Ahmednagar News : अपघाती मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिर्डी येथील महंत काशीकानंद महाराज यांच्या साई पालखी दिंडीला घारगावमध्ये ३ डिसेंबर रोजी अपघात झाला होता. त्यातील मृत वारकऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी नागपूर अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करताच, मुख्यमंत्री शिंदे यांनी मदत जाहीर केली. आमदार थोरात म्हणाले, की … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग

Ahmednagar News

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. निवडणूक आयोग व राज्य मुख्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार नगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी १५ डिसेंबर ते १५ फेब्रुवारीपर्यंत मोबाईल व्हॅनद्वारे ‘ईव्हीएम’चे प्रात्यक्षिक दाखवण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक मतदार केंद्रावर देखील अशा प्रकारचे प्रात्यक्षिक दाखवले जाणार आहे. या … Read more

संगमनेर : मंगळसूत्र चोरणारा एलसीबीच्या ताब्यात

Mangalsutra thief

संगमनेर येथे मंगळसूत्र चोरणारा सराईत आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने नगरच्या चांदणी चौकातून जेरबंद केला आहे. सचिन लक्ष्मण ताके (वय ३३, रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर) असे आरोपीचे नाव आहे. राजेंद्र भिमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी (रा. श्रीरामपूर) याच्या मदतीने गुन्हा केल्याची व चोरीचे सोने विजय पोपट उदावंत (रा. रुई, ता. राहाता) याला विकल्याची कबुली त्याने दिली. … Read more

निळवंडे धरणातून पाणी सोडून मध्यमेश्वर, पुनतगाव बंधारा भरून देण्याची मागणी

Nilwande Dam

निळवंडे धरणातून पाणी सोडून मध्यमेश्वर बंधारा व पुनतगाव बंधारा भरून द्यावा, अन्यथा गुरुवार (१४ डिसेंबर) पासून उपोषण करण्याचा इशारा नेवासे खुर्द व बुद्रुक, पुनतगाव, खुपटी, चिंचबन, साईनाथनगर ग्रामस्थांनी दिला आहे. निवासी नायब तहसीलदार चांगदेव बोरुडे यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की मध्यमेश्वर व पुनतगाव बंधारे भरून देणार असल्याचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले. निवेदनावर नंदकुमार … Read more

आ. राम शिंदे यांनी साधे उसाचे गुऱ्हाळही उभारले नाही, तरुणांचे भविष्य अडचणीत..आ. रोहित पवार कर्जत एमआयडीसीवरून आक्रमक

Ahmednagar News

महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर अनेक विकासकामांत स्थगितीचे राजकारण झाले. महायुतीने महाविकास आघाडीचे अनेक निर्णय रद्दबातल ठरवले. परंतु यात एक अहमदनगर जिल्ह्यात कर्ज एमआयडी बाबतचा प्रश्न भिजत पडला. आ. रोहित पवारांनी पाठपुरावा करत प्रसंगी आंदोलने करत एमआयडीसी मंजूर करून घेण्यापर्यंत धाव घेतली. त्यात अचानक आ. राम शिंदे यांची एंट्री झाली. त्यानंतर मात्र कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र औद्यागिक विकास … Read more

धोरण चांगले पण अडचणी अनंत ! ६०० रुपये ब्रास वाळूसाठी रोज ५०० रुपयांचे नुकसान, लोक ५ दिवसांपासून रांगेत उभे

Ahmednagar News

वाळू तस्करीला आळा बसला पाहिजे व सर्वसामान्यांना वाळू उपलब्ध झाली पाहिजे या दृष्टीने महसूल विभागाने नवीन धोरण आणले. या नव्या धोरणानुसार ६०० रुपये ब्रास वाळू आता लोंकाना उपलब्ध होईल. हे धोरण आखण्यात महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे मोठे योगदान. परंतु सध्या हे धोरण चांगले असले तरी विविध अडचणी येत आहेत. ६०० रुपये ब्रास वाळूच्या मागणीसाठी तहसील … Read more

