शहराच्या वाढत्या विद्रुपीकरणला कंटाळून महसूलमंत्र्यांनी उचलले पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 2 जानेवारी 2021 :- संगमनेर शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या तसेच शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्या फ्लेक्स बोर्डबाबत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कारवाई सुरू केली. संगमनेर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणातून जाणाऱ्या नाशिक- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला राज्यातील हायटेक बसस्थानक उभारले आहे. सर्वार्थाने परिपूर्ण असलेल्या या बसस्थानकाच्या परिसरात लागलेल्या अनेक लहानमोठ्या फ्लेक्‍सच्या फलकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत … Read more

रेखा जरे हत्यांकाड प्रकरण; महत्वाची डायरी पोलिसांच्या हाती लागली!

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मास्टर माईंड बाळ ज. बोठे अद्यापही अटक करण्यात पोलिसांना यश आले नसले तरी महत्वाची डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांनी ती जप्त केली असून, त्या डायरीत जरे हत्याकांड प्रकरणातील महत्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. ही डायरी रेखा जरे यांच्या घरातून जप्त करण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वर्षाच्या पहिल्याच दिवशी वाढले इतके रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ८६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ … Read more

धक्कादायक ! धावती कार अचानक पेटली; तलाठी बालबाल बचावले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- कर्जत येथील बेनवडी फाटा शिवारातील पुलाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी कारचालक जामखेड येथील तलाठी सुखरूप बाहेर निघाल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेबाबत अधिक माहिती अशी कि, ३० डिसेंबर रोजी सायंकाळी जामखेड तालुक्यातील तलाठी प्रशांत पांडुरंग जमदाडे हे काम आटोपून कर्जतहून राशीनकडे जात होते. … Read more

भेसळखोरांवर पोलिसांची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- भेसळखोरीमुळे अनेकदा या गोष्टींचा परिणाम मानवी शरीरावर झालेला दिसून येतो. दरम्यान हि भेसळखोरी रोखण्यासाठी प्रशासन नेहमी सतर्क राहते. अशाच राहुरी तालुक्यातील एका भेसळखोरी सुरु असलेल्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील दूध भेसळ करणार्‍या दूध सम्राटांचे धाबे दणाणले आहेत. याबाबत अधिकी माहिती अशी कि, राहुरी … Read more

….डील होण्याआधीच पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला आहे. कायद्याचा धाक या वाळूतस्करांच्या मनात राहिलेला नाही. मात्र अशा वाळूतस्करांना गजाआड करण्यासाठी पोलीस पथके देखील सरसावले आहे. नुकतेच एका तस्कराला कर्जतमध्ये अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळूतस्करीची डील करण्यासाठी आलेल्या वाळू तस्कराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून पिष्टल, गाडी … Read more

के.के.रेंज सराव क्षेत्राबाबत महत्वाचे अपडेट वाचा सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :-युध्‍दाभ्‍यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना अधिनियम 1938 याच्‍या कलम 9 च्‍या पोट कलम (1) व (2) नुसार प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये के.के. रेंज अहमदनगर लष्कराच्या गोळीबार क्षेत्रालगतचे क्षेत्रदिनांक 15 जानेवारी 2021 ते 14 जानेवारी 2026 या कालावधीत जिवंत दारूगोळ्यासहीत मैदानी व तोफखाना सराव प्रशिक्षणासाठी अधिसूचना क्षेत्र म्‍हणुन घोषित करण्‍यात आले … Read more

२ जानेवारीला होणार कोरोना लसीकरणाचा ड्राय रन, महाराष्ट्रातील या चार जिल्ह्यांची निवड !

