‘मिशन आरंभ’ : जिल्ह्यातील दोन हजार विद्यार्थ्यांची दांडी एकूण ३८५ केंद्रावर झाली परीक्षा

अहिल्यानगर : जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या शिक्षण विभाग (प्राथमिक) मार्फत मिशन आरंभ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणाया इ.४थी व ७ वी तील विद्यार्थ्यांची पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृती परिक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृती परीक्षेची तयारी व्हावी, यासाठी रविवारी १६ मार्च रोजी मिशन आरंभ परिक्षेचे जिल्हा परिषदेच्या सेस निधीतून आयोजन केले होते. या परिक्षेतून विद्यार्थ्याची शिष्यवृती परिक्षेची … Read more

नवीन विहिरीसाठी मिळणार ४ लाख अनुदान, दीड लाखांची उत्पनाची अटही संपवली ! ‘हे’ शेतकरी घेऊ शकतील लाभ

शासन अर्थात सरकार मग ते कुणाचेही असो, शेतकऱ्यांसाठी नेहमीच विविध योजना राबवत आले आहे आणि यापुढेही राबवत राहतील. याचे कारण म्हणजे शेतकरी हाच राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा कणा आहे. तोच खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा आहे. शेतात सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे पाणी अन ते साठवण्यासाठी विहीर. त्यासाठी खर्चही मोठा येतो. दरम्यान आता, या विहिरींसाठी ४ लाख … Read more

Ahilyanagar News : बापरे ! अहिल्यानगर जिल्ह्यातील ४८ हजार शेतकरी कर्जाच्या जाळ्यात, कर्जमाफी अन कर्जफेडीचे भयाण वास्तव

शेतकरी वर्ग हा विविध संकटांनी नेहमीच घेरलेला असतो. परंतु यातील सर्वात मोठे संकट त्याच्या डोईवर असते ते म्हणजे कर्ज. या कर्जाच्या जाळ्यात अहिल्यानगरमधील ४८ हजार शेतकरी अडकले असल्याचे वास्तव आहे. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर १२८४ कोटी रुपयांचे कर्ज आहे. शासनाकडून अनेकदा कर्जमाफीचा विषय घेतला जातो परंतु ती झालीच नाही तर हा कर्जाचा डोंगर वाढत जातो. महायुतीने … Read more

Mauli Gavane Murder : श्रीगोंद्यात रक्ताने माखलेले सत्य ! अखेर पोलिसांनी पकडला माऊलीचा खून करणारा आरोपी

Mauli Gavane Murder : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथील माउली सतीश गव्हाणे याचा निर्घृण खून झाल्याची घटना समोर आली होती शेतातील विहिरीत मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने जलद गतीने तपास करून एका आरोपीला अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. १२ मार्च रोजी विठ्ठल दत्तू मांडगे यांच्या शेतातील विहिरीत एक अनोळखी … Read more

गुन्हेगारांच्या टोळीचा हैदोस; पाचजण गंभीर जखमी, एकाचा डोळा निकामी तर एकास पडले ४५ टाके

अहिल्यानगर : जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील गुंडांनी शनिवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान करंजी येथील संकेत हॉटेलवर केलेल्या हल्ल्यात पाच जण जखमी झाले आहेत. त्यातील तीन गंभीर जखमींना उपचारार्थ अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात एका जखमीचा गेला डोळा, तर एका जखमीस तब्बल४५ टाके पडलेआहेत. करंजी येथील सलमान जमादार पठाण टोळीला … Read more

Ahilyanagar News : पुन्हा एकदा विटंबना, मूर्तीची तोडफोड ! अहिल्यानगरमधील ‘या’ गावात असंतोष

पुणतांबा या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या तिर्थक्षेत्री असलेल्या मंदिरांतील मूर्तीची तोडफोड होण्याचे प्रकार थांबता थांबेनात. येथे पुन्हा अहिल्यादेवी घाट परिसरातील श्री दत्तगुरुंच्या मूर्तीची विटंबना झाली आहे. मात्र या मूर्तीला कोणी जाणीवपूर्वक धोका पोहोचवला की दुर्लक्षित कारणामुळे ही मूर्ती विटंबित झाली, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. पाठीमागे डिसेंबर महिन्यात  पुणतांबा येथील गोदावरी तीरावर असलेले घृष्णेश्वर महादेव मंदिरातील मूर्तीची … Read more

