अहमदनगर ब्रेकिंग : बेपत्ता मुलाचा मृतदेह अढळला विहीरीत !

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- एक दिवसापासून बेपत्ता आसलेल्या संग्राम संतोष भोसले, वय वर्ष ६ रा फक्राबाद हा बेपत्ता आसलेल्या मुलाचा घराजवळच विहिरीत मृतदेह आढळून आला आहे. सदर मुलचा तोल जाऊन पाण्यात पडला आसल्याचा आंदाज वर्तविण्यात येत आहे. फक्राबाद येथील संग्राम संतोष भोसले वय ६ वर्षे हा मुलगा काल दि ५ फेब्रुवारी रोजी पासुन … Read more

चक्काजाम आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- दिल्लीच्या सीमेवर दोन महिन्यांहून अधिक कालावधीपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांची दखल न घेता त्यांचे आंदोलन हुकुमशाहीने दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा निषेध नोंदवून अ.भा.किसान संघर्ष समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य किसान सभेच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात नगर-पुणे महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. केंद्रातील मोदी प्रणित भाजप सरकारच्या विरोधात जोदराद घोषणाबाजी करुन … Read more

आमदार जगताप म्हणाले…महावितरण विरोधात गुन्हा दाखल करा

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- महावितरण कंपनीने महापालिकेची कुठलीही परवानगी न घेता शहरातील रस्त्यांची मनमानी पद्धतीने खोदाई करून रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे संबधितांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना द्यावेत अशी मागणी आ.संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त डॉ.राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. नगर शहरात मुख्यत: नगर … Read more

उर्जा राज्यमंत्री जिल्ह्यातील तरी नागरिकांवर आंदोलनाची वेळ येतेय

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- भारतीय जनता पक्षाच्यावतीने आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वीज कंपनीच्या विरोधात राहाता येथे हल्लाबोल आणि टाळे ठोको आंदोलन करण्यात आले. वीज बिल भरण्याची होत असलेली सक्ती, वीज कनेक्शन तोडण्याच्या कंपनीच्या निर्णयाचा यावेळी निषेध करून शंभर युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची मागणी यानिमित्ताने करण्यात आली. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण … Read more

थोड्याच वेळात शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन सुरू

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-कृषी कायद्यावरून संसदेत रणकंदन सुरू असतानाच आज आंदोलक शेतकऱ्यांनी देशभर ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे. राजधानी दिल्लीला या आंदोलनातून वगळण्यात आलं असून, देशभरात तीन तास आंदोलन केलं जाणार आहे. कृषी संयुक्त किसान मोर्चाने याबद्दल शुक्रवारी माहिती दिली. राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांवर आंदोलन केलं जाणार असून, कोणत्या वाहनांना जाण्यास मूभा दिली … Read more

अखेर ‘त्या’ देवस्थानच्या अध्यक्षासह विश्वस्तांवर गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- मोहटादेवी मंदिर बांधताना पायात सोने पुरल्याच्या प्रकराबाबत त्यावेळचे अध्यक्ष नागेश बी. न्हावळकर, विश्वस्त व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या विरुद्ध कट रचुन आर्थिक फसवणुक करणे व अमानुष, अनिष्ठ आणि अघोरी, कृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन व काळी जादु नियम २०१३ कायद्याने गुन्हा दाखल झाला आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या सहा पदाधिका-यांनी पोलिसात फिर्याद … Read more

जिल्हा सहकारी बँक निवडणूक: हे दोन उमेदवारीअर्ज माघारी!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- सहकार क्षेत्रातील लौकिक प्राप्त बॅंक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु आहे. काल शुक्रवारी भानुदास मुरकुटे यांनी शेती पूरक मतदार संघ आणि बिगर शेती मतदार संघासाठी दाखल केलेले प्रत्येकी एक असे दोन अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारीची … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या किल्ल्यावर खोदकाम करताना सापडले तब्बल 250 तोफगोळे

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथिल किल्ले शिवपट्टन या ठिकाणी किल्याच्या दुरुस्तीसाठी खोदकाम करत असताना 250 तोफ गोळे व तोफेचा फुटलेला भाग आढळून आला आहे. किल्ल्यावर तोफगोळे आढळून आल्याची बातमी गावात वार्‍यासारखी पसरली आहे. त्यामुळे तोफगोळे पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती. दरम्यान सापडलेले तोफगोळे खर्डा किल्ल्यात जपून ठेवून येणार्‍या पर्यटाकांसाठी किल्ल्याच्या … Read more

अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर ‘मी’ निवडणूक रिंगणात!

