राहुरी शहरात लॉकडाऊन; नागरिकांचा स्वेच्छेने उदंड प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर, श्रीरामपूर हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले. ग्रामीण भागातील अनेक तालुके आता कोरोना आपल्या विळख्यात घेत आहे. राहुरी तालुक्यातील अनेक गावात कोरोनाचे रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील व्यापारी संघटना व सर्वपक्षीय नागरिकांच्यावतीने करण्यात आलेल्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनला काल राहुरी … Read more

आ. जगताप यांच्या मध्यस्थीने चिघळण्यापूर्वीच मिटला बुरूडगावकरांचा ‘तो’ प्रश्न

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-  बुरूडगाव ग्रामपंचायतीचे अनेक प्रश्न आणि समस्या अशा आहेत कि ज्याची अनेक वर्षांपासून वारंवार मागणी होऊनही त्या समस्या सुटताना दिसत नाहीत. आधी मनपात आणि पुन्हा ग्रामपंचायत यामध्ये भरडल्या गेलेल्या बुरूडगावच्या अनेक समस्या आहेत. त्यामुळे आता बुरूडगावकरांनी आक्रमक होत, ‘नगर शहरातील गटार गंगेचे पाणी सीना नदीत सोडले जाते.त्या पाण्यामुळे आमची शेती … Read more

‘ह्या’ आमदारांची पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. जामखेड आणि कर्जत तालुक्यात तसेच राहुरी, श्रीरामपूर तसेच नगर शहरातही जोरदार पाऊस पडला. परंतु पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री वादळी वार्‍यासह जोरदार पावसामुळे खरीप पिके भुईसपाट झाले आहेत. यामुळे शेतकर्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. … Read more

‘लॉकडाऊनला प्रतिसाद द्या अन आपल्या कुटुंबाचे रक्षण करा’

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेर हा कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला. त्यानंतर आता श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना म्हणून रविवार दि. 13 ते 20 सप्टेंबरपर्यंत होणार्‍या सर्वपक्षिय श्रीरामपूर लॉकडाऊनला प्रतिसाद देऊन आपले व आपल्या कुटुंबाचे रक्षण करावे … Read more

भयानक…नगरमधील हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची कमतरता, व्यापार्‍यांकडून काळाबाजार

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात कोरोचे रूग्ण वाढत असल्याने रूग्णालयांमध्ये ऑक्सिजनची मागणी चौपट वाढली आहे.  परंतु, नगरमधील हॉस्पिटलना अपुरा ऑक्सिजन पुरवठा होत असल्याने व्यापार्‍यांकडून ऑक्सीजनचे भाव अव्वाच्या सव्वा वाढवून काळाबाजार सुरु केला आहे.  याबाबत आय.एम.ए.च्या नगर शाखेने वेळोवेळी प्रशासनाला अवगत करून ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व मुबलक करण्याची मागणी केली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८० ने … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ७०६ रुग्णांना डिस्चार्ज

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-आज ७०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मनपा २०२ संगमनेर ७१ राहाता ६० पाथर्डी ४३ नगर ग्रा. ३५ श्रीरामपूर २४ कॅन्टोन्मेंट १४ नेवासा ४४ श्रीगोंदा २७ पारनेर २६ अकोले ४२ राहुरी ३० शेवगाव ११ कोपरगाव ३९ जामखेड १९ कर्जत १७ इतर जिल्हा ०२ एकूण बरे झालेले रुग्ण:२५४३७ आमच्या इतर बातम्या … Read more

‘पहाटेचा शपथविधी चालतो मग नोटीस देऊन अवैध बांधकाम पाडण्यात गैर काय’; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- मागील काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि शिवसेना यांमध्ये वाक्युद्ध रंगले आहे. कंगनाने अनेक आरोप शिवसेना आणि राज्य सरकारवर केले. त्यातच तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अरेतुरेची भाषा करत टीका केल्यांनतर मात्र कंगनावर टीकेची झोड उठली. याचा निषेध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेतर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. कंगना विरूद्ध गुन्हा … Read more

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन होणार ? वाचा काय म्हणाले आरोग्यमंत्री टोपे..

