अहमदनगर ब्रेकिंग : वर्गातच गळफास घेवून विद्यार्थ्याने केली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात एका अकरावीच्या विद्यार्थ्याने फाशी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कदायक घटना आज सकाळी समोर आली आहे. मिरी रस्त्यावरील आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविदयालयात अकरावी काँमर्समध्ये शिक्षण घेणा-या आदेश विजय म्हस्के ( वय-१८) राहणार पवार वस्ती, शेवगाव या विदयार्थ्याने वर्गामध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. आबासाहेब काकडे कनिष्ठ महाविद्यालयात … Read more

अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाईपोटी साडे पाच हजार शेतकऱ्यांना आले साडेचार कोटी!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-जिल्ह्यात मार्च २०२० ते मे, २०२० या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाथर्डी, शेवगाव, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील १३९ गावातील ५ हजार ४८ शेतकर्‍यांना अनुदानापोटी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ४ कोटी २७ लाख ८४ हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली  नुकसानीपोटी हे अनुदान वितरित करण्यात … Read more

‘ती’ शक्यता खरी ठरली पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात……

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  वनमंत्री संजय राठोड यांच्या समर्थकांनी मंगळवारी वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर मोठी गर्दी केली होती. कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली होती. ती आता खरी ठरू पाहता आहे. पोहरादेवी येथील महंत कबिरदास महाराज यांच्यासह १९ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तीन दिवसांपूर्वी वनमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे जाऊन दर्शन … Read more

वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे बळीराजा हैराण

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  राज्यात सध्या ग्राहकांना वाढीव विजबिले आणि वीज वितरण कंपनीच्या मनमानी कारभारामुळे मनस्तापाला सामोरे जाव लागत आहे. नगर जिल्ह्यातही असाच काहीसा प्रकार सुरु आहे. एका शेतकऱ्याला चक्क 81 हजाराचे बिल महावितरणने पाठविले आहे. विज वितरण कंपनीने सध्या शेतीचे विजबील थकीत असल्याचे सांगत विज खंडीत करण्यास सुरुवात केली आहे. एव्हढ्यावरच … Read more

अखेर ‘ती’ स्कूल बस नगर जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी सापडली!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  अलीकडे चोरट्यांना कोणत्या वस्तूची चोरी करावी याचे ताळतंत्र राहिले नाही. नुकताच काही तरूणांनी गावी जाण्यासाठी चक्क एसटी बस चोरल्याची घटना घडली होती. आता तर थेट स्कूल बसचीच चोरी केली होती. ठाणे जिल्ह्यातुन चोरलेली एक स्कूल बस शेवगाव तालुक्यात सापडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ … Read more

अरेव्वा! आता शेतकऱ्यांना मिळणार दिवसा आठ तास वीजपुरवठा! तर उद्योगासाठी केली ‘ही’ घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  राज्यात विजेचे दर कमी करण्यासाठी व शेतकऱ्यांना दिवसा ८ तास वीज पुरवठा देण्यासाठी नियोजन करण्याचे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी नुकत्याच मंत्रालयात झालेल्या बैठकीत महावितरणला दिले आहेत. तसेच अन्य राज्याच्या तुलनेने औद्योगिक ग्राहकांचे वीज दर जास्त असल्याने राज्यात उद्योगधंदे वाढीस अडथळा निर्माण झाला आहे. “राज्यातील उद्योगांचे वीज दर कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे  … Read more

 अज्ञात व्यक्तीने वांबोरी चारीची पाईपलाईन फोडली! पाथर्डी पोलीसात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पाथर्डी – नगर – राहुरी- नेवासा तालुक्यातील ४५गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या वांबोरी चारीची मुख्य पाईपलाईन पाथर्डी तालुक्यातील करडवाडी नदीजवळ सोमवारी रात्री अज्ञात व्यक्तीने फोडली. यामुळे तिसगावच्या पाझर तलावात सुरू असलेला पाणीपुरवठा बंद झाला असून ,पाईप लाईन फोडणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात मुळा पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी पाथर्डी पोलीसात … Read more

आमदार राजळे यांच्या सूचनेनंतर ‘त्या’ भागाचा तात्काळ वीजपुरवठा सुरू!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  सध्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी वीज बिल भरावे यासाठी महावितरणने त्या त्या भागातील वीजपुरवठा खंडित करत आहेत. मात्र वीज पुरवठा खंडित केल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. मात्र आमदार राजळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देत तात्काळ वीज पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्याने या भागातील वीज पुरवठा … Read more

