टेम्पोचे चाक निखळले अन त्या चाकाने ७० फुटांवरील युवकाचा घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर – औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथे झालेल्या विचित्र अपघातात युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या महामार्गावरून ४०७ टाटा टर्बो टेम्पो भाजीपाला घेवून जात असताना टेम्पोचे चालते चाक निखळले. निखळलेले चाक सुमारे ७० फुटावर वेगाने धावत जावून रस्त्याच्या बाजूला बसलेल्या युवकाच्या डोक्यावर जावून आदळले. यात त्या युवकच मृत्यू … Read more

ट्रॅक्टरच्या धडकेत रांजणगाव मशिदच्या युवकाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- पारनेर तालुक्यातील हत्तलखिंडी ते वडझिरे जाणारे रोडवर पुलाजवळ हत्तलखिंडी शिवारात ट्रॅक्टरच्या धडकेने एकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर इसम रांजणगाव मशिद येथील रहिवासी असून प्रशांत विजय गाढवे असे त्याचे नाव आहे. सदर घटना 16 मार्च रोजी 4.30 वाजता सदर घटना घडली होती.फिर्यादीनुसार गुरुवार दि.3 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल … Read more

पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबियाना 5 लाख रुपयांची मदत !

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- टीव्ही 9 चे पत्रकार व हंगेवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगरचे सुपुत्र स्व. पांडुरंग रायकर यांचे कोरोना मुळे पुणे येथे निधन झाले. स्व.पांडुरंग रायकर यांना वेळेत व्हेंटलेटर न मिळाल्यामुळे अहमदनगर जिह्याचा सुपुत्र व धाडशी पत्रकार यांचे निधन झाले आहे. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री ना.प्रा.राम शिंदे यांनी सांत्वनपर कुटुंबाची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज ८३ रुग्ण वाढले वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६३८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार ७१० इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८३ ने … Read more

अत्यंत संतापजनक माहिती : अहमदनगरकरानों भाजपने जो खोटेपणा केलाय तो वाचून तुम्हाला धक्काच बसेल….

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :- अहमदनगरमध्ये भाजपाची भलतंसलता गवगवा करण्याची पद्धत उघड झाली आहे. करायचे एकाने आणि श्रेय घ्यायचे भाजपने अशीच काहीशी वृत्ती यातून समोर आली आहे. महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नटराजमधील कोवीड सेंटर सुरु केले. परंतु ते भाजपने सुरु केले असा गवगवा सगळीकडे करण्यात आला. सेंटर भाजपाने सुरू केल्याच्या जाहिराती सोशल मीडियावर फिरत … Read more

जिल्ह्यातील या माजी आमदाराला कोरोनाची लागण

अहमदनगर Live24 टीम,6 सप्टेंबर 2020 :-  जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असून अनेक नेते पदाधिकार्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना कोरोनाची लागण झाली असून ते सध्या श्रीरामपुरातील संतलुक येथील कोरोना उपचार केंद्रात उपचार घेत आहेत. याबाबत समजलेली माहिती अशी कि, आ. भाऊसाहेब कांबळे यांना ८ दिवसापूर्वी थोडासा त्रास वाटू लागल्याने … Read more

इकडे लोक मारतायत.. मात्र यांचा पब्लिसिटी इव्हेंट चालू

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप हा विषय नेहमीच चर्चेचा बनतो. त्याचप्रमाणे नगर जिल्ह्यातील माजी मंत्री यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर थेट निशाणा साधला आहे. ‘सरकारमध्ये काम करणाऱ्या सत्ताधारी पक्षातील लोकांचा केवळ पब्लिसिटी इव्हेंट चालू आहे. त्यांना जनतेची काळजी नाही. जिल्ह्यावर कोरोनाचे एवढे मोठे संकट असताना जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा सगळा वेळ … Read more

आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- शेवगाव-पाथर्डी मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. शुक्रवारी पाथर्डी येथील श्रीतिलोक जैन विद्यालयात राजळे यांच्या घशातील स्त्राव घेवुन चाचणी करण्यात आली. शनिवारी त्याचा अहवाल पाँझीटीव्ह आला आहे.  विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या सर्व आमदारांनी कोरोनाची टेस्ट करून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या नुसार शुक्रवारी ४ … Read more

या शिक्षकाचा संघर्ष ऐकून डोळ्यात येईल पाणी

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – शिक्षण देऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशाची शिखरे पार करण्यासाठी हातभार लावणारे शिक्षक आपण सर्वानी पाहिले असतील. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत त्याच्या आयुष्याची गाडी रुळावर आणण्यासाठी शिक्षक हे मेहनत घेत असतात, मात्र आज एका शिक्षकाला स्वतःचा आर्थिक डोलारा रुळावर यावा यासाठी न्यायालयाच्या खेट्या माराव्या लागत आहे. कोतूळ … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्येने ओलांडला 25 हजारचा आकडा !

