खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली. अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. … Read more

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात अंधश्रद्धा निर्मूलन समितीला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी सांगितले कि, तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावातील दहावीत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचा गावातीलच एका मुलासोबत शनिवारी विवाह होणार होता. … Read more

शेवगाव तालुक्यात कोरोनाबाधितांसाठी सेंट्रल ऑक्सिजन लाईन कार्यरत

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-   जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ लागल्याने अनेकांना प्राण गमवावे लागले. यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन सरसावले आहे. यातच जिल्ह्यातील शेवगाव येथील ग्रामीण रूग्णालय येथे उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रूग्णांसाठी लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या सेंट्रल ऑक्सिजन लाईनचे … Read more

कोरोनाचा वाढता धोका पाहता प्रत्येक प्रभागात लसीकरण केंद्र सुरू करावे

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. यामुळे दरदिवशी नागरिकांचे बळी जात आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम राबवण्यात आली आहे. मात्र शहरात लसीकरण वाढविण्यासाठी प्रत्येक प्रभागात केंद्र सुरू करावे, अशी मागणी आरोग्य समितीच्या वतीने करण्यात आली. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सागर बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी आयुक्त शंकर गोरे यांची … Read more

आमदार पवारांच्या तालुक्यात पाण्याचे नियोजन कोलमडले

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :-  सिंगल फेजचे रोहित्र जळाले असल्याने जामखेड तालुक्यातील बांधखडक ग्रामपंचायतचा पाणीपुरवठा बंद आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आता गावकऱ्यांची शासकीय विहिरीवर पाण्यासाठी धावाधाव सुरू झाली. त्यामुळे गावकऱ्यासंमोर कोरोनासह पाणीटंचाईचेही संकट उभे राहिले आहे. सविस्तर माहिती माहिती अशी कि, सातशे लोकसंख्या असलेले बांधखडक गावात पिण्याच्या पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ आली आहे. गावाला … Read more

ज्यांना लस मिळणार त्यांना जाणार फोन; गर्दी टाळण्यासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील लसीकरण केंद्रावर उपलब्ध होणारे कमी लसीचे डोस आणि लस घेण्यासाठी केंद्रावर होणारी भरमसाठ गर्दी कोरोना वाढीला कारणीभूत ठरू शकते म्हणून प्रांताधिकारी अनिल पवार आणि तहसीलदार प्रशांत पाटील यांनी गर्दी होऊ नये म्हणून नियोजन केले. ज्यांना लस मिळणार त्यांना फोन करण्यात येणार आहे. यामुळे कोणत्याही प्रकारची वशिलेबाजी … Read more

हनीट्रॅप प्रकरणात धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर तालुक्यातील हनीट्रॅप प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला आरोपी बापू बन्सी सोनवणे याला शुक्रवारी न्यायालयाने 24 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. नगर तालुक्यातील जखणगाव येथे एका 30 वर्षीय महिलेने एका बागतदाराला नाजूक संबंधाचे आमिष दाखवून त्याचा व्हिडिओ बनवून त्याच्याकडून एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हा … Read more

बाळ बोठेने ‘त्या’ मोबाईलवरून वकिलांना केले ‘इतके’ कॉल

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या कोठडीत सापडलेल्या मोबाईलवरून वकिलांशी तीन कॉल केल्याची माहिती तपासात समाेर आली आहे. याप्रकरणी बोठे त्याच्यावर याप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. बोठे सध्या पारनेर उपकारागृहात असून तेथील कोठडीत सापडलेल्या दोन मोबाईलमधून बोठेने वकिलांना फोन केल्याची पोलीस तपासात उघड … Read more

