अहमदनगर मध्ये लॉकडाऊन होणार कि नाही ? वाचा काय म्हणाले जिल्हाधिकारी…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना सर्व तालुकास्तरीय यंत्रणांना दिल्या असून बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या चाचण्या करण्यावर अधिक भर देण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. कोरोनापासून बचावासाठी सार्वजनिक अथवा गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, चेहर्‍यावर मास्क … Read more

मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला, एटीएसचे डीआयजी यांचा दावा

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- एटीएसचे DIG शिवदीप लांडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहित मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा केला आहे. “अति संवेदनशील मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मी आमच्या संपूर्ण ATS पोलीस फोर्समधील सहकाऱ्यांना सॅल्यूट करतो. ज्यांनी गेल्या काही दिवसांत रात्रंदिवस एक केला आहे. त्यामुळे या केसमध्ये न्यायपूर्ण परिणाम … Read more

राज्याला हादरवणारी घटना : मुलगी लग्नाला तयार नसल्याने…

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  महाराष्ट्राला हादरवणारी घटना सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपूरी येथे घडली आहे. लग्नाला तयार नसल्याने मुलीच्या डोक्यात खोरे घालून पित्यानेच तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. खुनानंतर चौघांच्या मदतीने पित्याने मुलीचा अंत्यविधी उरकून घेतला. मात्र, मृतदेह अर्धवट जळल्याने तो मध्यरात्रीच दफन करण्यात आला. दरम्यान, आठ दिवसांनंतर हा प्रकार उघडकीला … Read more

प्राण्याची शर्यत पडली महागातल तिघांविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- टांग्याला घोडा जुपुन शर्यत काढणार्‍या तिघांविरूद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस नाईक सचिन गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू दंगु बडे, रावसाहेब दंगु बडे (दोघे रा. मेहकरी ता. नगर) व प्रकाश मच्छिंद्र पोटे (रा. बारदरी ता. नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून 60 … Read more

जरे यांच्या हत्येसाठी बोठेनी 12 लाखांची सुपारी दिली होती

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या घर झडतीत पोलिसांनी आयपॅड जप्त केला होता. त्याचेही लॉक उघडत नसल्याने आयपॅडची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून, लवकरच आयपॅड तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर … Read more

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा एकटावली; केली जोरदार निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस सचिन वाझे यांना महिन्याला 100 कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले असल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी भाजपाने आज राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केले. त्याच अनुषंगाने आज श्रीरामपूर मध्ये देखील आंदोलन … Read more

उकाड्यापासून नागरिकांना मिळाला दिलासा; शहरात गारांचा पाऊस

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:-  शहर व परिसरात मागील दोन दिवसांपासून दुपारी तीन वाजेनंतर ढगाळ हवामानासह वारा सुटत होता. रविवारी (दि.21) दुपारी साडेचार वाजेपासून शहरासह उपनगरांमध्ये ढगाळ हवामानासह वारा सुटला अन् वीजांचा कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मागील दोन दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने … Read more

तडीपार सराईतांकडून शहरात धुडगूस

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- नगर जिल्ह्याची प्रतिमा राज्यात गुन्हेगारी स्वरूपाची होऊ लागली आहे. शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कोलमडली आहे. यामुळे गुंडगिरी प्रवृत्ती फोफावू लागली आहे. नुकतेच जिल्ह्यातून तडीपार केलेला सराईत गुन्हेगार विजय राजु पठारे, अजय राजु पठारे या पठारे बंधूंसह त्यांच्या इतर चार साथीदारांनी बालिकाश्रम रोडवरील कापड दुकान तसेच निलक्रांती चौकातील सायकल … Read more

