पाचवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या ३३ वर्षाच्या नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-राहाता तालुक्यातील निर्मळ पिंप्री परिसरात राहणारा आरोपी जालिंदर तुळशीराम वांगे, वय ३३ वर्ष याला इयत्ता ५ वी तील १० वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी लोणी पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका इ. ५ वीमध्ये  शिकणाऱ्या १० वर्षाच्या लहान मुलीवर २४ जानेवारी रोजी सायं. ४ च्या सुमारास आरोपी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १२१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ५५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ झाल्याने … Read more

‘टाळे ठोको’ आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! –आ.विखे पाटील आघाडी सरकारच्या विरोधात वीज ग्राहकांचा एल्गार

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय त्वरीत मागे घ्यावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शुक्रवार दि.५ फेब्रुवारी २०२१ रोजी वीज कंपनीच्या विरोधात पुकारलेल्या ‘टाळे ठोको’ आंदोलनात सर्व वीज ग्राहक आणि शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भाजपाचे जेष्ठ नेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे. राज्यातील ७२ लाख वीज जोडण्यांचा … Read more

पाच हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी हवालदारास अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-पारनेर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराला पाच हजाराची लाच मागीतल्या प्रकरणी अ. नगर लाचलुचपतच्या पथकाने आज दुपारी अटक केली. पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील एकास पारनेर पोलिस ठाण्यातील एका पोलिस हवालदाराचा आठ दिवसांपुर्वी फोन आला की, तुझ्या बायकोने तुझ्या विरूद्ध केस केली आहे. त्यामुळे मला कारवाई करावी लागेल, आजच पाच … Read more

गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी केले गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-शेवगाव पोलिसांनी अवैधरित्या गावठी कट्टा बाळगणार्‍या एकाला जेरबंद केले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच या आरोपीकडून त्याच्याकडून चोरीच्या दुचाकीही हस्तगत केल्या आहेत. नामदेव भागवत वटाने (वय 32, मुळगाव सावळेश्वर राक्षसभुवन ता. गेवराई, हल्ली राहणार कुरुडगाव ता. शेवगाव) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान शेवगाव पोलीस पथकाने खानापूर, रावतळे, … Read more

तोपर्यंत आम्ही नियमित बिले भरणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:- महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. तसेच महाराष्ट्रातील ४ कोटी जनतेव्हा वीजप्रवाहा खंडित करण्याच्या दृष्टीने हालचाली देखील सुरु आहेत. यामुळे आता सर्वत्र संतापाची लाट उसळू लागली आहे. महावितरणाच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून दि. 5 फेब्रुवारी रोजी उत्तर नगरमध्ये भाजपा जिल्हाध्यक्ष … Read more

राज्यपालांनी भुजबळांना दिली अप्रत्यक्षपणे ही ऑफर!

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी कोश्यारी यांनी भाषणाच्या ओघात थेट राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. थेट राज्यपालांनीच भुजबळांना अप्रत्यक्षपणे ही ऑफर दिल्याने त्याचे अनेक राजकीय अर्थ निघत आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नाशिकमध्ये आले होते. सटाणा येथे संत शिरोमणी देवमामलेदार स्मारकाचे उद्घाटन … Read more

जिल्ह्यातील ‘या’ संस्थानच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी पोलीस प्रशासनाला गुन्हा दाखल करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 04 फेब्रुवारी 2021:-मोहोटा येथील जगदंबा देवी मंदिर संस्थानच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी दाखल फौजदारी याचिकेत हायकोर्टाने दणका दिला. न्या. टी व्ही नलावडे आणि. न्या. एम.जी शेवलीकर यांनी  पोलीस प्रशासनाला मोहोटा देवस्थानमधील सुवर्णयंत्र गैरप्रकारणी तत्कालीन विश्वस्तांविरोधात  गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात यावा. फसवणूक, आर्थिक अफरातफरी, जादूटोणा प्रतिबंध कायदा व … Read more

संतापजनक : ७१ वर्षांच्या नराधमाने केला अकरावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एके ठिकाणी भाडोत्री खोलीत राहणाऱ्या इयत्ता अकरावीतील १८ वयाच्या विद्यार्थिनीवर आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख, (वय ७१) रा. आखेगाव रोड, शेवगाव याने तीन-चार वेळा शरीरसंबंध करून बळजबरीने बलात्कार केला. फिर्यादीत पीडित विद्यार्थिनीने म्हटले आहे कि, आई- वडिलांसह भाड्याच्या घरात रहात असताना आरोपी अजिमोद्दीन अमीनशहा शेख हा शेवगाव … Read more