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणाचा ड्राय रन देशभर दि. २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज याबाबत घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून लसीकरणासाठी कशा प्रकारे तयारी करायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

ज्या कारणाने तु हा निर्णय घेतला असेल,त्याला शिक्षा नक्कीच मिळेल,अगदी कुणी रक्ताचं असलं तरी…

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-  प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या होत्या. गौरी गडाख यांचा मृतदेह राहत्या घरात आढळल्याची घटना नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली. गौरी यांच्या आत्महत्येने जिल्ह्यात जिल्ह्यात सन्नाटा पसरला होता, गौरी गडाख या माजी खासदार आणि साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, जलसंधारण मंत्री … Read more

अहमदनगर-पुणे महामार्ग आज मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- अहमदनगर-पुणे महामार्गावरील बेलवंडी फाटा येथुन पुणेकडे जाणारी वाहतुक तसेच अहमदनगरकडुन सरळ पुणेकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतुक दिनांक ३१ डिसेंबर, २०२० च्या मध्यरात्रीपासून ते दिनांक २ जानेवारी २०२१ च्या पहाटे सहा वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोविस तासांत वाढले फक्त इतकेच रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात आज ११५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ९७० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८४ ने वाढ … Read more

निर्भयाच्या न्यायासाठी लढणाऱ्या ‘रेखा जरे’ न्यायपासून वंचित

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या रेखा जरे या पिडीत महिलांच्या मदतीला नेहमी धावून जायच्या. कोपर्डीतील निर्भयाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र आज त्यांचीच हत्या झाल्यानंतर सारे काही शांत झाल्यासारखे वाटते. या हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठेला तात्काळ अटक व्हावी अशी मागणी जरे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आली आहे. … Read more

जिल्हा परिषदेत सीईओंच्या ऑफिसबाहेरच तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालायात काल एक अत्यंत धक्कादायक घटना घडलेली आहे. झेडपीचे सीईओ यांच्या कार्यालयाबाहेर अभ्यागत कक्षात बसलेल्या एका तरूणाचा बेशुद्ध होऊन अचानक मृत्यू झाला. निलेश चौधरी (वय 30) असे या मृत तरूणाचे नाव आहे. दरम्यान या घटनेने जिल्हा परिषदे मध्ये एकच खळबळ उडाली होती. याबाबत अधिक माहिती … Read more

भाववाढ द्या अन्यथा ऊसतोड बंद आंदोलन करू

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :-गेल्या वर्षी कारखान्याने दोन हजार तीनशे रुपयांपर्यंत टनाला भाव दिला होता. तर यावर्षी उसाला 2 हजार 550 रुपये भाव न दिल्यास दि. 12 जानेवारीपासून ऊस तोड आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. याबाबत संघटनेचे तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी वृध्देश्वर साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जालिंदर पवार … Read more

आमदार रोहित पवारांच्या मतदार संघातील ‘या’ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावू लागला आहे. यातच गावागावातिल राजकारणे, भावकीचा वाद, या गोष्टींना फाटा देत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा हि मागणी काही पुढाऱ्यांनी केली आहे. यासाठी विकासात्मक निधीचे आश्वासने देण्यात येत आहे. याला आता नागरिकांकडून देखील सकारात्मक … Read more

महत्वाचे ! स्टेट बँक देत आहे इन्कमटॅक्स रिटर्न भरण्याची फ्री सुविधा; सोबत ‘सीए’चेही मार्गदर्शन ; वाचा सविस्तर…

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-योनो अ‍ॅपच्या मदतीने फ्री मध्ये भरा इनकम टॅक्स रिटर्न :- देशातील सर्वात मोठी सरकारी एसबीआयने (स्टेट बँक ऑफ इंडिया) आपल्या ग्राहकांना एक मोठी भेट दिली आहे. एसबीआयने ग्राहकांना विनामूल्य आयटीआर दाखल करण्याची सुविधा दिली आहे. आपण एसबीआय ग्राहक असल्यास आपण योनो अ‍ॅपच्या सहाय्याने प्राप्तिकर रिटर्न विनामूल्य भरू शकता. आयटीआर … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ११३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६६ हजार ८५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १६८ ने वाढ … Read more

ब्रेकिंग बातमी! भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत 3 दहशतवादी ठार

अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- जम्मू काश्मीर राज्यातील श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी हल्ला झाला.श्रीनगरपासून काही अंतरावर दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. श्रीनगरपासून काही अंतरावर असलेल्या लावापोरा भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली होती. सुरक्षादलांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान अचानक एके ठिकाणी दहशतवाद्यांशी चकमक … Read more