कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-दोन महिन्यांपूर्वी तेजीत आलेल्या कांद्याच्या दरात दोन आठवड्यात मोठी घसरण सुरू आहे. वांबोरी उपबाजारात शनिवारी एक नंबर कांदा २८०० ते तीन हजार पाचशे रुपयांनी विकला गेला. कांद्याचे दर दिवाळीनंतर घसरल्याने शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. नगर जिल्हा हे कांद्याचे मोठे आगार म्हणून ओळखले जाते. यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस … Read more

पाणी प्रश्नाबत सभापती मनोज कोतकरांनी दिले हे आदेश

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अमृत पाणी योजनेची ठेकेदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणा मुळे या योजनेचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळे पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत सभापती मनोज कोतकर यांनी आज आढावा घेतला आहे. नगर शहरात पाण्याची अडचण निर्माण होतेय म्हणून अमृत पाणी योजनेची मुळा धरणापासून विवाद पंपिंग स्टेशन पर्यंतची पाहणी करून पाणी … Read more

अकोले पोलीस ठाण्याचा पदभार आता यांच्या खांद्यावर

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अकोल्याचे वादग्रस्त पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी संगमनेरातून नियंत्रण कक्षात पोहोचलेले पेालीस निरीक्षक अभय परमार यांच्या हाती अकोल्याची सूत्रे सोपविण्यात आली आहे. अकोले तालुका हा आदिवासीबहुल असल्याने येथे अवैध व्यवसायांसह गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. या सर्व घटकांवर पोलीस निरीक्षक … Read more

मोठी बातमी : Amazon वर बंदी ? जाणून घ्या काय आहे प्रकरण

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ई-कॉमर्स कंपनी Amazon वर दंड लावलेला आहे. अ‍ॅमेझॉनवर विकल्या जाणाऱ्या उत्पादनांवर देशाची माहिती न दिल्याने मंत्रालयाने 25,000 रुपये दंड ठोठावला होता. परंतु कन्फेडरेशन ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ने हा अमेझॉनवर लादलेला दंड अपुरा असल्याचे म्हटले आहे. दंड त्यांचे म्हणजे आहे की, दंड वसूल करण्याचा हेतू गुन्हेगारांना … Read more

तिच्याशी लग्न लावून दिले नाही तर आख्खे नगर पेटवून देईल…

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- आमच्याकडे टिकली लावलेली व लिपस्टीक लावलेली चालत नाही, असे म्हणून व त्यावरून भांडणे करून तसेच लग्न व धर्म परिवर्तनासाठी बळजबरी केल्याने अल्पवयीने युवतीने आत्महत्या करण्याची घटना नगरमध्ये घडली. पोलिसांनी याप्रकरणी पुणे येथील सोहेल शेख याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संबंधित युवतीच्या आईने पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे. त्यांची … Read more

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे … Read more

दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- दुनिया घुम लो शेवटी लस पुण्यातच सापडणार आहे असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. सिरम आणि ऑक्सफर्डने तयार केलेली ही लस ७० टक्के परिणामकारक आहे. पंतप्रधान मोदी सिरमच्या लस निर्मितीचा आढावा घेत आहेत. यावरुन सुप्रिया सुळेंनी पंतप्रधानांना चांगलाच टोला लगावला एक … Read more

अबब! ‘ह्या’ कंपनीच्या मालकाने आपल्या कर्मचाऱ्यांना बनवले करोडपती ; वाटले करोडो …

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-बॉस म्हटले कि एक ठरलेली प्रतिकृती समोर उभी राहते. परंतु असे नाही की आपण गृहित धरले त्याप्रमाणे सर्व बॉस एकसारखे असतात. अशा बर्‍याच कंपन्या आणि बॉस आहेत जे आपल्या कर्मचार्‍यांच्या हिताचा विचार करतात. अशीच एक कंपनी आहे द हट ग्रुप. त्याच्या बॉसने कंपनीचा लाभ आपल्या कर्मचार्‍यांना अशा प्रकारे वितरीत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्येने पार केला 62 हजारांचा आकडा,आज वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३३१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६० हजार ३१४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०७ ने … Read more

कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर; महसूल मंत्र्यांच्या तालुक्यात चाललंय काय?

