ना.थोरात यांच्या संदर्भातील वक्तव्य राष्ट्रवादीच्या खोसे यांनी मागे घ्यावे !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- पार्किंगमधील वादातील किरण काळे यांचे वैयक्तिक मत स्पष्ट असतांना या वादात राष्ट्रवादीच्या अभिजित खोसे यांनी काँग्रेस पक्षाचे नेते प्रदेशाध्यक्ष ना.बाळासाहेब थोरात यांच्यावर नाहक आरोप करुन काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या असून, श्री.खोसे यांनी ना.थोरात यांच्या संदर्भातील ती भावना दुखावणारी वक्तव्य मागे घ्यावी व आघाडीचा धर्म पाहावा, असे आवाहन अहमदनगर शहर … Read more

गारूड्यांचा खेळ करणाऱ्यांचे आ. रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर ‘असे’ अनोखे आंदोलन

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- आज (सोमवार) १९ ऑक्टोबर रोजी मदारी समाजाच्या वतीने वसाहतीचे बांधकाम सुरु झाले नाही याच्या निषेधार्थ सकाळी साडे अकरा वाजता आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयासमोर गारुड्याचा खेळ सादर करत आंदोलन केले. तालुक्यातील खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. … Read more

माजी कृषिमंत्री कडाडले; मुख्यमंत्री ठाकरे यांनी ‘ती’ वचनपूती करावी

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कपाशी,तूर, कांद्यासह इतर पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत. मागील वर्षी परभणी येथे जाऊन शिवसेना नेते उध्दव ठाकरे यांनी पंचानामे न करता सरसकट हेक्टरी कोरडवाहूला २५ हजार, बागायती शेतीला ५० हजार, तर फळबागेला एक लाख रुपये मदत करा, असे ठणकावून सांगत … Read more

अवकाळी पावसाच्या नुकसानीची तात्काळ मदत द्या – आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आज या नुकसानीचे पेडगाव भागात आमदार बबनराव पाचपुते यांनी अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली. व या सर्व नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आमदार पाचपुते यांनी दिले.आज सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार व इतर अधिकाऱ्यांच्या … Read more

अद्याप वीजही न पोहोचलेल्या ‘त्या’ आदिवासी गावात ‘हे’ मंत्री पोहोचले दुचाकीवर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  महाराष्ट्रातील अजूनही अनेक जिल्ह्यांमधील काही आदिवसई भाग अतिशय दुर्गम आहेत. त्या ठिकाणी सोयोसुविधा पोहोचलेल्या नाहीत. असेच एक अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी-संगमनेर सीमेवर दूरवर जंगलात वसलेल्या बोंबलदरा या आदिवासी पाड्याची तीच अवस्था. या पाड्यावर अद्याप वीज पोहोचली नसल्याने त्याठिकाणी ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. आणि त्यासाठी उद्घाटन करण्यासाठी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे … Read more

अहमदनगर महापालिकेचे बजेट ‘इतक्या’ कोटीचे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- प्रशासनाने आज महासभेत महापौर बाबासाहेब वाकळे यांना महापालिकेचे बजेट सादर केले . 2020-21 साठी जवळपास 715 कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे. यात 294 कोटीचे महसुली उत्पन्न आणि 380 कोटी भांडवली जमा, दुबेरजीचे 37 कोटीसह सव्वातीन कोटी शिलकीचे हे बजेट आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आज महापौर बाबासाहेब वाकळे यांना … Read more

केवळ 799 रुपये हप्त्यावर घेऊन जा टाटाची कार; जाणून घ्या…

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- या सणाच्या हंगामात आपण कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर टाटा मोटर्सची योजना आपल्यासाठी उपयोगी ठरू शकते. टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकेबरोबर करार केला आहे.या अंतर्गत टाटा मोटर्सने 2 फायनान्स योजना आणल्या आहेत. एका योजनेंतर्गत, योजनेंतर्गत 799 रुपयांच्या सुरुवातीच्या हप्त्यावर 1 लाख रुपये कर्ज दिले जात आहे, तेथे लोकांना … Read more

केंद्राने राज्याची देणी वेळेत दिली, तरआम्हाला केंद्राकडे मदत मागावी लागणार नाही: उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- राज्याला केंद्राकडे हात पसरण्याची वेळ आली आहे असे विरोधक म्हणतात. मात्र, केंद्राने राज्याचे देणे वेळेवर दिले तर आम्हाला केंद्राकडे मागण्याची वेळच येणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येथे केले. राज्य सरकार कुणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले. राज्यभरात झालेल्या पावसानंतर अनेक ठिकाणी मोठे नुकसान … Read more

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना मोठे गिफ्ट ; आता देणार ‘हे’

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या बळकट करण्यासाठी आणखी एक मोठे गिफ्ट आणले आहे. फळे आणि भाजीपाला एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी नेण्यासाठी शेतकऱ्यांना रेल्वेला केवळ 50 टक्के भाडे द्यावे लागणार आहे. उर्वरित 50 टक्के भाडे सरकार देईल. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या यादीनुसार भाजीपाला आणि फळांना भाड्यात सूट देण्यात आली आहे. भाजीपाला … Read more

