पराभव झाल्याने तुफान राडा; तिघेजण जखमी या आमदाराच्या तालुक्यात घडला प्रकार

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- काल ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत पराभव झाल्याने वाद झाला. यात १० ते १२ जणांनी केलेल्या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना पारनेर तालुक्यातील अस्तगाव येथे मतमोजणीच्या दिवशीच म्हणजे दि.१८ रोजी दुपारी २ वाजता समाजमंदिरासमोरील चौकात घडली. या  मारहाणीत शिवाजी विलास काळे, ऋषिकेश मधुकर काळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मिनी बसचा अपघात

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- अहमदनगर ते जामखेड रस्त्यावर कडा (ता.आष्टी) परिसरात लग्नाचे वर्‍हाड घेऊन जाणार्‍या मिनी बसला अपघात झाला. यामध्ये कल्याण येथील वीस जण जखमी झाले आहेत. जखमींवर कडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथील विवाह समारंभासाठी कल्याण येथून मिनी बसमधून वर्‍हाड आले होते. विवाह आटोपून रात्री कल्याणकडे … Read more

ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सत्ता राखण्यात आ.रोहित पवारांना यश

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर करण्यात आले आहे. या निवडणुकीमध्ये अनेक सत्ताधाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यामुळे यंदाची निवडणूक चांगलीच चर्चेची झाली. दरम्यान आमदार रोहित पवार यांच्या कर्जत मतदार संघात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवून आलेले विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहे. विजयी … Read more

राहुरी फॅक्टरी येथे मोबाईलची चोरी

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :-जिल्ह्याचा क्राईम रेकॉर्ड दिवसेंदिवस वाढू लागला आहे. दरदिवशी होणाऱ्या वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राहुरी तालुक्‍यातील राहुरी फॅक्टरी येथे भाजी मंडईतुन मोबाईल चोरण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत योगेश बाबासाहेब आंबेडकर वय ३८, धंदा नोकरी, रा. राहुरी फॅक्टरी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, १७.१.२०२१ रोजी सकाळी … Read more

बंद घर फोडून दीड लाखांचा ऐवज लंपास

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- बंद असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून गुपचूप प्रवेश करून घरातील सामानाची उचकापाचक करून सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ५६ हजारंचा मुद्देमाल चोरल्याची घटना सुपा येथे घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, सुपा येथील सुपा हाईट्स या अपार्टमेंटमधील आदेश दीफ्क बिंगले रा. आकुर्डी पुणे हल्ली रा. सुपा … Read more

जिल्हा सहकारी बँकेसाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरुवात

अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2021 :- जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी अर्ज दाखल करण्यास आजपासून सुरूवात होत आहे. याबाबतची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दिग्विजय आहेर यांनी दिली आहे. येत्या 25 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी वेळ असल्याचे सांगण्यात आले. बँकेच्या 21 संचालकांच्या जागांसाठी येत्या 20 फेबु्रवारीला मतदान होणार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ९४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १३१ ने वाढ झाल्याने … Read more

कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित; नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या घेणे तसेच बाधित व्यक्तींच्या निकट संपर्कातील व्यक्तींची लवकर चाचण्या होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाचे कोविड सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर यांनी केल्या. कोरोना लसीकरण पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे किंवा … Read more

बर्ड फ्ल्यूला घाबरण्याचे कारण नाही अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्ण सुरक्षित

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- देशाच्या काही राज्यात तसेच महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा प्रादुर्भाव दिसून आला असला तरी अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे राज्य शासनाचे कोरोनाविषयक सल्लागार डॉ.दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील पोल्ट्री असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात या दोघांनीही चिकनचा आस्वाद घेत ते … Read more

कोणी केला आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचा पराभव ? वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगरमध्ये लोणी खुर्द हे भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचं गाव आहे. या गावातील ग्रामपंचायतीवर गेल्या 20 वर्षांपासून विखे-पाटलांची सत्ता होती. मात्र, या ग्रामपंचायतीच्या 17 पैकी 13 जागा जिंकून परिवर्तन पॅनलने विखे-पाटलांना धोबीपछाड केलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील स्वत: भाजपचे आमदार आहेत. त्यांचे चिरंजीव सुजय विखे-पाटील हे खासदार आहेत. असं … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६५ वषार्पासून अबाधित सत्ता असलेल्या ह्या गावात सत्तांतर

