अहमदनगर ब्रेकिंग : अखेर जिल्ह्यातील ‘त्या’ हॉस्पिटलला टाळे !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- हॉस्पिटल बंद ठेवण्याचा आदेश असतानाही रुग्णालय सुरू ठेवल्याने शहरातील डॉ. अमोल कर्पे यांचे साईनाथ हॉस्पिटल काल दुपारी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा सील करण्यात आले आहे. साईनाथ रुग्णालयाबाबत तक्रार गेल्यामुळे हे रुग्णालय यापूर्वी बंद करण्यात आले होते. असे असतानाही या रुग्णालयात रुग्णांवर उपचार सुरूच होते. या रुग्णालयात कोरोनाबाधित … Read more

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवाळीच्या शुभेच्छा

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या असून ही दिवाळी सर्वांच्या जीवनात आनंद, उत्साह, समृद्धी, उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. यंदाची दिवाळी सर्वांनी कोरोनाप्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करुन साजरी करुया, आसपासच्या गरीब, दुर्बल, वंचित, उपेक्षित बांधवांना मदत करुन त्यांनाही दिवाळी आनंदात सहभागी करुन … Read more

कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता,उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पथक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी गुरूवारी २६ कर्मचाऱ्यांचे स्वतंत्र पथक नेमले. एकविरा चाैक, ढवणवस्ती, भुतकरवाडी, नेप्तीनाका, भिस्तबाग, तेलीखुंट, कापडबाजार, दिल्लीगेट, अप्पू चाैक, राज चेंबर, पारिजात चाैक, पंचपीर चावडी, शिवनेरी चाैक, केडगाव बायपास, इंपिरियल चाैक, आयुर्वेद काॅर्नर, रंगोली हाॅटेल, चाणक्य चाैक, … Read more

रस्तालूट करणाऱ्याआरोपीला अटक

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शाहरुख अन्वर कोथमिरे (वय २६, रामनगर वॉर्ड १ श्रीरामपूर) हे मोटारसायकलीवर २ नोव्हेंबरला शिरसगाव रोडने जात असताना ओव्हरब्रिजजवळ पाठीमागून मोटारसायकलीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांना अडवून खिशातील ३ हजार रुपये व मोबाइल लांबवला. या प्रकरणी गौरव संजय रहाटे (दत्तनगर, श्रीरामपूर) याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. गुन्ह्याचा समांतर तपास … Read more

दिवाळी नाही त्यांच्या नावाने शिमगा करा बंडातात्या कराडकर सरकारवर संतापले

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीनंतर मंदिरे खुली करू, असे आश्वासन देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वारकरी संप्रदायाचे नेते बंडातात्या कराडकर यांनी कडाकून टीका केली आहे. देशभरातील मंदिरे सुरू झाली तरीही महाराष्ट्रातील देव बंदीवासात असताना दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला केला आहे. पार्ट्या चालतात, हळदी-लग्न समारंभ चालतो, हॉटेल, बार … Read more

बच्चू कडू यांच्या ‘त्या’ वक्त्यामुळे राजकारणात खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- मागील निवडणूक हि अनेक बड्या नेत्यांच्या पक्षांतरामुळे चर्चेत आली होती. अनेक दिग्ग्ज नेत्यांनी वर्षानुवर्षे कामे केलेल्या पक्षांना रामराम ठोकत विरोधी पक्षात प्रवेश केला होता. यामुळे राज्याचे राजकारण चांगलेच ढवळून निघाले होते. यातच राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू हे नगर दौऱ्यावर आले होते. यातच त्यांनी एक वक्तव्य केले ज्यामुळे राजकीय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खूनप्रकरणातील आरोपीस अवघ्या बारा तासांत अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना काल सकाळी नगर शहरातील निंबळक बायपास परिसरात घडली होती.दरम्यान अवघ्या बारा तासांत या गुन्हयातील आरोपीस अटक करण्यात एमआयडीसी पोलीस स्टेशनला यश आले आहे. निंबळक बायपास लामखेडे पंपाजवळ रामदास बन्सी पंडीत वय 50 रा.निंबळक ता.जि.अहमदनगर यांचा … Read more

स्टेट बँक ऑफ इंडियाने उजळली वंचित मुलांची दिवाळी.

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- स्टेट बँक ऑफ इंडिया भारतातील गरीब आणि वंचित समूहातील लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आपल्या सामाजिक दायित्व धोरणानुसार दरवर्षी वंचितांसाठी काम करणाऱ्या संस्थांना बँक कर्तव्यभावनेतून सहयोग देते ,असे प्रतिपादन बँकेचे क्षेत्रीय अधिकारी महेंद्र मोहिते यांनी केले. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अहमदनगर औद्योगिक वसाहतींमधील विभागीय कार्यालयाने अहमदनगर आणि … Read more

