पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण नडले, शिवसेना नेते संजय राठोड यांचा अखेर राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे वादात सापडलेले वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मंगळवारी सकाळी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले जात आहे. उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणाची गंभीर दखल घेतली. उद्धव ठाकरेंनी मंत्री संजय राठोड … Read more

गुन्हेगारांना पाठीशी घालणारे हे सरकार ; विखे पाटलांचा ठाकरे सरकारवर निशाणा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- राज्यात गेल्या काही दिवसांपासून पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यामुळे विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. यातच ज्येष्ठनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी याप्रकरणावरून मुख्यमंत्र्यावर निशाणा साधला आहे. पूजा चव्‍हाण मृत्‍यू प्रकरणातील सत्‍य बाहेर आले पाहिजे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणत असतील तर सरकारने अद्याप गुन्‍हाच दाखल केलेला नाही. मग … Read more

वीस टक्के अनुदानास पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील शाळा

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-कायम विनाअनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या (इंग्रजी माध्यम व्यतिरिक्त) खाजगी उच्च माध्यमिक शाळांना 20टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आले आहे. त्यात नगर जिल्ह्यातील अनेक शाळांचा समावेश आहे. या निर्णयामुळे नगर जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेत्तरांना दिलासा मिळाला आहे. याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे. 20 टक्के अनुदानासह नगर … Read more

थकबाकी वसुलीसाठी महावितरणकडून आक्रमक; बिल भर अन्यथा डीपी बंद…

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-महावितरण कंपनीने रोहीत्र बंद करून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित न करता शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. तर दुसरीकडे आक्रमक भूमिका घेतलेल्या महावितरणने थकीत शेती विज बिलाच्या वसुलीसाठी आता विज रोहीत्र बंद करण्याचा सपाटा सुरू केला आहे. महावितरण कंपनीने शेतकर्‍यांकडील थकीत शेतीबिल वसुलीसाठी महावितरण कृषी योजना … Read more

आता काय म्हणावे यांना: चोरट्यांनी मारला जिल्हा पोलिस दलाच्या बिनतारी यंत्रणेवरच हात..!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-चोरीच्या वाढत्या घटनांनी पठारावरील सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेला असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिले आहे. गेल्या चार दिवसांतील विविध घटनांनी चर्चेत आलेल्या घारगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जवळेबाळेश्वरच्या मंदिरालगत असलेली जिल्हा पोलिस दलाची बिनतारी संपर्क यंत्रणाच आज पहाटे चोरट्यांनी चोरून नेली. बाळेश्वराच्या उंच टेकडीवर ही यंत्रणा बसवण्यात आली होती. त्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यातील चार पोलिस ठाण्यात नव्याने एक पोलीस निरीक्षक व ४ सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांचे आदेश सोमवारी (दि.१५) झालेल्या अहमदनगर जिल्हा पोलिस आस्थापना बैठकीत काढण्यात आले. यामध्ये पोलीस निरीक्षक विजय करे यांची नेवासा पोलीस ठाण्यात तर भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात सपोनि शिशिरकुमार देशमुख, नगर एमआयडीसी पोलिस ठाण्यात सपोनि युवराज … Read more

नगरकरांनो लक्ष द्या… पाणी पुरवठा विस्कळीत होणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- पाणी उपसा करणार्‍या पंपामध्ये बिघाड झाल्याने दोन दिवस अहमदनगर शहराचा पाणीपुरवठा विस्कळित राहणार आहे. नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, काल 14 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता शहर पाणी पुरवठा योजनेवरील मुळा पंपिंग स्टेशन येथील एक पंप नादुरुस्त … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ४९२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६ ने वाढ झाल्याने … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची न्या. पी. बी. सावंत यांना श्रद्धांजली

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- माजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचे न्यायदानाच्या क्षेत्रातील आणि पुरोगामी महाराष्ट्राच्या वाटचालीतील कार्य सदैव स्मरणात राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांना निधनाबद्दल श्रद्धांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, न्या. पी.बी. सावंत यांनी न्यायादानाच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रतिमा उजळून टाकणारे कार्य केले आहे. गाढा अभ्यास आणि विविध … Read more

माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे पुण्यात निधन !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-  माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत (वय 91) यांचे आज, पुण्यात निधन झाले. एल्गार परिषदेचे ते अध्यक्ष होते. गेल्या एक महिन्यापासून ते आजारी होते. आज, निवासस्थानी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या (मंगळवार, 16 फेब्रुवारी) पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. पी. बी. सावंत यांचा जन्म 30 जून 1930 रोजी झाला होता. … Read more

