अहमदनगर ब्रेकिंग : विनापरवाना शिवरायांचा पुतळा बसवल्याने तणाव

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अज्ञात व्यक्तीने रात्रीतून उभा केला. याबाबतची माहिती तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनील कटके यांना मिळाली असता सदर घटनेची माहिती वरिष्ठांना देऊन ताबडतोब घटनास्थळी फौज फाट्यासह दाखल झाले. सदरच्या घटनेबाबत बाबतीत स्थानिक ग्रामस्थांना बोलावून विचारपूस केली असता, कोणीही पुढे येऊन माहिती दिली … Read more

वाळूतस्करांकडून नायब तहसीलदारांना धक्काबुक्की; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात वाळू तस्करीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच दिवसेंदिवस या वाळू तस्करांची मुजोरी देखील वाढू लागली आहे. यातच या तस्करांवर कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना मारहाण होण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. नुकतीच पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारात वाळूवाहतूक करणारा ट्रक नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी पकडला. तहसील कार्यालयात ट्रक घेऊन … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 52 हजारांचा आकडा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार २३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९३.८९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३०६ ने वाढ … Read more

तेल घेवून जाणार्‍या टँकरला टेम्पोने दिली धडक…. हजारो लिटर तेल गेले वाया

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत लॉकडाऊन मध्ये शिथिलता देण्यात आली आहे. यामुळे सर्वसेवा पुर्वव्रत झाल्या आहेत. तसेच वाहतूक व्यवस्था देखील सुरु झाली आहे. यातच महामार्गावर अपघाताच्या घटनां देखील घडू लागल्या आहेत. यातच संगमेनर तालुक्यात एका महामार्गावर तेल घेऊन जाणाऱ्या टँकरला टेम्पोने धडक दिल्याची घटना आज घडली आहे. याबाबत महामार्ग पोलिसांनी दिलेली … Read more

बनावट ओळखपत्र दाखवून दोन तरुणांचा लष्करी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर येथील लष्कराच्या हद्दीत गुरुवारी (दि.१६) बनावट ओळखपत्र दाखवून आत जाण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दरम्यान असा प्रकार करण्याऱ्या दोन भामट्यांना भिंगार कॅम्प पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तुषार ज्ञानेश्वर पाटील व सोपान महारु पाटील (रा.कापूरणी, ता. जि. धुळे) अशी पकडण्यात आलेल्याची नावे आहेत. दरम्यान … Read more

‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट जिल्ह्यात सर्वाधिक

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे संक्रमण प्रमाण कमी झाले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्यामध्ये देखील चांगलीच घट झाली आहे तर दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. यातच जिल्ह्यातील संगमेनर तालुका हा सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या असलेला तालुका म्हणून नावाजला होता. अशा या तालुक्याने स्वतःवरील ठपका पुसत आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने … Read more

जिल्हा वाचनालय या नवीन वेळेमध्ये राहणार सुरु.. जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मिशन बिगिन अंतर्गत राज्यात नवीन नियमवाली जारी करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील ग्रंथालये, वाचनालये सुरु करण्यात आले आहे. यातच शहरातील वाचनालय देखील सुरु करण्यात आले आहे. दरम्यान सरकारी आदेशानुसार अहमदनगर जिल्हा वाचनालय सकाळी 9.30 ते 5 या वेळेत वाचकांसाठी खुले राहील, अशी माहिती वाचनालयाचे अध्यक्ष प्रा.शिरिष मोडक व प्रमुख … Read more

मोठी बातमी ! झेडपीच्या माजी सदस्याविरोधात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव शंकर दराडे (रा.समशेरपूर) यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. दराडे यांनी नामदेव आनंद डामसे (रा.शेणीत) यांनी मद्यपान करून शिवीगाळ केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसरीकडे झेडपी सदस्य सुषमा बाजीराव दराडे यांनी … Read more

महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार… जाणून घ्या याबाबतची सत्यता

