‘त्या’ कार्यालय चालकांना दणका

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- देशभरासह राज्यात परत एकादा कोरोनाने डोके वर काढले आहे. रोज वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. मात्र शहरातील अनेक मंगल कार्यालये गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आता प्रशासनाने नव्या नियमावलीचा बडगा उगारला गेला आहे. कारण लग्न समारंभाची धूम सुरू असून त्याला अटकाव करण्याची जबाबदारी ही मंगल … Read more

शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले शिर्डी येथील विमानतळासाठी आता भरीव निधी उपलब्ध होणार आहे. यामुळे शिर्डी विमानतळाच्या विकासकामात सुधारणा होण्यास मदत होणार आहे. राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस सरकारने २५.६० कोटी रुपयांचा निधी देण्यास मान्यता दिली आहे. त्यात शिर्डी विमानतळासाठी ५ कोटी ९८ लाखांचा निधी उपलब्ध होणार आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात 15 मार्चपर्यंत ‘ह्या’ वेळेत संचारबंदी !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021: कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणून नगर जिल्ह्यात १५ मार्चपर्यत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामांसाठी व्यक्तींना फिरण्यावर निर्बध घालण्यात आले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे एक भाग म्हणुन नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमा होण्यास प्रतिबंध व्हावा म्हणुन,  … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात वाढतोय कोरोना ! चोवीस तासांत आढळले ‘इतके’ रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-:- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा पायउतार होण्यास सुरुवात झाली होती. रुग्णदर घटत असल्याने प्रशासन देखील काही काळ निर्धास्त झाले होते.  मात्र या आनंदावर विरजण पडू लागले असल्याचे चित्र सध्या नगर जिल्ह्यात तयार झाले आहे. जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढत आहे. तसेच कोरोनाचा धोका वाढू लागल्याने प्रशासन देखील पुन्हा अलर्ट … Read more

डॉनबॉस्को विद्यालयावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  बेकायदेशीर सहल काढणार्‍या व तीन व्यक्तींच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍या डॉन बॉस्को विद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालक व सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस अधिक्षक कार्यालया समोर घंटानाद आंदोलन केले. या आंदोलनात पालक सोन्याबापु भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रमेश अल्हाट, संदीप ठोंबे, बाळासाहेब पाटोळे, प्रा.पंकज लोखंडे, मोहन ठोंबे आदी सहभागी झाले होते. … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे जनतेला भावनिक आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आता वाढत आहे. यात अनेक प्रमुख मंत्री देखील कोरोना बाधित झाले आहेत.यात  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा देखील समावेश आहे. मात्र ते रूग्णालयात असतानाही राज्यातील जनतेला कोरोना पासून बचाव करण्यासाठी आवाहन केले आहे. ते म्हणतात की ,वर्षभरापासून आपण कोरोना विरुध्दची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, … Read more

टिकटॉक स्टार समीर गायकवाडची प्रेम संबंधातून आत्महत्या ?

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-  टिकटॉक स्टार ‘समीर गायकवाड’या तरुणाने रविवारी (दि. २१) सायंकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. समीरचे वय २२ वर्ष होते. दरम्यान, समीरने हे पाऊल प्रेम संबंधातून उचलेले असल्याचे बोलले जात आहे. वाघोली परिसरातील निकासा सोसायटी येथील राहत्या घरी पंख्याला साडीने गळफास घेऊन समीर गायकवाडने आत्महत्या केली. ही … Read more

वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अनेकदा शिकारीसाठी रस्त्यावर आलेले बिबटे हे अनेकदा रस्ते अपघातात ठार झाले आहे. अशीच घटना पुन्हा एकदा संगमनेर तालुक्यात घडली आहे. नाशिक पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात भरधाव वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. हा अपघात रविवारी पहाटेच्या सुमारास घडला. नाशिक पुणे महामार्गावर चंदनापुरी घाट, डोळसणे, … Read more

शुभ कार्यात विघ्न… नियमांचे उल्लंघन केल्याने झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. यातच राज्यातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन देखील करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी संचारबंदी लावलण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांची अमलबजावणी करावी यासाठी प्रशासनाने हालचाली सुरु केल्या आहेत. याच अनुशंगाने पारनेर तालूक्यात एका ठिकाणी कारवाई करण्यात आली … Read more