‘ह्या’ ठिकाणी नोकरीची संधी ; मिळेल 1.05 लाख रुपये पगार

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  राज्यात कोरोनामुळे आर्थिक स्थिती ढासळली आहे. अनेक ठिकाणी अनेक लोकांना आपली नोकरी गमवावी लागली. परंतु या परिस्थितीमध्ये नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (आयओसीएल) यांनी पानिपत रिफायनरीज विभागात जूनियर इंजीनियरिंग असिस्टेंट (JEA) / जूनियर टेक्निकल असिस्टेंट व जूनियर क्वालिटी कंट्रोल एनालिस्ट या पदावर वॅकन्सी काढल्या आहेत. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.९० टक्के

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ३५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार ३७७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९४.९० टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या १८९८ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा ७१, … Read more

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर : सोन्याचे दर झाले खूप कमी ; जाणून घ्या दर

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- भारतातील सोन्या-चांदीच्या भावात आजही घट दिसून आली आहे. आजही मल्टीपल कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर वायदा सोन्या-चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. एमसीएक्सवर डिसेंबरमध्ये डिलीव्हरीसाठीचे सोन्याचे भाव आज 0.22% किंवा 110 रुपयांच्या तुलनेत प्रति 10 ग्रॅम 50,437 रुपयांवर होते. त्याचबरोबर चांदी 0.67% म्हणजेच 416 रुपयांनी घसरून 61,260 रुपये प्रतिकिलोवर व्यापार करीत … Read more

जिल्ह्यातील ‘ह्या’ बाजार समितीत कांद्याला ५ ते ६ हजार रुपये भाव

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यावर रविवारी एक नंबर कांद्याला ५ ते ६ हजार रुपये क्विंटलचा बाजारभाव मिळाला. मोढ्यांवर ४ हजार २३६ गोणी कांद्याची निच्चांकी आवक झाली होती. मोंढ्यावर दोन नंबर कांद्याला ३ हजार ते ४९९५ रूपये, तीन नंबर कांद्याला ५०० ते २९९५ रुपये, तर गोल्टी कांद्याला ४ हजार … Read more

ऐन सणासुदीच्या काळातच पाच दिवसांपासून पाणी नाही !

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- गेल्या चार-पाच दिवसांपासून ऐन सणासुदीच्या काळातच छावणी परिषद प्रशासनाकडून भिंगार गावात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. परिणामी नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. भिंगारला पाणीपुरवठा करणारे मुळाधरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.जास्तीचे पाणी नदी पात्रात सोडले असले तरी पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीप्रश्नी आजी, माजी खासदार,आमदार यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा … Read more

एकरी ५० हजारांची भरपाई द्या : डॉ. अजित नवले

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-परतीच्या पावसाने कापणी करून ठेवलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भ, मराठवाड्यात कापूस, पश्चिम महाराष्ट्रात ऊस व द्राक्षपिकाचे, तर कोकणात भाताचे नुकसान झाले. खरीप हंगामातील ३० टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. तातडीने पंचनामे करून एकरी किमान ५० हजार रुपये भरपाई देऊन शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा. केंद्र सरकारने तातडीने पथक पाठवून … Read more

उपवासाची भगर खाल्ल्याने १०० जणांना विषबाधा

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- उपवासाची भगर खाल्ल्याने सुमारे शंभर गावकऱ्यांना विषबाधा झाली. राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथे शनिवारी रात्री हा प्रकार घडला. त्रास जाणवू लागल्यानंतर उपचार घेण्यासाठी चांगलीच धावपळ उडाली. नवरात्रामुळे उपवासाच्या पदार्थांची खरेदी वाढली आहे. म्हैसगाव पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी स्थानिक दुकानदाराकडून भगर खरेदी केली होती. शनिवारी रात्री भगर खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या व जुलाबाचा त्रास … Read more

के. के. रेंज बाबत आमदार निलेश लंके यांचा गौप्यस्फोट

अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :- के. के. रेंजसाठी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर, नगर व राहुरी तालुक्यातील 23 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनींचे हस्तांतर करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मान्यता दिली होती. 18 मे 2017 मध्ये मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली होती, असा गौप्यस्फौट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी केला आहे. फडणवीस व … Read more

मंदिरे उघडल्याने गुन्हा दाखल झाला तरी त्यास तोंड देवू

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-शारदीय नवरात्रौत्सवा निमित्त गौरी घुमट येथील गौरीशंकर मित्रमंडळाच्या वतीने तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विधिवत अभिषेक करुन मंडळाचे संस्थापक वसंत लोढा व माजी नगराध्यक्षा लता लोढा यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. मंदिरे उघडल्याने जर गुन्हा दाखल झाला तरी न घाबरता त्यास तोंड देवू, पण हे मंदिर बंद करणार नाही, अस ईशारा घटस्थापनेनिमित्त … Read more