काय सांगता : या पंपावर रुग्णवाहिकेस मिळतेय मोफत पेट्रोल!

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- आज कोरोनामुळे सर्वत्र हाहाकार उडाला आहे. सर्वच उद्योगधंदे बंद आहेत. त्यामुळे अनेकजण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मात्र या सर्व अडचणीच्या काळात देखील जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्यावतीने कोरोना काळात सेवा देणाऱ्या रुग्णवाहिकासह ऑक्सिजन सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनांना दररोज ५० लिटर इंधन पूर्णपणे मोफत देण्याचा … Read more

बाहेर विनाकारण फिरले तर पोलिसांकडून रॅपिड अँटीजन टेस्टचा प्रसाद !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- विनाकारण घरातून बाहेर पडत असाल तर मग पोलिसांच्या त्या अनोख्या कार्यवाहीला सामोरे जावे लागणार आहे. याकामी राजूर पोलिसांनी अनोखी शक्कल लढवली असून, आता मोकार फिरणाऱ्यांवर कोरोनाची चाचणी केली जाणार आहे. राज्यात वाढत्या कोरोना संक्रमांचा फटका शहरी भागासह ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसत आहे.शहरी भागातून आता ग्रामीण भागातही कोरोनाने … Read more

धोका लक्षात घेऊन ‘या’ तहसीलदारांची कार्यतत्परता !

अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- तौक्ते वादळामुळे भयावह परिस्थिती असून या वाऱ्याचा फटका सहारा शासकीय कोविड सेंटर मधील रुग्णांना बसू नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून तहसीलदार एफ.आर.शेख यांनी तातडीने संपूर्ण हॉल बंदीस्त करण्याच्या सूचना दिल्यानंतर अवघ्या काही तासात ज्या भागातून वारा आत शिरतो तो भाग ग्रीन शेडने बंदीस्त केल्याने सर्व रुग्णांनी सुटकेचा निश्वास … Read more

अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा गाजतोय हनी ट्रॅप ! ते साहेबही झाले शिकार…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात पुन्हा एकदा हनी ट्रॅपची चर्चा गाजत आहे,नगरमध्ये नुकतेच प्रेमाच्या जाळ्यात अडकवून ‘त्या’ प्रसंगाचा व्हिडिओ शूट करून एक बागायतदारावर हनी ट्रॅप रचला असल्याची घटना उघडकीस आली होती. पोलिसांत अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग करून 1 कोटी रुपयांची मागणीही केली गेली. परंतु संबंधित बागायतदाराने पोलिसात धाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती बंद

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून बाधितांची आकडेवारीमध्ये वाढ होतच आहे. याला रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. यातच यामध्ये दरदिवशी काहीतरी नवीन नियम करण्यात येत आहेत. नुकतेच जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी नवीन आदेश काढला आहे. करोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने निर्बंध आणखी कडक केले आहेत. गर्दी टाळण्यासाठी … Read more

मुंबईकरांनो सावधान ! येत्या २४ तासात मुसळधारचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला आहे. तौत्के चक्रीवादळामुळे मुंबई शहर, उपनगर तसेच ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांमध्ये … Read more

अहमदनगर कोरोनाला हरवत आहेत ! आज रेकॉर्डब्रेक रुग्ण गेले घरी…वाचा संपूर्ण आकडेवारी “

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४०५२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख ११ हजार १९० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २१०५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

RBI चा अलर्ट ! २३ मे रोजी NEFT सेवा काही काळासाठी बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात बँकांचे सर्वाधिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीनं होत आहेत. व्यावसायिक आणि बँकांच्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. आरबीआय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ट्विट करुन ऑनलाईन पैसे पाठवण्यासाठी वापरली जाणारी एनईएफटी सेवा २३ मे रोजी १४ तासांसाठी बंद ठेवण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. एनईएफटी सेवा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तौक्ते चक्रीवादळामुळे शेतकऱ्याच्या सहा म्हशी ठार !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने कोकणासह गोव्यात प्रचंड नुकसान केले आहे. शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या या वादळाने अनेक जिल्ह्यात झाडे कोसळेली,त्याचसोबत घरांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या वादळाचा फटका नगर जिल्ह्यातील काही भागास बसला असून आज शहरातील कानडे मळा येथील एका शेतकऱ्याच्या म्हशींच्या अंगावर वीजवाहक … Read more