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.१८ टक्के इतके झाले आहे.  दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८९९ ने … Read more

पोलिसांकडून ‘या’ कुख्यात गुंडाना अटक

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – सावेडी येथील कविजंग नगर कळमकर हॉस्पिटलच्या समोर जमिनीच्या ताबा घेण्यासाठी आलेला कुख्यात गुंड व लँड माफिया दिशान शेख याला फिर्यादी नाजीश अरबाज शेख याच्या तक्रारीवरुन तोफखाना पोलीसांनी आज (दि.5 सप्टेंबर) रोजी अटक केली. नाजीश शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, दिशान शेख व त्यांच्या साथीदार सदर … Read more

स्थानिक भूमिपुत्रांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळली

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   नगर – एमआयडीसी येथील क्लासिक व्हील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून कामगार कायदे पायदळी तुडवून ठेकेदार पध्दतीने परप्रांतीय कामगारांची भरती केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला आहे. कंपनीच्या या मनमानी कारभाराच्या विरोधात मनसे कामगार सेनेच्या वतीने कंपनीचे गेट बंद करुन आंदोलन केले जाणार असल्याचा इशारा … Read more

जिल्ह्यातील या गावात आजपासून जनता कर्फ्यु

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-   अकोले – जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची वाढती आकडेवारी पाहून प्रशासनाला चांगलाच घाम फुटला आहे. वाढत्या रुग्ण संख्येबरोबरच जिल्ह्यात दररोज मृतांच्या आकडेवारी मध्ये देखील वाढ होत असलेली पाहायला मिळत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोरोनाने आजही थैमान घातले असून आज अकोल्यातील राजूर येथे 66 संशयित रुग्णांची तपासणी केली होती. … Read more

नगर जिल्ह्यातील ‘हे’ हत्याकांड पुन्हा चर्चेत

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :- नगर – नगर जिल्ह्यात अनेक हत्याकांड प्रकरणे गाजली असून काहींचा उलगडा झाला व काही अद्यापही प्रलंबित आहे. जिल्ह्यातील अशाच एका हत्याकांडाची चर्चा पुन्हा होऊ लागली आहे. प्रेम प्रकरणातून निघोज (ता. पारनेर) येथील अक्षय उर्फ किरण लहू पवार या युवकाची हत्या झाली असताना आरोपींना अटक करण्यास पोलीस प्रशासन निष्फळ ठरत … Read more

….म्हणून गुरुजींनी धाडले शिक्षण मंत्र्यांना पत्र

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  प्रत्येकाच्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षक हे व्यक्तिमत्व नेहमीच आदरस्थानी राहिले आहे. मात्र आज शिक्षणदिन असून आजच्याच दिवशी गुरुजींना आपल्या मागण्यांसाठी शासन दरबारी पत्र धाडवे लागले आहे. शिक्षकांचे प्रश्‍न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी शिक्षकदिनी शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर, प्राध्यापकेतर कर्मचारी काँग्रेस महासंघ व कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्फत शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई … Read more

लोकप्रिय सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे आकस्मित निधन

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्हा पोलीस मुख्यालयात ट्रेनिंग मास्तर म्हणून सर्वपरिचित झालेले आणि नगरसह कोपरगाव राहुरी, पारनेर या तालुक्यात प्रदीर्घ सेवा बजावलेले सेवानिवृत्त सहा.फौजदार मच्छिंद्र कुसळकर यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले. युवान संस्थेचे संस्थापक संदिप कुसळकर आणि जिल्हा पोलीस विशेष शाखेतील कर्मचारी प्रविण कुसळकर यांचे ते वडिल होते.मूळचे पाथर्डी तालुक्यातील कोळसांगवी गावचे … Read more

संभाजी बिडी वरून आ.रोहित पवार झाले आक्रमक म्हणाले महाराजांच्या….

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा असा गैरवापर करणं अक्षम्य चूक आहे.  लोकभावनेचा विचार करुन संबंधित कंपनीने छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने पुण्यातील एक कंपनी बिडी उत्पादन करतेय. महापुरुषांच्या नावाचा … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज सकाळीच वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर माहिती

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ … Read more