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके यांच्या गटाने खारेकर्जूने ग्रामपंचायतीत सत्तांतर घडविले. ११ पैकी ११ जागा जिंकून विरोधी गटाचा पराभव केला. खारेकर्जूने येथे माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांच्या गटाची गेल्या ६५ वषार्पासून अबाधित सत्ता होती. परंतु मागील वेळी येथे शेळके यांच्या गटाचा पराभव झाला होता. यावेळी स्व. … Read more

गडाख यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र आले मात्र सोनई ग्रामपंचायतीवर वर्चस्व कायम

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- सोनई ग्रामपंचायतीवर मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने वर्चस्व कायम ठेवले आहे. १७ पैकी १६ जिंकून गडाख गटाने दणदणीत विजय मिळवला. मंत्री शंकरराव गडाख यांच्या गटाने सोनई गावावर गेल्या अनेक वषार्पासूनची सत्ता आहे. यावेळी माजी खासदार तुकाराम गडाख यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. ते स्वत: प्रचारात उतरले होते. … Read more

विखे पाटील यांचा स्वताच्या गावात पराभव तर राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राहता तालुक्यातील 25 पैकी 24 ग्रामपंचायती वर्चस्व कायम ठेवलं आहे. त्यांचं गाव असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतीची सत्ता त्यांना गमवावी लागली आहे. आमदार राधाकृष्ण विखे-पाटलांनी राहता तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चांगला जोर लावला होता. अचूक नियोजनाच्या बळावर त्यांना राहता तालुक्यातील सत्ता खेचून आणण्यात यश आलं. तालुक्यातील 25 … Read more

बुर्‍हाणनगरवरील कर्डिले यांची एकहाती सत्ता कायम !

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील बुर्‍हाणनगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्त्वाखालील ग्रामविकास पॅनलनेच बाजी मारली आहे. 15 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्यानंतर विरोधकांनी उर्वरित 7 जागांसाठी उमेदवार दिल्याने बुर्‍हाणनगरला अनेक वर्षांनी प्रथमच निवडणूक झाली. प्रचारादरम्यान विरोधकांनी कर्डिले यांच्या कार्यपध्दतीवर आरोपांच्या फैरी झाडल्या. मात्र मतदारांनी कर्डिले यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : राळेगणसिध्दी मध्ये या पॅनेलचा झाला विजय

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :- राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत ९ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या होत्या. सात जागांसाठी १५ उमेदवार रिंगणात होते. यात औटी-मापारी यांच्या राळेगणसिध्दी ग्रामविकास पॅनलने ५ जागांवर विजय मिळविला आहे. दोन जागांचा निकाल येणे बाकी आहे. विरोधी शामबाबा पॅनलला हाती आलेल्या निकालानुसार एकही जागेवर विजय मिळवता आला नाही. राळेगणसिध्दी ग्रामपंचायतीत सुरूवातीला बिनविरोधचे … Read more

राम शिंदे यांना दुसरा झटका

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आमदार रोहित पवार यांनी चौंडी नंतर जामखेड तालुक्यातील सर्वात मोठी खर्डा ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर करून माजी मंत्री राम शिंदे यांना जोरदार दुसरा धक्का दिला . राष्ट्रवादीचे आमदार रोहीत पवार यांनी भारतीय जनता पक्षाला एक धक्का देत खर्डा ग्रामपंचायतमध्ये ११ जागा जिंकले तर दुसरीकडे या ग्रामपंचायतीत भारतीय जनता पक्षाला फक्त ६ … Read more

AhmednagarLive24 Updates : ग्रामपंचायत निकाल 2021

Gram Panchayat Election Results 2021 LIVE Updates : राज्यातील सुमारे 12 हजार 711 ग्रामपंचायतींच्या निवडणुका 15 जानेवारीला पार पडल्या. आज या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आहे. अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा (LAST UPDATE On 9.23 AM)   नगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी सुरु झाली आहे जिल्ह्यातील एकूण 767 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक लागली होती. त्यातील 53 ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध … Read more

सुखद रविवार ! आजच्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यात वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ५६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने वाढ … Read more