Ahilyanagar News : नगर शहरात दोन गटात हाणामारी ! तलवार, रॉड, दांडक्याने मारहाण

शहरातील घासगल्ली येथे दोन गटांमध्ये वाद होऊन हाणामारी झाली. या हाणामारीत एका तरुणाच्या डोक्यावर तलवारीने वार करण्यात आला, तर दुसऱ्याला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत खान फैज अनवर वहीद अहमद (तांबटकर) आणि त्याचा भाऊ रैयान वाहीद अहमद खान (तांबटकर) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात … Read more

‘एआय’ करणार पोलिसांचे काम ! पोलिसांचं काम होणार ‘अशा’ पद्धतीने अगदी सोपं, गुन्हेगारांचा दी एन्ड

कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय या आधुनिक प्रणालीमुळे जग अधिक वेगवान होत आहे. आता हीच एआय टेक्नॉलॉजी पोलीस प्रशासनाचे काम अगदी सोपे करणार आहे. या टेक्नॉलॉजीच्या वापराने कोणत्याही गुन्ह्याचा तपास वेगवान, अधिक अचूक होणार आहे. भविष्यात ही प्रणाली गुन्हेगारांचा वेगाने शोध घेण्यास मदत करू शकते. नेमका कशा पद्धतीनं याचा वापर होऊ शकतो त्यावर एक नजर टाकुयात. … Read more

Ahilyanagar News : आदल्या दिवशी संभाजीराजेंचा ‘छावा’ पाहिला, दुसऱ्या दिवशी तशीच कटरने सगळे अवयव कापून हत्या झाली ! श्रीगोंद्याच्या माऊलीचा भयानक खून

बारावीत शिकणारा वारकरी वृत्तीचा निष्पाप मुलगा. पेपर सुरु असतानाच मिसिंग झाला. नंतर कुटुंबियांना तो सापडला तो थेट तुकडे तुकडे झालेला मृतदेहच. मृतदेहाची भयंकर विटंबना, एका विहिरीत त्यांचे तुकडे तुकडे केलेले अवयव तर दुसऱ्या विहिरीत त्याचे धड. धक्कादायक म्हणजे मृतदेह व त्याचे हात, पाय हे आरोपींनी अत्याधुनिक कटरने कापले आहेत. हे सगळं सहन केलं श्रीगोंदेतील माउली … Read more

निळवंडे धरणातून प्रवरा नदीत १७०० क्युसेक विसर्ग सुरू ! नागरिकांना काहीसा दिलासा…

Nilwande Water

अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून सध्या १७०० क्युसेक वेगाने प्रवरा नदीत पाणी सोडले जात आहे. गेल्या महिन्यापासून सुरू असलेले रब्बी हंगामाचे दुसरे आवर्तन कायम ठेवण्यात आले असून या विसर्गामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणीपुरवठ्याला मदत होणार आहे. नदीच्या शेवटच्या टोकापर्यंत १४ बंधारे भरण्याची प्रक्रिया सुरू असून त्यामुळे लाभक्षेत्रातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धरणातील पाणीसाठा भंडारदरा … Read more

भाविकांची लूट करणे भोवले, २०० रुपयांचा हार प्रसादास ९०० रुपयांना विकला : नगरपालिकेने केले दुकान सील

अहिल्यानगर : जिल्ह्यातील प्रसिध्द असलेल्या तिर्थक्षेत्र असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भक्त शिर्डीत दाखल होत असतात. श्रद्धेने हे भक्त साई चरणी हार व प्रसाद अर्पण करतात. मात्र, काही दुकानदार या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत असून मूळ किमतीच्या दहापट अधिक किमतीत प्रसाद व हार विकत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले. यानंतर ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत, लुट करणाऱ्या … Read more

लग्न सोहळे ठरताहेत इव्हेंट मॅनेजमेंटचे केंद्रबिंदू : अनेकांवर वाढतोय कर्जाचा डोंगर