विखे-थोरातांचा संघर्ष नव्या वळणावर ! अहमदनगरमधील राजकारणात मोठ्या घडामोडी घडणार

Ahmednagar News

अहमदनगर जिल्ह्याचे राजकारण व राजकारणाचे विविध पैलू हे नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. नगर उत्तरेचे राजकारण जर पाहिले तर मंत्री राधाकृष्ण विखे व आ. बाळासाहेब थोरात यांच्या भोवतीच फिरत राहिले. दोघेही आपल्या स्थानी दिग्गज. अहमदनगरमधील दिग्गजांच्या यादीत या दोघांचेही नाव अदबीने घेतले जाते. परंतु वैयक्तिक दृष्टया हे दोघेही एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी. हे काँग्रेसमध्ये एकत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये अध्यक्ष बदलावरून राडा, लाठ्या-काठ्यांनी हाणामारी

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अहमदनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. श्रीक्षेत्र मढी देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये मोठा राडा झाला आहे. अध्यक्ष बदलाच्या मुद्द्यावरून ही घटना घडली आहे. सुरवातीला बाचाबाचीचे प्रकरण अगदी हाणामारीपर्यंत गेले. अध्यक्ष बदलावरून बोलावण्यात आलेल्या बैठकीत विश्वस्तांमध्ये लाठ्या-काठ्यांनी हाणामारी झाल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये विश्वस्तांसह काही तरुण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. अध्यक्ष संजय मरकड यांना … Read more

खासदार सुजय विखेंनी आधी स्वतःचाच मेंदू तपासून घ्यावा !

Ahmednagar News

Ahmednagar News : खासदारकीच्या निवडणुकीत ज्यांच्या विरोधात दोन हात केले, त्यांच्याच हातात हात घालून तुम्ही फिरत आहात, ही जनतेची फसवणूक नाही का, असा सवाल करत विरोधकांचे मेंदू तपासण्याची भाषा करण्याआधी तुमचा मेंदू तपासून घ्या, असा उपरोधिक सल्ला युवासेनेचे राज्य सहसचिव विक्रम राठोड यांनी खासदार डॉ. सुजय विखे यांना दिला. आमचा विरोध हा तुमच्या राजकीय स्वार्थी … Read more

Ahmednagar Crime : स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवुन व्यापाऱ्यास लुटणारा जेरबंद

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : स्वस्तात सोने देण्याचे अमिष दाखवून व्यापाऱ्यास लुटणारा आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. नकुल उर्फ कारभारी अरुण भोसले (वय २५, रा. टाकमुकवाडी, ता. परांडा, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. पुणे जिल्ह्यातील कात्रज येथील संतोष नगर येथील व्यावसायीक रघुनाथ ऋषिकेश शिंदे (वय ४८) … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेचे दागिने चोरणारा गजाआड

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : महिलेचे दागिने चोरणारा आरोपी गजाआड करण्यात आला आहे. सचिन लक्ष्मण ताके (रा. उंदिरगाव, ता. श्रीरामपूर, जि. अ.नगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस संगमनेर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. संगमनेर येथील उषा अशोक लोंगानी या नातवाला घेवून घराकडे जात असताना एका मोटारसायकलवर … Read more

Shirdi Airport : शिर्डी विमानतळ परिसरात नियमित तपासणीचे निर्देश

Shirdi Airport

Shirdi Airport : जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तूंची व जिल्ह्याची माहिती दर्शविणारे फलक विमानतळ परिसरात उभारावेत. परिसरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच परिसरात पशुपालन करणाऱ्या पोल्ट्री फार्म चालकांना मृत्यू झालेल्या पक्षांची विल्हेवाट लावण्याच्या सूचना द्याव्यात. याबाबत नियमितपणे तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड यांच्यावतीने शिर्डी येथील विमानतळ आणि परिसराच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात जलजीवन योजनेत मोठा घोटाळा ! ‘त्या’ सर्वांची मिलीभगत, आ. नीलेश लंके यांनी केला मोठा गौप्यस्फोट