धंनजय मुंडेंच्या अडचणीत वाढ; दुसऱ्या पत्नीची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने तक्रार मागे घेतली असली, तरी मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ निर्माण होण्याची शक्यता आहे. बुधवारी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा यांनी धनंजय मुंडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. करुणा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे कि, मुंडे यांनी … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ४३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १२४ ने वाढ … Read more

मोठी बातमी ! राज्यातील महाविद्यालय 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील महाविद्यालयात पुन्हा सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती. मात्र याबाबत काही बैठका देखील पार पडल्या. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविद्यालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आलेली राज्यातील महाविद्यालयं पुन्हा सुरु केली जाणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा उच्च … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमसंबधातून पत्नीने केला प्रियकराच्या मदतीने पतीचा मर्डर !

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-  प्रियकरासोबत असलेल्या संबंधात अडचण निर्माण होत असल्याने पत्नीने केलेल्या जबर मारहाण करून पतीचा खून केल्याची घटना नगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे घडली. याबाबत सविस्तर असे की मिरजगाव येथील राहणारी विवाहित महिला अनिता प्रमोद कोरडे हिचे योगेश बाळासाहेब बावडकर याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणातूनच अनिता हिने तिचा पती प्रमोद बाळासाहेब कोरडे … Read more

दोन दिवस दर्शन बंद : वारकरी दर्शनाला मुकणार!

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:-सध्या करोनाची लस जरी बाजारात आलेली असली, तरी या महामारीचा फटका पंढरीच्या वारीला देखील बसला आहे. कारण, माघी यात्रेच्या काळात दोन दिवस श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे दर्शन भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. माघ दशमी आणि एकादशी म्हणजेच २२ व २३ फेब्रुवारी रोजी दर्शन बंद ठेवण्याचा निणर्य मंदिर समितीच्या बैठकीत घेतला … Read more

हुश्श झाला बुवा एकदाचा ‘हा’ कार्यक्रम जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडलेल्या आहेत. आता सरपंच, उपसरपंच निवडीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रम जाहीर केला आहे. ग्रामपंचायत निवडणुक झालेल्या ग्रामपंचायतीच्या नवीन सदस्यांची सरपंच, उपसरपंच निवडीसाठीची सभा दि. ९ आणि १० फेब्रुवारी रोजी घेण्यात येणार आहे. सरपंच आरक्षणानुसार नवीन सरपंच निवड होणार आहे. जानेवारीत निवडणूक झाली निकालही जाहीर झाला.परंतु … Read more

आता बलात्कार पिडितेची ओळख स्पष्ट होऊ नये यासाठी ही आहे निमावली

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- बलात्कार पीडीत महिला अथवा मुलींची ओळख स्पष्ट झाल्यास त्यांच्या भावी जीवनात अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तरी त्यांना सन्मानाने जीवन जगता यावे, त्यांची ओळख स्पष्ट हो नये,यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमुर्ती टी.व्ही. नलावडे आणि न्या. एम.जी.शेवलीकर यांच्या खंडपीठाने एका जनहित याचिकेत राज्यातील पोलिस आणि न्यायव्यवस्थेला नियमावली लागू … Read more

कोरोनामुळे रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबत राज्य सरकारने आदेश जारी केला आहे. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू होणार आहे. डिसेंबर 2020 अखेर निवडणुकीस पात्र असलेल्या जिल्ह्यात 2020 मध्ये मुदत संपलेल्या 1 हजार 916 संस्था असून त्यांची येत्या वर्षभरात सहा टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात 156 संस्थांच्या निवडणूकांचा समावेश … Read more

कृषी विद्यापीठाच्या वॉचमनचा मृत्यू; नातेवाईकांनी केला गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम, 03 फेब्रुवारी 2021:- राहुरी कृषी विद्यापीठातील वॉचमनचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान चंद्रकांत याच्या मृत्यूला फक्त विद्यापीठातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गेल्या दहा वर्षांपासून सतत व एकाच जागेवर रात्रपाळीची ड्युटी लागत असल्याने चंद्रकांत देवराम पवार (वय 38 वर्षे, रा. खडांबे खुर्द, … Read more