‘त्या’ पुरस्काराने नगर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत जिल्हा प्रशासनास राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. योजनेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांच्या हस्ते केंद्रीय कृषिराज्यमंत्री चौधरी, राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. … Read more

खुशखबर ! ‘या’ दिवशीपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. यामुळे आता सर्वसामान्य जनतेला कोरोनाची लस मिळणार आहे. येत्या सोमवारपासून 60 वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना कोरोनाची लस मिळणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली. सरकारी रुग्णालयात ही लस मोफत मिळेल, अशी माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. … Read more

ही बातमी वाचाच ! कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात …

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कोरोना रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.महसूल, पोलिस, पालिका, आरोग्य व पंचायत समिती अशा सर्व यंत्रणा संयुक्तपणे कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी मास्क वापरणे अनिवार्य आहे. लग्नसोहळे, दशक्रियासाठी शासनाने निर्धारित केलेल्या संख्येपेक्षा जास्त उपस्थिती तपासणीदरम्यान आढळली, तर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक रणजीत डेरे … Read more

आनंदाची बातमी : ह्या ठिकाणी सुरु झाला जिल्ह्यातील पहिला सीएनजी गॅस पंप !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-नगर-पुणे मार्गावरील सुपे औद्योगिक वसाहतीत म्हसणेफाटा येथील जिल्ह्यातील पहिल्या सीएनजी पंपाचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले व आमदार नीलेश लंके यांच्या हस्ते झाले. सुपे औद्योगिक वसाहतीबरोबरच पारनेर शहराला पाइपलाइनद्वारे गॅसचा पुरवठा करावा, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी भारत पेट्रोलियमच्या अधिकाऱ्यांना केली. उद्योजक कैलास गाडीलकर यांचा हा पंप आहे. डिझेल डोअर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७२ हजार ९४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७६ ने वाढ … Read more

कौतुकास्पद : अहमदनगर जिल्ह्यास पहिला क्रमांक,दिल्लीत पुरस्कार प्रदान !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल नगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रीय स्तरावर अहमदनगर जिल्ह्याचा दिल्ली येथील कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय कृषीमंत्री श्री.तोमर व केंद्रीय राज्य मंत्री चौधरी, … Read more

आता बोला: चक्क उर्जामंत्र्यांच्या जिल्ह्यातच अंधार!

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :- एकतर दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, कोरोना या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची अत्यंत दैन्य अवस्था झाली आहे आणि परत ही वसुलीसाठी वीजपुरवठा खंडित केल्याने महावितरण जोमात अन शेतकरी कोमात अशी अवस्था झाली आहे. थकबाकीच्या वसुलीपोटी महावितरणने कृषी पंपांची वीज खंडित करण्याचा धडाका लावला आहे.मात्र यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची … Read more

रेखा जरे हत्याकांड : अब बाळ बोठे तो गये…

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठेने जिल्हा न्यायालयमध्ये स्टॅंडिंग वॉरंटच्या विरोधात दाखल केलेला पुर्ननिरीक्षण अर्ज न्यायालयाकडून फेटाळल्यानंतर जिल्हा पोलिसांकडून आता पत्रकार बाळ बोठेच्या संपत्तीवर टाच आणण्याचा मार्ग मोकळा झाला असून पोलिसांनी त्या कारवाईसाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे . बाळ बोठे याने पारनेर … Read more

मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली मुलींच्या वसतिगृहात एक कोटीचा भ्रष्टाचार !

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत (अताएसो) मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली कोट्यवधींचा गैरव्यवहार झाला आहे. अध्यक्ष व सचिवांचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप अताएसो बचाव समितीने केला. सर्वसाधारण सभा घेण्याची मागणीही करण्यात आली. अताएसो बचाव आंदोलन समितीची बैठक राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात झाली. २००८ पासून अध्यक्ष जे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनेरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू!

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-कंटेनरचा दुचाकीला धक्का लागल्याने दुचाकीवरील तरुणाचा कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली चिरडुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील सावळीविहिर येथील महावीर मार्केट समोर नगर-मनमाड रोडवर घडली. रोशन राजेंद्र गुजर (वय-३२) रा.राजगुरूनगर शिर्डी असे या अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. या दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याबाबत … Read more