कोरोनाची दहशत; तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला डावलले

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- राज्यभरात एमपीएससीची परीक्षा रविवार रोजी पार पडली. कोरोनाच्या सावटात या परीक्षा होणार झाल्याने या अनुषंगाने जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर मोठ्या उपाययोजना करण्यात आल्या. मात्र तरीही या परीक्षेकडे तब्बल सहा हजार विद्यार्थ्यांनी पाठ फिरवली. दोन सत्रात घेण्यात आलेल्या परिक्षेला जवळपास साडेनऊ हजार विद्यार्थी हजर होते. एमपीएससीची परीक्षा नगर शहरातील तब्बल ५१ … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील संतापजनक घटना : नराधम बापाचा मुलीवर लैंगिक अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील निमगाव खैरी येथे २७ वर्षीय जन्मदात्या बापाने १० वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली असून मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून बापाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील निमगाव खैरी शिवारात एक परप्रांतीय २७ वर्षांचा गृहस्थ आपल्या २५ वर्षीय पत्नी व १० वर्षीय मुलीसह एका पोल्ट्री फार्मवर काम करतात. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले. एकनाथ रामकृष्ण बर्वे ( ४८ वर्ष ) असे त्यांचे नाव आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शनिवारी ( दि. २० ) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ‘द बर्निंग कार’चा थरार! वाचा असे काय झाले त्या कारसोबत…

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- नगर कर्जत मार्गावरील थेरगावच्या शिवारात अचानक एका कारने पेट घेतल्याने एकच  खळबळ उडाली. यावेळी कारमधील दोघंानी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र याआगीत कार पूर्ण जळून खाक झाली आहे. सुदैवाने यात कोणत्याही व्यक्तीस इजा झाली नाही. याबाबत सविस्तर असे की, शिक्षक किरण जगन्नाथ शिंदे व त्यांचे चुलते अशोक पाराजी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात रेकोर्डब्रेक रुग्णवाढ ! आज वाढले इतके तब्बल सातशेपेक्षा जास्त रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ५५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९ हजार ८९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७६५ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३५१८ इतकी … Read more

फिर्याद अपहरणाची; प्रत्यक्षात मात्र भलताच प्रकार!

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- मुलाचे अपहरण केल्याच्या फिर्यादीची सखोल तपास चौकशी करत असताना जामखेड पोलिसांसमोर वेगळाच प्रकार आला. हा प्रकार अपहरणाचा नसून आर्थिक व्यवहारावरून खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. यावरून शोभा सवई राठोड (वय ५५ वर्षे, रा.धनगरवाडी, ता.दारव्हा, जिल्हा यवतमाळ) या महिलेच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल केला म्हणून जामखेड पोलिसांत … Read more

मागील भांडणाच्या कारणातून केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू!  

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी केलेल्या जबर मारहाणीत शेवगाव तालुक्यातील ठाकुर पिंपळगाव येथील हरिभाऊ पांडुरंग बडधे (वय ४२ वर्षे) याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी मयताच्या नातेवाईकांनी मृतदेह थेट शेवगाव पोलिस ठाण्यात आणला. सायंकाळी ७ वाजेपर्यंत मृतदेह पोलिस ठाण्यात आणुन ठेवण्यात आला होता. यामुळे काहीकाळ … Read more

सरकारच्या मंत्र्यांचे केवळ ‘उपभोगा’कडेच लक्ष! सरकारविरोधात भाजपाची प्रचंड घोषणाबाजी

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असे विधान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले. ही बाब गंभीर असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. या सरकारचा आपल्या मंत्र्यावर कोणताही वचक राहिला नसून, प्रत्येक मंत्री आपल्यासच … Read more

फडणवीस म्हणतात, संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालणारा हा प्रसंग

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड-पपरमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलिस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री … Read more

पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने प्रवास होतोय सुरु

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- करोना महामारी वेगाने फैलावत आहे. नागरीकांनी नियमांचे उल्लंघन केल्याने तालुका पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोपरगाव शहरासह १ तालुक्यात १९ मार्च रोजी सापडलेल्या ५७ करोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची रॅपिड टेस्ट करण्यात आली त्यात १३ तर खासगी लॅब मधील १८ तर नगर येथे पाठवलेल्या अहवालांपैकी … Read more