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’ अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा व्हिडीओ प्लॅटफॉर्म यूट्यूबवर या दिवसात जोरदार व्हायरल होत आहे. याबाबतची पडताळणी करण्यात आली असून या मेसेजबाबतची सत्यता जाणून घेऊ .. केंद्र सरकारकडून सर्व महिलांच्या खात्यामध्ये ‘पंतप्रधान नारी शक्ती … Read more

बळीराजा संकटात; महसूल मंत्र्यांनी पतंप्रधानांना केली हि विनंती

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाच्या वर्षी राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्ववभूमीवर महसूलमंत्र्यांनी केंद्राकडे मदतीची अपेक्षा केली आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकंही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे असून … Read more

मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये झाले मोठे नुकसान

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसाने नगरकरांना अक्षरश झोडपून काढले आहे. यातच आता गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. यातच जिल्ह्यात सुरु असलेल्या अतिवृष्टी, आणि सोसाट्याचा वारा यामुळे दाणादाण उडवली. नगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात विशेष करून दक्षिण नगर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये … Read more

खुशखबर! सोनं चक्क साडेपाच हजार रुपयांनी स्वस्त झाले…

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावामध्ये चांगलाच चढउतार पाहायला मिळतो आहे. वेगाने भाववाढ होणाऱ्या सोन्याला काहीसा ब्रेक लागला आहे. आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणेच देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर सातत्याने कमी होत आहेत. शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या विक्रीवर दबाव पाहायला मिळाला. भारतात आज पुन्हा एकदा वायदा भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचं … Read more

जनावरे चोरणाऱ्या चोरट्यांकडून गोळीबार; या ठिकाणी घडला धक्कादायक प्रकार

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात वाढती गुन्हेगारी व कुचकामी प्रशासन यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. लुटमारी, चोरी, मारहाण आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच जिल्ह्यातील एका ठिकाणी जनावरांची चोरी करणाऱ्या चोरटयांनी गोळीबार करत परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. शेळ्या चोरुन चार चाकी वाहनातून पळ काढणाऱ्या चोरट्यांच्या वाहनाला अपघात घडला. या … Read more

विवाहितेला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसात जिल्ह्यात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आधीच देशात महिला अत्याचाराच्या घटनांवरून वातावरण तापलेले आहे, यामध्ये अशा घटनांमुळे संतापाची लाट उसळण्याची शक्यता आहे. दरम्यान महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या … Read more

अल्पवयीन मुलीचा विवाह केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :-  मुलामुलींचे लग्नासाठी वयोमर्यदा ठरविण्यात आलेलं आहे. या नियमनाचे उल्लंघन केल्यावर दंडात्मक कारवाई केली जाते, याचे ज्ञान असूनही एका अल्पवयीन मुलीचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथील सोळा वर्षीय एक मुलगी आपल्या बहिणीकडे लोणीव्यंकनाथ येथे राहत होती. काही … Read more

मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील नदीला आला पूर

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- यंदाची वर्षी पावसाने जिल्ह्यात चांगली हजेरी लावली आहे. काही काळ विश्रांती घेतल्यानंतर आता परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र याच परतीच्या पावसाने जिल्ह्यातील अनेक नद्यांना, नाल्यांना पूर आला आहे. नुकतीच श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर जलाशयाच्या लाभक्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून पावस कोसळला आहे. पाण्याचा साठा वाढल्याने जलाशयाच्या सांडव्यातून हंगा नदीत पाण्याचा … Read more

या ठिकाणचा पाणी पुरवठा झाला विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात यंदाच्या वर्षी पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील धरणे, नद्या, ओढे, बंधारे हे ओव्हरफ्लो झाले आहे. पाण्याची मुबलकता असल्याने शहरातील काही ठिकाणी पाणी विस्कळीत झाल्याच्या घटना घडत आहे. नुकतीच भिंगार शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय. आठवड्यातून ४-५ दिवसानंतर पाणी सोडले जाते. भिंगार शहराला … Read more

शेतकऱ्यांच्या या महत्वाच्या मागणीसाठी धावली भाजपा; आंदोलनाचा घेतला पवित्रा

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात पार्टीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोडपले आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या काळात मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. यातच आता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते धावले आहे. नगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात यावा … Read more