Ahmednagar News

Ahmednagar News : जलजीवन मिशन अभियानांतर्गत अनेक घोटाळे झाल्याचे आरोप आ. नीलेश लंके यांनी केले. अहमदनगर जिल्ह्यात विविध पाणीयोजना राबविण्यात आल्या. परंतु यात निविदा प्रक्रियेत मुख्य कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता यांनी संगनमताने घोटाळा केल्याचा आरोप आ. लंके यांनी नागपूर विधानसभेत केला. जलजीवनच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व गैरव्यवहार झाला असून याची चौकशी करावी अशी … Read more

चारचाकी वाहनाच्या धडकेत तीन जण जखमी ! नागरिकांकडून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : चारचाकी वाहनाने मोटारसायकलस्वराला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये मोटारसायकलवरील तिघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात पाथर्डी तालुक्यातील देवराई गावाजवळ बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची माहिती अशी की, कासार पिंपळगाव येथील महेश बनकर हे पत्नी व दोन वर्षांच्या मुलीसह नगरकडून तिसगाव मार्गे कासार पिंपळगावला मोटारसायकलवरून जात होते. देवराई गावाजवळ तिसगावकडून भरधाव … Read more

Ahmednagar Politics : शरद पवार गटाच्या पदाधिकारी निवडी अजित पवार गटाच्या मर्जीने होणार? अहमदनगरमध्ये ‘राज’कारण रंगले

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले. अजित पवार गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी देखील शरद पवार गटातून अजित पवार गटात केले. पण अनेक निष्ठावंत मात्र शरद पवारांसोबतच राहिले. परंतु आता या निष्ठावंतांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे अकोलेतील पदाधिकारी निवडी. राष्ट्रवादी बंडानंतर डॉ. किरण लहामटे हे आधी अजित … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे सापडले !

Ahmednagar News

ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याचे चार बछडे आढळल्याचे तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा हद्दीतील राहुरी एमआयडीसी परिसरात काल बुधवारी उघडकीस आले. चार नवजात बछडे असल्याने आसपास मादी बिबट्याचा संचार असल्याने शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या आठवड्यात जोगेश्वरी आखाडा येथील शेतकरी सचिन हारदे यांच्या शेतातील ऊस तोडणी सुरू असताना बिबट्याची बछडे दिसून आले होते. मात्र त्यावेळी उसतोडणी … Read more

सरकारने जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावे – आ. प्राजक्त तनपुरे

Prajakt Tanpure

नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्य शासनाला चांगलेच फैलावर घेत शेतकरी, दूध दर, वीज पुरवठा, पीक विमा व पाणी योजनांबाबत चांगलाच समाचार घेतला. शेतकरी विरोध थांबवत जनतेच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी आ. प्राजक्त तनपुरे यांनी अधिवेशनात केली आहे. यावेळी आ. तनपुरे म्हणाले की, नगर जिल्हा दुष्काळाच्या खाईत असताना राज्याने केवळ … Read more

Ahmednagar News : लाचलुचपत विभागाची कुणकूण लागताच तहसीलचा कर्मचारी फरार

Ahmednagar News

श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांची मागणी केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने सापळा रचला; मात्र, याबाबतची कुणकुण लागताच तो कर्मचारी पळून गेल्याने लाचलुचपत विभागाची कारवाई फेल गेल्याच्या चर्चेला श्रीगोंद्यात उधाण आले होते. याबाबत चर्चेतून मिळालेल्या माहिती अशी की, श्रीगोंदा तहसील कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने एका नागरिकाला शासकीय कागदपत्र देण्यासाठी एक हजार रुपयांच्या … Read more