खळबळजनक ! काँग्रेस-भाजपच्या महिला नेत्याच चालवित होत्या सेक्स रॅकेट; अनेकांना अटक

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- सध्या सर्वत्र कोरोनाचे थैमान आहे. अनेक शहरांत परिस्थिती बिकट आहे. परंतु या महामारीच्या संकटात अनेक गुन्हेगारी कृत्ये घडल्याचे समोर आले आहे. महिलांवरील अत्याचाराविरोधात अनेक कायदे, प्रबोधन होऊनही महिलांवरील अत्याचार कमी होत नसल्याचे वास्तव चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता जे प्रकरण समोर आले आहे त्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. … Read more

राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- धनगर सारा एक’ असा नारा देत आज कोल्हापूरात धनगर समाजाची गोलमेज परिषद पार पडली. राज्य सरकारला नमवून आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. आजपर्यंत अनेक राज्यकर्त्यांनी ७० वर्षे धनगर समाजाचा उपयोग करून घेतला. मात्र आता हे होऊ देणार नाही. असं मत माजी आमदार राम शिंदे यांनी परिषदेनंतर आलेल्या पत्रकार बैठकीत … Read more

पुण्यामध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाचा निर्घुण खून

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांचा मुलगा अाणि शिवसेना विभागप्रमुख दीपक मारटकर (३२, रा. गवळी अळी, पुणे) यांचा शुक्रवारी मध्यरात्री बुधवार पेठेत धारदार शस्त्राने एका टाेळक्याने सपासप वार करून खून केल्याची घटना घडली. राजकीय पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असून याप्रकरणी फरासखाना पाेलिस ठाण्यात सात अाराेपींसह एका महिलेवर खुनाचा … Read more

आरक्षण हीच बहिणीला भाऊबीजेची ओवाळणी ठरेल

अहमदनगर Live24 टीम,3 ऑक्टोबर 2020 :- आरक्षणासाठी मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाने महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सुदर्शन निवासस्थानी शुक्रवारी घोषणाबाजी देत ठिय्या आंदोलन केले. विशेष म्हणजे थोरातांची बहीण नगराध्यक्ष दुर्गा तांबे व त्यांचे पती आमदार डॉ. सुधीर तांबेही या आंदोलनात होते. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक बैठकीत ठराव होऊन आरक्षण मिळण्यासाठी गांधी जयंतीचे औचित्य … Read more

श्रीगोंद्याच्या तहसीलदारपदी प्रदीपकुमार पवार यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :- अखेर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुका तहसीलदारपदी प्रदीपकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मागील एक ते दीड महिन्यापूर्वी तहसीलदार महिंद्र माळी यांची बदली झाली असून, श्रीगोंदा तहसीलदारपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत सुरू असलेल्या चर्चाना आता पूर्णविराम मिळाला आहे. तत्कालीन तहसीलदार महिंद्र माळी यांची बदली झाल्यानंतर जवळपास दीड महिना प्रभारी तहसीलदार सौ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला ४५ हजारांचा आकाडा !

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ७५५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४० हजार ३१७ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.५४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५९७ ने वाढ … Read more

कोरोना चाचणीविनाच कैदी जेलमध्ये दाखल; रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  गेल्या काही दिवसांपूर्वी राहुरी कारागृहातील कैदी, पोलीस कर्मचारी यांना कोरोनाची लागण झाली होती. या घटनेस पोलीस प्रशासनाचा निष्काळजीपणा भोवला होता. एवढे होऊनही आता त्याच घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. आरोपीची अटकपूर्व वैद्यकीय चाचणीबरोबर कोरोना तपासणी करण्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ठ आदेश दिला होता. मात्र पोलीस प्रशासनाने वरिष्ठांचा आदेश धुडकावत पुन्हा एकदा राहुरी … Read more

शिवसेना शहरप्रमुखांच्या बदलीसाठी ते जाणार थेट मुख्यमंत्र्यांच्या दारी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  दिवंगत नेते अनिल भैय्यांच्या जाण्याने पोरकी झालेली शहरातील शिवसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे. नुकतीच झालेल्या स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून उलट सुलट चर्चा होते आहे. आता नगरसेवक गणेश कवडे यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख यांच्याकडून सेनेच्या नगरसेवकांवर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे. तसेच नगरसेवक व पदाधिकारी मुख्यमंत्री उद्धव … Read more

कोरोना लसीबाबत अखेर शरद पवारांनीच केला खुलासा..