अहिल्यानगर : लग्न म्हणजे दोन जिवांचे, दोन कुटुंबांचे मिलन मात्र बदलत्या काळानुसार आता ही संकल्पना देखील बदलत असल्याचे विदारक चित्र दिसत आहे. कारण आता शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही खर्चिक विवाह सोहळे होत आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे लग्न, साहित्याच्या किमतीही गगनाला भिडल्या असून, सोने, चांदीच्या दागिन्यांवर ही महागाईचे सावट आहे, असे असले तरी कर्ज काढून … Read more

ग्रामसेवक व सरपंचाचा अजब कारभार ; घरकुलच्या जिवंत लाभार्थ्यास दाखवला मृत ‘या’ तालुक्यातील घटना

अहिल्यानगर : पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थी जिवंत असूनही ग्रामपंचायतीच्या ठरावात ग्रामसेवक व सरपंचानी मृत दाखवण्याचा प्रताप करण्यात आला.ही घटना जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथे घडली आहे. या संदर्भात लाभार्थीच्या वारसदार मुलाने याप्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करावी, अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. या संदर्भात लेखी तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांच्याकडे केली आहे. मुलगा भागवत भुजंग … Read more

पाच ठिकाणी घरफोडी केली ; एकदा पोलिसांच्या तावडीतून सुटले पण दुसऱ्यांदा अडकले!

अहिल्यानगर : शहराजवळ असलेल्या भिंगारमध्ये घरफोड्या करणाऱ्या तिघा भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी संगमनेरमध्ये अटक केली आहे. त्यांनी नगर पाथर्डी रोडवरील वडारवाडी येथील मेडिकल दुकान फोडले होते. त्यांना संगमनेर येथील बसस्थानक परिसरात शिताफीने पकडले आहे. त्यांनी भिंगार परिसरात ५ ठिकाणी घरफोड्या केल्याचे उघडकीस आले असून त्यांच्याकडून रोख रक्कम व किराणा माल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला … Read more

इथे चेष्टा करू नका म्हटला ; सहा जणांनी एकास लोखंडी पाईपने बेदम चोपले

अहिल्यानगर : मस्जिदमध्ये चेष्टा मस्करी करु नका असे म्हटल्याचा राग येऊन सहा जणांच्या टोळक्याने तरुणास शिवीगाळ दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी व काहीतरी टणक धारदार वस्तूने डोक्यात मारहाण केली. तसेच दुकान व मोटारसायकलचे नुकसान केले. ही घटना मुकुंदनगर येथील गौसिया मस्जिदजवळ १३ मार्च रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या बाबत नाजीम मोहंमदअली शेख (वय ३२, रा.मुकुंदनगर) … Read more

कुटुंबासोबत झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे केले अपहरण : नगर तालुक्यातील ‘या’ गावात घडली घटना

जिल्ह्यात अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपत आल्याने या घटनांची भीती अधिकच वाढली आहे. १५ वर्षीय मुलीचे अपहरण! १३ मार्च रोजी नगर तालुक्यातील वाळकी गाव परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने अमिष दाखवून … Read more

महानगरपालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर विनापरवानगी वृक्षतोड प्रकरणी गुन्हा दाखल

शहरातील पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत महत्त्वाचे असून, कोणत्याही झाडाची तोड करण्यापूर्वी महानगरपालिकेची अधिकृत परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र, नियमांचे उल्लंघन करत मे. गृह संजीवनी कन्स्ट्रक्शन इंजिनियर व डेव्हलपर्स यांच्या “देव गुलमोहर कमर्शियल प्रोजेक्ट” समोरील “रेन ट्री” वृक्ष विनापरवानगी तोडण्यात आले. ही घटना महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासन प्रमुख यशवंत डांगे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने … Read more

Mauli Gavane Murder : माझ्या लेकराने असा काय गुन्हा केला होतो कि, त्याची निघृण हत्या केली ?

Mauli Gavane Murder News : श्रीगोंदा तालुक्यातील दाणेवाडी येथे – तुटलेल्या अवस्थेत विहिरीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पाच दिवसानंतर १५ मार्च रोजी पटली. दाणेवाडी गावातील दुसऱ्या – विहिरीत पोत्यात शरीराचे इतर – अवयव सापडले. ते अवयव माऊली सतीश गव्हाणे याचे आसल्याचा दुजोरा मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी दिला. परंतु बेलवंडी पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळू शकली नाही. माऊलीच्या कानातील … Read more