जिल्ह्यातील देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या लोकांसाठी खुल्या करावेत !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :- लॉकडाऊनमुळे झालेली आर्थिक परवड, कोरोना ग्रस्त कुटुंबाचे दवाखान्यात झालेला व होत असलेला खर्च पहाता, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, येणारी तिसरी लाट थोपविण्यासाठी शंभर टक्के मोफत लसीकरण करून कोरोनाग्रस्त कुटुंबासाठी आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी अहमदनगर राष्ट्र सेवादलाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली व जिल्ह्यातील सर्वधर्मीय देवस्थानांनी आपल्या तिजोऱ्या … Read more

त्या बॉक्‍समध्ये काय होते, ते मोकळे होते की त्यामध्ये बिस्किट, चॉकलेट होते, हे मी त्यांना सांगेन …

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-अहमदनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करत थेट विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला. या साठ्याचे वाटप केल्याबद्दल माहिती व्हिडिओ चित्रफितीद्वारे त्यांनी सामाजिक माध्यमांमार्फत प्रसारित केली. शिर्डी विमानतळावर त्यांनी हा साठा विशेष विमानांमधून उतरविला. तो रेमडेसिवीरचा साठा कोठून आणला हे त्यांनी जाहीर केलेले नाही. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकार रोहिदास दातीर हत्याकांडातील फरार आरोपीस उत्तर प्रदेशमधून अटक

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-पत्रकार रोहिदास दातीर हत्या प्रकरणातील पसार चौथा आरोपी अक्षय कुलथे याच्या पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी उत्तरप्रदेशमधून मुसक्या आवळल्या. येथील पत्रकार दातीर हे आपल्या घरी परतत असताना मल्हारवाडी रोडणे अचानक आलेल्या एका पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओतील काही इसमांनी पत्रकार दातीर यांना बळजबरीने स्कॉर्पिओत बसवुन त्यांचे अपहरण करून जीवे ठार मारले … Read more

‘रेमडेसिवीर’इंजेक्शनावरुन नगरमध्ये वातावरण तापले !

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-मतदारसंघाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी  विशेष विमानाने रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आणला खरा, परंतु आता यावरुन जिल्ह्यात चांगलेच वातावरण तापले आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. विखे यांनी विनापरवाना रेमडेसिवीर इंजेक्शन आणल्याचा दावा करत याविरोधात हायकोर्टात दाद मागितली आहे. सोमवारी सुनावणी झाली असता, न्या. आर. व्ही. घुगे आणि न्या. बी. … Read more

दोन दिवसात तब्बल २९६ रेल्वे प्रवाशी होम क्वारंटाईन!

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-संवेदनशील राज्यातून दूर पल्ल्याच्या गाडयांनी जिल्हयात येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकातच जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशानुसार शुक्रवारपासून तपासणी सुरू झाली आहे. रविवार व सोमवार या दोन दिवसात दूर पल्ल्याच्या गाड्यांनी जिल्हयात दाखल झालेल्या आणखी २९६ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. १७ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. उपजिल्हा निवडणूक … Read more

ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णालयांनी पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकिडल भागामध्ये याचा कहर जरा जास्तच आढळून येत आहे. कोरोनाची मोठी वाढ सध्याच्या स्थितीला राहता तालुक्यात आढळून येत आहे. यातच राहता तालुक्यावर मोठे संकट ओढवले आहे. राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच … Read more

सकारात्मक बातमी : नगर जिल्ह्यात 1 लाख 37 हजार जणांनी कोरोनाला केले पराभूत.

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ३७ हजार ६८६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.८० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत २८६६ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासदार डॉ सुजय विखे अडचणीत !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-खा. डॉ सुजय विखे यांनी १०,००० रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा कोणतेही कायदेशीर परवाना व अधिकार नसताना गोपनीय व्यक्तीकडून किंवा काळ्या बाजारातुन खरेदी केली असावी, सदर रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा भेसळ मुक्त/ शुद्ध आहे असे प्रमाणपत्र वापराआधी घेतलेले नाही, एवढा मोठा रेम्डेसिवीर इंजेक्शनचा साठा कुठे व कसा वापरला याचा हिशोब नाही अश्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तरुणीचा विहिरीत पडून मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील तरूणीचा विहिरीत पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. वडजाई परिसरात शेतात राहत असलेले संदीप सावळेराम जगदाळे यांची मुलगी पूजा (वय १७) ही महाविद्यालयीन तरूणी घरापासून काही अंतरावर असलेल्या गट नं. १८४ मधील … Read more

कोरोना ब्रेकिंग : अहमदनगरकरांसाठी सर्वात मोठी गुड न्यूज ! कोरोना रुग्ण झालेत ‘एवढे’ कमी …

