मुलींसाठी शासनाच्या असणाऱ्या ‘ह्या’ १० योजना जाणून घ्या; मुलींना मिळेल खूप सारी आर्थिक मदत

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  १) बेटी बचाओ बेटी पढ़ाओ :- बेटी बचाओ, बेटी पढाओ ही भारत सरकारची एक मोहीम आहे, ज्याचा उद्देश भारतातील मुलींबाबत जागरूकता निर्माण करणे आणि त्यांच्यासाठी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना सुधारणे आहे. सुरुवातीस 100 कोटींच्या निधीतून ही योजना सुरू झाली. हे प्रामुख्याने उत्तर प्रदेश, हरियाणा, उत्तराखंड, पंजाब, बिहार आणि दिल्ली … Read more

कोरोनाला हरविण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  कोरोनावर मात करण्यासाठी काय खबरदारी घ्यावी, याबाबत विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जावून याबाबत माहिती देण्यात येत आहे. कोरोनाला हरविण्यासाठी मास्कचा वापर, हात स्वच्छ धुणे आणि शारीरिक अंतर राखणे या त्रिसूत्रीचा वापर करून आपल्या जीवनशैलीत बदल करणे आता आवश्यक आहे, … Read more

स्टार प्रवाहवरील ‘बंदे मे है दम’ या मुलाखत मालिकेला मिळतोय उदंड प्रतिसाद; वाचा, प्रेरणादायी मालिकेमागील प्रेरणादायी गोष्ट

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोणताही संघर्ष हा कधीच सहज आणि सोपा नसतो. प्रत्येकाच्या संघर्षामागे एक मोठी गोष्ट असते. अशाच काही संघर्षाच्या आणि शून्यातून आपले एक नवीन विश्व तयार केलेल्या खास व्यक्तींच्या गोष्टी त्यांच्याचकडून ऐकण्याचा योग म्हणजे ब्रॅण्ड मेकर – किरण गवते आणि जे.पी मिडिया हब प्रस्तूत बंदे मे है दम हा कार्यक्रम आहे. … Read more

होम लोन घेणाऱ्यांसाठी खुशखबर ; ‘ह्या’ ५ बँकांत मिळणार स्वस्त कर्ज

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  आता काही दिवसांत नवरात्रोत्सवाची सुरुवात होऊन उत्सवाचा हंगाम सुरू होईल. ग्राहकांनी त्यांच्या गरजेनुसार खरेदी सूची तयार करण्यासदेखील सुरुवात केली आहे. या उत्सवाच्या हंगामात कार, घर किंवा घरातील उपकरणे खरेदी केली जातील. उत्सवाच्या हंगामात बहुतेक बिल्डर्स घर विकताना खूप आकर्षक ऑफर देतात. दुसरीकडे रेपो दर कमी असल्याने गृहकर्जही स्वस्त आहेत. … Read more

आज ७७९ रुग्णांना मिळाला डिस्चार्ज आतापर्यंत ४५ हजार ३८२ रुग्ण बरे होऊन परतले घरी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ७७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४५ हजार ३८२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३५ टक्के इतके झाले आहे. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या ३५२५ इतकी आहे. दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा १४०, … Read more

रोहित पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांवरच उलटला ‘तो’ गेम …

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-  जामखेड राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांना ट्विट करत प्रतिउत्तर दिल आहे. गोपीचंद पडळकर यांनी आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून मिरजगाव येथील रस्त्यांची दुरवस्था वरून रोहित पवार यांच्यावर टीका केली होती यालाच उत्तर देताना पवार यांनी म्हणाले की माझे मित्र गोपीचंद पडळकर जी … Read more

सोन्या चांदीच्या किमती पुन्हा वाढल्या; जाणून घ्या दर आणि बरेच काही…

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. सोन्या – चांदीच्या दराने सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले होते. अगदी गगनाला जाऊन हे भाव भिडले होते. परंतु मंगळवार पाठोपाठ बुधवारीही या दरामध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अधिकमासात सोन्यात घसरण होत असल्याचे उलट चित्र प्रथमच पाहायला मिळाले आहे. गेल्या एक महिन्यापासून सोन्याचांदीच्या दरात घसरण … Read more

अहमदनगर शहरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :-महापालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील देहरे येथील भुयारी मार्गाच्या कामासाठी नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी जोडण्याच्या कामामुळे पाण्याचा उपसा बंद होता. शुक्रवारी दुपारी काम पूर्ण झाले. तथापि, महावितरणकडून १० आॅक्टोबरला दुरूस्तीचे काम केले जाणार असल्याने पुढील तीन ते चार दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. दुरूस्तीच्या कारणास्तव बंद झालेला पाणी उपसा पुन्हा … Read more

महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल !

