संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी रुजवला

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  संकट कितीही मोठं असलं तरी डगमगायचं नाही, हा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. राज्यावरील कोरोनाचं संकट आज सगळ्यात मोठं आहे. या संकटाचा मुकाबला करताना, सरकार आणि नागरिक दोघेही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना आदर्श मानून आपापली कर्तव्ये पार पाडतील,’ असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे … Read more

आव्हाडांचा फडणवीसांना टोला, तुमचे वजन वापरून बघा काही मिळते का

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :-  युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच जनतेला काही ना काही दिलंय. तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा!. विरोधक वा तज्ञांचा दु:स्वास करून नाही, तर आपण प्रत्यक्ष काय करतो, याचे प्रबोधनात्मक विवेचन कोरोना थांबवण्यात अधिक मदत करेल, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री … Read more

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडे जिल्हापरिषदेची कोट्यवधींची थकबाकी

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाकडून जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतींना विविध कारणांसाठी कर्ज दिले जाते. देण्यात येणारे हे कर्ज हे दहा वर्षात समान हप्त्यात फेडाची अट आहे. मात्र, जिल्ह्यातील 20 ग्रामपंचायतींची ही मुदत संपली असून त्यानंतर देखील जिल्हा परिषद प्रशासन त्यांच्यावर मेहरबान आहे. जिल्हा परिषदेने दहा वर्षांच्या मुदतीपेक्षा जास्त मुदत … Read more

पिकांसाठी उन्हाळी आवर्तनाकडे शेतकर्‍यांचे नजरा खिळल्या

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- गेल्या पंधरा दिवसांपासुन तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्यातच लाभक्षेत्रातील इंधन विहीरी अथवा विहीरींचे पाणी कमी झाले आहे. या कारणांनी शेतातील उभी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील उभी पिके पाण्याअभावी सुकून चालली आहेत. या पिकांसाठी उन्हाळी आवर्तनाकडे शेतकर्‍यांचे नजरा खिळल्या आहेत. लोकप्रतिनिधी हे … Read more

पुतळयाचे स्थलांतराने शिवप्रेमी दुखावले; बंदचे केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 3 एप्रिल 2021 :- छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुर्णाकृती पुतळा श्री शिवाजी चौकातच बसवावा या मागणीसाठी तसेच हा अश्वारूढ पुतळा दुसरीकडे बसविण्यात येणार या नगराध्यक्षांच्या भूमिकेच्या विरोधात रविवार दि. 4 एप्रिल रोजी श्रीरामपूर बंदचे आवाहन श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा संघर्ष समितीने केले आहे. शिवाजी चौकात महाराजांचा पूर्णाकृती अश्वारूढ पुतळा बसवावा ही … Read more

तर महाराष्ट्रात पुर्ण लॉकडाऊन करावा लागेल ; मुख्यमंत्र्यांचा मोठा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल (गुरुवारी) तब्बल 43 हजार कोरोना बाधितांची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. राज्यात सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज येणारे नव्या पॉझिटिव्ह रूग्णांचे आकडे धडकी भरवणार आहेत. राज्यातील काही ठिकाणी कडक निर्बंध लावण्यात आले आहेत … Read more

LIVE Updates : राज्यात लॉकडाऊन नाही वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री…

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री जनतेशी संवाद साधला.  कडक निर्बंध लावावे लागतील, उद्या परवा जाहीर करु, गर्दी टाळावी लागेल, ऑफिसेसना नियमावली हवी, बसना नियम, रेल्वे, बस तुडुंब आहेत. परिस्थिती हाताबाहेर गेली तर ब्राझीलसारखा शुकशुकाट दिसेल –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रोजगारही गेला आणि जीवही गेला. तसं होऊ नये. येत्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक एकाच दिवसात तब्बल 1800 रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ६४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ८८ हजार ४७३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९०.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत १८०० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ८३३५ इतकी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले तब्बल इतके रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आजही विस्फोट झाला असून एकूण 18०० नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. 24 तासांमध्ये 1 हजार 800 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक 456 रुग्ण … Read more