आता ‘या’ वादळाचा धोका : 5 राज्यांना केंद्राचा अलर्ट !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-तौक्ते चक्रीवादळानंतर आता ‘यास’ वादळाचे संकट घोंघावत आहे. 24 मे पर्यंत या वादळाची चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता केंद्राने आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू आणि अंदमान निकोबारला अलर्ट केले आहे.केंद्रानुसार 26 मे रोजी वादळ बंगालच्या किना-यावर धडकेल. कोविड रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तयारी करण्याचे केंद्राने पाचही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शहरातील लसीकरण मोहीम ‘ह्या’ कारणामुळे बंद !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- नगर शहरात विविध केंद्रांवर लसीकरण मोहीम हाती घेतली जात आहे. मात्र लसींचा साठा त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्याने अनेकदा या मोहिमेत अडथळा निर्माण होतो. सध्याही लस उपलब्ध नसल्याने शनिवारपर्यंत लसीकरण पूर्णतः बंद ठेवण्यात आल्याचे आयुक्त गोरे यांनी सांगितले. तसेच लसीकरण केंद्रावर टोकन सिस्टीम, नावे जाहीर करणे आदी अवलंबले … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद,वाचा जिल्ह्यातील आजची कोरोना रुग्णाची अधिकृत आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी होती असली तरी जिल्ह्यातील वाढते मृत्यू हा चिंतेचा विषय बनला आहे, अहमदनगर जिल्ह्यात ७५ मृत्यूची नोंद गेल्या चोवीस तासांत झालेली आहे. जिल्ह्यात आज ३४१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २४ हजार ५५६ इतकी झाली आहे. रुग्ण … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेत ‘इतके’ रुग्ण ! वाचा थोडक्यात…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात गेल्या 24 तासांत 2492 रुग्ण वाढले आहेत, जिल्ह्यातील रुग्णसंख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे –  (ही बातमी आताच ब्रेक झाली आहे,सविस्तर अपडेटसाठी कृपया काहीवेळाने पेज रिफेश करा ) अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम 

आमदार लंके यांच्या कार्याचे भाजपच्या ‘त्या’ महिला आमदारांकडून कौतुक !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- विधानसभेतील सहकारी आमदार निलेश लंके हे कोरोना संकटाच्या काळात रुग्णांची करीत असलेली सेवा ही कौतुक व अभिमानास्पद असून त्यांचा आदर्श घेऊन राज्यात कोव्हिड सेंटर सुरू करावेत असे सांगत आमदार लंके यांच्या कार्याचे चिखलीच्या भाजपाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी कौतुक केले. आमदार निलेश लंके यांच्या संकल्पनेतून भाळवणी येथे सुरू … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ‘ते’ आमदार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना उपचारासाठी मुंबईत ब्रीचकॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,आमदार डॉ. लहामटे १६ मे रोजी कोरोना बाधित झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यांना संगमनेर येथील चैतन्य हाॅस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.डॉ. नितीन जठार हे त्यांच्यावर उपचार करीत होते. मात्र, बुधवारी सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ह्या ठिकाणाहून अल्पवयीन मुलीचे अपहरण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- राहुरी खुर्द येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या दरम्यान घडल्याने खळबळ उडाली. या घटनेबाबत राहुरी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आला. राहुरी खुर्द येथे आई-वडिलांसोबत ही मुलगी राहत होती. बुधवारी, १९ मे रोजी पहाटे चार ते सहा वेळेत अज्ञात व्यक्तीने … Read more

पंतप्रधान देशाचा असतो. मात्र नरेंद्र मोदी केवळ गुजरातचेच पंतप्रधान आहेत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व गोवा या राज्यांना चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील चक्रीवादळाची पाहणी करून नुकसान भरपाईसाठी 1 हजार कोटींची मदत जाहीर केली. मात्र, महाराष्ट्रासाठी अद्याप कोणतेही पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून केंद्र सरकारवर टीका केली जात … Read more

हद्दच झाली ! उसाच्या शेतात घेतले गांजाचे …

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :-  अकोले तालुक्यातील मेहदूरी गावातील एका शेतकऱ्याने उसाच्या शेतात गांजाचे अंतरपीक घेतल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी बुधवारी त्या क्षेत्राचा शोध घेऊन छापा टाकून सुमारे ७५ किलो गांजा हस्तगत केला. यासंदर्भात मेहदूंरी येथे रोहिदास रामभाऊ पथवे बहिरवाडी, याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात कॉन्स्टेबल जबीर अन्वरअली सय्यद याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल … Read more

… बाळ बोठेला होवू शकते ‘इतकी’ शिक्षा !

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कारागृहातील आरोपींकडे सापडलेल्या माेबाइलचा रेखा जरे हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे याप्रकरणी बोठे याच्यावर गुन्हा दाखल झालाय. बोठे याच्यासह इतर तीन आरोपींनी दुय्यम कारागृहात माेबाइलचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान दुय्यम कारागृहात असलेल्या बोठेसह इतर दोन आरोपींवर मोबाइलचा … Read more