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आज  कमी झालेला दिसला आहे. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात 2866 रुग्ण आढळले आहेत.  गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने 3500 पेक्षा जास्त रुग्ण रुग्ण आढळत होते ते आज काही प्रमाणात कमी झाले आहेत. गेल्या चोवीस तासांत अहमदनगर जिल्ह्यात तालुकानिहाय पुढीलप्रमाणे रुग्ण वाढले आहेत – … Read more

खा. विखे म्हणाले ‘ही वेळ’ राजकारण करण्याची नव्हे तर कोरोनाविरोधात सर्वांनी ‘एकत्र’ येण्याची!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाने आज संपूर्ण देशात धुमाकूळ घातला असून, सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे. त्यामुळे ही वेळ राजकरण करण्याची नसून, या कोरोना महामारी विरोधात सर्वच लोकप्रतिनिधींसह राजकारणी समाजकारणी तसेच अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन लढण्याची असल्याचे नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी सांगितले. पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणच्या कोविड सेंटरला त्यांनी काल भेट … Read more

बिग ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ भागाला भुकंपाचे धक्के

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- जिह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे रोज मोठ्या संख्येने बाधित रुग्ण वाढत आहेत. एकीकडे कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासन तारेवरची कसरत करत असताना परत हे संकट उभे ठाकल्याने नागरिक हैराण झाले आहेत. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील शेळकेवाडी परिसरात शनिवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. … Read more

कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनामुळे आपल्यातील अनेकांचे निकटवर्तीय आपल्याला कायमचे सोडून गेले आहेत. आपण पहिल्या लाटेचा खूप धैर्याने मुकाबला केला. मात्र, दुसऱ्या लाटेने आपल्याला मुळापासून हलवून सोडले आहे. कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी, तज्ज्ञ आणि वैज्ञानिक सल्ल्याला प्राधान्य देण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. रविवारी मन की बातमध्ये ते देशवासियांना संबोधित करताना बोलत … Read more

‘या’ तालुक्यात एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांची केली जातेय लूट!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यात कोरोना बाधित रूग्णाच्या एचआरसीटी चाचणी करण्यासाठी रुग्णांकडुन नियमापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याची तक्रार येथील नगरसेवक प्रविण राजगुरु यांनी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. पाथर्डीच्या स्थानिक अधिकाऱ्यांना सांगुनही कारवाई होत नाही.  येथील ग्लोबल डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटरवर छापा टाकून कारवाई करावी. अन्यथा मी जनतेसाठी या परस्थीतीही … Read more

प्रेमात सर्व काही माफ : नवरा पॉझिटिव्ह, नवरीने पीपीई किट घालून घेतले सातफेरे!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह, नववधूच्या अंगावर पीपीई किट लग्न लावले. कोरोनाच्या संकटातही अवघ्या काही जणांच्या साक्षीने केरळमधल्या अलाप्पुझा येथे एक आगळा वेगळा असा विवाह सोहळा रविवारी पार पडला. मेडिकल कॉलेजच्या आवारातच हा विवाह सोहळा पार पडला. प्रेमात सर्व काही माफ असते, हे यानिमित्त पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कोरोनाच्या … Read more

मनपाच्या फ्रंटलाईन वर्करसाठी ‘ते’ इंजेक्शन राखीव ठेवा!

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- महापालिकेचे काही कर्मचारी सध्या शहरातील हॉस्पिटलमध्ये गंभीर परिस्थितीत असल्याने या कर्मचाऱ्यांना हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या मागणीप्रमाणे रेमडेसिवीर इंजेक्शन मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी आपल्यासह जिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष तसेच मनपा आरोग्याधिकारी यांना सतत संपर्क केलेला आहे. परंतु काळाबाजार अथवा इंजेक्शन्सचा पुरेसा पुरवठा न होण्याच्या कारणामुळे आपण हतबल असल्याचे चित्र … Read more

???? अहमदनगर ब्रेकिंग : तरुणाची हत्या,अज्ञात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारामध्ये  एका तरुणाचा अज्ञात कारणाने दोन अज्ञात इसमांनी धारदार हत्याराने निर्घृण हत्या केली असल्याची घटना  रविवारी उघडकीस आली आहे.  सचिन अरविंद शिंदे ( 23, रा मोठे बाबा मळा सायखिंडी, तालुका संगमनेर ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत संगमनेर तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी … Read more

जिल्ह्यात उपलध झाला 46 मेट्रीक टन ऑक्सिजन

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दिवसभरात 46 मेट्रीक टन ऑक्सिजन उपलब्ध झाल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचीत यांनी दिली. मात्र, नगर शहराला दैनंदिन 50 मेट्रीक टन आणि उर्वरित जिल्ह्यात 10 मेट्रीक टन असा 60 मेट्रीक टन ऑक्सिजनची आवश्यकता असून शनिवारी उपलब्ध झालेला साठा हा 24 तासांत वापरला जाणार असल्याने पुन्हा ऑक्सिजनसाठी प्रशासनाला पाठपुरावा … Read more