कत्तलीसाठी जाणाऱ्या५ जनावरांची सुटका

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कत्तलीसाठी पीकअपमधून नेण्यात येणाऱ्या ३ गायी व २ वासरांची सुटका आश्वी पोलिसांनी केली. ही कारवाई शनिवारी रात्री ८.३० वाजता निमगावजाळीतील हॉटेल गोविंद गार्डन परिसरात झाली. वाहनचालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोल्हार-घोटी महामार्गावरुन चाललेल्या पीकअपमध्ये (एमएच १२ डीजी ८६३) कत्तलीसाठी जनावरे नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सापळा रचून त्यांनी … Read more

विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. यामुळे अनेक महिला थेट टोकाचे पाऊल घेते आपले जीवन संपविण्याचा निर्णय घेतात. असाच काहीसा प्रकार जिल्ह्यातील राहाता तालुक्यात घडला आहे. अनैतिक संबंधाबाबत आम्ही तुझी समाजात बदनामी करू अशी धमकी देऊन विवाहितेस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी … Read more

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना मानद डी.लिट पदवी प्रदान

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सार्वजनिक जीवनात गेली ६० वर्षे केलेल्या समाजसेवेबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आज एका विशेष दीक्षांत समारोहात डी.लिट ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. राजस्थानच्या झुनुझुनु येथील श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिब्रेवाला विद्यापीठातर्फे राज्यपालांना राजभवन येथे ही मानद पदवी समारंभपूर्वक देण्यात आली. डी. लिट. ही सन्माननीय पदवी घेण्याची आपली योग्यता … Read more

एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण थकीत वेतन दिवाळीपूर्वी

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-एसटी कर्मचाऱ्यांच्या मागील 3 महिन्यांचे थकीत असलेले पूर्ण वेतन दिवाळीपूर्वी देण्यात येत आहे, अशी माहिती परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्री.परब म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचे पूर्ण वेतन लवकर मिळावे अशीच शासनाची भूमिका होती त्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरू होते. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. आज … Read more

निवडणुकीचे बिगुल वाजले; या ठिकाणच्या नगरपंचायतची प्रभागनिहाय सोडत जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- देशात कोरोनाची उतरण सुरु झाली तोच निवडणुकांचे बिगुल वाजण्यास सुरुवात झाली आहे. आज देशभर बिहार निवडणुकीच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. त्यातच नगर जिल्ह्यातील मुदत संपत आलेल्या नगरपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहे. यातच अकोले नगरपंचायतच्या प्रभागनिहाय सोडत मंगळवारी (ता.10) सकाळी 11 वाजे दरम्यान अकोले पंचायत समितीच्या सभागृहात प्रातांधिकारी … Read more

दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महानगरपालिका तयार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत ग्राहकांची झुंबड उडाली आहे. फिजिकल डिस्टन्सिंगला फाटा देत उसळलेली ही गर्दी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला निमंत्रण देणारी ठरण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी केली आहे. दिवाळीमुळे नगरची बाजारपेठ फुलून गेली आहे. कोरोनाबाधितांची संख्या घटत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे नागरिकही … Read more

टँकर-दुचाकीची धडक एक तरुण ठार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- संगमनेर टँकर व दुचाकीची धडक होऊन सुकेवाडीचा अक्षय सोमनाथ गोसावी (२५) हा तरुण जागीच ठार झाला. ही घटना सोमवारी सकाळी १० वाजता रहिमपूर येथे घडली. अक्षय आश्वी येथील दुचाकी शोरूममध्ये कामाला होता. दुचाकीवरून (एमएच १७ ईजे ६५२९) तो कामावर निघाला होता. रहिमपूरच्या जोर्वे-आश्वी रस्त्यावर ओढ्याजवळील धोकादायक वळणावर त्याच्या … Read more

महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी पत्रकार जितेंद्र आढाव यांची निवड

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ ( महाराष्ट्र ) या सामाजिक संस्थेच्या महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख पदी श्रीगोंदा तालुक्यातील कोरेगव्हाण येथील पत्रकार जितेंद्र आढाव यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकार वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांच्या हस्ते अहमदनगर येथे नियुक्ती पत्र देऊन त्यांची … Read more

तहसील कार्यालयात भाजपचे जागरण गोंधळ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी भाजपा आक्रमक

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफी पासून वंचित राहिलेले शेतकरी, नियमित कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना न मिळालेली मदत व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी अश्या अनेक मागण्यांसंदर्भात भाजपा नगर तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय, नगर येथे जागरण गोंधळ आंदोलन करत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या … Read more

महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीत ‘या’ गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सणदिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वत्र दिवाळीची धामधूम सुरु आहे. यातच जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येत आहे. महावितरणच्या चुकीमुळे ऐन दिवाळीच्या सणामध्ये नेवासा तालुक्यातील अनेक गावांची बत्ती गुल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथील 220 केव्ही वीज उपकेंद्राकडे … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश! धक्कादायक माहिती समोर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील लग्नोत्सुक नवरदेवांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अहमदनगर पोलिसांनी पर्दाफाश केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. नेवासा तालुक्यामध्ये नुकतीच अशी एक घटना घडली. या घटनेतील नववधूला पळून जाताना पकडण्यात पोलिसांना यश आले व तिने सर्व हकीगत सांगितल्यानंतर लाखो रुपये घेऊन लग्न करून फसवणूक करणाऱ्या टोळीचे रॅकेट उघडकीस … Read more

नगरकरांनो लक्ष द्या! उड्डाणपुलाच्या कामामुळे शहरातील वाहतूक वळवली

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-शहरातून जाणार्‍या उड्डाणपुलाचे काम लवकर सुरू होत आहे. यासाठी महामार्गावरील वाहतूक बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. नगर शहरातून नगर-पुणे महामार्गावरून जात असलेल्या या उड्डाणपुलाचे काम सक्कर चौकापासून सुरू होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. … Read more

खड्ड्यात कार आदळून झाडावर धडकली,तरुणाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-सुपे रस्त्यावर रविवारी पहाटे दोन वाजता झालेल्या अपघातात पारनेरमधील शुभम अनिल इथापे (२२) याचा मृत्यू झाला. शुभम मोटारीने सुप्याला निघाला होता. खड्ड्यामध्ये मोटार आदळल्याने शुभमचे नियंत्रण सुटून झाडावर मोटार धडकली. मोटारीचा चक्काचूर होऊन शुभम गंभीर जखमी झाला. सहाच्या सुमारास हंगे येथील तरुणांच्या निदर्शनास हा अपघात आला. त्यांनी १०८ रुग्णवाहिकेशी … Read more

नगर परिषदेची दिवाळी; महसुलात ६० हजारांची भर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-यंदा दीपावलीचा सण १४ नोव्हेंबरला साजरा होत असल्याने राहुरीत फटाका स्टाॅल लावण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले आहे. फटाका विक्रीसाठी लागणाऱ्या स्टाॅलच्या जागेचे वाटप नुकतेच करण्यात आले. राहुरी शहर मागील वर्षीच्या तुलनेत यंदा फटाका स्टाॅलच्या माध्यमातून राहुरी नगर परिषदेला ६० हजार रुपयांचे जास्त उत्पन्न मिळाले आहे. गेल्या आठ महिन्यांपासून कोरोनाचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : स्मशानभूमीजवळ कारमध्ये आढळला मृतदेह

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे गहणारे भाऊसहेब सोमनाथ कातोरे, (वय ४५) हे त्यांच्या मालकीची इंडिका कार नं. एमएच १४ इपी ९८०५ ही घेवुन घरातून गेले ते परत आले नाही म्हणून त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता देवठाण रोडजवळील स्मशानभूमीजवळ इंडिका कारमध्येच सिटवर आडवे पडलेल्या स्थितीत भाऊसाहेब कातोरे आढळून आले. त्यांना … Read more

आईशी वाईट बोलणाऱ्याच्या डोक्यातच दगड घातला; शहरात घडलेली घटना

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- रागावर नियंत्रण नाही राहिले कि नकळत आपल्या हातून अनपेक्षित घटना घडल्या शिवाय राहत नाही. असाच काहीसा प्रकार शहराच्या अत्यंत वर्दळीच्या परिसरात घडला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. आई विषयी वाईट वक्तव्य केल्याच्या रागातून एकाने वृद्धाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना शहरातील तारकपूर बस स्थानका … Read more

कायद्यापेक्षा कोणीही मोठं नाही, कोर्ट योग्य तो निर्णय देईल: अनिल देशमुख

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-पिंपरी चिंचवड मधील एका मोटार चालकाने ट्रॅफिक पोलिस सावंत यांना फरफटत नेलेले पण त्यांनी प्रसंगवधान दाखवून आपला जीव वाचवला. याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो. अशी अजून एक घटना सोलापूरातही घडली, पण आमच्या हवालदार साहेबांनी हिमंत दाखवली याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मला आज फोन केला. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतात पाणी आणण्यासाठी गेलेल्या तरुणीवर बलात्कार

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्‍यात देवदैठणे गावच्या शिवारात एक २१ वर्षांची तरुणी विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेली असता आरोपी ‘भागवत धोंडिबा वाघमारे, रा. देवदेठण याने तरुणीला धरून तिचे तोंड दाबून तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने जबरी संभोग केला. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, सदर तरुणी शेतातील विहिरीजवळ गुरे चारीत असताना आरोपी भागवत वाघमारे … Read more