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  सध्या राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्युटला भेट दिली. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी सीरम इन्स्टिट्यूटला दिलेली ही दुसरी भेट आहे. दरम्यान अनेकांनी शरद पवारांवर कोरोनाची लस घेतल्याची चर्चा सुरू होती. शरद पवार बिनधास्त फिरतात यावरुन त्यांनी लस घेतल्याची चर्चा … Read more

कोरोनामुळे ‘बापूंना’ विसरले सरकारी कर्मचारी

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  इंग्रजांच्या काठ्या खाल्या, जेलमध्ये गेले मात्र कोणत्याही संकटाला न घाबरता देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधींचा आज जन्मदिवस आहे. नियमांचे पालन करत देशभर बापूंची जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. मात्र जिल्ह्यातील अकोले मध्ये सरकारी कर्मचारी मात्र घरी निवांत बसून सुट्टीचा आनंद घेताना दिसले. कोरोनामुळे सरकारी कार्यालयात … Read more

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक; युपी सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  उत्तरप्रदेश मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर देशामध्ये संतापाची लाट उसळली आहे. मयत पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघालेल्या राहुल गांधींना पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली. याच निषेध म्हणून देशभर ठिकठिकाणी आंदोलने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पाथर्डी येथे येथे वसंतराव नाईक चौकात काँग्रेस पक्षाच्या वतीने उत्तर प्रदेश सरकारचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात … Read more

त्याने जुन्या दुचाकीची केली चारचाकी… पहा कोठे घडली घटना

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  टाळेबंदीच्या काळात नेवासा तालुक्यातील निंभारी येथील पवार बंधूंनी जुन्या दुचाकीची चक्क चारचाकी गाडी बनवून एक वेगळाच विक्रम केला आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी पवार बंधूंच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आहे. दरम्यान याबाबाबत सविस्तर माहिती अशी कि, निंभारी येथील स्थापत्य अभियंता शिक्षण झालेल्या मात्र … Read more

शेतकर्‍यांना आणि कामगारांना अडचणीत आणणार्‍या धोरणाचा निषेध

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  भारतीय जनता पक्षाच्या केंद्र सरकारने जे नवे कृषि धोरण देशावर लादून शेतकर्‍यांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे. त्याचप्रमाणे नवीन कामगार धोरणातही कामगारांच्या हक्कांची पायमल्ली करुन त्यांचे हक्का हिरावून घेण्यात आले आहे. त्यांच्या या धोरणाला प्रखर विरोध करुन अहमदनगर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारचा निषेध केला आहे. शहराध्यक्ष बाळासाहेब … Read more

संदिप मिटके यांचा महाराष्ट्राची शान पुरस्कार देऊन गौरव”

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  कोराना आजार नियंत्रीत ठेवण्यकरीता महाराष्ट्र राज्यात संचारबंदी लागु करण्यात आल्यापासुन एक सामाजिक बांधिलकी व आपण समाजाचे एक देणे लागतो या भावनेतुन पोलीस दलात काम करणारे एक समाजसेवक व कर्तव्यदक्ष अधिकारी श्री.संदिप मिटके, DYSP अहमदनगर शहर विभाग यांनी कोरोना या संसर्ग जन्य आजाराचा अहमदनगर शहरात प्रादुर्भाव वाढत असतांना अहमदनगर शहर … Read more

काँग्रेस हा देशाला झालेला कँन्सर आहे

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   पहीले राष्ट्र मग पक्ष असा आमचा अजेंडा आहे. काँग्रेस हा देशाला झालेला कँन्सर आहे तो समुळ नष्ट झाला पाहीजे. राज्यातील सरकारचे अस्तीत्व अल्पकाळाचे आहे. भाजपामुळे शिवसेना वाढली आहे , सेनेमुळे भाजपाचे अस्तीव वाढलेले नाही. राज्यातील सर्व पक्षाने भारतीय जनता पक्षाला फसविले मात्र जनतेने आमच्या बाजुने कौल दिला होता असे … Read more

त्या कारवाईअंतर्गत पोलिसांनी जप्त केला 45 लाखांचा मुद्देमाल

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-   जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने आता आक्रमक धोरण अंगीकारले आहे. दरम्यान जिल्ह्यातील एका तालुक्यात पोलिसांनी अशीच कारवाई करत तब्बल 45 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील मांजरी येथे गट नंबर 618 मधील शेतजमिनीतील शासनाच्या मालकीची माती विनापरवाना, बेकायदा उत्खनन करून वाहतूक केली … Read more

अत्याचारातील पीडित बालिकेचे पुनर्वसन

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  अकोले तालुक्यातील सामूहिक अत्याचारात बळी बालिकेचे स्नेहालय संस्थेत यशस्वी पुनर्वसन करण्यात आले. याकामी बाल कल्याण समिती आणि अकोले पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. राहता तालुक्यातील राहणारे कुटुंब रोजंदारीसाठी अकोले येथे गेले होते. येथील टाकळी व गर्दणी गावामधील विट भट्टीवर हे सर्व काम करीत होते. आई वडील वीटभट्टीवर कामाला गेले … Read more

मुसळधार पावसामुळे या तालुक्यातील रस्त्यांची झाली चाळण

अहमदनगर Live24 टीम,2 ऑक्टोबर 2020 :-  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. मात्र या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. दरम्यान या खड्यांचे लोकप्रतिनिधींनी देखील चांगलेच राजकरण केले होते. रस्त्यावरील खड्ड्यांतून मार्ग काढताना वाहनचालकांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याने वाहनेच काय; पायी चालणेही कठीण झाले आहे. शेवगाव शहर … Read more