कांद्याने वाढवलं सरकारच टेन्शन ; किंमती कमी करण्यासाठी उचलली ‘ही’ पावले

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कांद्याच्या किंमती पुन्हा चढू लागला आहे. कांद्याच्या वाढत्या किंमतींबरोबरच सरकारचा ताणही वाढू लागला आहे. म्हणूनच सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कांद्याच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने आयात नियम शिथिल केले आहेत. ही सवलत सरकारने 15 डिसेंबरपर्यंत दिली आहे. या निर्णयामागील बिहार निवडणूक देखील एक कारण असल्याचे मानले जाते. आयातीची … Read more

कोरोना योद्ध्यांचे कार्य म्हणजे देशसेवाच : जिल्हाधिकारी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  कोरोना योद्धे हे कोरोना विषाणूच्या विरोधात आपल्या प्राणांची पर्वा न करता लढत आहेत. ही एकप्रकारे देशसेवा आणि देवपूजाच आहे. हीच आपली संस्कृती आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. राजेश भोसले यांनी केले. कोरोना विषाणूच्या संक्रमणापासून स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोनाचा समूळ नायनाट व्हावा व समाजातील गरीब, वंचितांना मदत करणारे स्नेहबंध … Read more

येस बँकच्या फेस्टिव सीजनमध्ये खरेदीवर बऱ्याच ऑफर ; स्मार्टफोन, टीव्ही जिंकण्याची संधी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- फेस्टिव सीजन सुरू झाला आहे. आपण या उत्सवात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. सणासुदीच्या हंगामात, सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील बँका ग्राहकांना कमी व्याजदराने खरेदी आणि कर्जावर सूट ऑफर देत आहेत. यात आता येस बँक आपल्या ग्राहकांसाठी सणाच्या हंगामातील ऑफर घेऊन आला आहे. … Read more

आतापर्यंत ५२ हजार १९८ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३९१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार १९८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.८३ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १४३३ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ८८, अकोले … Read more

मोदींची शेतकऱ्यांना आणखी 5000 रुपये देण्याची तयारी, ‘अशी’ आहे योजना

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार शेतकऱ्यांना अधिकाधिक रोख रक्कम देण्याची तयारी करत आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये मिळतात. हे पैसे 3 हप्त्यात दिले जातात. प्रत्येक हप्त्याची किंमत 2000 रुपये आहे. 5000 रुपये अधिक मिळू लागताच शेतकऱ्यांना वर्षामध्ये 17,000 रुपये मिळू लागतील. हे पैसे थेट शेतकऱ्यांना बँक खात्यावर … Read more

अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांसाठी महसूलमंत्री थोरातांची उद्धव ठाकरेंकडे ‘ही’ मागणी

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा पाऊस खूप बरसला. जूनच्या पहिल्याच आठवड्यात दमदार सुरु झालेल्या पावसाने अगदी आजपर्यंत दमदार हजेरी लावली आहे. या पावसाने खरीप पिकांवर अक्षरशः पाणी फिरवले. परंतु आता परतीचा पाऊसही बळीराजाच्या मानगुटीवर बसला आहे. शेतांना तळ्यांचे स्वरूप येऊन पिके नष्ट झाली. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी … Read more

साईबाबांच्या ‘ह्या’ उत्सवावरही कोरोनाचे सावट; होणार ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  शिर्डीचे साईमंदिर हे भक्तांसाठी अमृततुल्य गोष्ट आहे. साईंचे भक्त जगभर आहेत. या ठिकाणी दर्शनाला येणाऱ्या भक्तांची संख्या अगणित आहे. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर बंद आहे. मंदिरात पार पडणारे अनेक उत्सव हे रद्द करावे लागले.आताही श्री साईबाबांचा 102 वा पुण्यतिथी उत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करण्यात येणार … Read more

विळद बायपास येथे मालट्रक चालकासोबत झाले ‘असे’ काही

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- मालट्रक घेऊन नगर- मनमाड रोडने जाणाऱ्या चालकाला विळद बायपास येथे तिघांनी लुटण्याची घटना घडली आहे. त्यांच्याकडून जवळपास १२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेला आहे. ट्रक चालक सोनु लक्ष्मणलाल धाकड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक महती अशी : सदर फिर्यादी हे त्यांच्या ताब्यातील मालट्रक घेऊन नगर- … Read more

नात्याला काळिमा ! मामानेच केला भाचीवर अत्याचार

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे यात समाविष्ट आहेत. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशीच एक धक्कादायक नात्याला काळिमा … Read more

सात महिन्यांनी फुलला जनावरांचा बाजार पहिल्याच दिवशी झाली कोट्यवधींची उलाढाल

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या सात महिन्यापासून बंद असलेला नेवासा बाजार समितीच्या घोडेगाव येथील जनावरांचा बाजार फुलल्याचे चित्र काल शुक्रवारी पहावयास मिळाले. करोना अनलॉक नंतर सुरू झालेल्या पहिल्याच बाजारात सुमारे 3400 जनावरे विक्रीसाठी आली होती. या जनावरांच्या खरेदी-विक्रीतून अडीच कोटींच्या दरम्यान उलाढाल झाली आहे. नेवासा बाजार समिती अंतर्गत असलेला घोडेगावचा … Read more