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे.  त्यातच महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात सध्या कायदा – सुव्यवस्था अक्षरश वाऱ्यावर असलेली दिसून येत आहे.  संगमनेर शहरातील एका मंगल कार्यालयातून नवरदेवाच्या खोलीमधून अज्ञात … Read more

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला !

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीने झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री अजित पवार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पैशाच्या वादातून एका तरुणाचा खून

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी जवळील डो-हाळे गावामध्ये पैशाच्या घेण्यावरून एका तरुणाचा खून झाला आहे. या घटनेने शिर्डी डो-हाळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (दि.27 नोव्हेंबर) रोजी रात्री साडेनऊच्या दरम्यान येथे घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणारे डोराळे या गावात एका तरुणाचा पैशाच्या घेण्यावरून … Read more

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुजाता दिवटे यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सुजाता दिवटे यांची नियुक्ती करण्यात आली. आमदार संग्राम जगताप व राष्ट्रवादी महिला शहर जिल्हाध्यक्ष रेशमा आठरे यांच्या हस्ते दिवटे यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, युवती अध्यक्ष अंजली आव्हाड, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित … Read more

फडणवीस, बावनकुळे,ठाकरे यांनी त्यांना आलेली वीजबिलं भरली,पण जनतेला सांगतात बिलं भरू नका..

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-  राज्यात वीजबिल माफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. यातच वीजबिल माफ व्हावे यासाठी सर्वसामान्य नागरिक देखील रस्त्यावर उतरला आहे. तसेच यावेळी महावितरणचा निषेध करण्यात येत आहे. दरम्यान वीजबिल मुद्द्यावरून राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. राज्यात लॉकडाऊन दरम्यान जनतेला आलेल्या वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन … Read more

शेतकरी मरण पावल्यानंतर आपण दिवसा लाईट देण्याचा विचार करणार आहात का ?

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- बिबट्यामुळे भयभीत झालेल्या नगर तालुक्यातील शेतकरी बांधवांना शेतीपंपासाठी ८ दिवसांच्या आत दिवसा वीज पुरवठा करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समवेत तीव्र स्वरूपाचे जनआक्रोश आंदोलन करू असा इशारा तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे नगर तालुका कार्यकारी अभियंता श्री.कोपनर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे. या वेळी … Read more

शिक्षणाची मशाल पेटवून महात्मा फुलेंनी सर्व समाजाला प्रकाशमान केले -आ. संग्राम जगताप

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त माळीवाडा येथील महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.  यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेशमा आठरे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, अजय दिघे, महादेव कराळे, माजी नगरसेवक विष्णू म्हस्के, … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात गायीचे वासरू ठार

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत.  यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुन्हा एकदा बिबट्याने प्राण्यांना आपले भक्ष करण्यास सुरुवात केली आहे. आज जिल्ह्यातील कापुरवाडी येथे बिबट्याने सुरेश शिंदे याच्या जर्शी गायचे वासरु … Read more

महिला वकिलासह एकावर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-खोटे दस्तऐवज तयार करून मोटार अपघाताचा दावा कोपरगाव न्यायालयात दाखल केल्याप्रकरणी नगर येथील अॅड. मंगला राजेश कोठारी (श्रीरंग अपार्टमेंट, गुजरगल्ली) व नंदकुमार छोटुलाल खिच्ची (सावळीविहिर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. एमएसीपी ३६९/२००२ या दाव्यात समाविष्ट फिर्याद, घटनास्थळ, पंचनामा आदी दस्तऐवज बनावट तयार करून ते खरे असल्याचे भासवून दावा दाखल … Read more