पैशांची वसुली होत नसल्यान भिशी चालकाने उचलले धक्कादायक पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-संगमनेर मध्ये कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत यात सहभागी आहेत. 5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे. दरम्यान भिशीच्या या व्यवहारातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत. मात्र दुसरीकडे याच बेकायदेशीर भिशी व्यवसायामुळे अनेकजण अडचणीत … Read more

बर्ड फ्लू ! वस्तीजवळ मृत कोंबड्या आणून टाकल्या

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- गेल्यादेशासह राज्यात अनेक ठिकाणी बर्ड फ्लूचे संकट घोंगावत आहे. यातच या रोगाचा काहीसा प्रभाव हा नगर जिल्ह्यात देखील झालेला पाहायला मिळाला आहे. यातच एका धक्कादायक बाब समोर आली आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील हनमंतगाव, हसनापूर शिवेजवलील चराजवळ विलास योसेफ ब्राम्हणे यांच्या वस्ती जवळ अज्ञात इसमाने रात्रीच्या वेळेस शेकडो कोंबड्या आणून … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात पाच जण जागीच ठार !

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:- औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्विफ्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि २२ रोजी रात्री दोनच्या सुमारास घडली आहे.  मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. रस्त्यात पडलेली वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. अपघात नेमका कशामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळली …

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-कोपरगाव तालुक्यातील धामोरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत काल सकाळी अचानक कोसळली. शाळेत विद्यार्थी नसल्याने जीवित हानी टळली. धामोरी प्राथमिक शाळेत १ली ते ५वीचे वर्ग भरतात. शाळेचा पट २७३ असुन १० शिक्षक कार्यरत आहेत. शाळेची वेळ दहा ते दोन असल्याने शाळेत विद्यार्थी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. शाळेची इमारत अतिशय … Read more

Corona Live Updates : उद्यापासून सर्व राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांना राज्यात बंदी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर आज सांयकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेशी संवाद  साधला आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार का, काय बंद होणार याबाबत मुख्यमंत्री काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. फेसबुक Live च्या माध्यमातून मुख्यमंत्री ठाकरे जनतेशी संवाद साधला आहे.  आपल्या राज्यात … Read more

जिल्हा बँक: या आमदाराला बसला फटका!

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा बँकेचे २१ पैकी १७ जागा आधीच बिनविरोध झालेले आहेत.यात सोसायटी मतदार संघातील तीन आणि बिगरशेती मतदारसंघातील १ जागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. यात विद्यमान आमदार रोहित पवार यांना झटका बसला आहे. कर्जत मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे जोरदार चुरस दिसून आली. विखे गटाच्या … Read more

प्रत्येक व्यक्तीला मोटिव्हेट करणाऱ्या व्यक्तीने असा निर्णय का घेतला असे न सुटणारे कोडे आहे…

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ.महेंद्र थोरात त्यांची पत्नी, दोन मुले हे शनिवारी आपल्या राहत्या घरात मृतअवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. राशीन येथील डॉ.महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले, तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१) यांच्यासह … Read more

मोठी बातमी : कोरोना रुग्ण वाढल्याने पुण्यात नाईट कर्फ्यू, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- पुणे शहरासह जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं प्रशासनानं तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच जात आहे.बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे मागील सात दिवसांत सक्रीय बाधितांच्या संख्येत तब्बल एक हजाराने वाढ … Read more

जिल्हा बँक निवडणूक Live Updates : कर्डीले, शेळके, पिसाळ,गायकवाड झाले विजयी !

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत विद्यमान संचालक उदय गुलाबराब शेळके यांनी १०५ पैकी मते ९९ घेत प्रतिस्पर्धी उमेदवार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले यांचा धुव्वा उडविला. नगरमध्ये शिवाजी कर्डीले यांनी ९४ मते घेऊन तर, कर्जतमध्ये अंबादास पिसाळ १ मतांनी विजयी झाले आहेत.व पारनेर चे प्रशांत गायकवाड यांनी पानसरे यांचा पराभव केला … Read more