योग्य उपचाराअभावी ‘त्या’ महिलेचा झाला मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- आरोग्य विभागाने केवळ कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यावरच लक्ष केंद्रीत केल्याने कोरोनाव्यतीरिक्त आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची हेळसांड होत आहे. अशाच हेळसांडीमुळे, शासकिय अनास्थेमुळे तालुक्यातील जवळे येथील महिलेला आपला जीव गमवावा लागला. दि. १२ सप्टेबर रोजी जवळे येथील सुनंदा दरेकर या महिलेस श्‍वसनाचा त्रास होउ लागल्याने स्थानिक डॉक्टरांनी त्यांना पारनेर येथील ग्रामिण रूग्णालयात … Read more

माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले हे सर्वसामान्यांचे नेते : माज मंत्री विनोद तावडे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- भाजप सरकारच्या काळामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी-नगर मतदारसंघामध्ये विविध विकास कामे मंजूर करुन आणली. प्रत्येक गावामध्ये शासनाचा निधी घेऊन जाण्याचे काम करत आले. कुठलाही राजकीय वारसा नसताना गेली २५ वर्षे नगर जिल्ह्याच्या राजकारणात सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे काम त्यांनी केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या बळावर त्यांनी प्रस्थापितांच्या विरोधात … Read more

कोरोनाला हरवण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  ही मोहीम सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी आहे. कोणताही नागरिक केवळ दुर्लक्षामुळे उपचारापासून वंचित राहणार नाही याची काळजी कुटुंबातील प्रत्येक सदस्याने घ्यावी. कोरोनाला हरवण्यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे प्रतिपादन स्नेहबंध फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिमेस स्नेहबंध … Read more

वंचित बहुजन आघाडीच्या नावाचा गैरवापर करणाऱ्यावर गुन्हे दाखल करणार : प्रतीक बारसे

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  महाराष्ट्रातील बहुजनची शक्ती म्हणून उदयास आलेल्या बहुजन वंचित आघाडीच्या नावाने या आघाडीला बदनाम करण्याच्या हेतूने अनेक हितशत्रूनि बहुजन आघाडीच्या नावाने व्हॉटस अँप ,ट्विटर ,फेसबुक ,इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया वरती वंचित बहुजन आघाडीच्या नावाने ग्रुप तयार केले आहेत अकाउंट उघडले आहेत आणि त्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारा विरुद्ध पोस्ट … Read more

…म्हणून राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मानले आभार !

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर महापालिकेत स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला. भाजपमधून कालच राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या मनोज कोतकर यांची स्थायीच्या सभापतीपदी वर्णी लागली. निवडणुकीत दिलेल्या पाठिंब्याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभार मानले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, मंत्री … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज तब्बल ‘इतक्या’ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज,वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रास्ता रोकोचा प्रयत्न करणार्‍या कार्यकर्त्यांना अटक

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-  केंद्र सरकारने पारीत केलेल्या शेतकरी व कामगार विधेयकाच्या निषेधार्थ भारत बंदच्या हाकेला प्रतिसाद देत भारतीय कम्युनिस्ट पक्ष, अ.भा. किसान सभा व डावे पक्षांच्या वतीने शहरातील मार्केटयार्ड चौकात निदर्शने करुन नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी पोलीसांनी आंदोलकांना अटक केली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा गळा दाबून खून, आणि नंतर कोरोनाने मृत्यू झाल्याचा बनाव ! पण शेवटी….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :-पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच तिचा गळा दाबून खून केला. तसेच नातेवाईकांना पत्नीचा करोनाने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. मात्र हा बनाव मृतदेहाच्या उत्तरीय तपासनीनंतर उघड झाला. राहुरी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, महिलेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. 23 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास राहुरी … Read more

महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती निवडीवरुन राजकीय खल सुरु झाला असून, शिवसेना उमेदवार योगीराज गाडे यांना माघारीसाठी मुंबईतून आदेश आल्याची माहिती खास सूत्रानी दिली . रात्री उशिरा एका हॉटेलमध्ये झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गाडे यानी आता अर्ज मागे घेतलण्यास ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. अहमदनगर … Read more

‘मोदी आजोबा, आता शाळेची ओढ लागली, प्लिज कोरोनाला नष्ट करा’ चिमुरडीचे मोदींना पत्र