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-आजवर आपण स्व. गुलाबराव शेळके यांच्या आदर्शावर वाटचाल करून शेतकरी, कर्मचारी यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. अजितदादा, आ. लंके यांच्या आग्रहाखातर मी निवडणूक लढविणार असून सर्वांनी सहकार्य करा. असे आवाहन उदय शेळके यांनी केले. शुक्रवारी उदय शेळके यांनी मांडओहळ येथे आयोजित केलेल्या स्नेहभोजनासाठीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी १०५ मतदारांपैकी … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीचा विवाह राहुरी तालुक्यातील एका मुलाशी जबरदस्तीने विवाह करण्यात आला आहे. याबाबत पीडीत मुलीच्या जबाबावरून राहुरी पोलिसात विवाह लावून देणार्‍या नवरदेवासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील एका 17 वर्षे 6 महिने वय असलेल्या अल्पवयीन मुलीचा … Read more

गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. ”आज माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी करोना चाचणी करून घ्यावी, असे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ६२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ झाल्याने … Read more

आमदार बबनराव पाचपुते झाले आक्रमक म्हणाले राज्य सरकार ने शेतकऱ्याचा गळा….

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  राज्य सरकारने शेतकऱ्यांकडून सक्तीची वसुली करण्याऐवजी वीज मंडळाला १हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा असे प्रतिपादन आमदार बबनराव पाचपुते यांनी वीज वितरण च्या विरोधातील आंदोलनाच्या वेळी बोलताना केले महावितरणने महाराष्ट्रातील 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी कारण प्रश्न आहे पाण्याचा..

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  महावितरणकडून मुळा डॅम वाहिनीच्या तातडीचे तांत्रिक देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेपर्यत शटडाउन घेण्यात येणार आहे. तसेच सदर शटडाउन वेळेत महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहे. सदर कामे ही शनिवार दि.६ ६रोजी दुपारी १२ ते सायं.६ वाजेपर्यंत घेण्यात येणार … Read more

खंडणी मागणारे ‘ते’तिघेजण जेरबंद कांदा मार्केटमध्ये नगर तालुका पोलिसांची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:-  येथील नेप्ती कांदा मार्केट येथे खंडणी मागणाऱ्या तिघांना नगर तालुका पोलिसांची अटक केली आहे. अक्षय दिलीप कोके (रा. अक्षदा गार्डनसमोर अहमदनगर), हर्षवर्धन महादेव कोतकर (रा. एकनाथनगर केडगाव ), राजेंद्र गोरख रासकर (रा. चास ता जि अहमदनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी की, फोनवर … Read more

कर्मचार्‍यांच्या थकीत वेतनासाठी सीईओना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- करोनाच्या संकटकाळात सेवा देऊनही भिंगार छावणी परिषदेतील सफाई कर्मचार्‍यांचे वेतन थकले असताना त्यांचे वेतन तात्काळ मिळण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या मागणीचे निवेदन छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांना देण्यात आले आहे. निवेदनात म्हंटले आहे कि, भिंगार छावणी परिषदेत सफाई कर्मचार्‍यांनी करोनाच्या संकटकाळात जीवाची पर्वा न … Read more

महावितरण विरोधात भाजपचे आज ‘टाळे ठोको’ आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- करोना काळात जनतेला वीज बिल माफीचे आश्वासन देणारे सरकार आता सक्तीने वीज बिलांची वसुली करून जनतेला नाहक त्रास देत आहेत. थकीत बिल भरले नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी देणारे हे सरकार किती असंवेदनशील आहे हे यावरून दिसून येते. मात्र आम्ही या आघाडी सरकारला मनमानी कारभार करू देणार नाही. … Read more

शहरात भिशीचा व्यवसाय जोरात

अहमदनगर Live24 टीम, 05 फेब्रुवारी 2021:- संगमनेर कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य नागरीकांपासून मोठ्या व्यापार्‍यांपर्यंत यात सहभागी आहेत. 5 हजारांपासून ते 50 लाखांपर्यंत भिशी लावण्यात येत आहे. यातून अनेक भिशीचालक मालामाल झाले आहेत. शहरात मोठ्या प्रमाणावर फोफवलेल्या या व्यवसायाकडे संबंधित खात्यांच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष आहे. … Read more