गुड न्यूज : अखेर कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  कुकडीच्या आवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयात प्रशांत औटी यांनी दाखल केलेली याचिका सोमवारी मागे घेतलीय. त्यामुळे कुकडीचे आवर्तन सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुकडी प्रकल्पातून नियोजनानुसार गेल्या आठवड्यातच पाणी सोडण्यात येणार होते. मात्र जुन्नर तालुक्यातील शेतकरी प्रशांत औटी यांनी याविरोधात याचिका दाखल केली. त्यावर कुकडी प्रकल्प आठमाही असल्याने आवर्तन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता असलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भावडी येथील सोपान नामेदव शिंदे ( वय ३८ वर्षे) याचा मृतदेह आढळून आला. सोपान शिंदेचा घातपात झाल्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. सोपान शिंदे सहा दिवसांपासून बेपत्ता होते. तशी फिर्याद नातेवाईकांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. रविवारी अकरा वाजेच्या सुमारास गावातील एक व्यक्तीला … Read more

तौक्‍ते वादळाचा अहमदनगर जिल्ह्यालाही जोरदार तडाखा; मोठ्या प्रमाणात नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- महाराष्ट्रासह चार राज्यांवर ‘तौक्ते’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे,अरबी समुद्रात निर्माण झालेलं तोक्ते चक्रीवादळाचे परिणाम नगर जिल्हयातही पहावयास मिळत आहे. जिल्ह्याच्या विविध भागात शनिवारी रात्रीपासूनच सोसाट्याचा वारा वाहत होता. काल रविवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास श्रीरामपूर शहर व परिसर मध्ये जोरदार सरी बरसल्या. हरेगाव, उंदिरगाव, माळेवाडीत जोरदार पाऊस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : वादळी वा-याच्या थैमानाने जनजीवन विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रिवादळाचा तडाखा दोन दिवसांपासून नगर जिल्ह्यातही बसत आहे. या वादळी वा-याच्या थैमानाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टीला धोक असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला होता. मात्र आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात तोक्ते चक्रिवादळाच्या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने केल असे काही ! पण अखेर गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :-  पत्नीची हत्या करून तिने आत्महत्या केली आहे, असा बनाव करणाऱ्या कोपरगाव तालुक्यातील मढी खुर्द येथील पती विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी याच्या विरुद्ध कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मढी खुर्द येथील विजय ऊर्फ बंडू आप्पासाहेब गवळी व त्याची पत्नी सुवर्णा यांच्यात १३ मे रोजी … Read more

‘आ. रोहित पवार यांच्यामुळे कुकडीच्या आवर्तनाचा खेळखंडोबा’

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या ढिसाळ नियोजनामुळे व दुर्लक्षामुळे गेल्या दीड वर्षात कुकडी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला असल्याचा आरोप भाजपचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख सचिन पोटरे यांनी केला. कर्जतसह दोन तालुक्यातील सुमारे दीड लाख हेक्टरपेक्षा जास्त असणाऱ्या क्षेत्राला हक्काचे पाणी न मिळाल्याने शेतकरी देशोधडीला लागून आर्थिक संकटात सापडून आत्महत्येची भाषा … Read more

निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे आश्वासन…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- ऊस व दुध व्यवसाय शाश्‍वत उत्पादनाचे साधन आहे. शेतकर्‍यांनी एकरी उत्पादन वाढवणे गरजेचे आहे. थोरात कारखान्याने ऊस गाळपाची विक्रमी कामगिरी केली. संगमनेर तालुका सुजलाम – सुफलाम करण्यासाठी लाभक्षेत्रात निळवंडे धरणाचे पाणी कालव्यांद्वारे आणू, असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या सन २०२०-२१ … Read more

राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे…

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- काँग्रेस पक्षाचे युवा नेते, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य, खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त अंत:करण पिळवटून टाकणारे आहे. तरुण वयातच देशपातळीवर नावलौकीक कमावलेला, लोकशाहीवर, काँग्रेस विचारांवर प्रगाढ श्रद्धा व उवल भविष्य असलेला समर्पित नेता आम्ही गमावला, अशा शब्दात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. खासदार राजीव … Read more

नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल !

अहमदनगर Live24 टीम, 17 मे 2021 :- कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी आतापर्यंत नगर शहरात ५ लाख ३० हजार २०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई महापालिकेच्या चार पथकांनी केली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शहरात दक्षता पथक गठीत करण्यात आले आहेत. परिमल निकम, शशिकांत नजान, कल्याण बल्लाळ, संतोष लांडगे … Read more