाकावर सरपंचाकडून ग्रामपंचायत सदस्याचे अपहरण; अहमदनगर हादरले

Ahmednagar News : आतापर्यंत मोठे उदयोजक किंवा प्रसिद्ध असणाऱ्याचे खंडणीसाठी अपहरण केल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र आता चक्क ग्रामपंचायत सदस्याचे अन ते देखील बंदुकीचा धाक दाखवत अपहरण केल्याची कर्जत तालुक्यात घडली आहे. नितीन बन्सी गव्हाणे असे या घटनेत अपहरण झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव असून ते श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. याबाबत अधिक माहिती … Read more

अहमदनगरमधील ‘या’ गावांत भूकंपाचे धक्के

bhukamp

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याचे वृत्त आले आहे. संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरात हे धक्के जाणवले. सकाळी ७.१५ वाजता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी भागात ४.५ इतक्या तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली. या भूकंपाचे हे सौम्य धक्के असल्याचे सांगितले जात आहे. समजलेली अधिक माहिती अशी : आज बुधवारी (१० जुलै) सकाळी सव्वासात … Read more

… जर सरकार बदलले नसते, तर आत्तापर्यंत ‘ते’ काम पूर्ण झाले असते : आमदार रोहित पवार

Ahmednagar News : ज्यांनी आपल्या कार्यकर्तृत्त्वाचा झेंडा देशभर फडकवला त्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या चौंडी या गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बांधकामासाठी निधी द्या. अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली. याबाबत आमदार पवार यांनी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना निवेदन दिले आहे. जर सरकार बदलले नसते, तर अद्यापपर्यंत … Read more

खासदार लंके यांनी गल्लीबोळात आंदोलने करण्यापेक्षा संसदेत दूध दरवाढीबाबत कायदा करण्यासाठी भांडावे ; ‘या’ शेतकरी नेत्याची टीका

Ahmednagar News : नुकतेच पार पडलेल्या लोकसभेत नगर मतदारसंघातून निवडून आलेल्या खा. निलेश लंके यांना जनतेने त्यांच्या समस्या संसदेत मांडण्यासाठी निवडून दिले आहे. त्यामुळे त्यांनी गल्लीबोळात आंदोलने करण्यापेक्षा संसदेत दूध दरवाढीबाबत कायदा करण्यासाठी भांडले पाहिजे. शेतकऱ्यांचा एवढा कळवळा असेल तर संसदेत भांडा. अशी टीका शेतकरी नेते संतोष रोहन यांनी केली आहे. राज्यात पडलेल्या दूधदर वाढीसाठी … Read more

एसटी कर्मचाऱ्यांची पगारासाठी वणवण ; अजून जूनचा पगार झालाच नाही

Ahmednagar News : प्रवाश्यांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य घेऊन गेले ७५ वर्षे अहोरात्र धावणाऱ्या एसटीने नुकताच अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. एकीकडे एसटीला स्वातंत्र्यकाळापासूनची परंपरा असताना सध्या मात्र याच एसटीच्या कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काच्या पगारासाठी तिष्ठत राहण्याची वेळ आली आहे. आज मितीला अनेक सरकारी तर सोडा पण इतर खाजगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याच्या ५ ते … Read more

‘ती’ शाळेत गेली, पण परत आलीच नाही.. विद्यार्थिनी सोबत काय झाले? अहमदनगरमधील घटना

kidnap

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात मुलींच्या अपहरणाच्या घटना घडत असल्याचे प्रकरणे समोर आली आहेत. आता शाळकरी मुलीला पळवल्याची घटना समोर आली आहे. राहुरी तालुक्यातील एका शाळकरी अल्पवयीन मुलीबाबत ही घटना घडली. अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीच्या विरोधात नविन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला … Read more

साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय !

sai baba

शिर्डी येथील साईबाबा सुपर व साईनाथ हॉस्पिटलमध्ये आठवड्यात एक दिवस कॅन्सर रोग तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध असले, तरी कॅन्सर आजाराची तीव्रता ज्या प्रमाणात आहे. त्यासाठी केमोथेरपी करायची असेल तर, यासाठी दोन्ही हॉस्पिटलचा समावेश महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत नसल्याने या मोफत आरोग्य सेवेचा लाभ रुग्णांना मिळत नाही. त्यासाठी लागणारे तज्ज्ञ डॉक्टर व बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांची … Read more

घाटघर, भंडारदऱ्याच्या पाणलोटात पावसाची विश्रांती, भात लागवडींना ब्रेक !

bhandardara

गेल्या दोन दिवसांपासून भंडारदरा धरणाच्या पाणलोटासह परिसरात पावसाने विश्रांती घेतली असून आदिवासी बांधवांच्या भात लागवडी थांबल्या असल्याचे चित्र समोर आले आहे. तर भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ३ टीएमसीवर पोहोचला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच भंडारदऱ्याला मान्सूनचे जोरदार आगमन झाले होते. १ जुलैपासून ते ७ जुलै पर्यंत भंडारदऱ्याच्या पाणलोटासह परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे आदिवासी बांधवांची भात खाचरे … Read more

दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची गरज !

dudh darvaadh

दूधाला हमीभाव देणे अतिशय गरजेचे आहे. दुधाला हमीभाव देत असताना दूध दरवाढीसाठी कायदा करण्याची अत्यंत गरजेचे आहे. यासाठी मोठे आंदोलन उभारू, असा इशारा दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. संगमनेर शहरातील श्रमिक मंगल कार्यालयात आयोजित दूध परिषदेमध्ये बोलताना उत्पादकांनी हा इशारा दिला. येथील श्रमिक उद्योग समूहाचे संस्थापक साहेबराव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली काल मंगळवारी (दि.९) दूध परिषद … Read more