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- महाराष्ट्रात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेक बळी या आजाराने घेतले असून आर्थिक घडी विस्कटून लावली आहे. आज अनेक देश यावर लस शोधण्यासाठी कार्य करत आहेत. परंतु सध्या लस नसल्याने, संपर्ग टाळणे, मास्क, सॅनिटायझर वापरणे, सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे आदी गोष्टी सर्वानी पाळणे फायद्याचे ठरणार आहे. असे आरोग्यमंत्री राजेश टोपे … Read more

मोठी बातमी: ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात मोठा निर्णय ; आरोग्यमंत्र्यांची ‘ही’ माहिती

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- कोरोनाने देशभर धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या वाढत्या आणि जास्त रुग्णसंख्येला ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी राज्याने महत्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. ते म्हणाले, ‘महाराष्ट्रात जे काही ऑक्सिजन … Read more

लॉकडाऊनबाबत जनता काय निर्णय घ्यायचा तो घेईल, मात्र आरोग्य सेवेचे काय?

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर शहर सात दिवस लॉकडाऊन करण्याबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय झाला, मात्र त्यानंतर मतमतांतरे सुरू झाली. सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण करण्यात ताकद वाया घालवण्यापेक्षा जनतेला उपचार सुविधा, रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी ताकद लावणे गरजेचे आहे, असे सर्वसामान्यांना वाटते. श्रीरामपूर शहर १३ ते २० सप्टेंबरदरम्यान लॉकडाऊन ठेवण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. मात्र, या मुद्यावरून … Read more

कुटुंबीय झोपेत असतानाच तिला पळवण्यात आले…

अहमदनगर Live24 टीम,12 सप्टेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील देसवडे व सारोळा आडवाई येथून १७ वर्षांच्या दोन मुली बेपत्ता झाल्या. शेरी कासारे येथून ३ सप्टेंबरला १७ वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची फिर्याद तिच्या वडिलांनी दाखल केली होती. या मुलीचा शोध सुरू असतानाच देवसडे व सारोळा आडवाई येथूनही दोन मुलींचे अपहरण झाल्याने पोलिस चक्रावले आहेत. देसवडे येथील मुलीचे २ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गेल्या चोवीस तासांत वाढले ८५६ कोरोना रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज ५८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४ हजार ७३१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.७९ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८५६ ने वाढ … Read more

हे आहेत आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कारार्थींच्या यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या यादीला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नुकतीच मान्यता दिली आहे. दरवर्षीच शिक्षकदिनी या पुरस्कारांचे वितरण केले जाते. मात्र, यंदाच्या वर्षी कोरोना असल्यामुळे पुरस्कारांचे वितरण झालेले नाही. या पुरस्कारांचे लवकरच वितरण करण्यात येणार … Read more

कोरोनाग्रस्त बँक कर्मचाऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोना महामारीत सेवा देणार्‍या बँक कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली असून, सदरील कर्मचार्‍यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन जिल्ह्यातील सर्व सहकारी बँकांना पाठविण्यात आल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष धनंजय भंडारे यांनी दिली. बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवेत येत असल्याने सर्व … Read more

लवकर निर्णय घ्या, अन्यथा साईमंदिर खुले करू

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोना विरुद्ध सुरु असलेला लढा कधी कंगणा विरुद्ध होऊन गेला कळलंच नाही. कंगना विरुद्ध सुरु असलेल्या वादावरून जिल्ह्याचे खासदार सुजय विखे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. राज्य सरकारने कंगनासोबत भांडण्याऐवजी साई मंदिर खुले करून येथील रोजीरोटी सुरू करावी, अशी मागणी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केली आहे. या … Read more

आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  कोरोनाच्या या महामारीत कोरोना योध्याबरोबरच आशा सेविका देखील सहभागी होऊन गावपातळीवर काम करत आहे. मात्र कामाच्या तुलनेत त्यांना दिला जाणार मोबदला ऐकला तर तुम्हाला देखील नवलच वाटेल. कोरोना सर्व्हेचा पुरेसा मोबदला न देता आशा सेविकांना प्रतिदिन केवळ 33 रुपये व आशा गट प्रवर्तकांना प्रतिदिन 16 रुपयात राबवून घेतले जात … Read more

या ठिकाणची एमआयडीसी आठ दिवसांपासून पाण्याविना

अहमदनगर Live24 टीम,11 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात सर्वदूर पावसाने चांगलीच हजेरी लावली असून जिल्ह्यातील धरणसाठ्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. धरणांची पाणीपातळी वाढलेली असताना एक एमआयडीसी चक्क आठ दिवसांपासून पाण्याविना आहे. पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीतील पाणीपुरवठा गेल्या आठवडाभरापासून बंद झाल्याने कारखान्यांना जादा पैसे देऊन पाणी घ्यावे लागत आहे. त्याचा परिणाम उत्पादन व निर्मितीवर होत आहे. … Read more