इंदोरीकर महाराजांची सुनावणी ‘ह्या’ तारखेला होणार !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- पुत्रप्राप्तीबाबत केलेल्या विधानावरुन वादग्रस्त ठरलेले निवृत्ती महाराज (इंदोरीकर) यांच्यावरील खटल्याची सुनावणी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने १६ डिसेंबरला ठेवली आहे. मंगळवारी होणारी सुनावणी बुधवारी ठेवण्यात आली होती. सरकारी वकिलांनी कनिष्ठ न्यायालयाकडील दाव्यातील कागदपत्र व संपूर्ण फाईल या न्यायालयात सादर करण्यासंदर्भात अर्ज केला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयाने इंदोरीकर … Read more

दौंड महामार्गावरील अपघातात चाैघांनी गमावला जीव,तालुक्‍यामध्ये शोककळा !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दौंड महामार्गावरील पवारवाडी शिवारात दुचाकी व ट्रक अपघातात प्रतिक नरसिंग शिंदे, राजकुमार विठ्ठल पवार, विशाल संतोष सोनवणे व राहुल बाजीराव बरकडे रा.पवारवाडी हे चौघे मित्र ठार झाले. पवारवाडी येथे हे चौघेही शेजारी – शेजारीच रहायला असल्याने त्यांची जिवाभावाची मैत्री होती. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्‍यामध्ये शोककळा पसरली आहे. श्रीगोंदे … Read more

कोरोनामुळे झाला जिल्ह्यातील इतक्या रुग्नांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात दिवसभरात ३१६ रुग्ण आढळले. तिघांचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या ९७१ झाली आहे. जिल्ह्यात बऱ्याच दिवसांनंतर बुधवारी ३०० हून अधिक रुग्ण आढळले. उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १५५७ झाली आहे. २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ९७, खासगी प्रयोगशाळेत ११० आणि … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘एवढे’ रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३४५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६३ हजार ८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३१६ ने वाढ … Read more

बिग ब्रेकिंग : डिसले गुरूजी झाले कोरोना पॉझिटिव्ह मुख्यमंत्री, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या होते संपर्कात…

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-तब्बल ७ कोटी रूपयांचा ग्लोबल टिचर अवॉर्ड जिंकणारे बार्शीतील झेडपी शिक्षक रणजितसिंह डिसले गुरूजी हे बुधवारी सकाळी कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह निघाले. रणजितसिंह डिसले गुरुजी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते डिसले गुरुजींना कोरोनाची लागण झाली आहे. आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझ्या संपर्कात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात चार तरुण ठार !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील चार तरुण जागीच ठार झाले. नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विशाल संतोष सोनवणे,राहुल बाजीराव बरकडे,राजकुमार विठ्ठल पवार,प्रतीक नरसिंग शिंदे या चार तरुणांचा आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दौंड नगर … Read more

बाळ बोठेला  मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-रेखा भाऊसाहेब जरे हत्येतील प्रमुख सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले. ११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी तेथे छापा टाकला. मात्र, तत्पूर्वीच तो पसार झाला होता. बोठे गेल्या सहा … Read more

नागरिकांनो लक्ष द्या! या दिवशी दवाखाने बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-  बी.एम.एस.झालेल्या आयुर्वेद शाखेतील विद्यार्थ्यांना 58 अ‍ॅलोपॅथीक शस्त्रक्रिया करण्यास परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध खासगी डॉक्टरांनी केला आहे. दरम्यान ही परवानगी रद्द करण्याच्या मागणीसाठी येत्या शुक्रवारी (11 डिसेंबर) संप पुकारला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशानने आंदोलनाचे नियोजन केले असून,11 डिसेंबरला भारतातील सर्व दवाखाने, क्लिनिक व ओपीडीच्या सेवा … Read more

कोरोनाबाधितांची संख्या तीन हजारांच्या पार

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. पूर्वीप्रमाणे बाधितांची संख्या वाढत नसली तरी देखील कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून येतच आहे. श्रीरामपूर तालुक्यात काल एकूण 13 रुग्ण करोनाबाधित आढळून आले असून तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 3048 पर्यंत जाऊन पोहोचला आहे. काल श्रीरामपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये 39 जणांची रॅपीड तपासणी करण्यात … Read more