राहूरी तालुक्यातील ‘हे’ गाव लॉकडाउन , गावानेच घेतला स्वयंस्फूर्तीने निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  राहुरी तालुक्यात कोरोनाच्या रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता केंदळ खुर्द गावाने स्वयंस्फूर्तीने गाव लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत विणकारन घराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती सरपंच मच्छिद्र आढाव यांनी दिली आहे. राहुरी तालुक्यामधे कोरोना रूग्णांमधे झपाट्याने वाढ होत. त्यामुळे आता प्रशासनाने देखील कडक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेल्वे खाली सापडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव( अशोक नगर)येथे वेड्या पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा रेल्वे कटिंग होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. सदर मयत इसमाचे अंदाजे वय ४oते ४५ असून त्याच्या अंगामध्ये पांढऱ्या रंगाचा शर्ट व त्यावर चौकटी रंगाच्या रेघा व राखाडी रंगाचे अंगात पॅन्ट परिधान केल्याची आढळून आली आहे. पॅंटीच्या खिशामध्ये एक … Read more

स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे म्हणाले माझ्या पोलिस संरक्षणात वाढ करा

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरण बहुचर्चित झाले आहे. स्व.रेखा जरे यांचे चिरंजीव रुणाल जरे यांनी आता पोलिस संरक्षणात वाढ करण्याची मागणी केली आहे. तशा प्रकारचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षक मनोजकुमार पाटील यांच्याकडे दिले आहे. स्वत:ला दिलेले पोलिस संरक्षण वाढवून मिळावे, तसेच आणखी एक पोलिस कुटूंबियांकरिता नियुक्त करावा, असे त्यांनी नमूद केले … Read more

आलिया भट्टला कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री आलिया भट्ट हिला कोरोनाची लागण झाल्याची माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. आलिया भट्टने इन्स्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, मला कोरोनाची लागण झाली आहे. हॅलो, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यानंतर मी स्वत:ला विलग करुन घेतलं असून सध्या मी होम क्वारंटाईन आहे. … Read more

श्रीरामपुरात तालुक्यात कोरोनाचे ९१ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-नगर शहरासह जिल्ह्यात कोरोनाची व्याप्ती वाढू लागली आहे. प्रशासनाकडून कडक नियमांची अंलबजावणी करण्यात येऊ लागली आहे. काही ठिकाणी अक्षरश काही दिवसांसाठी लॉकडाऊन देखील जाहीर करण्यात आला मात्र तरीही कोरोना बाधितांची आकडेवारी काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. नुकतेच नगर जिल्ह्यात गेल्या २४ तासात तेराशेहून अधिक कोरोनाबाधितांची भर पडली आहे. यातच … Read more

लसीकरण मोहीम युद्धपातळीवर; जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख लोकांचे लसीकरण

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-राज्यात चौथ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने नगर जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात आली आहे. दरम्यान कालपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. आधी 107 केंद्रांवर लस दिली जात होती. 1 एप्रिलपासून त्यात वाढ करून आता लसीकरण केंद्रांची संख्या 165 करण्यात आली … Read more

धक्कादायक ! 24 तासात सहा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार आता वेगाने होऊ लागला आहे.दरदिवशी धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहेच मात्र आता यामध्ये मृत्यूचा आकडा देखील वाढू लागला आहे. नुकतेच कोपरगाव मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कोपरगाव शहरासह तालुक्यात 31 मार्च रोजी सापडलेल्या 65 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली, त्यात … Read more

राज्यात कोरोनाचा विस्फोट; आज ४३ हजाराहून अधिकांची भर

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रातील नव्या कोरोनाग्रस्तांनी पुन्हा एकदा उच्चांक गाठलेला आहे. आज महाराष्ट्रात ४३ हजार १८३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर तब्बल २४९ रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.९२% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९९,७५,३४१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गाईचे दूध निघत नसल्याने गोठ्यातच पतीकडून दगडाने ठेचून पत्नीचा खून

अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :-गोठ्यात गायीचे दूध निघत नव्हते याच कारणातून पती-पत्नीत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून नवरा शिवाजी याने पत्नी भारती हिच्या डोक्यात दगड घालून तिला गोठ्यातच जीवे ठार मारून खून केला. हि खळबळजनक घटना बुधवारी सायं. ६ वा. संगमनेर तालुक्यातील तळेगावदिघे परिसरातील बोडखेवाडी परिसरात घडली. पोलिसांनी आरोपी शिवाजी रामनाथ दिघे, वय … Read more