बिहारमध्ये निवडणूक म्हणून तेथे मोफत लस मग महाराष्ट्र वाऱ्यावर सोडणार का ? महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणतात…

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- सध्या बिहारमध्ये निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अनेक आरोप प्रत्यारोप चालूच आहेत. भाजपनेही आपल्यावतीने विविध आश्वासने देण्यास सुरुवात केली आहे.परंतु यातीलच एक आश्वासनावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचे काम विरोधी पक्षाने सुरु केले आहे. भाजपने नुकतेच बिहारमध्ये  भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे.त्याच पार्श्वभूमीवर  भाजप पूर्णपणे अडकत … Read more

मंत्री तनपुरेंची ‘ती’ कृती अन घरकुल लाभार्थ्यांना झाला ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  राहुरी नगरपालिका हद्दीतील प्रधानमंत्री घरकुल योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मंजूर घरकुलांच्या लाभार्थ्यांची आर्थिक अडचण नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दूर केली आहे. ग्रीनझोनमधील लाभार्थ्यांना बांधकाम परवानगी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. शुक्रवारी राहुरी येथे घरकुलाच्या पहिल्या टप्प्यातील 233 व दुसऱ्या टप्प्यातील 460 लाभार्थ्यांना केंद्र व राज्य सरकारचे 6 … Read more

कोरोनाचा परिणाम रावण दहनावरही ; संगमनेरमधील सोहळा रद्द

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  यंदा कोरोनाने सर्वत्र धुमाकूळ घालत अनेकांना घरात बसविले. त्याचे सावट अनेक उत्सवांवर पडले. पंढरीची वारी असो कि गणेशोत्सव असो हे सर्व सध्या पद्धतीने पार पडले. आता याचा परिणाम यंदाच्या दसरा सणावरही होणार आहे. संगमनेर मध्ये मालपाणी उद्योग समुहाच्या अकोले रस्त्यावरील कारखाना परिसरात असलेल्या शमी वृक्षाचे पूजन करण्यासाठी संगमनेरकर विजयादशमीलामोठी … Read more

‘खडसेंच्या जाण्याने सिंचन घोटाळ्याचा साक्षीदार फुटला’

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सिंचन घोटाळ्यातील प्रमुख साक्षीदार असल्याने त्यांना राष्ट्रवादीने फोडले, असा दावा भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे, त्या पार्श्वभूमीवर शिंदे कर्जत येथे पत्रकारांशी बोलत होते. ‘खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर कोणतीही भरतीओहटी येणार नाही,’ असा दावाही त्यांनी … Read more

रोहित पवारांनी कोंबड्या, मासे विकले ; प्रा. राम शिंदेंचा ‘हा’ गंभीर आरोप

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  २०१९ ची विधानसभा सर्वानीच अनुभवली. यात अनेक अशक्य गोष्टी शक्य झाल्या. यात अनेक ठिकाणी मंत्री असलेले नेतेही पराभूत झाले. ‘कर्जत जामखेड मतदार संघातही तेच झाले. रोहित पवार यांनी तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांचा पराभव केला. या निकालाला एक वर्ष पूर्ण होत असताना प्रा. शिंदे यांनी कर्जतमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत … Read more

अत्यंत महत्वाची बातमी : व्यापाऱ्यांवर कांदा साठ्याची मर्यादा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- कांद्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे केंद्र सरकारने शुक्रवारी कांद्याचा साठा करण्यावर मर्यादा घातली. आता ठोक व्यापारी कमाल २५ टन, किरकोळ व्यापारी कमाल दोन टन कांदा साठवू शकतील. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानुसार, कांद्याची साठेबाजी रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. ही साठा मर्यादा ३१ डिसेंबरपर्यंत राहील. प्राइस वॉटर … Read more

अहमदनगर शिवसेनेतील वादावर अखेर पडदा

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  सभासद नोंदणी कार्यक्रमात खुर्च्यांची फेकाफेक होऊन आनंद लहामगे व रवी वाकळे यांच्यात वाद झाला होता. या वादावर भाऊ कोरगावकर व स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने पडदा पडला. हाॅटेल यश ग्रँड येथे शुक्रवारी शिवसेना, वंजारी समाज, जयभगवान महासंघ व दैवत फाउंडेशनच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांंची बैठक झाली. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी वाकळे यांनी शिवसेना जिल्हा … Read more

मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला : जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :-  अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देऊन त्यांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला. “मी तुमच्या पाठीशी आहे ,काळजी करू नका” असा जो शब्द व विश्वास दिला होता तो मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पॅकेज देऊन खरा करून दाखवला, अशी प्रतिक्रिया मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख … Read more