मंत्र्यांच्या तालुक्यात कोरोनाची गाडी सुसाट

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. संगमनेर तालुक्यात मागील ५ दिवसांत १९३ कोरोना बाधित आढळले. एकूण संख्या ५४७४ झाली आहे. त्यातील ५०११ रुग्ण बरे झाले असून २४५ रुग्णांवर उपचार … Read more

शहरातील या ठिकाणच्या चाैकीसाठी मनपा देणार जागा

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-बोल्हेगावात पोलिस चौकीसाठी महानगरपालिकेने सांस्कृतिक हाॅलची जागा द्यावी, अशी मागणी नगरसेवक कुमार वाकळे यांनी महासभेत केली. महापाैर बाबासाहेब वाकळे यांनी त्यास सहमती दर्शवली. दरम्यान नगरसेवक कुमार वाकळे यांनी बोल्हेगाव परिसरातील गुन्हेगारीबाबत माहिती दिली. हा परिसर सुमारे ४० हजार लोकसंख्येचा असून बोल्हेगाव भाग तोफखाना, तर नागापूर भाग एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या … Read more

शिर्डीतील ‘त्या’ निर्णयास आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचा पाठिंबा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- साईदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी सभ्य पोषाख करून यावे, अशा आशयाचे फलक साईसंस्थानने लावले. त्याला भुमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आक्षेप घेतला. त्यानंतर अनेकांनी या वादात उडी घेतली. संस्थानाच्या विरोधात शिवसेना व मनसेची महिला आघाडी आणि ब्राह्मण महासंघाने यावर भाष्य केले.  काल काही ग्रामस्थांनी ठिकठिकाणी लावण्यासाठी फलक तयार केले. याला … Read more

बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याने वेधले भिंगारकरांचे लक्ष

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भिंगार येथील गौतमनगर मित्र मंडळा तर्फे त्यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. भीम वंदना घेऊन बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी आरपीआय (आठवले) आयटी सेलचे जिल्हा संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, मयूर सोनावणे (मेंबर), आरपीआयचे भिंगार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या चोवीस तासांतील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५२ ने वाढ झाली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या ! अटकपूर्व जामिनावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी घेण्यापूर्वीच पोलिसांना नोटीस काढत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आता बोठेच्या जामिनावर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडाचा सूत्रधार ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर आल्यानंतर त्याचा समावेश आरोपीत करण्यात आला … Read more

शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न प्रा. शशीकांत गाडे यांचा माजी आमदार कर्डिले यांना टोला

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :- शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे आत्तापर्यत तीन वेळा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आहे . शिवसेना शेतकऱ्यांना कर्जाच्या डोंगरातून कबाहेर काढत असताना भाजपचे काही लोकप्रतिनिधी जिल्हा बँकेचे खेळते भांडवल कर्ज स्वरुपात देऊन शेतकऱ्यांना कर्जबाजारी करण्याचा प्रयत्न करत आहेत. असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा. शशीकांत गाडे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे नाव न घेता … Read more

महत्वपूर्ण ! रेल्वेने प्रवास करण्याआधी ‘हे’ वाचा; ‘ह्या’ ट्रेन झाल्यात रद्द, पहा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-पंजाबमधील शेतकऱ्यांच्या निषेधामुळे रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. काही गाड्या अर्धवट रद्द करण्यात आल्या आहेत. म्हणजेच या गाड्या अर्ध्या मार्गावर थांबतील आणि तेथून प्रारंभ होतील. रेल्वेने ज्या मार्गासाठी गाड्या शक्य आहेत त्यांचा मार्ग बदलला आहे. जाणून घ्या रेल्वेने कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत आणि कोणत्या गाड्यांचा मार्ग बदलला … Read more

फरार बोठेचा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असलेल्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस बोठे याला पकडायला त्याच्या घरी गेले होते. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत बाळ फरार झाला आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळाला पकडण्यासाठी पाच तपास पथके … Read more