Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये पोलिसाकडून तरुणीवर बलात्कार, तर पोलीस म्हणतो तिनेच माझ्याकडे एक कोटी मागितले..

श्रीरामपूर शहरातील रेल्वे स्थानकाजवळ एका महिलेची फसवणूक करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एका रेल्वे पोलिस कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा दाखल फरण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी (ता. १४) पीडित महिला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी श्रीरामपूर रेल्वेस्थानकावर आली होती. मात्र, तेथे एका गणवेशातील व्यक्तीने तिला गाठले आणि आपण रेल्वे पोलिस व सेवानिवृत्त सैनिक असल्याचे … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील ‘या’ गावात गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या !

अहिल्यानगरमधून एक दोन गटात तुंबळ मारहाणीची बातमी समोर आली आहे. राहुरीमध्ये ही भांडणे झाले असून गज, चाकू, चॉपरने तुंबळ हाणामाऱ्या दोन गटात झाल्या आहेत. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून या घटनेत सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. गौरव राजेंद्र रणसिंग (वय २२, रा. आझाद चौक, राहुरी) याने राहुरी … Read more

तारकपूरमध्ये एसटी बंद ! तारकपूर स्थानकात बसेस थांबत नसल्याने प्रवासी संतापले

Tarakpur Bus Stand Ahilyanagar : नगर शहरातील तारकपूर भागात रस्त्याच्या कामामुळे एसटी बसेस येणे बंद झाले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असून या समस्येकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सध्या तारकपूर येथील मुख्य रस्त्याचे काम सुरू असून एका बाजूचे काम पूर्ण झाले आहे, मात्र दुसऱ्या बाजूचे काम अजूनही … Read more

आधी प्रेमविवाह नंतर भांडणे ! नवऱ्याने मित्रांच्या सोबतीने केले बायकोला किडनॅप.. अखेर शिर्डीतून सुटका, धक्कादायक थरार..

Shirdi News : प्रेम होणं किंवा प्रेमविवाह करणं हे आता समाजाचा एक भाग बनले आहे. आता प्रेमविवाह किंवा प्रेम या गोष्टींकडे व्यापक दृष्टिकोनातून पाहिले जाते. बऱ्याचदा ज्या व्यक्तीवर प्रेम केलं, त्याच व्यक्तीशी लग्न व्हावं यासाठी तरुण-तरुणी जीवाचं रान करतात. परंतु हे प्रेमविवाह सर्वांचेच शेवटपर्यंत टिकतात असे नाही. अनेक प्रेमवीरांचे संसार अर्ध्यात संपलेले आहेत. दरम्यान आता … Read more

जुने सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास नाबार्डच्या साह्याने कृती कार्यक्रम – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सिंचनासाठी शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी नवीन योजन राबवित असताना जुने प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्यात येत आहेत. जुने रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नाबार्डच्या माध्यमातून कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला असल्याचे जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत सांगितले पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील निरा देवधर प्रकल्प संदर्भात … Read more

एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याकडून ‘त्या’ पोलिसावर हनीट्रॅप ? ५० लाख मागितले? अहिल्यानगरमध्ये खळबळ

अहिल्यानगरमध्ये हनीट्रॅपची प्रकरणे काही नवीन नाहीत. परंतु आता एका प्रकरणाने चांगलीच खळबळ उडाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याने पोलीस कर्मचाऱ्यालाच हनीट्रॅपमध्ये अडकवले असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात रंगली आहे. आम्ही एका नेत्याला अडकवलंय आता तुझा कार्यक्रम करू असे म्हणत त्या पोलिसाला महिला पदाधिकाऱ्याने व तिच्याबरोबर असलेल्या दोघांनी हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमध्ये पुन्हा एक मोठा अधिकारी लाच घेताना जाळ्यात ! मोठी कारवाई

अहिल्यानगरमध्ये यापूर्वीही अनेक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यांच्यावर कारवाईही झाली. परंतु लाच घेण्याचे प्रमाण मात्र कमी होत नाही. आता पुन्हा एक अधिकारी लाचेच्या जाळ्यात सापडला आहे. प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्पासाठीचे शासकीय अनुदान मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी तक्रारदारास ४० हजारांची लाच मागून त्याचा पहिला हप्ता म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना मत्स्य … Read more

Saklai Pani Yojana : ३० वर्षांची प्रतीक्षा संपली ! साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा, शेतकऱ्यांत जल्लोष

Saklai Pani Yojana : पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनाला राज्याच्या जलसंपदा विभागाने 21 मार्च 2025 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी लागणारं पाणी घोड धरणातून उपलब्ध होणार असून, या योजनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. हा शासन निर्णय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण … Read more

श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांना मिळणार पाणी ! शासन निर्णय झाला जाहीर

पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मौजे चिंचणी येथील घोड धरणाच्या फेर जल नियोजनाला राज्याच्या जलसंपदा विभागाने 21 मार्च 2025 रोजी मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे साकळाई उपसा सिंचन योजनेचा मार्ग मोकळा झाला असून, या योजनेसाठी लागणारं पाणी आता घोड धरणातून उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सूचनेनुसार हा शासन निर्णय … Read more

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : पुढील आठवड्यात तीन दिवस कांदा लिलाव राहणार बंद

अहिल्यानगर : सध्या ग्रामीण भागातील शेतकरी कांदा काढणी करत असून तो लगेच बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. जरी भाव कमी असला तरी अनेकांना कांदा विकण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे कांद्याची चांगली आवक होत आहे. परंतु आता सलग तीन दिवस बाजार समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. मार्च एंड अर्थात सन २०२४-२०२५ या आर्थिक वर्षाची अखेर असल्याने बँकांचे … Read more

मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा ! बिबट्या पिंजऱ्यात अडकला, त्याचे तीन साथीदार बिबटे आले आणि दरवाजा तोडून त्याला बाहेर काढून फरार झाले, अहिल्यानगरमधील थरार

अहिल्यानगरमधील एक गाव.. गावात एक दोन नव्हे चार चार बिबटे.. गावात सगळीकडे दहशत.. वनविभागाने पिंजरा लावला.. त्यात एक बिबट्या अडकला.. गावकरी व वनविभागाचे अधिकारी आले.. तेथे गावकऱ्यांनी इतरही बिबटे जेरबंद करा म्हणत वाद घालायला सुरवात केली.. तितक्यात त्या बिबट्याचे इतर तीन साथीदार बिबटे आले.. त्यांनी पिंजऱ्याला धडाका मारून मारून पिंजऱ्याच्या दरवाजाचे लॉक वाकून टाकले… आतला … Read more

Ahilyanagar News : ट्रक पलटी, दुचाकीवरून जाणार कुटुंब चेंगारल, आई ठार तर वडील व मुलगा गंभीर

नाशिकहून पुण्याकडे प्लायवूड घेऊन भरधाव वेगाने जाणारा मालट्रक संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारात पलटी झाला. या ट्रकखाली दुचाकीवरून जाणार कुटुंब दबले गेले. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले. पुणे-नाशिक बाह्यवळण राष्ट्रीय मार्गावर गुंजाळवाडी शिवारात पुलाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे दोन्ही बाजुची वाहतूक सर्व्हिस रस्त्याने वळवलेली आहे. नाशिकहून पुण्याकडे … Read more

Ahilyanagar News : आ.कर्डिलेंच्या गावात टोळक्याचा धुडगूस ! कुटुंबावर हल्ला, कुणाच्या डोक्यात तर कुणाच्या हातावर खुपसवले..

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात हाणामारी, गुंडागर्दी सारख्या घटना घडतच आहेत. आता थेट आ. कर्डीले यांच्या गावात अर्थात बुऱ्हाणनगर मध्ये एका मद्यधुंद टोळक्याने धुडगूस घातल्याचे समोर आले आहे. येथे एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला झालाय. बुऱ्हाणनगर येथील लहुजी चौकात एका कुटुंबावर रात्रीच्या सुमारास धारदार वस्तुने हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरूध्द भिंगार … Read more

कर्जतमध्ये पाणीटंचाईचा धोका ! ‘अवैध पाणी उपसा’ केल्यास थेट गुन्हा

कर्जत तालुक्यात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन तहसीलदार गुरू बिराजदार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने अनेक ठिकाणी जलस्रोतांची पातळी खालावली असून, ग्रामपंचायत हद्दीतील साठवण तलावांचे पाणी जून २०२५ पर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या तलावांमधून अवैध आणि अनधिकृत पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला असून, यासाठी … Read more

पाणी हक्कासाठी संघर्ष! ग्रामस्थांनी थांबवलं निळवंडे कालव्याचं काँक्रिटीकरण

संगमनेर: निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम धांदरफळ खुर्द आणि गोडसेवाडी (ता. संगमनेर) येथे सुरू होते. मात्र, बुधवारी (१९ मार्च २०२५) स्थानिक ग्रामस्थांनी एकत्र येऊन हे काम बंद पाडले. पोटचारी पूर्ण होईपर्यंत लाभक्षेत्रात काँक्रिटीकरण करू नये, कालव्यामुळे बंद झालेले ओढे आणि रस्ते पुन्हा खुले करावेत, तसेच ओढ्यांना पाणी मिळण्यासाठी व्हॉल्व्ह बसवावेत, अशा मागण्या ग्रामस्थांनी … Read more

शिर्डी विमानतळावर रात्रीही उतरतील विमानं ! आता रात्री येता येणार शिर्डीत, पहाटेची आरती गाठणं सोपं

राहाता: शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली नाईट लँडिंग सेवा अखेर सुरू होत आहे. येत्या ३० मार्च २०२५ पासून ही सेवा कार्यान्वित होणार असल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाने दिली आहे. पहिल्या टप्प्यात हैदराबाद-शिर्डी विमान रात्री ९:३० वाजता शिर्डी विमानतळावर उतरणार असून, ९:५० वाजता पुन्हा उड्डाण घेणार आहे. आतापर्यंत नाईट लँडिंगच्या केवळ चर्चा होत होत्या, पण … Read more

जिवंत सातबारा मोहीम आणि अहिल्यानगरच कनेक्शन ! शेवगावचा सुपुत्र, राज्यात हिरो

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष काकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम आता राज्यभर राबवली जाणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाला यासंबंधी शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांना होणारी ससेहोलपट संपुष्टात येण्यास मदत होणार असून, राज्यातील … Read more

भोंग्यावर टीका केल्याची शिक्षा ? अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकाराला घरासमोरच जबर मारहाण

श्रीरामपूर शहरातील मिल्लतनगर परिसरात १९ मार्च २०२५ रोजी एका वरिष्ठ पत्रकारावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात पत्रकार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्याकडून रोकड आणि सोन्याची चैन हिसकावण्यात आली आहे. हल्ल्यामागचे कारण शांतता कमिटीच्या बैठकीत मशिदीवरील भोंग्याच्या आवाजावर केलेली टीका असल्याचे समोर आले आहे. या घटनेने पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत … Read more