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाने सर्वत धुमाकूळ घातला आहे. या आजाराची दहशत तरुणांसोबतच चिमुरड्यांनीही घेतलेली दिसत आहे. लहानगेही आता हा कोरोना नष्ट व्हावा यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. याचीच प्रचिती अहमदनगर मधील एका घटनेने आली. कायनेटिक चौकात राहणाऱ्या भक्ती सिद्धार्थ दीक्षित या शाळकरी विद्यार्थिंनीने थेट पंतप्रधानांना पत्र लिहून आपली व्यथा कळविली आहे. … Read more

त्याने केला ‘तसा’ फोटो व्हायरल; पोलीस पोहोचले घरी, आणि मग…

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा चांगलीच सतर्क झाली आहे. अशा काळामध्ये काही अनुचित प्रकार करणे आता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या चांगलेच अंगलट येणार येत आहे. अशीच एक घटना नुकतीच नेवासे तालुक्यात घडली. योगेश शिवाजी चावरे (वय २२, रा. नजीक चिंचोली, ता. नेवासा ) या तरुणाने हातामध्ये … Read more

खा. विखेंच्या गावात शेतकऱ्यांचं आंदोलन; घराकडे जाण्यास पोलिसांचा मज्जाव, आंदोलनकर्त्यांनी केले ‘असे’ काही ….

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- देशात लागू केलेल्या कांदा निर्यातबंदीच्या निषेधार्थ शेतकरी संघटना बुधवारी खासदारांच्या घरासमोर ”राख रांगोळी” आंदोलन करणार असल्याच इशारा आधीच संघटनांनी दिलेला होता. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असलेल्या खासदारांनी लोकसभेत आवाज उठवून निर्यातबंदीचा आदेश मागे घेण्यास सरकारला भाग पाडावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा दिला गेला होता. त्यानुसार शेतकरी संघटनेने … Read more

आमदार पाचपुते म्हणाले मी तुमच्यामागे खंबीर उभा आहे, काळजी करु नका …

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे व नगर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शासनदरबारी पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना मदत मिळवून देणार असल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी दिली. आमदार पाचपुते यांनी नगर तालुक्यातील आठवड, चिचोंडी पाटील, दशमी गव्हाण, भातोडी, पारेवाडी, पिंपळगाव लाडगा या गावांचा पाहणी दौरा केला. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, बाजरी, कांदा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ नदीकाठी तरुणाचा मृतदेह सापडला

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर गावात गोदावरी नदीकाठी तरूणाचा मृतदेह सापडला. मृताचे वय सुमारे ३५ वर्षे असून तोंडाला मास्क, अंगात टी शर्ट, काळे बनियन, राखाडी रंगाची बर्मुडा पँट असा पेहराव आहे. हवालदार नवनाथ बर्डे, कॉन्स्टेबल संदीप पवार, होमगार्ड अजय सोनवणे यांनी ग्रामस्थ व पोलिस पाटील यांच्या मदतीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी … Read more

आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गुरूवारी आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आणखी ७७८ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. नगर जिल्ह्याची वाटचाल आता ४० हजारांच्या टप्प्याकडे सुरू झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३१, खासगी प्रयोगशाळेत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ७०, संगमनेर १, राहाता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘या’ धरणात पोलीस वाहून गेला !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणात लोहमार्ग पोलीस वाहून गेल्याची घटना आज सायंकाळी घडली. गणेश दहिफळे असे वाहून गेलेल्या लोहमार्ग पोलीस कर्मचार्‍याचे नाव आहे. रात्री उशिरापर्यंत धरणातील पाण्यात त्यांचे शोधकार्य सुरू होते. गणेश दहिफळे हे आपल्या काही मित्रांसमवेत मांडओहोळ धरणालगत असलेल्या रुईचोंडा धबधबा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. मित्रांसमवेत दहिफळे धबधब्यालगत फिरत … Read more

पोलीस अधिक्षकांची एन्ट्री लांबणीवर ‘हे’ आहे कारण !

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  नगरचे नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांची अवघ्या पाच महिन्यातच शासनाने बदली केली असून त्यांच्या जागी सोलापूर येथील मनोज पाटील यांची नियुक्ती केली होती. सोलापूर ग्रामीणचे एसपी मनोज पाटील यांची नगरला एसपी म्हणून बदली झाली. पण त्यांच्या जागेवरही नव्या एसपींची नियुक्ती झालेली नाही. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : चोवीस तासांत वाढले इतके रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,24 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ६४४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४ हजार ७६९ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७७८ ने वाढ झाली. … Read more