या ठिकाणी केली मुस्लिम युवकाच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापणा

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- यंदा हिंदूंचा गणेशोत्सव व मुस्लिम समाजाचा मोहरम हे दोन महत्वाचे व मोठे सण एकाच वेळेस आले आहेत. या काळात हिंदू मुस्लीम समाजात जातीय सलोखा राहावा यासाठी चौपाटी कारंजा मित्रमंडळाच्यावतीने शनिवारी सायंकाळी मुस्लीम युवकाच्या हस्ते गणेशाची छोटीशी मिरवणूक काढण्यात आली. चौपाटी कारंजा चौकातील श्री दत्त मंदिरात कोणताही जल्लोष न … Read more

आजपासून अहमदनगर महापालिकेची कार्यालये उघडणार !

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2020 :- महापालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाल्यानंतर ‘वर्क फ्राॅम होम’ सुरू केल्यामुळे मनपाची कार्यालये अघोषित बंद होती. सोमवारपासून ५० टक्के कर्मचारी कार्यालयात हजर राहणार राहून कामकाज करणार आहेत, परंतु नागरिक व ठेकेदारांना प्रवेश बंद नसेल, असे कामगार युनियनने स्पष्ट केले. मनपाचे ४० ते ५० कर्मचारी, तसेच अधिकाऱ्यांना कोरोनाची … Read more

बिग ब्रेकिंग : महानगर बँकेकडून खातेदाराची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज नव्या ५६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ७८.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५६६ ने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याला हादरवणार्या हत्याकांडचा अखेर पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चार जणांच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र हे हत्याकांड खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष व त्यानंतर झालेल्या वादातून घडले असल्याची माहिती आता समोर आली आहे. खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगावातील पाच जणांना अहमदनगर येथील तरुणाने बोलावून घेतले. सोने न … Read more

कोरोनामुळे मरणानंतरही सुटका नाही ! वाचा काय होतोय हे अहमदनगरमध्ये …

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सध्या अहमदनगर शहरात कोरोनाचा चांगलाच फैलाव झाला आहे, कोरोना रुग्णांना बेड उपलब्धतेसाठीही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अक्षरशः मरणानंतरही त्रासातून सुटका होत नसून अंत्यसंस्काराविना मृतदेह दोन तीन दिवस जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात ठेवावे लागत आहेत. कोरोना मयतांवर विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्याचे शासनाचे आदेश आहेत. नगरच्या अमरधाममध्ये एकच विद्युतदाहिनी … Read more

जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख घडवणार जिल्ह्यात राजकीय भुकंप !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढील आठवड्यात माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र म्हस्के, बाजार समितीचे माजी उपसभापती वैभव पाचपुते अन्य दहा बारा कार्यकर्ते मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधणार आहेत. शनिवारी राजेंद्र म्हस्के व वैभव पाचपुते यांनी सोनईत प्रशांत गडाख यांच्याशी चर्चा केली … Read more

ग्रामपंचायत कर्मचारी यांची वेतन कपात करणारा शासननिर्णय रद्द करावा यासाठी आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  28 एप्रिल 2020 चा शासन निर्णय रद्द करुन शासनमान्य वेतन 100 टक्के शासनानेच अदा करणे आवश्यक आहे. या मागणीसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी 10 जुलै रोजी महाराष्ट्रव्यापी आंदोलन केले. आता पुन्हा याच मागणीसाठी 28 ऑगस्ट 2020 रोजी महाराष्ट्र व्यापी संप/ कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे … Read more

बिग ब्रेकिंग : प्रशासन खासदार सुजय विखे यांच्यावर कारवाई करणार ?

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- सध्या जिल्ह्यात के.के. रेंज लष्कराच्या जागेचा प्रश्न चांगलाच पेटला आहे, आज खासदार सुजय विखे यांनी याबाबत बैठक घेतली, मात्र या बैठकीला कोणतेही नियम न पाळता सरकारने दिलेले नियम पायदळी तुडवले जात असल्याचे दिसून आलं आहे. खासदार विखे यांनी गेल्या एक महिन्यापासून जिल्हाधिकारी तसेच प्रसार माध्यमातून नगर जिल्हा लॉकडाऊन … Read more

कुकडी प्रकल्पाचे ओव्हर फ्लोचे पाणी विसापूर मध्ये

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  सद्या मोठया प्रमाणात सर्वत्र पाऊस पडत असल्याने कुकडी प्रकल्पात ही पाण्याची चांगली आवक होत असल्याने अधिका-यांनी कुकडी प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या ओव्हरप्लो पाण्याचा लाभक्षेत्रातील शेततळी, साठवण तलाव, पाझर तलाव, व इतर तलावामध्ये पाणी साठवून ठेवावे व या चालू असलेल्या पाण्याचा जास्तीत जास्त उपयोग करून. ओव्हरप्लो च्या पाण्याचा चांगला पद्धतीने … Read more

