अप्पू चौक आता हत्तीशिवाय ! ऐतिहासिक शिल्प हटवल्याने स्थानिक नाराज !

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील लाल टाकी परिसरातील प्रसिद्ध ‘अप्पू’ हत्तीचा पुतळा अखेर महापालिकेने हटवला आहे. चौकातील रस्ता काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने हा पुतळा हलवण्यात आला आहे. मात्र, नागरिकांमध्ये याबाबत नाराजी असून, काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा याच ठिकाणी हत्ती शिल्प बसवण्याची मागणी केली जात आहे. महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले की, पुतळा कायमस्वरूपी हटवण्याचा … Read more

जामखेड शहरातील अतिक्रमण हटवण्याचा निर्णय ! ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

जामखेड शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आता गती घेणार असून, शहरातील पक्क्या अतिक्रमणांवर आठ दिवसांत कारवाई केली जाणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, व्यापारी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या निर्णयामुळे शहरातील वाहतूक सुधारणा व विकासकामांना गती मिळेल. शहरातील अतिक्रमण, राष्ट्रीय महामार्गाचे काम तसेच भूमिगत गटार व पाणीपुरवठा पाइपलाइन यांसाठी … Read more

विवाह सोहळ्यातील स्टेजने घेतला पेट ! दोघेजण गंभीर जखमी

संगमनेर तालुक्यातील कसारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लब अँड पॅलेसमध्ये बुधवारी दुपारी मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीत विवाह समारंभासाठी उभारण्यात आलेले स्टेज संपूर्णपणे जळून खाक झाले असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मालपाणी हेल्थ क्लब हा परिसरातील प्रसिद्ध विवाह सोहळ्यांचे ठिकाण आहे. अनेक भव्य विवाह समारंभ येथे पार पडतात. या पार्श्वभूमीवर बुधवारी एका लग्न … Read more

बडतर्फ पोलिस कर्मचाऱ्यांनी रचला व्यापाऱ्याच्या खुनाचा कट – पोलिस तपासात मोठे धक्के!

अहिल्यानगरमध्ये व्यापारी दीपक लालसिंग परदेशी यांच्या अपहरण आणि हत्येच्या प्रकरणाने संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. तोफखाना पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींकडून एक पांढऱ्या रंगाची कार जप्त केली असून, या गुन्ह्यात आणखी काही लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. पोलिस अधिक तपास करत आहेत. २४ फेब्रुवारी रोजी व्यापारी दीपक परदेशी यांचे अपहरण करण्यात आले होते. आरोपींनी त्यांना पांढऱ्या … Read more

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या आरोपीस अटक !

अकोले, २० मार्च २०२५: महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधान केल्याच्या आरोपावरून आंबड (ता. अकोले) येथील गवनेर सरोदे यास अकोले पोलिसांनी बुधवारी पहाटे पुण्यात अटक केली. अकोले न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी नरेंद्र रामभाऊ भोर (रा. आंबड) यांनी अकोले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गवनेर सरोदे विरोधात विविध कलमांनुसार अजामीनपात्र गुन्हा … Read more

अहिल्यानगर जिल्ह्यात गोहत्येच्या आरोपाखाली ८ सराईत गुन्हेगार हद्दपार – नेमकं काय घडलं?

२० मार्च २०२५, नेवासे : महाराष्ट्र शासनाने गोहत्येवर बंदी घातलेली असूनही, नेवासे येथील आठ सराईत गुन्हेगारांनी सातत्याने गोवंशाची कत्तल केल्याने अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी त्यांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. हद्दपार करण्यात आलेल्यांमध्ये नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, अबू शाबुद्दीन चौधरी, मोजी अबू चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी … Read more