आमदार लंके निंबळकचा ‘हा’ प्रश्न कायमचा सोडवणार

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- वेळेवर पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. हा गंभीर प्रश्न आहे. विधानसभेत या बाबत प्रश्न उपस्थित करून, निंबळकचा पाणी प्रश्न कायमचा सोडवणार. तसेच येथे विकासकामासाठी भरीव स्वरूपाचा निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे आ. निलेश लंके यांनी सांगीतले . नगर तालुक्यातील निंबळक येथे नूतन सरपंच प्रियंका … Read more

शेतकऱ्यांवर संकट असताना तालुक्याचे आमदार कुंभकर्णी झोपेत आहेत का ?

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- कोपरगाव तालुक्यासह, मतदारसंघातील शेतकऱ्यांचा कृषिपंपाचा वीज पुरवठा खंडित करण्याची कुठलेही पूर्वसूचना न देता वीजतोडणी मोेहीम वीज वितरण कंपनीने सुरू केल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल आहे. असे असतानाही तालुक्याचे आमदार कुंभकर्णी झोपेत आहेत का? वितरण कंपनीने ही मोहीम थांबवावी, अन्यथा जन आंदोलन उभे करून उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कालव्यात सापडला ‘त्या’ तरुणाचा मृतदेह !

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर शहरातील नॉर्दन ब्रँच रोडवरील अक्षय काॅर्नर परिसरातील कालव्यात रविवारी जुनेद झाकिर पटेल (३०, मिल्लतनगर) या तरुणाचा मृतदेह आढळला. नागरिकांनी तातडीने पोलिसांना ही माहिती दिली. शहर पोलिस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यावेळी मृत तरुणाच्या खिशात मतदान कार्ड, मोबाइलसह काही पैसे होते. याप्रकरणी शहर ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद … Read more

महावितरणच्या वीजबिल वसुलीने बळीराजा झाला हैराण

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात शेतीपंपाच्या वीजबिल वसुलीचा सपाटा महावितरणने सुरु केला आहे. वीजबिल भरा अन्यथा विजकन्शेन कट करण्यात येईल, अशा धमक्या शेतकर्‍यांना दिल्या जात आहेत. ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर महावितरणने आक्रमक वसूली सुरु केल्याने शेतकर्‍यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाली आहे. आमचं सरकार सत्तेवर आल्यानंतर शेतकर्‍यांचे शेतीपंपाचे संपूर्ण वीजबिल माफ करु. शेतकर्‍यांना सरसकट कर्जमाफी … Read more

चोरटयांनी दाम्पत्याला मारहाण करत लुटले

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- आजच्या स्थितीला नगर जिल्हा एक चोरट्यांचा अड्डा बनला आहे. पोलिसांचा कोणताच धाक आता या चोरट्यांमध्ये उरलेला नाही आहे. चोरीच्या घटना घडणार व पोलिसात केवळ गुन्हे दाखल होणार हे नित्याचेच झाले आहे. मात्र दरदिवशी जिल्ह्यात एवढ्या चोऱ्या घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी करते काय आता हा प्रश्न उपस्थित होऊ लागला … Read more

लोकांना वेदना होतील असे कधीही वागलो नाही – रामदास आठवले

अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- शेतकऱ्यांची मागणी कायदेच मागे घ्यावेत, अशी आहे. ती पूर्णपणे चुकीची आहे. कारण आज हे कायदे मागे घेतले तर उद्या दुसरे घटक इतर कायदे मागे घेण्याची मागणी करतील. तसे झाले तर आपली लोकशाही आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान देखील अडचणीत येईल. या कायद्यांना काळे कायदे का म्हणतात, यात काळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराफाच्या घरावर दरोडा !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-काही कामानिमित्त बाहेरगावी गेलेल्या सराफाचे बंद असलेले घर अज्ञात चोरट्यांनी फोडून घरातील सर्व साहित्याची उचकापाचक करून घरात ठेवलेली तब्बल १५ चांदी व ८ ग्रॅम सोने व २० हजार रूपये ५०० रूपये रोख रक्कम, असा एकूण अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना केडगावमधील अयोध्यानगरी येथे घडली आहे. हा प्रकार रविवार दि.१४ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ७६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ३४७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०१ ने वाढ झाल्याने … Read more