आरोप-प्रत्यारोप करणाऱ्यांना आपण माफ करणार नाही – खासदार डॉ.सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  के.के. रेंजच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर कुणी राजकारण करत असेल तर त्याला आपण माफ करणार नसल्याचा इशारा देत येत्या पाच वर्षात हा प्रश्न कायमस्वरूपीचा मार्गी लावण्याचे आश्वासन देत समितीच्या मागणीचे निवेदन लोकसभेच्या येत्या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात येणार आहे. वेळप्रसंगी याच प्रश्नावर न्यायालयात देखील जाण्याची आपली तयारी असल्याचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १३ हजार ४७८ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे ८० टक्क्यांहून अधिक असून ते आता ८१.२७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ … Read more

…अशी वेळ कोणावरही येवू नये.. राजकिय नेत्यांच्या वडिलांचे झाले कोरोनामुळे निधन,कोरोनाबाधित मुलालाच करावे लागले….

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  कोरोना मुळे अहमदनगर जिल्ह्यातील सध्याची स्थिती भयावह आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १६५०८ व्यक्तींना कोरोनाची लागण झालीय आणि तब्बल २२६  रुग्णांना जीव गमवावे लागले आहेत.  अशातच कोरोनामुळे मरण पावलेल्यांवर अंत्यसंस्कार करायचे कसे…? करायचे कोणी? हे प्रश्न तालुकास्तरावर प्रशासकीय यंत्रणेत समन्वय नसल्याने भेडसावत आहेत. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना मृत … Read more

अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ४२४ रुग्णांना डिस्चार्ज. मनपा १९७ संगमनेर २९ राहाता ९ पाथर्डी ८ नगर ग्रा.३७ श्रीरामपूर १२ कॅन्टोन्मेंट१४ नेवासा १३ श्रीगोंदा१९ पारनेर ३० राहुरी ७ शेवगाव १२ कोपरगाव१७ जामखेड २ कर्जत १८ बरे झालेले एकूण रुग्ण:१३४७८ आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो … Read more

बिग ब्रेकिंग : त्या खून प्रकरणातील पाच संशयित ताब्यात !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :-  स्वस्तात सोने घेण्यासाठी विसापूरफाटा येथे आलेल्या जळगाव जिल्ह्यातील अज्ञात व्यक्तींनी ‘सोने’ देणाऱ्या चौघांना गुरुवारी धारदार शस्त्राने ठार केले. यातील पाच संशयितांना गुन्हे अन्वेषणच्या पथकाने शनिवारी पहाटे पुण्यात ताब्यात घेतले. कोट्यवधी किमत असलेले गुप्तधन अवघ्या काही लाखांत घेण्यासाठी जळगावचे लोक आले होते. आपली फसवणूक होण्याच्या शक्यतेने ते हत्यारबंद होते. … Read more

एका दिवसात झाला ‘इतक्या’ जणांचा मृत्यू वाचा अहमदनगर कोरोना अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात गेल्या २४ तासांत कोरोनामुळे आठ जणांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या २२६ झाली आहे. दरम्यान, दिवसभरात नवे ६०३ रुग्ण आढळले. त्यामुळे रुग्णांची संख्या झाली १६ हजार ५०८ झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या कोवीड चाचणी प्रयोगशाळेत ११५, अँटीजेन चाचणीत २८८ आणि खासगी प्रयोगशाळेत २०० बाधित आढळले. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- पुणतांबे रस्त्यावर गोंडेगावनजीक पिकअप, इंडिका व्हिस्टा आणि टीव्हीएस स्टार मोटारसायकलीचा शनिवारी तिहेरी अपघात होऊन ३ लहान मुलांसह १० जण जखमी झाले. नेवासे येथील इंडिका (एमएच १३ एक्यू ०२३३) श्रीरामपूरहून पुणतांब्याकडे जात होती. कारमध्ये सात प्रवासी होते. टीव्हीएस स्टार (एम एच १७ सीके ८८८४) मोटारसायकलीवर दोन महिला व एक … Read more

अभिमानास्पद कार्य : हिंदू मुलींच्या विवाहात त्यांच्या मागे उभा राहिला मुस्लिम मामा !

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- हिंदू आणि मुस्लिम या धर्मियांमधील ‘बंधुत्वा’चे नाते सांगणाऱ्या सकारात्मक घटनाही देशात घडत आहेत. बोधेगाव येथील बिकट परिस्थिती असलेल्या कुटुंबांतील दोन मुलींचे कन्यादान घरासमोर राहणाऱ्या आणि लहानपणापासून मामाची भूमिका बजावणाऱ्या बाबाभाई या मुस्लिम युवकाने केले.  विशेष म्हणजे या मुस्लिम मामाने दोन्ही नववधू बहिणींचे कन्यादानही केले. ‘माणुसकीचा धर्म अन् धर्मापलिकडचं … Read more