दिवसा उन्हाचा तडाखा अन रात्री बोचरी थंडी ; विषम हवामानामुळे अनेक आजार वाढले

अहिल्यानगर : मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागात दिवसा उन्हाचा पारा चांगलाच वाढत असून रात्री व पहाटेच्या सुमारास बोचरी थंडी जाणवत आहे.या विषय हवामानाचा परिणाम मानवी आरोग्यावर होताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांना सर्दी,पडसे,ताप, खोकला अशा आजारांचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उष्णतेच्या त्रासामुळे दुपारच्या वेळी सर्व रस्ते निर्मनुष्य दिसत असून अघोषित संचारबंदी असल्यासारखी परिस्थिती निर्माण होत आहे.सकाळी … Read more

वणव्यांनी शेकडो हेक्टर वनसंपदेची झाली राख अन्नपाण्यासाठी वन्यप्राण्यांची मानवी वस्तीकडे धाव; दुर्मिळ औषधी वनस्पतीं नामशेष होण्याच्या मार्गावर

अहिल्यानगर : वणवा हा निसर्ग संपदा व वन्य प्राण्यांसाठी खूपच घातक ठरत असतो. नगर तालुक्यात एकाच महिन्यात विविध ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो हेक्टर वनसंपदेची अक्षरशः राख झाली आहे. वणव्यांमुळे वन्यप्राण्यांचे हाल झाले तर दुर्मिळ औषधी वनस्पतींना फटका बसला असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. नगर तालुक्यात वनविभागाचे सुमारे साडेसहा हजार हेक्टर क्षेत्र आहे. आर्मीचे सुमारे दोन … Read more

यांत्रिक युगात गाढवांचीही वाढली किंमत : मढीच्या बाजारात गाढवांना मिळाली इतकी मोठी किंमत

अहिल्यानगर : मढी यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रासह इतर राज्यातून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी आली होती. यावर्षी गाढवांच्या खरेदी विक्रीमध्ये दुपटीने वाढ झाल्याचे बोलले जात होते. श्रीक्षेत्र मढी येथील कानिफनाथांच्या यात्रेनिमित्त भरणारा गाढवांचा बाजार राज्यातच नव्हे तर देशात मोठा चर्चेचा विषय मानला जातो. या यात्रेनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक राजस्थान मधून देखील गाढव खरेदी विक्रीसाठी येतात आणि या खरेदी … Read more

रंगपंचमीला भटक्यांच्या पंढरीत खिशेकापुंची झाली दिवाळी ; अनेक भाविकांचे दागिने, मोबाइल, पैसे केले लंपास

अहिल्यानगर : रंगपचंमीच्या दिवशी मढी येथे सुमारे सात ते साडेसात लाख भाविकांनी चतुर्थ्यी व रंगपंचमी अशा दोन दिवसात (नाथभक्तांनी) कानिफनाथांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. मात्र वाहतुक कोंडी,खिसेकापुंचा व पाकीटमारांचा प्रचंड धुमाकुळ अशा अडचणी नेहमीप्रमाणे आल्या. त्यामुळे अनेक भाविकांना फटका बसला. मढी ग्रामपंचायत व देवस्थान समितीने भाविकांना पिण्याच्या पाण्यासह विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या होत्या. मढी … Read more

५०वर्षांपासुन ‘ते’ प्रश्न न सुटल्याने कोतवालांचे आजपासून कामबंद

अहिल्यानगर : चतुर्थश्रेणीचा दर्जा द्यावा,या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कोतवालांनी (महसूल सेवक) आज गुरूवारपासून पासून काम बंद आंदोलनाही हाक दिली आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नामदेव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन सुरु होणार असल्याची माहिती कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मिसाळ यांनी दिली. मंगळवारी कोतवाल संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्या नावे असलेले निवेदन … Read more

भीषण आग आणि हाहाकार! ब्राह्मणदरा डोंगरावर जनावरांसह गुराख्याचा जळून मृत्यू

१९ मार्च २०२५, संगमनेर : संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी गावाजवळील ब्राह्मणदरा डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्यासह दोन जनावरांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी दुपारी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, म्हसवंडी येथील रहिवासी सीताराम तुकाराम जाधव (वय ५३) हे मंगळवारी (१८ मार्च) जनावरे चारण्यासाठी ब्राह्मणदरा … Read more

संगमनेर ब्रेकिंग : छत्रपती शिवाजी महाराज यांची कमान कोसळल्याने राज्यात संतापाची लाट !

फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक कार्यकर्ते यांच्या गलथान कारभारामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांची उभारलेली स्वागत कमान कोसळली असून यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला असल्याने राज्यांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून आयोजकांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी शिवप्रेमी व विविध … Read more

कांदा १० रुपयांवर ! एप्रिलपर्यंत भाव ‘इतका’ घसरणार, ‘असे’ असेल कांद्याचे गणित

३५ रुपये किलोवर गेलेला कांदा आता घसरू लागला आहे. मागील काही दिवसांपासून कांद्याचे दर १० ते १५ रुपये प्रतीकिलो झाले आहेत. बाजारात सध्या लाल आणि उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होण्यास सुरुवात झाली आहे. याचा परिणाम म्हणून कांद्याचा भाव कमी होत आहे. बाजार समितीमध्ये कांद्याला सरासरी ३० ते ४० (प्रतिकिलो) रुपयांपर्यंत दर मिळत होता. मात्र, … Read more

शालेय विद्यार्थ्यांसाठीची वाहने सुरक्षित असतील याची दक्षता घ्या – जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला

अहिल्यानगर, दि.१९- शालेय विद्यार्थ्यांची ने – आण करणारी बस व वाहने विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित असतील याची संबंधित शाळेने दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्या. पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हा शालेय बस सुरक्षितता व जिल्हा प्रवासी समन्वय समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस महानगरपालिकेचे उपायुक्त विजय मुंडे, प्रादेशिक परिवहन अधिकारी … Read more

Ahilyanagar : गुंगीच औषध पाजायचे, नंतर पत्नींची अदलाबदल करायचे.., अनेकांशी संबंध; अहिल्यानगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर

अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसांत महिलांवरील अत्याचाराच्या अनेक घटना सातत्याने समोर येत आहेत. यात महिलांचे अपहरण, अत्याचार आदी घटनांचा समावेश आहे. आता एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. यात पत्नीला गुंगीचे औषध देऊन परपुरुषाशी संबंध ठेवायला देणाऱ्या पतीचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोणी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने (वय २९) पोलिस … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगरमधील सह्याद्री रांगांतील डोंगर काळवंडले ! प्रचंड आगीने वन्यजीव मानवी वस्तीकडे निघाले, वनस्पती, पशुपक्षी खाक

मागील काही दिवसांत आग, वणवा लागल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात डोंगरांना आग अर्थात वणवा लागला जात आहे. जंगलांना आग लागत आहे. अर्थात हा वणवा किंवा आग ही मानवनिर्मित असल्याचे नेहमीच बोलले जाते. जास्त नुकसान हे सह्याद्री पर्वत रांगांचे होताना दिसतेय. सह्याद्री पर्वत रांगातील डोंगर, दऱ्यांच्या कुशीत संगमनेर-अकोले तालुक्याचा पठार भाग वसला … Read more

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात ‘इतके’ शिक्षक होतायेत अतिरिक्त ! थेट जिल्ह्याबाहेर होणार समायोजन

मागील काही वर्षांत संचमान्यता झाल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांची संख्या वारंवार समोर आली. यात अनेक शिक्षक अतिरिक्त झाले व बहुतांशी लोकांची समायोजनही झाले. दरम्यान आता अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा एकदा २३९ शिक्षक अतिरिक्त ठरत असल्याची माहिती समजली आहे. यांमध्ये मराठीचे २२३ तर उर्दू माध्यमाचे १६ अशा शिक्षकांचा समावेश आहे.अंतिम संचमान्यतेनंतर अतिरीक्त शिक्षकांचे आंतरजिल्हा बदलीने समायोजन केले जाण्याची शक्यता … Read more