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- एकनाथ खडसे सक्षम विरोधी पक्षनेते होते. भाजप-सेनेच्या सरकारमध्ये त्यांचे मोठे योगदान होते. महाविकास आघाडीत त्यांना घेण्याचा प्रयत्न चालू आहे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी सांगितले. आरोग्य अभियानाच्या बैठकीसाठी ते येथे आले होते. लोकशाहीचा चौथा खांब पत्रकारिता आहे. मात्र, जनभावना निर्माण करून लोकशाहीला घातक काम या क्षेत्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन शिक्षकांपाठोपाठ ‘त्या’ चहा विक्रेत्यानेही केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- कोल्हार येथील चहा विक्रेते भाऊसाहेब नाथाजी तांदळे (वय ७५) यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या दुकानातील लोखंडी खांबास गळफास घेऊन आत्महत्या केली. एकामागोमाग ही तिसरी आत्महत्या असल्याने खळबळ उडाली. बेलापूर रोडलगत वास्तव्यास असलेले आणि अनेक वर्षांपासून चहाचे दुकान चालवणारे तांदळे सकाळी घरी चहा घेऊन दुकानात आले. दुकानातील लोखंडी गजास लटकून त्यांनी … Read more

पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची बदली

अहमदनगर Live24 टीम,10 ऑक्टोबर 2020 :- नगरमधील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस उपअधीक्षक प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे पोलिस उपअधीक्षक पदी बदली झाली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने राज्यातील पोलीस उपअधीक्षक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात नगर जिल्ह्यातील प्रांजली सोनावणे यांची नंदूरबार येथे बदली झाली आहे. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | … Read more

आरबीआयच्या घोषणेचा ईएमआय आणि एफडी रिटर्नवर ‘असा’ परिणाम होईल

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) शुक्रवारी सलग दुसर्‍या वेळी पॉलिसी दरात बदल केला नाही. त्याने आपली भूमिका नरम ठेवली आहे. ऑगस्टमध्येही आरबीआयने पॉलिसीचे दर बदलले नाहीत. मार्च आणि मे 2020 मध्ये रेपो दर सलग दोनदा कमी करण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेनंतर रेपो दर 4 टक्के तर रिव्हर्स रेपो … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील सविस्तर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज 745 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 44 हजार 603 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 89.78 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत 511 ने वाढ … Read more

रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना सर्व बॅंकांमध्ये पीक कर्ज उपलब्ध- अग्रणी बॅंक व्यवस्थापक

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- अहमदनगर दि.9: जिल्हयात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे. हया पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम समाधानकारक असेल त्या नुसार सर्व शेतकरी बांधवांना येणा-या रब्बी हंगामासाठी पीक कर्ज सर्व बँका मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर ( सेंट्रल बँक ऑफ इंडिया, अहमदनगर) यांनी केले आहे. शेतकर्‍यांनी त्याचा लाभ घ्यावा, … Read more

मोठी बातमी : एमपीएससी परीक्षा पुढे ढककली, वाचा काय म्हणाले मुख्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा यासाठी परीक्षा पुढे ढकलल्याचे सरकारकडून सांगितले आहे. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ११ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेली एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या संदर्भात बोलावण्यात आलेल्या … Read more

बाजार समितीतील अनधिकृत गाळे पाडा

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेचा आयुक्तांच्या दालनात ठिय्या अहमदनगर:माजी खासदार दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बाजार समिती सत्ताधार्‍यांनी अनधिकृतपणे बांधलेले २९ गाळे पाडण्याच्या मागणीसाठी नगर तालुका महाविकास आघाडी व नगर शहर शिवसेनेच्यावतीने आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. अनधिकृत गाळे पाडण्याबाबतचे निवेदन आयुक्त श्रीकांत … Read more

चोरटयांनी गाडीची काच फोडून पळविले 36 लाखांचे सोने

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवीन पोलीस अधीक्षकांनी पदभार स्वीकारला आहे. आता या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालणे हे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. दरम्यान राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील सराफ व्यावसायिकाच्या कारची काच फोडून सुमारे 36 लाखांचे सोन्या चांदी चोरीस गेल्याची घटना घडली आहे. ही घटना … Read more

कोरोनाचे ग्रहण! या देवीचा नवरात्रोत्साव राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम,9 ऑक्टोबर 2020 :- गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या कोरोना महामारीमुळे अनेक सणउत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरे केले आहे. तसेच शासनाने देखील सण उत्सवाच्या पार्शवभूमीवर याबाबतच आवाहन केले आहे. काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या देवीच्या नवरात्रीच्या सणवार देखील कोरोनाचे ग्रहण कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नवरात्रीचा उत्सव रद्द करण्यात आला आहे. जिल्ह्यातील कोल्हार येथील … Read more