पुन्हा घराणेशाही… नगर आणि नेवासा तालुक्याला मिळतेय झुकते माप

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-भाजपा युवा मोर्चाच्या नगर (दक्षिण ) जिल्हा कार्यकरणी आज जिल्हाअध्यक्ष अरुण मुंढे यांनी जाहीर केली. जिल्हाध्यक्ष पदी सत्यजित कदम यांची निवड करण्यात आली. सरचिटणीस पदी अक्षय कर्डिले, गणेश कराड यांची निवड करण्यात आली. मात्र या निवडीवरून आता कलह निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नगरमध्ये जाहीर झालेल्या युवा मोर्चाच्या … Read more

कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला; कमी खर्चात मिळणार भरघोस उत्पादन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-यंदाच्या वर्षी जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. दरम्यान परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याच्या घटना देखील घडल्या आहेत. यातच अतिवृष्टीमुळे कांदारोपांचे मोठे नुकसान झाले. कांदारोपांची नासाडी झाल्याने, पुन्हा रोपे टाकून लागवडीऐवजी थेट कांदा पेरणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्यामुळे यंदा प्रथमच कांदापेरणी वाढल्याने तालुक्‍यातील कांद्याचे क्षेत्र … Read more

शिर्डीच्या ‘त्या’ रिक्त जागेवर तुकाराम मुंडेंची नियुक्ती करावी

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. बगाटेंची बदली झाल्यानंतर शिर्डी संस्थानची सुत्रे कोणाच्या हातात देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. यातच या महत्वाच्या पदावर शिस्तप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ख्याती असलेले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शिवसेना उपजिल्हाप्रमुखांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषदेतील गटनेते अनिल कराळे यांचे दीर्घ आजाराने आज (दि.13) निधन झाले. ते 41 वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या पुण्यातील खासगी रूग्णालयात उपचार चालू होते. ऐन दिवाळीत कराळे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने शिवसेनेत शोककळा पसरली आहे. त्यांचे मूळ गाव पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : माजी महापौर संदीप कोतकर यांच्या बंगल्यात चोरी, लाखोंचा मुद्देमाल….

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :-  माजी महापौर संदीप कोतकर व भानुदास कोतकर यांच्या अहमदनगर शहारातील केडगाव मधील बंगल्यात काल रात्री चोरी झाल्याची माहिती समोर आली आहे. घरातील रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने असा सुमारे ३ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात खुरपणी करणाऱ्या महिलेवर भरदिवसा बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- शेतात खुरपणी करणाऱ्या ३५ वर्ष वयाच्या तरुण महिलेवर भरदिवसा शेतात बलात्कार करण्याचा प्रकार घडल्याने पानोडीसह संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पानोडी परिसरातील एक ३५ वर्षांची महिला शेतात गवत खुरपणी करीत होती. तेथे आरोपी अण्णा लहानू घुगे, रा. पानोडी हा आला व माझे तुझ्यावर … Read more

धक्कादायक : अहमदनगर मध्ये पुन्हा वाढले कोरोना मृत्यू ! एकाच दिवशी झाले…

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या २४ तासांमध्ये २२८ जणांना कोरोना संसर्गाचे निदान झाले. सध्या १ हजार ३९५ जणांवर उपचार सुरू आहेत. कोरोना उपचारानंतर आज २४८ रुग्णांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनातील मृतांचा आकडा ९०० च्या उंबरठ्यावर पोहोचला आहे. जिल्ह्यात आज कोरोना उपचारादरम्यान आठ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ८९७ जणांचा मृत्यू झाला … Read more

दारू अड्ड्यावर पोलिसांचे छापे,देशी विदेशी दारू जप्त !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील देवीभोयरे फाटा येथील हॉटेल जय मल्हार येथे ५ हजार २२० रूपयांची देशी विदेशी दारू पो. कॉ. सत्यजित शिंदे यांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आली. या गुन्हयाप्रकरणी विठठल बाळू माकर तसेच सुनिल बबन मगर (दोघेही रा. ढोकसांगवी ता. शिरूर जि. पुणे) यांना अटक करण्यात आली. दोघाही आरोपींविरोधात … Read more

कोरोनाचे भय कायम, नवीन वर्षात दुसर्‍या लाटेची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 13 नोव्हेंबर 2020 :- पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीमध्ये कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते अशी शक्यता राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयाने वर्तवली आहे. त्यासंदर्भात प्रत्येक जिल्हा आणि महापालिका प्रशासनाला खबरदारी म्हणून संभाव्य लाटेची पूर्वतयारी करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. “सध्या राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली तर युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आहे. युरोपियन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या सेक्स रॅकेट बद्दल धक्कादायक माहिती समोर !

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यामध्ये सेक्स रॅकेट करणारी टोळी सध्या सक्रीय झालेली असून वेश्याव्यवसायातून मिळणाऱ्या पैशावर मजा लुटणारे लुटेरे पुढे येत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये हॉटेल आणि लॉजिंग व्यवसाय बंद ठेवण्यात आल्यामुळे सुखसोयीनी परिपूर्ण असलेल्या हॉटेल लॉजऐवजी घरगुती वेश्याव्यवसायच सुरक्षित वाटू लागल्याने अवैध वेश्याव्यवसाय करणाऱ्या टोळ्या समोर येत आहे. श्रीगोंदा शहरातील उच्चभ्रू … Read more